तसे पाहिले तर मिसळपाव मला काही नवीन नाही...पण कधी वाटले नाही आपण यावर लिहावे...काल अचानकच सुचले...आता का हे तुम्ही नक्की विचारणार नाही...तर सुचले...लवकरच घेऊन येईन तुमच्यासाठी एक खुमासदार लेखन...तोवर...
प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको.
काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना
मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;)
ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका.
तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले.
या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले.
पैजारबुवा,
काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;)
ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी.
अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते.
म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे
प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई,
बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी
कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही.
उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर.
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) )
आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं.
(अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )
बॉलरचा फॉलोथ्रू संपायच्या आधीच सेहेवाग स्टंप कव्हर करत ऍक्रोस यायचा. बॅट थर्डमॅनच्या दिशेला उचलली जायची. आता झणकेदार पुल बसणार म्हणून आम्ही सरसावून बसायचो.
पैजारबुवांचं नाव प्रतिसादांत बघून तसंच काहीसं झालं.
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 3:06 pm | गणामास्तर
तोवर. . .काय करायचं आम्ही तोवर? ते पण सांगून टाका कि लगेहात दीड दोन शब्दांत.
4 Aug 2016 - 3:28 pm | सनईचौघडा
गणामास्तर तोवर तवेरा गाडीतुन फिरुया आपण. हाकानाका.
4 Aug 2016 - 3:35 pm | किसन शिंदे
टेम्पो नाय चाल्णार का? नायतं यखांदं जीपडं??
4 Aug 2016 - 3:37 pm | किसन शिंदे
"निरमा..निरमा..वॉशिंग पावडर निरमा, इसके झाऽऽगने जादू कर दिया"
खाली ल्यायचं राह्यलं का?
4 Aug 2016 - 3:55 pm | अभ्या..
किसन्या ते झा आणि ग च्या मधले दोन एस्स्स्स कशे टायपले रे?
मला येतच नाही ते. :(
4 Aug 2016 - 4:07 pm | संजय पाटिल
झाSSग असं टायपायचं ....
4 Aug 2016 - 4:08 pm | किसन शिंदे
पाटीऽऽऽल, अवं त्यो S येगळा आन ऽ येगळा..
4 Aug 2016 - 4:07 pm | किसन शिंदे
A+~ (टॅबच्या वर) = ऽ
4 Aug 2016 - 4:11 pm | नीलमोहर
या खास (माजी) संपादकांच्या शॉर्टकट कीज काय ?
4 Aug 2016 - 4:16 pm | किसन शिंदे
नाय नाय... या चाव्या डेल, आय्बॉल, एच्पी, चायना, इंडियन सगळ्यावं हायेत.
4 Aug 2016 - 4:37 pm | संजय पाटिल
मोबाइल वरुन कसं करायचं?
4 Aug 2016 - 4:45 pm | किसन शिंदे
मराठी किबोर्ड असेल तर कदाचित जमणार नाही, पण गूगलचा इनस्क्रिप्ट किबोर्ड असेल तर जमेल बहुदा
4 Aug 2016 - 3:45 pm | सनईचौघडा
किसन देवा तुम्ही म्हनाल तसं चला आज येतांव काय तलावपालीला ? वाईच फिरुन येवुया संद्याकाली.
4 Aug 2016 - 3:51 pm | किसन शिंदे
यिवू की.. सांच्याला सहाला "एक कप चाय" पाशी भ्यॅटा मंग
4 Aug 2016 - 3:46 pm | ज्ञानोबाचे पैजार
तोवर तुम्ही बाहेरच थांबायच. दरवाजा ठोकुन लवकर बाहेर या असे बोंबलायचे नाही.
आता तर कुठे कळ आलीय, मोकळ व्हायला वेळ लागणारच. तोवर दम धारा.
सब्रका फळ मिठा होता है. थोड थांबा अन मग बघा तुम्हाला कसा ताज्या ताज्या सुगंधी जिलबीचा आनंद लुटता येइल ते.
आता पर्यंत लोक मिपावर डायरेक्ट मोकळे व्हायला येत असत. अशी कळ आली म्हनुन कोनी झैरात केली नव्हती.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 3:48 pm | अमितदादा
__/\__
4 Aug 2016 - 3:49 pm | किसन शिंदे
ब्वॉ..दंडवत घ्या.!!
