कसं भेटायचं, कुठे भेटायचं, वेळ काय, सर्व काही आदल्या दिवशी ठरलं. अन अखेरीस तो दिवस उजाडला. पहाटेचा गजर झाला वेळतच तय्यारी झाली. घोंगावणाऱ्या वाऱ्यासोबत अल्लड पावसाने पण हजेरी लावली. ठरलेल्या ठिकाणी अन दिलेल्या वेळेत भेटणे जरुरी होतं. नाहीतर शिव्या हमखास पडणार हे माहीत होतं.
स्टॉप वर पोचलो, रिक्शा-ऑटों-रिक्शा-ऑटों-रिक्शा ओरडत हातवारे करत होतो. समोरच्या व्यक्तीचा चेहरा पण स्पष्टपणे दिसत नव्हता एवढा पाउस. फक्त गाड्यांचे चमकणारे दिवे तेवढे दिसत होते. त्यावरून समजे की चारचाकी, तिनचाकी अन दोनचाकी वाहने कुठची आहे. इतक्यात एक रिक्शा पुढ्यात येउन थांबली. साहेब कुठं जाणार..? गांधीनगर वरुण डावीकडे पहिला बस स्टॉप. नाही तुम्हाला गांधीनगर सिग्नल वर सोडेन..... आजुबाजुला बघितले तर गर्दी वाढत चालली होती. रिक्शा पण दिसत नव्हती. चालेल चला, तिथून जाईन मी चालत. रिक्षावल्यासोबत गप्पा मारत त्याला थोडाफार पटवलं. तसा तो समजुतदार निघाला, बरोबर माझ्या ठिकाणी त्याने सोडला. ४२ रुपयांचा मीटर झालां, मी ५० ची नोट दिली, तो पण खुश मी पण खुश.
"कल हो ना हो " ची रिंग वाजली......
मी- हेल्लो
अनिल- भूषण दस मिनिट में बस आएगी, यल्लो कलर की मिनी बस है, तू छाते से बाहर निकल,
मी- ओके, ठीक है,
तस मी आधीच व्हाट्सअप करुन माझं लोकेशन सांगितले होते. अखेरीस बस आली. चल चल बस लवकर बॅग ठेव तिकडे, छत्री टाक तिथे. गाण्यांची मैफिल तर रंगली होती. अनिल, योगी, सचिन सर, राकेश, धीरज, मंग्या, स्वराज,बाबू, चंदू, मनीष, प्रदीप, राजेंद्र, सगळे हजर झाले होते. फ़क्त दोघेजन बाकी होते. एक ऐरोलीला आणि एक पनवेल ला.
तोपर्यंत इकडच्या तिकच्या गप्पा रंगल्या, कोणी किती वेळ लावला, पावसाने कोणाचा किती वेळ घेतला सर्व काही हिशोब चालू होते. इतक्यात अमोलचा स्टॉप आला. स्टॉप वर काय अमोल दिसत नव्हता.
योगी- अमोल किधर है....?
अमोल- निघालोय रे येतोय, बस पाच मिनिटात.
योगी- हा जल्दी आ.
पावसाने तर पूर्ण थैमान घातला होता. ते एका दृष्टीकोनातुन आम्हांला योग्यचं होतं. पण सर्वांच्या गाठी-भेटी झाल्यावर...फोन केला तेव्हा अमोल झोपेतच होता.. पण गड्याने कमाल केली. जास्त वेळ घेतला नाही.तिथून थेट निघालो. आता आम्हांला फ़क्त पनवेल ला थांबायच होतं. तिथे आम्हांला मोठी हस्ती भेटणार होती. जबाबदार व्यक्तिमत्व "पप्पा" ( मानकामे सर ) ....! हो दोन दिवसासाठी ते आम्हांला "पप्पा" होते. बाहेर मुसळ्दार पाउस, सोबत गाण्यांची मैफिल, प्रत्येकाला टार्गेट करत आमची बस चालली होती. फोन रिंग वाजली. फोनवर पप्पा होते.
