आज मिसळपाव वरील एक चर्चा वाचल्यानंतर हे लिहावेसे वाटले.
आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो?
माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने.
मेडीकल सायन्स (मानवाच्या जीनचा संगणक आराखडा तयार होणे), संगणक, अंतराळ, इ अनेक क्षेत्रातील भरारी थक्क करते.
ह्यात भारतीयांचा वाटा जो काही आहे त्याबद्दल वेगवेगळी मते असू शकतील, पण सगळेच मान्य करतील की, सकाळी डोळे उघडल्यापासून "टूथपेस्ट" पासुन सुरु होणारा आपला प्रवास रात्री "लाईट स्विच-ऑफ" करे पर्यंत जे काही आपण करतो त्यात अनेक तंत्र हे मुळ भारतीय शोध नाही. पण ह्यासगळ्या झाल्या वस्तु (things). मग भारतीयांनी जगाला काय दिले?
भारतीय संस्कृतीत पुर्वीपासुनच मानवाच्या मनाचा, शरीराचा (आयुर्वेद), आरोग्याचा (योग), विश्वाचा, निसर्गाचा, जगण्यासंबधी नियमांचा (वेद), संस्कृतीचा (विवाहसंस्था, सण, शेती, काव्य, संगीत, साहित्य, काम, शिल्पकला, चित्रकला, इ) सर्वांगीण अभ्यास झाला व त्यामुळे जंगली माणूस, "मानव" झाला. ती सर्व तत्वे आजही तितकीच लागू पडतात. ती rock-solid priciples आहेत. माणूस म्हणून माणसाने कसे जगावे हेच भारतीयांनी जगाला दिले. आणि हाच तो महत्वाचा फरक मला नेहमीच पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीत दिसत आला आहे.
त्यामुळे २१ व्या शतकात जायचे असेल असेल तर त्याचा अर्थ इतर संस्कृतींची नक्कल करणे ह्यात पुढारलेपण नसुन, त्या विज्ञानात प्रगत झालेल्या समाजाने जे शोध लावले तसे नवे शोध भारतीयांनी लावायला हवेत. त्यासाठी आपली मुळ संस्कृती (वर वर्णन केलेली) सोडण्याचे प्रयोजन मला तरी दिसत नाही. दोहोंचा योग्य संगम (त्यांचे विज्ञानज्ञान + आपली संस्कृती) आपल्याला जगात सर्वोत्तम करु शकते.
सकाळी ६ वाजता आपण भजन, इ न ऐकता जर आयटम सॉंग ऐकले तर त्याचा तिटकारा येतो. "प्रेम" इश्वरावरील असेल तर ती पवित्र भक्ती असते आणि मानवाच्या देहावर असेल तर भावना असते. आपल्याला सकाळी ६ वाजता इश्वरभक्तीची आस असते; आयटम सॉंगमधून व्यक्त होणाऱ्या भावनेची नसते, हे त्या तिटकाऱ्याचे कारण असते. हे आपल्या मनाला समजते तेच भारतीय संस्कृतीचे आपल्याला देणे.
प्रतिक्रिया
1 Feb 2009 - 1:10 pm | विनायक प्रभू
रॉक शॉलेट्ट प्रिन्सिपॉल
1 Feb 2009 - 2:18 pm | अविनाशकुलकर्णी
मला असे वाटते कि भारतिय संस्क्रुतिने माणसाला पशु बनवले होते.....जन्मावर आधारित जातिव्यवस्था, बहुजन समाजाला मुलभुत मानवि हक्कापासुन वंचित ठेवणे..अंधश्रध्धेचे समाजरोपण करुन देवा धर्माचा धाक घालुन त्याम्च्या संपत्ति/बायका उपभोगणे..अनंत अत्याचार दलितांवर.. विज्ञान द्रुश्टीचा अभाव, परदेश गमन केले तर....शिक्षा,..स्त्रियांना अधिकारापासुन वंचित, केशवपन,सति असे अघोरि प्रकार....ईंग्रजांचे राज्य आले अन प्रकाश पडला..कायद्याचे राज्य आले...विज्ञान युगाचि ओळ्ख झाली....आणि सारे हळुहळु बदलु लागले..बहुजन समाजातिल समाज सुधारकांनि क्रंति केली.
1 Feb 2009 - 3:30 pm | त्रास
"ईंग्रजांचे राज्य" हा शब्दप्रयोगच असा वापरता येईल- "ईंग्रजांचा व्यवसाय". त्यांनी शेवटपर्यंत सगळ्या जगात फक्त व्यवसायासाठी आक्रमणे केली. त्यांची ब्रांच ऑफिसे, हेड ऑफिस, बिझनेस प्रोसेस, ई त्यांनी निर्माण केले व लोकांना ट्रेनिंग दिले. त्यालाच तुम्ही "प्रगती" म्हणता आहात का? असेलही.
