मॅरेथॉन

क्रिडाजगतातील कुंभमेळा... रिओ ऑलिंपिक..आणि घडामोडी ..

shawshanky's picture
shawshanky in क्रिडा जगत
5 Aug 2016 - 4:23 pm

आजपासून रिओ ऑलिम्पिक २०१६ ची दमदार सुरूवात होणार असून क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्पर्धेला प्रारंभ होईल. या ऑलिम्पिक महाकुंभाची ओपनिंग सेरमनी रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत.

'इट अ‍ॅंड रन' : अल्ट्रारनर्सच्या थरारक विश्वाची सफर !

मारवा's picture
मारवा in क्रिडा जगत
15 Aug 2015 - 11:31 pm

'इट अ‍ॅंड रन : माय अनलाइकली जर्नी टू अल्ट्रामॅरेथॉन ग्रेटनेस' ही स्कॉट ज्युरेक या असामान्य माणसाची अत्यंत रोचक, विलक्षण अशी जीवनकहाणी आहे. स्कॉट ज्युरेक हा अल्ट्रारनर आहे. अल्ट्रारनिंग म्हणजे जहॉं मॅरेथॉन खत्म होती है, वहॉंसे अल्ट्रारनिंग शुरू होती है. या पुस्तकाअगोदर मलाही मानवी रनिंगची मर्यादा म्हणजे मॅरेथॉन वा फार तर ट्राअ‍ॅथलॉन इतकीच माहीत होती. मागे सकाळमध्ये पुण्याच्या एका तरुण डॉक्टरने ट्राअ‍ॅथलॉनसाठी केलेल्या प्रयत्नांवर एक सुंदर लेख वाचला होता. नुकतेच सुपरमॉडेल मिलिंद सोमणनेही एक ट्राअ‍ॅथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केलीय वयाच्या पन्नासाव्या वर्षी, त्याचीही बातमी ताजीच आहे.