रणथंभोर ची राणी

लोनली प्लॅनेट's picture
लोनली प्लॅनेट in जनातलं, मनातलं
21 Aug 2016 - 11:24 pm

राजस्थान मधील रणथंभोर राष्ट्रीय उद्यान १९९७ चा जुलै महिना, जंगलातील एका भागात एका वाघिणीने तीन बछड्यांना जन्म दिला, हि अतिशय आनंदाची घटना पाहण्यासाठी भारतीय व्याघ्र तज्ज्ञ डॉ वाल्मिक थापर व आयरिश माहितीपट निर्माता कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन हे दोघे गेले होते, त्यांनी पहिले कि तिन्ही बछडे मादी आहेत. काही दिवस त्यांनी बछड्यांचे निरीक्षण केले, तेंव्हा त्यांना दिसले कि एक मादी बछडा इतर दोन बछड्यांपेक्षा जास्त आक्रमक व खेळकर आहे. त्यांनी पहिले कि तिच्या चेहेऱ्यावर एक माशाच्या आकाराचा पट्टा आहे , कॉलिन नि वाल्मिक थापर ना विचारले FISH ला हिंदीतून काय म्हणतात ? ते म्हणाले " मछली " आणि अशा प्रकारे त्या गोड बछड्याला हे सुंदर नाव मिळाले. जगातील प्रत्येक प्राणिप्रेमीला हे नाव माहित आहे.
तिचे सांकेतिक नाव होते T-16
1

2

मछली ने रणथंभोर च्या जंगलावर तब्बल दोन दशके राज्य केले. तेथील राजमहालावर किल्ल्यावर तलावावर तिचेच राज्य होते. त्यामुळे तिला "रणथंभोर ची राणी " लेडी ऑफ दि लेक्स" हि नावे सुद्धा मिळाली. तिने एकदा एका १४ फूट लांबीच्या मगरीची दीड तास झुंज देऊन शिकार केली. हि एक ऐतिहासिक घटना आहे, या आधी कोणत्याही वाघाने मगरीची शिकार केलेली कोणीही पाहिलेले नाही. डॉ वाल्मिक थापर यांनी सतत तिच्यावर लक्ष ठेवून तिच्या वास्तव्याचा मागोवा घेतला आहे.

3

मछली दोन वर्षे वयाची व्हायच्या आतच शिकार करू लागली. २००० साली बोंबु राम नावाच्या एक वाघापासून तिने दोन बछड्यांना जन्म दिला. कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन नि त्यांना नांवे दिली "Broken Tail" व "Slant Ear" सहसा पहिल्यांदा आई होणाऱ्या वाघिणीचे बछडे जिवंत राहत नाहीत परंतु मछली चे हे दोन्ही बछडे मोठे झाले. यावरून ती किती हुशार होती ते समजेल. यापैकी Broken Tail या तिच्या बछड्यावर कॉलिन स्टॅफर्ड जॉन्सन नी एक अतिशय सुंदर माहितीपट बनवला आहे "Broken Tail - a journey into the last days of a wild tiger"

4

5

मछली ने २००२ साली तीन बछड्यांना जन्म दिला त्यापैकी दोन मोठे झाले "झुमरी व झुमरू" त्यानंतर २००५ साली पुन्हा दोन बछडे " शर्मिली व बहादूर" चा जन्म झाला २००६ साली पुन्हा तीन बछडे त्यापैकी "सुंदरी" हि सुद्धा प्रसिद्ध वाघीण बनली. मछली ने एकूण ११ बछड्यांना जन्म दिला त्यापैकी ९ मोठे झाले. कोणत्याही वाघिणीचे जास्तीत जास्त निम्मेच बछडे जिवंत राहतात. यावरून ती इतर वाघिणीपेक्षा किती हुशार होती हे लक्षात येईल. रणथंभोर उद्यानातील ५०% वाघ आज तिचेच वंशज आहेत. शेजारच्या सारिस्का उद्यानातील वाघिणी हि तिच्याच मुली आहेत.

