रविवार सकाळ.
अनयाची वाट बघत होतो.
नेमके कशासाठी येणार होते ते माहीत नव्ह्ते पण अंदाज करु शकत होतो.
अत्यंत तल्लख बुद्धीची अनया.
दोन इयत्ता पुढे.
ठरल्या वेळी माय लेकी हजर.
झळालले चेह्रेरे सगळे काही सांगुन गेले.
आई ने सुद्धा फाफट पसारा न लावता मुद्द्याच्या विषयाला हात घातला. पर्समधुन मेडल काढले.
होमी भाभा गोल्ड(रंग) दाखवले.
"ऑसम. ये तो होना ही था.अभिनंदन"
सर, तुमच्या मार्ग दर्शनाशिवाय शक्यच नव्हते.
"मी निमित्तमात्र. सगळी मेहेनत तिची. नेक्स्ट स्टॉप एन्. टी.एस. टॉप ५, राइट अनया."
अनया ने मान डोलावली.
अनया सरांच्या पाया पडुन आशिर्वाद घे.
अनया च्या चेहेर्यावर किंचित ढग.
" नको पाया पडायची गरज नाही. लेट अस शेक हँड्स अँड सील द पार्टनरशिप, ओके"
मी हाथ पुढे केला.
अनया ढीम्म उभी.
आई ने आवाज दिला, अनया....
आता अनया चा नाईलाज होता,
अंग चोरुन तिने हाथ पुढे केला, मी तो हातात घेउन थोपटला.
वॉश रुम कुठे, अनया चा पुढचा प्रश्न.
मी दिशा दाखवली.
"बेसीन वर डिसेन्फेक्टंट आहे. साबण वापरायची गरज नाही."
अनया चा चेहेरा खुलला.
........................
सर राग नाही आला ना.
" नाही बॉ. राग कशाला. काहीही चु़क नाही तिची"
जरा जास्तच होतय सर, हे म्हणत होते सायकिअॅट्रीस्ट दाखवुया.
"काही ही गरज नाही"
सर, शाळेतुन आली की पहिल्यांदा आंघोळीला जाते.तीला तिच्या कुठल्याही वस्तुला हाथ लावलेला चालत नाही. आम्हाला सवय झाली आहे, पण पाहुणे आले की अवघड होते. विषेशतः लहान मुले आली तर पंचाईत होते. आणि त्यांना समजावुनन सांगता सांगता नाकी नउ येतात. आणि मग ओ.सी.डी,सायकीअॅट्रीस्ट च्या हलक्या आवाजात चर्चा सुरु होतात. कंटाळा आलाय, काय करावे ते कळत नाही. बोलते सर्वांशी पण लांबुन. तसा कुणाचा अपमान पण करत नाही.पण एका हद्दीच्या बाहेर काहीही नाही.
"ज्याला तुम्ही प्रॉब्लेम म्हणता ते तिच्या खाती नॉर्मल आहे आणि ते तुम्ही करत नाही म्हणुन ती तुम्हा सर्वांना ओ.सी.डी. माझ्या लहानपणी क्रिकेट खेळुन आल्यावर हात धुल्या शिवाय जेवणे हा नेहेंमीचा कार्यक्रम. गटारात गेलेला बॉल काढुन त्याच हाताने जेवणे वॉज वेरी नॉर्मल.आज त्याचा विचार करुन शहारे येतात. काहीही काळजी करुन नका.
शाळेत होणारे विविध हेल्थ कॉन्शसनेस चे कार्यक्रम,मीडीया "जर्म फोबिया बंबार्ड्मेंट" काही मुले टोटॅलिटी मधे स्विकार करतात. उगाच कुठल्या तरी डॉक्टर कडे नेउन प्रॉब्लेम वाढवु नका. जे आहे ते आहे त्याचा हसत स्विकार करा,आपोआप जाईल हे."
हे फार खंतावतात हो, मेडल मिळाल्यावर तिला कवेत घ्यायचे होते पण तिने फक्त शेक हँड केला. ही चे पुढे कसे काय होणार ह्याची फार काळजी आहे हो. समवयस्कांबरोबर मिसळायला नको का?
"तिला नाही मिसळायचे, तर सो बी ईट."
पण सर..
"काहीही फर॑क पडत नाही. अहो इतर पालकांना मिसळायचे प्रॉब्लेम असतात आणि त्यातुन मुलांना कसे वाचवायचे हे त्यांना कळत नाही, तुमचा कोलॅटरल बेनिफिट समजा आणि शांत रहा.सो फार शी कॅन कॅरी हर सो कॉल्ड ओ.सी.डी इट इज ओके"
..............
वॉश रुम चा दरवाजा उघडला, अनया बाहेर आली. मी आत गेलो, कपाटातुन एक इंटरनॅशनल ब्रँड चे ३ बाटल्यांचे पॅक आणले,आणि तिच्या हाती स्वाधीन केले.