पप्पा- हेल्लो...अरे, कुठे पोचलात....?
प्रदीप- ऐरोली केव्हाच सोडलय.. अर्ध्या तासात पोहचतोय आम्ही
पप्पा- ठीक आहे, या लवकर, वाट पाहतोय मी तुमची..
प्रदीप- हो, येतोय...ट्राफिक खुप आहे.
तसं थोडफार ट्राफिक होत. पण जागेवरून निघायलाचं थोड़ा वेळ लागला होता. ट्राफिकचं कारण सांगत पनवेल ला पोहचलो एकदाचे.
पप्पा तर खुप वैतागले होते. पण जशी आमची बस बघितली तसा त्यांचा राग कमी झाला.... ते त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य सांगत होते..... इथे तर सर्वजण खुश दिसत होते. खायचं-प्यायचं सर्वकाही त्यांच्याकडेच होत.. खरतर त्यावेळी गरज होती ती नाश्त्याची... त्यांनी त्याचीही व्यवस्था चोख पार पाडली होती. भोकाचे वडे, सोबत हिरव्या लाल चटणीने तर नाश्त्याची चवचं पार बदलून टाकली होती.. पनवेल पर्यंतच्या प्रवासातील त्यांच्यी ती भेट प्रवासाला वेगाळचं वळन देऊन गेली. उगाच त्यांना आम्ही पप्पा म्हणत नव्हतो...
छोट्याशा विश्रांतिनंतर बसने पुन्हा वेग घेतला.तसं तर आम्ही पप्पांच्या गावातुनच (पनवेल) प्रवास करत होतो. त्या प्रत्येक निसर्गरम्य ठिकानांची ओळख करून देत होते.मुक्कामाच्या ठिकाणी पोहचण्यास अजुन दोन अडिज तासांचा प्रवास बाकी होता. एरवी मात्र प्रवासात मोहम्मद रफ़ी, किशोर दां, मायमराठी संगीत रत्न म्हणजेच आजच्या तरुणांच्या गळ्यात असलेली अजय-अतुल दांची गाणि माझ्या सोबत असत. पण आज तसं नव्हतं. सोबत असुनही मी ऐकत नव्हतो. कारण मोठ्या आवाजात बस मद्धे तशी गाणी चालूच होती. मी पण त्यांचा मनमुराद आनंद घेत चाललो होतो. काही क्षणापुरता का होइना पण स्वर्गदर्शन घडवणारे ते पेय सोबत घेतलं होतं. आम्ही तिघे सोडलो तर त्या पेयाची प्रत्येक जन आतुरतेने वाट बघत होते. जसा बसने पनवेलचा रस्ता सोडला, तसा तो पेयाचा पेठारा उघडला गेला. प्रत्येकाने आपाआपल्या आवडीच्या स्वर्गदर्शन घडाविणाऱ्या पेयाच्या बाटल्या घेतल्या प्रत्येकाचा ठप ठप आवाज कानी घुमु लागला. पेयाचा शिडकावा होउ लागला. तसं तर मी या आधि कितीतरी वेळा स्वर्गदर्शन देणाऱ्या त्या पेयासोबत सामोरा गेलो होतो. त्यावेळी असं काहिचं घडलं नव्हतं.आजं अचानक असं काय घडतं होतं काहिचं समजत नव्हतं. जसा त्या पेयाचा माझ्यावर शिडकावा झालां तसा माझां रंग पण बदलत गेला. दोन्ही कानातुन गरम वाफा निघत होत्या, थंडगार वातावरणात माझ्या अंगावर घामाच्या धारा ओसांडून वाहत होत्या. चेहरा लाल बूंद होत चालला होता. असं वाटत होतं की तड़क उठावं अन चाललेला खेळ थांबवावा. पण मला अस करता येणं शक्य नव्हतं. मनात असुनही ते मला करायचं पण नव्हतं. मला तर त्यांच्या सोबत ते क्षणं त्यांच्यापेक्षाही द्विगुणित साजरे करायाचे होते. एका पाठोपाठ पंचवीस-तिस ठप ठप आवाज होत गेले. पण तो ठप आवाज आत्ता माझ्या ओळखिचा वाटत होता. त्यांच्या त्या नाच-गाण्याच्या मैफिलीत माझं मन कसं काय रमलं मलाचं समजले नाहि. हसत-खेळत केव्हाच त्या एस. पि. फार्महाउस च्या दरवाजात पोहचलो.