=)) =)) =))
4 Aug 2016 - 3:56 pm | ज्ञानोबाचे पैजार
देवा उगा येता जाता दंडवत घालु नका. आमाला आमच्या पायरीने राहुद्या.
बहुरुप्याचा पुढचा भाग कधी लिवताय?
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 4:07 pm | नीलमोहर
देवांना भरपूर (रिकामा) वेळ दिसतोय हाताशी,
पैजारबुवा, तुम्हाला दंडवत घालून थकलो आम्ही :)
लेखिकाबाई, अत्यंत उत्कंठावर्धक लेखन.. व्हॉट अ सस्पेंन्स..
4 Aug 2016 - 4:11 pm | किसन शिंदे
तर..तर मास्तरच्या म्हागं माझाच नंबर हाय, आन अजून जिल्बी यायला येळ हाय तोवर...
4 Aug 2016 - 3:52 pm | चिनार
कळा या लागल्या जीवा...:-)
दंडवत घ्या !
4 Aug 2016 - 3:54 pm | मोहनराव
:)
4 Aug 2016 - 3:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
=)) खपलो.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 3:56 pm | अभ्या..
माऊली सोडत नाहीत मौका.
हाणणारच स्टेडीयमबाहीर
4 Aug 2016 - 4:07 pm | जव्हेरगंज
4 Aug 2016 - 7:46 pm | आनन्दिता
=))
4 Aug 2016 - 8:29 pm | उडन खटोला
>>> सब्रका फळ मिठा होता है.
'काना' टाकला नाहीत हे बरं केलंत. कुठं म्हणून बुवा विचारणार नाहीत बरं. ;)
4 Aug 2016 - 3:53 pm | मोहनराव
मिपावर "Teaser" टाकायची पद्धत आली आहे काय?
तोवर ... माश्या मारत बसतो.....
4 Aug 2016 - 4:00 pm | ज्ञानोबाचे पैजार
माश्या मारताना हात सांभाळा. माशी जायची उडुन आणि हात जायचा बुडुन
आणि माश्या मारल्यावर हात साबण लावुन स्वच्छ धुवा.
मगच किबोर्डाला हात लावा.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 4:02 pm | अभ्या..
अयायायायायाया
अशा प्रकारे माऊली फुल्ल पेटलेले आहेत. पळा....
4 Aug 2016 - 5:36 pm | मोहनराव
बुवा.. लोल!!
4 Aug 2016 - 3:56 pm | सनईचौघडा
आणि शिंची ही कळ साधी नाहीये हो, अचानक सुचलं म्ह्णत्येय लेखिका म्हणजे जिल्बी बरोबर मठ्ठा पण असणार. गुरुजीss ओ गुरु sजीss तांब्या आणा बरे.
4 Aug 2016 - 3:59 pm | सिरुसेरि
जोवर पैसा तोवर बैसा हा संदेश आठवला .
4 Aug 2016 - 4:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्लीज चिकोल्या नका आणू ? डोळे भरून येतील असंही नको.
काही तरी खुसखुशीत, म्हणजे आपलं लेखन मोबाइलवर वाचतांना
मी सारखा गालातल्या गालात हसलो पाहिजे, आणि आजुबाजुचे लोक.. कसला बावळट म्हातारा आहे, अशा नजरेने लोकांनी माझ्याकडे पाहिलं पाहिजे. ;)
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 4:13 pm | किसन शिंदे
अच्छा !! इथलं कनेक्शन तिथं जोडलं तर...
4 Aug 2016 - 4:19 pm | ज्ञानोबाचे पैजार
ओ ताई तुम्ही यांच्या वरलिया रंगा भुलून त्यांच्या फर्माईशी पूर्ण करायच्या फंदात पडू नका.
तुम्हाला अजून यांनी पाहिले देखिल नसेल पण खुशाल काकु म्हणुन मोकळे झाले.
या खवचट म्हातार्याच्या काकु या नात्याने आम्ही तुम्हाला ताई म्हणुन संबोधले.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 4:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काकू या शब्दात अतीव रिस्पेक्ट आहे, काकू शब्दातून एक जिव्हाळा, आपुलकी, प्रेम दिसतं, सतत कुटुंबाची काळजी करणारं प्रसंगी चुका पोटात घेणारं ते एक व्यक्तिमत्व वाटतं. तै अशा शब्दात जालावर भीती दिसते, उगा रिस्क नको असा भाव त्या शब्दात दिसतो ;)
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 5:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
ताई म्हणते की कशी एक वात्सल्यमुर्ती डोळ्यासमोर उभी रहाते. आपली सतत काळजी घेणारी. आपल्या घासातला एक घास लहानग्या भावासाठी काढुन ठेवणारी. आईने घातलेले धपाटे स्वत:च्या पाठीवर झेलणारी.
