१४ ऑगस्ट २०१६

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
14 Aug 2016 - 11:02 am

८३ वर्षाचा झालो.आज मनात आलं....

सुचलं तेव्हडं लिहावं
दिसलं त्तेव्हडं वाचावं
रुचलं तेव्हडं ऐकावं
आवडलं तेव्हडं बोलावं
विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं
जीवन तृप्त असावं

आणि कुणी म्हटलं तसं

"ह्या जन्मावरं
ह्या जगण्यावरं
शतदा प्रेम करावं"

शुभेच्छा देण्यार्‍यांचे आणि न देण्यार्‍यांचेही आभार.

श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

जीवनमानमत

प्रतिक्रिया

बरेच दिवसांनी लिहिलंत. छान वाटलं. उत्तम आयुरारोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! :)

अमितदादा's picture

14 Aug 2016 - 12:05 pm | अमितदादा

मनःपूर्वक शुभेच्छा।

सामान्य वाचक's picture

14 Aug 2016 - 12:10 pm | सामान्य वाचक

2033 ला पण असाच लेख तुम्ही लिहावा

सामंतकाका, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा :)

सामंतकाका, धागा पाहून आनंद झाला. तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
पंचाहत्तरीचा धागा आलेला आठवतोय.

वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!!!

तिमा's picture

14 Aug 2016 - 1:34 pm | तिमा

सामंतसाहेब,
तुमचे जुने लेख अजून आठवतात. उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.

- तिमा

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2016 - 2:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

दीर्घ आयुरारोग्यासाठी शुभेच्छा !

जव्हेरगंज's picture

14 Aug 2016 - 10:31 pm | जव्हेरगंज

अरे वा!!

मनापासून शुभेच्छा!!!!!

पद्मावति's picture

14 Aug 2016 - 10:42 pm | पद्मावति

वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा तुम्हाला.

उडन खटोला's picture

14 Aug 2016 - 11:02 pm | उडन खटोला

याप्पी बड्डे काकाजोबा.

आनंदयात्री's picture

15 Aug 2016 - 3:51 am | आनंदयात्री

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका.

फारएन्ड's picture

15 Aug 2016 - 5:06 am | फारएन्ड

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लिहीत राहा. आवडेल वाचायला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

15 Aug 2016 - 8:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंतसाहेब, वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा !!!

लिहीत राहा.

-दिलीप बिरुटे

मुक्त विहारि's picture

15 Aug 2016 - 11:02 am | मुक्त विहारि

वाढदिवसाच्या शुभेच्छा....

मुक्त विहारि's picture

15 Aug 2016 - 11:03 am | मुक्त विहारि

"विचारलं तेव्हडं सांगावं
दिलं तेव्हडं घ्यावं
पचलं तेव्हडं खावं
जमलं तेव्हडं चालावं."

ह्याला प्रचंड अनुमोदन

टवाळ कार्टा's picture

16 Aug 2016 - 2:20 am | टवाळ कार्टा

+१
वादिहाशु

कलादालन's picture

16 Aug 2016 - 1:21 am | कलादालन

सामंतकाका,
बहोत खुशी महेसुस हुयी ..अव्वल तो आपको सालगिरह की दिल की गहराईयों से पुरखुलुस मुबारकबाद !! और फिर खुदा से आपके सेहतमंद जिंदगी के लिए ढेर सारी दुवाएं :-)
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
~ वाहीदा

पिलीयन रायडर's picture

16 Aug 2016 - 1:40 am | पिलीयन रायडर

ह्याप्पी बड्डे आजोबा! माझे आजोबा असते तर आता तुमच्या एवढेच असते आणि असंच बोलले असते अगदी!
:)

अनन्त अवधुत's picture

16 Aug 2016 - 1:41 am | अनन्त अवधुत

उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा.
देव तुम्हास उदंड आयुष्य देवो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

बहुगुणी's picture

16 Aug 2016 - 1:52 am | बहुगुणी

सामंतसाहेब, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुमचा तो बी ए आर सी च्या संशोधनावरचा लेख लिहायचा राहिलाय, आठवण करून देतो आहे...

चतुरंग's picture

16 Aug 2016 - 9:59 am | चतुरंग

पहिला संगणक! रोमांचक आठवणी असणारेत....