6

7

शांत स्वभावाच्या मछली ने कायम आपल्या बछड्यांची इतर शिकारी प्राण्यांपासून अतिशय कष्टाने सुरक्षा केली. इतर वाघ तिला घाबरून असत. ती जगातील सर्वात जास्त फोटोग्राफी केलेली वाघीण बनली. तिच्यावर अनेक माहितीपट बनले. नॅशनल जिओग्राफिक ने तिच्यावर "Tiger Queen" हि फिल्म बनवली आहे. यामुळे ती जगातील सर्वात लोकप्रिय वाघीण बनली. प्राणीप्रेमींनी तिचे फेसबुक पान सुरु केले. परदेशातून लोक रणथंभोर मध्ये फक्त तिला पाहण्यासाठी येऊ लागले. ती रणथंभोर ची शान बनली. २०१३ मध्ये भारत सरकारने तिला ऐतिहासिक आणि प्राकृतिक वारसा घोषित करून तिचे टपाल तिकीट काढून तिचा सन्मान केला आहे. तिने गेल्या १० वर्षात रणथंभोर राष्ट्रीय उद्यानाला तब्बल ६५ कोटी चे उत्पन्न मिळवुन दिले. तिने उद्यानातील वाघांच्या संख्येत लक्षणीय भर घातल्यामुळे तिला Life time achivement award ने गौरवण्यात आले आहे. अशा प्रकारे ती सुपरस्टार बनली.

टपाल तिकीट

8

परंतु या १८ ऑगस्टला ती एका वेगळ्याच कारणाने प्राणीप्रेमींच्या चर्चेत आली निमित्त होते तिच्या मृत्यूचे. हे अपेक्षित होते पण तरीही दुःखद. मछली १९ वर्षाची झाली होती, वाघांचे सरासरी आयुष्य १४-१५ वर्षाचे असते पण ती १९ वर्षे जगली.राष्ट्रीय उद्यानाचे कर्मचारी व डॉक्टर तिची २ वर्षांपासून काळजी घेत होते. गेल्या ५ दिवसापासून तिने काहीही खाल्ले नव्हते. ती वयाने जगातील सर्वात मोठी वाघीण होती. २० व्या शतकात जन्म झालेली ती एकमेव जिवंत वाघीण होती. तिच्या मृत्यूची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली बी बी सी, द टेलिग्राफ, न्यू यॉर्क टाइम्स भारतात टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू व अनेक. फेसबुक वर प्रतिक्रियांचा वर्षाव झाला. जगभरातील प्राणीप्रेमींनी दुःख व्यक्त केले.तिने वाघांच्या संरक्षणामध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावली.
रणथंभोर राष्ट्रीय उद्यानामध्ये आता तिची कमतरता जाणवणार आहे.
तिच्याबद्दल माहिती असणारा प्रत्येक प्राणीप्रेमी म्हणतो “She Lived a Glorious Life”

9

REST IN PEACE MACHLI

कथामाहिती

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

21 Aug 2016 - 11:32 pm | पद्मावति

छान लिहिलंय. रणथंभोर ची राणी आवडली.

लोनली प्लॅनेट's picture

24 Aug 2016 - 11:19 am | लोनली प्लॅनेट

नॅशनल जिओग्राफिक च्या Tiger Queen या माहितीपटाच्या लिंक

https://www.youtube.com/watch?v=7_gERPEAyFA

लोनली प्लॅनेट's picture

24 Aug 2016 - 11:20 am | लोनली प्लॅनेट

मछली चा एक विडिओ
https://www.youtube.com/watch?v=TiGn7jvFJfU

माम्लेदारचा पन्खा's picture

21 Aug 2016 - 11:42 pm | माम्लेदारचा पन्खा

जीवन उसका इक कहानी है |
लोगो के दिलों मे ये बस गई है |
तस्वीरो में कैसे जच रही है |

अमितदादा's picture

21 Aug 2016 - 11:46 pm | अमितदादा

वाह वाह...सुंदर लेख...

तिच्याबद्दल माहिती असणारा प्रत्येक प्राणीप्रेमी म्हणतो “She Lived a Glorious Life”

Indeed!!!

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 12:09 am | महासंग्राम

फोटो दिसत नाय :(

जव्हेरगंज's picture

22 Aug 2016 - 12:15 am | जव्हेरगंज

मस्त !

झकास माहिती. फोटोच्या लिंका दुरूस्त करून घ्या..

अतिशय सुंदर लेख. 'मछली'ला भावपूर्ण श्रद्धांजली!