अशी ताई असावी अशी प्रत्येक भावाची इच्छा असते.
म्हणुनच एका प्रसिध्द कवीने लिहिले आहे
प्रेम स्वरुप ताई,वात्सल्य सिंधु ताई,
बोलावु तुज आता मी कोणत्या उपायी
कोणाला ताई म्हणण्यात आम्हाला तर कोणतीच रिस्क दिसत नाही.
उलट काकु म्हटल्याने चार फटके पडायची शक्यता जास्त दिसते. (पुण्यात येउन कोणत्याही वयाच्या आणि आकाराच्या बाईला (तोंडावर) काकु म्हणुन दाखवा. लकडीपुलावर मी तुमचा पुणेरी पगडी घालुन शाल आणि श्रीफळ देउन (पाणी असलेला नारळ वाजवुन) सत्कार करेन. जर तुम्ही सत्काराला येउ शकलात तर.
पैजारबुवा,
4 Aug 2016 - 5:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वास्तव जगातील ताई आणि आभासी जगातील ताई यात फरक आहे हो, जाल काकू आणि वास्तव काकू या सारख्या वाटतात.
जाऊ द्या....जाल काकू लेखन घेऊन आल्यावर सांगतील खरं काय ते.... :)
-दिलीप बिरुटे
5 Aug 2016 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार
जाल काकू असे म्हणाल्यावर आमच्या डोळ्या समोर राष्ट्रकाकू गिरीजा उभ्या रहातात. आणि मग दुसर्या कोणाला काकू म्हणावेसे वाटत नाही.
या उलट तै म्हटले की आपल्या शरदिनीताई डोळ्यासमोर येतात. याच कारणाने मी सर्व स्त्री सदृष्य आयडींना ताई असे संबोधतो.
कोणी कोणाला काय म्हणावे हे माझ्या हातात नाही. मी केवळ एक निरिक्षण नोंदवले इतकेच.
पैजारबुवा,
5 Aug 2016 - 12:38 pm | रातराणी
किती तो गोंधळ बाई बाई. मॅडम म्हणत चला सरळ.
4 Aug 2016 - 4:10 pm | नाखु
"कळ"ल्यावाचून लिहू नये,"बो"लावल्याशिवाय जाऊ नये....
मी नक्की कुणाचा या त्यांच्या आगामी चोरोळी संग्रहातून साभार.
4 Aug 2016 - 4:54 pm | अजया
पैजार बुवा _/\_
4 Aug 2016 - 4:54 pm | ५० फक्त
मला फोटो दिसत नाहीत, अजुन कुणाला असं होतंय का ?
4 Aug 2016 - 4:59 pm | अभ्या..
पोटो दिसत नैत अन्ना तुम्हाला. मला तर दिसतेत की.
.
अभ्या चिंताकिंदी
(कन्ना चौक)
4 Aug 2016 - 5:01 pm | सनईचौघडा
झालं तांब्या आणि जिल्बीचं नाव कुठे निघालं की ५० फक्त आलेच.
4 Aug 2016 - 5:24 pm | ५० फक्त
अंमळ गंडला काय प्रतिसाद सचौ.
4 Aug 2016 - 7:37 pm | सामान्य वाचक
भाषा शैली सुरेख आहे.
पुढचे सगळे 100 भाग एकदम टाकले तरी चालतील
तुम्हाला मिपा नवीन नाही हे कळलेच म्हणूनच तुम्ही असा धागा काढलात
4 Aug 2016 - 8:19 pm | अस्वस्थामा
आधी एक पोटे होते (या त्यांच्या प्रतिक्रियांचा नमुना, बघा ओळख पडतीय का ? ;) )
आंतरजालावरदेखील लोकांची सामाजिक स्मृती क्षीण असते असे मानणारे असतात म्हणायचं.
(अर्थात या आयडीचा त्या आयडीशी संबंध असेल असं म्हणणं घाईचं असेल. वाट बघेगे आणि देखेंगे पुढे काय काय होताय ते. )
4 Aug 2016 - 9:58 pm | खटपट्या
वाचतोय...
5 Aug 2016 - 11:54 am | आदूबाळ