अनया चा चेहेरा उजळला, "थँक यु सर"
मी अनयाला विचारले एक गणित घालु,?
तिने मान डोलावली.
5 raised to (x-a).(x-b).(x-c) till (x-z) ची वॅल्यु काय?
अनया ने एक सेकंद विचार केला आणि उत्तर दिले 1.
"बादशाहो तुस्सी ग्रेट हो, पॅकेट संपले की सांग आणखी एक पाठवतो"
प्रतिक्रिया
1 Aug 2016 - 6:13 pm | राजाभाउ
ग्रेट सर ग्रेट. तुमचा या कड बघण्याचा द्रूष्टिकोन खरच वेगळा आहे. म्हणजे ओसीडी बद्दल अस नव्हे तर एकुणच मुलांच्या वागण्यातील छोट्या , छोट्या चुकां(??) कडे आम्ही पालक अस बघतो कि झाल संपल आता सगळ, त्या पार्श्वभुमीवर हे केवळ वेगळच नव्हे तर विचार करायला लावणार आहे . अस्तुचा मंत्र.
या विषयावर अजुन वाचायला आवडेल.
1 Aug 2016 - 6:36 pm | पैसा
खूप पॉझिटिव्ह विचार आहे. अजून लिहा!
1 Aug 2016 - 6:40 pm | उडन खटोला
हा प्रश्न फक्त एवढ्यापुरता मर्यादित आहे? तसं असल्यास ठीक आहे. अन्यथा काही उपाय योजना करणं आवश्यक वाटतंय. बाकी आपण 'सुगम'संगीत कधी पासून ? ;)
1 Aug 2016 - 6:52 pm | असंका
सुगम संगीत!!!
शब्द आवडला!!
1 Aug 2016 - 6:42 pm | विनायक प्रभू
सुगम संगीत ? कळले नाही हो उख
1 Aug 2016 - 7:05 pm | उडन खटोला
तुम्ही लिहिलेलं पटकन 'गमलं'.
काही cryptic नाही. म्हणून सुगम.
1 Aug 2016 - 6:59 pm | नीलमोहर
हा वेगळा दृष्टीकोन खूपच आवडला, खरेतर असे कौन्सेलिंग शाळांमध्येच होणे गरजेचे आहे.
सगळे पालक असा विचार करत असते आणि आपल्या मुलांना नॉर्मल, अॅज इज जगू देत असते तर
कितीतरी समस्या मुळातूनच मिटल्या असत्या.
तुम्ही सायकियॅट्रिस्ट आहात बहुतेक. अजून असे किस्से वाचायला आवडतील,
धन्यवाद :)
1 Aug 2016 - 6:59 pm | गवि
या कथेत वेगळीच छटा दिसली. तो भास की खरंच तसंच इन्टरप्रिटेशन योग्य आहे हे सांगता येत नाही.
फिक्शन असल्यास तसं मानता येईल.
मानसिक उपचारांऐवजी उलट हँडवॉशच्या इंपोर्टेड ब्रँडचा सप्लाय करणारे (खतपाणी घालणारे) सर/ कोच असा फिक्शनल अँगल आहे का?
1 Aug 2016 - 7:07 pm | विनायक प्रभू
इट इज कॅच २२ गवि
1 Aug 2016 - 7:12 pm | गवि
__/\__
1 Aug 2016 - 7:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून उकलून सांगता का स्टोरी. प्रॉब्लम सूटला असं वाटलं नाही.
कथा सांगत राहा सर, मला नै कल्ला म्हणून काय झालं. :(
-दिलीप बिरुटे
2 Aug 2016 - 12:14 pm | गामा पैलवान
प्राडॉ,
असं बघा की :
(x-a).(x-b).(x-c).... हा गुणाकार करंत (x-z) पर्यंत गेलं, तर एक कंस x-x म्हणजे ० येणार. सहाजिकंच सर्व गुणाकार ० येणार. शेवटी 5 raised to 0 म्हणजे ५ चा शून्यावा घातांक काढायचं एव्हढंच काम उरलं.
आ.न.,
-गा.पै.
2 Aug 2016 - 12:43 pm | विनायक प्रभू
ह्याचा अर्थ जिथे तुमची पॉवर शुन्य आहे तिथे अंक कुठलाही असो उत्तर एक च येणार. १= अनया
म्हणजेच अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.
2 Aug 2016 - 1:12 pm | गामा पैलवान
विप्र,
हे पण खरंच की! ये अंदाजपे गाम्या बहुत खुश हुवा. :-)
आ.न.,
-गा.पै.
3 Aug 2016 - 3:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>>>मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.
हं....ओके.
गा. पै आणि सर. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
4 Aug 2016 - 10:24 am | डॉ सुहास म्हात्रे
अनया ला जे वाटते ते खरे. तुमच्या फ्रेम ऑफ रेफेरन्स शी तिला काहीही घेणे देणे नाही. मला योग्य वाटते ते मी करणार, त्याचा तुम्हाला काहीही त्रास आहे का? मग गप्प बसा आणि लक्ष देउ नका.
