आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत.
शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या ऑलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पदकांची संख्या दुप्पट करण्याच्या प्रयत्नात भारतीय पथकातील ११८ खेळाडू निश्चितच असतील. धावपटू धरमवीर आणि गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने त्यांना भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. याआधी नरसिंगदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता; पण नाडाच्या सुनावणीत तो सहीसलामत बाहेर पडल्यामुळे आणि विश्व कुस्ती महासंघाने परवानगी बहाल केल्याने नरसिंग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.
तर आज आर्चरी (तिरंदाजी) स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती आहे. आज या खेळाचा पहिलाच रॅंकिंग राऊड असणार आहे. पुरूष ग्रुपची स्पर्धा आज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. त्यानंतर पुरूष एकल स्पर्धाही ५.३० वाजता होणार आहे. तर महिला ग्रुप आणि महिला एकलही आज रात्री ९.३० वाजता पार पडणार आहे. तर भारताकडून यावेळी ऑलंपिक खेळासाठी दीपिका कुमारी, अनातु दास, लक्ष्मीराणी मांझी, बॉम्बायला देवी राईश्राम यांची निवड झाली आहे. दीपिकाकडून देशाला मेडल मिळण्याच्या अपेक्षा केल्या जात आहेत.
ऑलिंपिक संबंधित सर्व बातम्या,निकाल,विक्रम मराठीमध्ये जाणून घेण्यासाठी आणि देण्यासाठी सर्वानी मदत करावी।
प्रतिक्रिया
5 Aug 2016 - 4:28 pm | shawshanky
भारताचा पुरूष दूहेरीचा ड्रॉ जाहीर.. पेस/बोपन्नाची जोडी पहिल्या फेरीत पोलंडच्या माटोवस्की/कुबोट जोडीशी लढणार
टेनिस महिला दूहेरी
सानिया मिर्झा/प्रार्थना ठोंबरे या जोडीचा पहिल्या फेरीचा सामना चीनच्या झँग/पेंग जोडीबरोबर..
भारताच्या बॉक्सर्सना ड्रॉ अवघड..शिवा थापा आणि मनोज कुमारला पहिल्याच फेरीत लंडन ऑलिंपिकच्या पदक विजेत्यांशी झुंजावे लागणार
5 Aug 2016 - 8:23 pm | shawshanky
ऑलिंपिक तिरंदाजी अतानू दास,मानांकन फेरीत ६८३ गुणांसह ५व्या स्थानावर(एकूण ६४ स्पर्धकांमधे)..जबरदस्त..भारतासाठी सुरेख सुरूवात
5 Aug 2016 - 10:44 pm | shawshanky
5 Aug 2016 - 10:45 pm | shawshanky
5 Aug 2016 - 10:46 pm | shawshanky
6 Aug 2016 - 8:55 pm | shawshanky
रिओ ऑलिंपिक चे पहिले सुवर्ण अमेरिकेच्या खात्यात..तर रौप्य आणि कांस्य चीनला..१० मीटर एअर रायफल (महिला) सुवर्ण- व्हर्जिना थ्रॅशर
6 Aug 2016 - 10:48 pm | shawshanky
मोठी बातमी..भारताचे पदकाचे मुख्य आशास्थान जितू राय १० मीटर एअर पिस्तोल मधे अंतिम फेरीत दाखल..क्वालीफिकेशन मधे ५८८ गुणांसह ६व्या नंबरवर
6 Aug 2016 - 10:53 pm | अमितसांगली
पेस-बोपान्ना बाहेर.....
6 Aug 2016 - 11:26 pm | shawshanky
जितू रायची अंतिम फेरी रात्री १२ वाजता
थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस २,३
गो फॉर गोल्ड जितू,ऑल द बेस्ट
7 Aug 2016 - 12:26 am | कपिलमुनी
Well played
7 Aug 2016 - 12:31 am | shawshanky
ऑलिंपिक स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक पटकाविण्याचा मान अमेरिकेची नेमबाज व्हर्जिनिया थ्रॅशर हिने पटकाविला.
7 Aug 2016 - 12:32 am | shawshanky
रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या जीतू रायचं एअर पिस्टलमधलं आव्हान अंतिम फेरीत संपुष्टात. जीतू आठव्या स्थानावर.
जीतू रायकडून पदकाच्या आशा अजूनही कायम. आता 10 ऑगस्टला प्रकाश नान्जप्पासह 50 मी. पिस्टल स्पर्धेत खेळेल जीतू.
7 Aug 2016 - 11:21 am | संदीप डांगे
दीपा करमकर गोल्ड!!
7 Aug 2016 - 12:45 pm | थॉर माणूस
अफवा आहे. तिचा इव्हेंट अजून यायचा आहे.
7 Aug 2016 - 7:00 pm | shawshanky
सानिया मिर्झा/प्रार्थना ठोंबरे ची जोडीसुध्दा पहिल्याच फेरीत बाहेर..चीनच्या जोडीकडून ६-७(६-८),७-५,५-७ अशा चांगल्या लढतीनंतर पराभव
7 Aug 2016 - 7:27 pm | साधा मुलगा
नेमबाजीमध्ये भारतीय महिला संघ उपान्त्यपूर्व फेरीत दाखल , कोलम्बियाला अतिटतीच्या लढतीत ५-३ ने हरविले, शेवटच्या सेट मधील कोलंबियाच्या खेळाडूने केलेली चूक महागात पडली त्याचा आपल्याला फायदा झाला.