(मी इतिहास्कार नाही; मला जे वाचून माहित आहे ते असे-) सुरतेच्या वखारीनंतर त्यांनी तंजावूर भागात त्यांनी जम बसवला. तेथे कर वसुलीसाठी स्थानिक जमीनदारांना नेमले गेले व स्थानिकांनी त्यांचा फायदा पाहून ते मान्याही केले.
तेच मॉडेल त्यांनी बिहारला वापरले व त्यांना जम बसवण्यासाठी स्थानिकांची मदत मिळु लागली. प्रत्यक्ष जाउन कर वसुलीपेक्षा त्रयस्थांकडून मदत केव्हांही चांगलीच होती त्यांच्यासाठी.
वरील मॉडेल देशात सगळीकडे वापरले जाउ लागले. काही ठिकाणी प्रांत साहेब ते काम करु लागले. त्यांनी ज्यासुधारणा केल्या त्या तमाम भारतीय जनते साठी नव्हत्या- त्या त्यांचा बिझनेस चांगला चालावा म्हणुन केल्या होत्या.
3 Feb 2009 - 8:05 am | विटेकर
संस्कृती म्हाणजे काय कळतयं का आपल्याला?
प्रत्येक संस्कृतीमध्ये चांगल्या- वाईटाचे मिश्रण असते, १९२९ पर्यंत इंग्लंड मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता हे तुम्हाला माहित आहे का? चालले इंग्रजांचे गुणगान करायला....!
ज्या संस्कृतीने सार्या जगाला शांततेची आणि सद्भावनेची शिकवण दिली त्याबद्द्ल बोलताना जरा विचार करायला हवा होता, कि उचलली जी भ लावली टाळ्याला?
आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!
3 Feb 2009 - 8:38 am | सुचेल तसं
तसेच,
अमेरिकेत ओबामांनी कार्यभार सांभाळल्यावर, स्त्रियांना पुरुषांइतकाच पगार मिळाला पाहिजे हा ठराव मांडला. (तो ठराव पास झाला की नाही ते माहित नाही.)
Life is what happens to you while you are busy making other plans.
-- John Lennon
1 Feb 2009 - 2:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मग भारतीयांनी जगाला काय दिले?
संपूर्ण भारतीय बनावटीची जी.एम.आर.टी. दुर्बिण. जी.एम.आर.टी.ची वेबसाईट आणि त्यावर मराठीतला एक लेख.
शून्य.
इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉन्सशिवाय अजूनही काही मूलभूत कण असू शकतील याचं प्रेडिक्शन.
रामन इफेक्ट.
अजून चिक्कार गोष्टी आहेत, पण टंकाळाही आहे.
दोहोंचा योग्य संगम (त्यांचे विज्ञानज्ञान + आपली संस्कृती) आपल्याला जगात सर्वोत्तम करु शकते.
'गजनी' पिच्चरमधलं एक वाक्य फार आवडलं, "अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे आणि त्या दुसर्या गोष्टीची काही गरज नाही." (या वाक्यालाही भारतीय म्हणायला हरकत नाही, एका भारतीयानेच 'गजनी'चे संवाद लिहिले असावेत.)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
1 Feb 2009 - 3:04 pm | त्रास
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे"
ह्यासम वाक्य इंटेलिजन्स आणि विसड्म ह्यातील फरक दाखवण्यासाठी नेहमी वापरला जातो. कदाचित ह्यावाक्यात् वरील वाक्याचे मुळ दडले असावे-
""Intelligence tells you what the problem is and how to solve it, wisdom tells you whether or not you should."
1 Feb 2009 - 3:13 pm | त्रास
"संपूर्ण भारतीय बनावटीची जी.एम.आर.टी. दुर्बिण. जी.एम.आर.टी.ची वेबसाईट आणि त्यावर मराठीतला एक लेख."
मला ही प्रतिक्रीया तुम्ही जे म्हणताय ते खोडून काढण्यासाठी लिहायची नाहीए. तुम्ही दिलेला संदर्भ योग्यच आहे. पुर्वी ऋषींनी ग्रह आणि तारे ह्याचे वास्तव्य दुर्बिणींशिवाय दाखवले होते असा मा़झा समज आहे. (त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले). समोर दिसतो तो तारा आणि तो ग्रह हा फरक दाखवू शकणारे अभ्यासूच त्याकाळचे!
1 Feb 2009 - 3:30 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला ही प्रतिक्रीया तुम्ही जे म्हणताय ते खोडून काढण्यासाठी लिहायची नाहीए.
सहमत.
तुम्ही दिलेला संदर्भ योग्यच आहे. पुर्वी ऋषींनी ग्रह आणि तारे ह्याचे वास्तव्य दुर्बिणींशिवाय दाखवले होते असा मा़झा समज आहे. (त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले). समोर दिसतो तो तारा आणि तो ग्रह हा फरक दाखवू शकणारे अभ्यासूच त्याकाळचे!