मयुरा गुप्ते's picture

16 Aug 2016 - 2:41 am | मयुरा गुप्ते

जीवेत शरदः शतम सामंतकाका!!

--मयुरा

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

राही's picture

16 Aug 2016 - 9:46 am | राही

थोड्या उशीराने, वाढदिवसाच्या शुभेच्छा.
आज आपण ८३ वर्षांचे आहात म्हनजे स्वातंत्र्य मिळाले तेवव्हा जवळजवळ १४-१४ वर्षांचे होतात. तेव्हाच्या आणि नंतरच्याही म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या, डांगे-जोशी-अत्रेंच्या, महाराष्ट्र राज्य झाले त्याच्या, कमांडर नाणावटी खूनखटल्याच्या, अंतुले-सीमेंट खटला, चीन युद्ध, भारतपाकयुद्धे, बांगलादेशमुक्ती, नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे मृत्यू, इंदिरा गांधींच्या कारकीर्दीत घडलेला पहिला अणुबाँबस्फोट्/चाचणी, ऑपरेशन ब्लू स्टार यांविषयीच्या लोकांतल्या मनातल्या अभिमानाच्या/संतापाच्या/खळबळीच्या आपल्या काही आठवणी असतील. जरूर इथे लिहावे. अगदी मुघले आझम किंवा शोलेला कशी गर्दी लोटत असे, अलबेला पाहून लोक थिएटरमध्ये कसे नाचत असत, बिनाका गीतमाला, रेडिओ सीलोन, अमीन सायानी हे सगळे वाचायला आवडेल. खरोखर, पुन्हा एकदा आपल्या आठवणींना ताण द्या ही विनंती.

सामंतकाका तुमच्या आठवणींमधून त्या कालखंडाचा एका व्यक्तीच्या नजरेतून घडलेला प्रवास समोर येईल जो अतिशय रोमांचकारी असेल यात शंका नाही!

देशपांडे विनायक's picture

17 Aug 2016 - 12:08 pm | देशपांडे विनायक

वाढदिवसाच्या शुभेच्छा
आता ८३ आणि ७५ मधे ८ वर्षांचे अंतर हे आकडेमोडीनुसार झाले
परंतु जगताना मात्र हे अंतर फार वाटते . हे अंतर काटून सामंत काका तुम्ही माझा आधार झालात
तुम्हाला भेट म्हणून आठवणी लिहून काढतो
वाहतो हि दुर्वांची जुडी हे बाळ कोल्हटकरांच्या लोकप्रिय नाटकानंतर आलेल्या त्यांच्या '' वाऱ्यात मिसळले पाणी ''नाटकाबद्दल
या नवीन नाटकाचे पहिले पाच प्रयोग advance booking लाच हाउसफुल झाले
आणि पहिल्या दोन तीन प्रयोगात लोकांचा झालेला हिरमोड इतका तीव्र होता कि पुढील प्रयोग झालेच नाहीत .
त्या वेळी
दादा कोंडके यांचे '' विच्छा माझी पुरी करा '' जोरात चालले होते . आणि
दादांचे comments अफलातून असत
दादा एका प्रयोगात सोड्याची बाटली फोडण्याची action करत म्हणाले '' वाऱ्यात मिसळले पाणी म्हणजे सोडा ''
त्या वेळी सोड्याच्या बाटल्या एका गोटीने बंद केलेल्या असत . हि गोटी खाली दाबली कि बाटलीचा गळा मोकळा होई आणि सोडा बाहेर येत असे
गोटी आत ढकलली म्हणजे फस्स असा आवाज येत असे आणि नाटक फस्स झाले हेहि लक्षात येत असे

बंट्या's picture

16 Aug 2016 - 11:27 am | बंट्या

मनापासून शुभेच्छा !!!!!

जिन्गल बेल's picture

16 Aug 2016 - 11:50 am | जिन्गल बेल

आजोबा मनःपूर्वक शुभेच्छा!

उत्तम आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा.

मी-सौरभ's picture

16 Aug 2016 - 2:32 pm | मी-सौरभ

टु नीमो

नाखु's picture

17 Aug 2016 - 10:29 am | नाखु

वरील काही गोष्टींबाबत लिहावे विशेषतः सिनेमा आणि त्याबद्दलच्या गमती जमती.

अभिजीत अवलिया's picture

17 Aug 2016 - 1:32 am | अभिजीत अवलिया

आजोबा वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!