मुक्त विहारि's picture

22 Aug 2016 - 10:14 am | मुक्त विहारि

धन्यवाद...

फोटो बाबतीत आमचा गणेशा झाला

सुरेख लेख. मछलीचे फोटो बघायला मिळाले असते तर...

महासंग्राम's picture

22 Aug 2016 - 1:58 pm | महासंग्राम

.0

0

m2

फोटो कर्टसी : http://miscethoughts.blogspot.in/

किसन शिंदे's picture

22 Aug 2016 - 2:59 pm | किसन शिंदे

फोटो दिसत नाहीत.

कंजूस's picture

22 Aug 2016 - 3:28 pm | कंजूस

छान!

असंका's picture

22 Aug 2016 - 3:34 pm | असंका

सुरेख!
धन्यवाद!

जगप्रवासी's picture

22 Aug 2016 - 4:20 pm | जगप्रवासी

फोटू दिसत नाहीयेत

इरसाल's picture

22 Aug 2016 - 4:39 pm | इरसाल

गणेशा.

अरे हो हा वैयक्तिक प्रतिसाद नाही.

निओ's picture

22 Aug 2016 - 7:32 pm | निओ

छान लेख.

पिशी अबोली's picture

22 Aug 2016 - 9:22 pm | पिशी अबोली

छान ओळख. या राणीला भेटायला हवं होतं असं वाटून गेलं..

स्वाती दिनेश's picture

22 Aug 2016 - 9:58 pm | स्वाती दिनेश

रणथंबोरची राणी, मछली आवडली.
स्वाती

मृत्युन्जय's picture

23 Aug 2016 - 12:39 pm | मृत्युन्जय

लेख मस्तच. आवडला एकदम

ज्योति अळवणी's picture

23 Aug 2016 - 8:40 pm | ज्योति अळवणी

आवडली मच्छली... फोटो अप्रतिम

सतिश गावडे's picture

24 Aug 2016 - 12:04 am | सतिश गावडे

शेवटचा फोटो पाहून गहीवरुन आले. :(

लोनली प्लॅनेट's picture

24 Aug 2016 - 11:40 am | लोनली प्लॅनेट

रणथंभोर ला भेट न देता आल्यामुळे हळहळ वाटत आहे

पियुशा's picture

24 Aug 2016 - 11:09 am | पियुशा

खुप आवड्ली , शेवतचा फोटु पहावत नाही :(

शान्तिप्रिय's picture

24 Aug 2016 - 11:28 am | शान्तिप्रिय

मस्त लिहिलय!
शेवटचा फोटो सुन्न करतो!

मुक्त विहारि's picture

24 Aug 2016 - 11:57 am | मुक्त विहारि

सगळे फोटो मस्त...

एस's picture

24 Aug 2016 - 12:53 pm | एस

फोटो दिसताहेत.

मोदक's picture

24 Aug 2016 - 1:10 pm | मोदक

सुंदर फोटो..!!
शेवटचा फोटो सुन्न करतो :(

इल्यूमिनाटस's picture

24 Aug 2016 - 4:25 pm | इल्यूमिनाटस

छान लेख आणि फोटु

संत घोडेकर's picture

24 Aug 2016 - 4:36 pm | संत घोडेकर

छान!

पैसा's picture

24 Aug 2016 - 4:59 pm | पैसा

वाईट तर वाटलंच. गेल्या वर्षी मछली बरेच दिवस नाहिशी झाली तेव्हा बातमी आली होती. पण त्यानंतर ती परत आली आणि जवळपास एक वर्ष तिने काढले. आपल्याकडे प्राण्यांबद्दल जी अनास्था आहे त्या पार्श्वभूमीवर अजून अशा खूप मछलींचा मागोवा घेतला जावा.

जव्हेरगंज's picture

24 Aug 2016 - 7:06 pm | जव्हेरगंज

अप्रतिम फोटो!

पहिले दोनतर खल्लास !!!

अभिजीत अवलिया's picture

25 Aug 2016 - 2:58 am | अभिजीत अवलिया

छान जीवनपट उलगडून दाखवलाय मछलीचा.

कैलासवासी सोन्याबापु's picture

25 Aug 2016 - 9:19 am | कैलासवासी सोन्याबापु

सुंदर लेखन सुंदर संकल्पना अन त्याहून राजस सुंदर मछली!