पाहून वाट शेवटी पुढे निघून गेलो
मी माझे आयुष्य थोडे जगून गेलो
थांबण्याचा शब्द होता जरी दिलेला
पावलांचे ऐकून बेवफा वागुन गेलो
गुस्ताख आठवणींचे वादळ आंधळे
आधार काडीचा घेऊन तगून गेलो
शब्दांत माझी शिस्त मी सांभाळलेली
पण आज बेशिस्त थोडी भोगून गेलो
- शैलेंद्र
प्रतिक्रिया
14 Aug 2016 - 2:19 pm | Bhagyashri sati...
आयुष्याचं थोडक्यात दर्शनच घडवून टाकलं की राव :)
14 Aug 2016 - 5:43 pm | शैलेन्द्र
धन्यवाद, गजल लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न
14 Aug 2016 - 5:44 pm | अभ्या..
सुपर सर, सुपर
14 Aug 2016 - 6:06 pm | पद्मावति
मस्तं!
14 Aug 2016 - 10:36 pm | एस
मीटर लईच बिघडलंय. भावना छान आहे.
15 Aug 2016 - 9:49 am | शैलेन्द्र
बरोबर, योग्य शब्द सापडले नाहीत
15 Aug 2016 - 9:49 am | शैलेन्द्र
बरोबर, योग्य शब्द सापडले नाहीत
2 Sep 2016 - 8:16 pm | ज्योति अळवणी
भावना सुंदर व्यक्त केल्या आहेत