बोबयाला देवीची नेमबाजी आवडली.दीपिका कुमारी अवघी २२ वर्षांची आहे असा कळल, मागच्या ओलीम्पिकला ती फक्त १८ वर्षांची होती. लक्ष्मिराणी पण चांगली खेळाडू आहे.
8 Aug 2016 - 12:18 am | थॉर माणूस
महिला संघ बाहेर. रशिया कडून पराभव.
8 Aug 2016 - 12:27 am | धनावडे
एकही पदक नाही मिळत बघा यावेळी
9 Aug 2016 - 6:06 pm | लालगरूड
अपडेट द्या
9 Aug 2016 - 6:11 pm | जेसीना
रिओ ऑलिम्पिकः रोईंगपटू दत्तू भोकनळ पदकाच्या शर्यतीतून बाहेर, चौथ्या उपांत्य फेरीत दत्तू चौथ्या स्थानावर
9 Aug 2016 - 7:00 pm | आदूबाळ
नाही. उपांत्य फेरीत पोचला आहे तो. चौथं स्थान त्याच्या हीटमध्ये होतं.
9 Aug 2016 - 7:41 pm | असंका
काय आहे कायच कळेना...मला पण तसंच वाटतंय वाचल्यासारखं... पण रेडिफवर आलंय की पदकाच्या शर्यतीतून बाहेर. ..
9 Aug 2016 - 7:16 pm | लालगरूड
दत्तू भोकनळही पदकाच्या
शर्यतीतून बाहेर
9 ऑगस्ट 2016 - 05 : 59 PM IST
रिओ डि जानिरो : रोईंगमध्ये उपांत्यपूर्व
फेरी गाठून इतिहास घडविणारा
भारताचा दत्तू भोकनळ आज (मंगळवार )
पदकाच्या शर्यतीतून मात्र बाहेर पडला .
उपांत्य फेरीसाठी तो पात्र ठरू शकला
नाही. त्यामुळे भारतीय पथकाच्या पदरात
आज पुन्हा एकदा निराशा आली .
दत्तू भोकनळने उपांत्यपूर्व फेरी गाठत
इतिहास घडविला होता . किंबहुना,
पहिल्या दोन दिवसांमधील ही भारतीय
पथकासाठी एकमेव सुखद बाब होती .
उपांत्यपूर्व फेरीत मात्र दत्तू फारशी कमाल
करू शकला नाही.
एकूण सहा जणांच्या या उपांत्यपूर्व फेरीमध्ये
दत्तू चौथ्या क्रमांकावर राहिला . प्रत्येक
उपांत्यपूर्व फेरीतील पहिले तीन स्पर्धक
उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले .
वास्तविक , दत्तूने सुरवात चांगली केली
होती . पहिल्या 500 मीटरनंतर तो
तिसऱ्या क्रमांकावर होता . पण त्यानंतर
पोलंडच्या नॅथन वेग्रिझ्कीने त्याला मागे
टाकले. ही पिछाडी दत्तूला शेवटपर्यंत भरून
काढता आली नाही. यामुळे
पदकासाठीच्या शर्यतीतून दत्तूला बाहेर
पडावे लागले .
रोईंग : उपांत्यपूर्व फेरीचा निकाल
1 : दामिर मार्टिन (क्रोएशिया) :
6 :44 : 44
2 : ऍलन कॅम्पबेल (ब्रिटन ) : 6 : 49 :41
3 : नॅथन वेग्रिझ्की (पोलंड ) : 6 : 53 :52
4 : दत्तू भोकनळ (भारत ) : 6 :59 : 89
5 : जोनाथन इस्क्युवेल (उरुग्वे ) : 7 : 40 :27
6 : महंमद अल खाफाजी (इराक) : 8 :29 :76
9 Aug 2016 - 7:44 pm | एस
दत्तू भोकनळ यांचं विशेष कौतुक वाटते. शाब्बास!
9 Aug 2016 - 7:49 pm | shawshanky
भारत वि. अर्जेंटिना हॉकी
भारताचा ७ व्या मिनिटाला पहिला गोल..पेनल्टी कॉर्नरवर चिंग्लेसाना ने केला गोल..भारत १-० ने आघाडीवर
9 Aug 2016 - 7:52 pm | shawshanky
9 Aug 2016 - 7:52 pm | shawshanky
9 Aug 2016 - 7:53 pm | shawshanky
9 Aug 2016 - 9:04 pm | shawshanky
भारतीय पुरुष संघाचा अर्जेंटिनावर २-१ ने विजय,36 वर्षांनंतर उपउपांत्य फेरीत प्रवेश
9 Aug 2016 - 9:16 pm | shawshanky
#Archery अतनू दासचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश..क्यूबाच्या अँद्रेसला ६-४ गुणांनी हरविले (२८-२६,२९-२६,२६-२७,२७-२८,२९-२८)
11 Aug 2016 - 9:43 pm | shawshanky
रिओ ऑलिम्पिकमध्ये सायनाची विजयी सलामी, साखळी सामन्यात ब्राझिलच्या लोहायनी व्हिसेन्टवर 21-17, 21-17 अशी मात