दोन पेयाचे पेठारे बॅगा, छत्र्या, घेउन आम्ही तिथेच उभे. आमच्या येण्याची सूचना तशी कदमांना अगोदरच दिली होती. (फार्महाउसची सर्व सोयी सुविधा पाहणारी महान हस्ती, कदम) पण सर्व नियमांची पुर्तता केल्या शिवाय आम्ही आतमद्धे तर जाऊ शकत नव्हतो. पप्पा, चंद्रू आणि योगिने पुढे जाउन ती पुर्तता केलि. रूमची चावी सोबत घेउन आम्ही चाललोय. तोच पावसाळी मातीचा सुगंध, आजुबाजुला हिरवळिने सजलेले डोंगर, ते पाहताच एका क्षणी गावाच्या आठवणिने मन दाटुन गेलं. शरीर जाग्यावर अन मन मात्र स्वैरवैर बागडत होते. तेवढ्यात अनिलने मोठ्याने आवाजं दिला. अरे...भूषण ऊपर आ. चेंज करके जातें है। हो आलो रे. फटाफट कपडे बदलले. आम्ही तिघं सोडले तर बाकि सर्व जण अजुनही त्या पेयात अड़कुन पडले होते. विचार केला की, ह्यांच स्वर्गदर्शन झाल्यावर हे येतील. तोवर आपण सर्व काही न्याहळुन तरी घेउ. वेळ साधून तिकडना पळ काढली. थेट स्विमिंग पाशी येउन पोचलो. तशी चार पाच स्विमिग्स तिथे होती. प्रत्येकाच्या पाण्याचा गारवा अन त्याची ऊंची बघितिली. बरोबर दोन वर्षानंतर एवढ्या खोल पाण्यामद्दे पुन्हा एकदा मनोस्वक्त बागडलो. आपल्या सोबत इतर मित्र-मंडळि आली आहेत याचही भान उरले नाही. मोठ्याने आवाज करणारा डी.जे. सोबत मनपसंद गाणि. कधी तिन वाजून गेलें समजलेच नाही. शरीराला थकवा जाणवत होता. मन काही थकायचं नाव घेत नव्हतं. इतक्यात स्वर्गदर्शन घेउन आलेली आपली मित्र-मंडळि दिसली. बागडणाऱ्या मनासोबत शरीराने पण पुन्हा डूबकी घेण्यास सुरवात केली. स्वर्गदर्शन करणारं पेय तर यांच्या सोबत होत. म्हणूनच त्यांच्यासोबत तिथल्या त्या अप्सरांचा उबारा होता. आणि आम्ही तोच उबारा चहाच्या झुरक्यावर एकवटत होतो. समोरच रेनडांस होता. थेट तिकडेच शिरलो. ठेका धरायला लावणारी गाणी मोठ्या आवाजात वाजत होती. नाचता येईना अंगन वाकडं अश्यातली माझी अवस्था होती. अरे इकडच पाणी खुप थंड आहे असे म्हणत मी पळ काढली.इतक्यात शिट्टी वाजली. चला चार वाजले स्विमिंग बंद. जेउन घ्या. अर्ध्या एक तासात चालू होइल पुन्हा. तिथला सिक्यूरिटी बोलत होता. आम्ही पण मनाला थोड़ा आवर घालून तिथून बाहेर पडलो. ओल्या शरीराने कैंटीन मद्धे गेलो. तेवढाच चिकन मटणावर ताव मारला. कैंटीन मद्धेही मनोरंजन चालूच होतं. तिथे तर लावन्यवती प्रत्येकाचं मन जपत होती. आमची मंडळी तर तिच्याच तालावराच नाचत होती. जेवणाचा कार्यक्रम आटोपला, पुन्हा दोन अडिज तास पाण्यामद्धे. तो माकडाचा खेळ, स्लाइडिंग, मुसळदार पावसामद्धे हॉलीबॉल, मनासोबत शरिरही बाहेर पडत नव्हतं. ते क्षण कैमेऱ्या मद्धे टिपता आले नाही. मन मात्र प्रत्येक क्षण टिपून काळजात साठवत होते. आत्ता मात्र सात वाजून गेलें होते. पुन्हा रुमकड़े परतलो.