ते तेव्हाचे ऋषी हे आजच्या दृष्टीने अभ्यासक, आणि तारे-ग्रहांपलिकडे अफाट विश्व आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी एवढं प्रचंड उपकरण बांधणारे आजचे ऋषी, प्रा. गोविंदस्वरूप आणि त्यांचे सहकारी!
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
3 Feb 2009 - 8:29 am | सुनील
त्यातुनच ज्योतिषशास्त्र निर्माण झाले
हे खरे नाही. बारा राशींची संकल्पना भारतीयांनी ग्रीकांकडून घेतली. आणि त्याच सुमारास चीनमध्ये एक वेगळेच खगोलशात्र विकसीत झालेले होते.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
1 Feb 2009 - 3:28 pm | सखाराम_गटणे™
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे"
हे वाक्य मला ही आवडते
1 Feb 2009 - 3:41 pm | त्रास
"अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते ही प्रौढी आहे"
वाक्या छान आहे. मला ते असे असते तर जास्त पटले असते-
अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आहे
3 Feb 2009 - 8:15 am | llपुण्याचे पेशवेll
>> ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आ
सुधारणा आवडली...
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
3 Feb 2009 - 8:21 am | टारझन
वा !!!! :)
- टारझन
एरवी सगळे पेशवे सारखेच. फक्त पेशव्याला खडूसपणा चिटकला की त्याचा पुण्याचा पेशवा होतो .
3 Feb 2009 - 8:50 am | llपुण्याचे पेशवेll
ही प्रतिक्रिया टार्याच्या अवांतर प्रतिसादाच्या यादीत नसल्याने, यादीबाहेरची प्रतिक्रिया टाकल्याबद्द्ल त्याचा जाईर णिषेद आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
(खडूस)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
1 Feb 2009 - 3:42 pm | सखाराम_गटणे™
अमुक एक गोष्ट मी करू शकतो/ते हा विश्वास आहे; ती गोष्ट मीच करु शकतो/ते हाआत्मविश्वास आहे; ते दुसर्या कोणालाही करता येणार नाही, ही प्रौढी आहे
हेच गजनी मध्ये आहे.
1 Feb 2009 - 3:44 pm | मराठी शब्द
ग्रेट माइंडस थिंक अलाइक
1 Feb 2009 - 4:00 pm | अनंत छंदी
लेखाच्या मूलभूत गाभ्याशी सहमत
1 Feb 2009 - 5:16 pm | स्वानन्द
लेखावरच्या प्रतीक्रिया वाचून असं वाटतंय की हा लेख गजनी मधल्या डायलॉगबद्दल चालू आहे.
असो. मूळ लेखकाचेविचार पटले. अविनाश चे विचार पूर्णपणे नाही पटले. मला वाटतं की त्यांनी संगितलेल्या गोष्टी या मुळ्च्या नाहीत तर कालानुरुप कोणी ना कोणी सोयीसाठी चालू केल्या. ज्या सतत अंगीकारल्याने संस्कृतीचा भाग बनल्या.
--भारतानन्द
3 Feb 2009 - 8:25 am | llपुण्याचे पेशवेll
पेशवाईत नाना फडणवीसाने एका पुलाच्या बांधकामाचे वेळी पुलाचा पायाचा भराव टिकत नव्हता तेव्हा रुद्राच्या अनुष्ठानाला बसविलेले ब्राम्हण उठवून त्या खर्चात ते काम इंग्रज इंजिनयराकडून करून घेतले होते असे वाचनात आले. तसेच पेशव्यांच्या वापरातही इंग्रजानी भेट दिलेले घड्याळ होते असा उल्लेख सापडतो. तसेच कवायती फौजेचे महत्व ओळखून महादजी शिंद्यांनी मराठ्याना कवायती फौजेचे प्रशिक्षण द्यायला आणलेला फ्रेंच अधिकारी 'जनरल पेराँ' आणि त्याच्या बंगल्यावरच्या चौकीमुळे पुण्यात असलेली पेरूगेट पोलिस चौकी याणि अशा इतर अनेक खूणा सुधारणेबद्दल असलेला सकारात्मक दृष्टीकोण दाखवतात.
यावरून ज्या सुधारणा ब्रिटीशानी आणल्या त्या इथली राज्यव्यवस्था आणू शकली नाही असे नाही. त्याही कदाचित पुढील काळात येऊ शकल्या असत्या. फक्त काळ जरा जास्त गेला असता इतकेच.
बाकी मूळ लेखकाशी सहमत.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
2 Feb 2009 - 5:12 pm | त्रास
"मला वाटतं की त्यांनी संगितलेल्या गोष्टी या मुळ्च्या नाहीत तर कालानुरुप कोणी ना कोणी सोयीसाठी चालू केल्या. ज्या सतत अंगीकारल्याने संस्कृतीचा भाग बनल्या."
पुर्णपणे सहमत.