ताजेतवाने होउन चहा आणी गरमागरम भजिचा फडशा पाडला. रात्रीच्या जेवणाला खुप उशीर होता. तोपर्यंत पुन्हा एकदा त्या पेयासोबत मैफिल रंगली. मराठमोळा निळु भाऊ, दादा, लक्ष्या, हिंदीमधला बच्छन, सनी, नाना सर्वांचे आवाज आमच्या मंडळिकडून ऐकायला मिळाले. दहा वाजता पुन्हा कैंटीन मद्धे गेलो. आत्ता तर तिकडच वातावरण खुप वेगळ होत. इंद्रायनी दरबार भरतो तसा काहीस वाटत होंता. लावन्यवती-अप्सरा नाचत होती. तानसेन गाण गात होता. पुन्हा आमची मंडळी तिच्या ठेक्यावर नाचत होती. पैशाची उधळन होत होती. सकाळचे तिन वाजून गेले तरी कोण थकत नव्हतं. आम्ही मात्र येउन झोपलो. इतर मंडळी कधी येउन झोपली काही कळलेच नाहि. जाग आली ती सकाळी आठ वाजता. नऊ-साडेनऊ वाजता नाश्ता केला. स्वर्गदर्शन करणारे ते पेय काही संपले नव्हते. आणि ते संपणार ही नव्हते. त्याची चोख व्यवस्था पप्पानी केलि होती. कारण तिथून थेट आम्हाला दुसऱ्या एका निसर्गरम्य ठिकाणी जायचं होत. आवराआवर केली तोवर अकरा वाजले होते. गाडीचा ड्राईवर कुठे दिसत नव्हता. अखेर सापडला त्याचहि मन अजुन स्वर्गात अडकून होता. लावण्यवती सहित कदमांचा निरोप घेउन पुढच्या प्रवासाला निघालो.
हां प्रवास मात्र खुप वेगळा होता. एक वेगळच वळन देणारा. तसा एक फोन आला. योगिच्या घरचा फोन होता. योगी काय झालं. त्याचा तो हंबरडा काळजाचं पाणी पाणी करून गेला. थरथरत्या आवाजात योगी बोलत होता. डॅडींना हार्ट अटॅक आलाय. कोणचं काही बोलत नव्हता. मुसळदार पावसासोबत बस तूफानी वेगात धावत होती. तिला पण तो चार तासांचा प्रवास गाठायचा होता. रस्त्यावर पाणि भरले आहे की, पाण्यातुन रस्ता जातोय काहीच समजत नव्हते. नाच-गाण्याची मैफिल ही रंगत नव्हती. ठप करणाऱ्या बाटलीचा आवाजही येत नव्हता. आवाज येत होता तो फ़क्त, चर्र करणाऱ्या बसच्या ब्रेक चा. एकच शेवटची बाटली उघडली गेली. तिलाही कळुन चुकल होत. ती पण आवाज न करता शांतच होती. पसरली होती सगळिकडे एकच नीरव शांतता ………..
चू.भू.दे.घे.
@भूषण घाडी.
२९/०७/२०१६-३०/०७/२०१६
प्रतिक्रिया
18 Aug 2016 - 1:36 pm | तर्राट जोकर
चांगलं लिहिताय... पुलेशू.
19 Aug 2016 - 5:35 pm | Bhushan chandra...
पुलेशू????