हे अनयामध्ये असलेल्या मोठ्या समस्येचे पहिले लक्षण असले तर ?
मोठ्या समस्या छोट्या असताना त्यांचे निराकरण तुलनेने बरेचसे सोपे आणि यशस्वी असते. मोठी समस्या असणारच नाही असे वरवरचा अंदाज पुढे भारी पडू शकतो. त्यामुळे, सामान्य व्यवहारापेक्षा फार वेगळा व्यवहार एखाद्या मोठ्या समस्येकडे निर्देश करत नसल्याची खात्री करून मगच त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.
1 Aug 2016 - 8:31 pm | चतुरंग
कधी होतं त्याचा प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असतो.....
इतकंच पालकांनी सांभाळलं तर बरेच प्रश्न हे प्रश्न नसतातच.
धन्यवाद मास्तुरे! __/\__
1 Aug 2016 - 11:48 pm | ज्योति अळवणी
आवडलं
1 Aug 2016 - 11:52 pm | संदीप डांगे
अव्हिएटर आठवला....
2 Aug 2016 - 4:42 am | डॉ सुहास म्हात्रे
संस्कारक्षम वयातल्या समस्यांची झलक सुंदर रितीने लेखात मांडली आहे.
या नाण्याला दोन बाजू आहेत.
एक बाजू...
प्रत्येकजण (म्हणजे तुम्ही आम्हीच हो !) आपल्याभोवती विचार-आचाराची एक विशिष्ट सीमा आखून घेतो. समाजातली प्रत्येक व्यक्ती आपल्या वैयक्तीक विचारांप्रमाणे आणि मानसिक ताकदीप्रमाणे ती सीमा स्वतःला परवडेल तेवढी ताणते-आक्रसते. या सर्व सीमांची सरमिसळ (ओव्हरलॅप) होऊन त्यांची एक जाडसर सामाजिक सीमा तयार होते.
त्या सीमेपासून (बाहेर किंवा आतवरही) दूर गेलेल्या व्यक्तिच्या संबंधात; (अ) ती व्यक्ती "परकी" असली तर "जमेल व परवडेल तेवढी" छद्मी टीकाटिप्पणी केली जाते आणि (आ) ती व्यक्ती "आपली" असली तर दुसरे कोणी "तशीच छद्मी टीकाटिप्पणी" करेल म्हणून कावरे बावरे व्हायला होते ! :)
ही दुसरी अवस्था म्हणजे "इतर लोक काय म्हणतील?" सिंड्रोम होय. तो टाळायला, "संस्कारक्षम" वयाच्या मुला-मुलींना समजून त्यांच्या प्रश्नांचे निरसन करणे जेवढे जरुरीचे आहे तेवढेच त्यांच्या पालकांच्या गैरसमजती दूर करणे जरूरीचे आहे. (दुसर्या शब्दांत : 'कोणकोणत्या गोष्टींना' व 'त्या प्रत्येक गोष्टीच्या कोणत्या स्तराला' किती महत्व द्यायचे किंवा फाट्यावर मारायचे, याचे भान ठेवणे जरूरीचे आहे.) याबाबतीत तारतम्य पाळले तर, "काल सरतो तसे शहाणपण येते."
दुसरी बाजू...
पालक मुलांच्या जवळपास वावरत असतात (हे गृहीतक सर्व पालकांत खरे असेलच असे नाही, पण बहुसंख्य पालकांत ते अध्याहृत धरूया). त्यामुळे, जेव्हा पालक कावरेबावरे होतात तेव्हा ती केवळ "इतर लोक काय म्हणतील?" अशीच काळजी आहे की त्यांच्या म्हणण्याला अजून काही सबळ आधार आहे हे पाहण्यासाठी अजून काही उत्खनन करणे जरूर आहे. जर पाल्यात काळजी करण्याजोगे इतर काही महत्वाचे धागेदोरे सापडले तर त्याची मूळ कारणे आणि म्हणून उपायही जास्त गंभीर असू शकतात.
गंभीर उदाहरण फार कमी प्रमाणात आढळत असले तरी ज्या व्यक्तीत ते आढळते त्या व्यक्तीच्या (आणि तिच्या पालकांच्या) जीवनावर त्याचे लक्षणीय आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात... मुख्य म्हणजे अश्या प्रत्येक व्यक्ती-पालक समुहासाठी हे परिणाम १००% असतात... तेथे संख्याशास्त्र (statistics) कामी येत नाही.
थोडक्यात, फार आक्रमक पवित्रा नको पण फार संरक्षणात्मक पवित्राही बरा नाही... ही कृती कठीण आहे, पण हे जग असेच आहे ! ;)
2 Aug 2016 - 12:31 pm | सतिश गावडे
प्रतिसाद आवडला.
2 Aug 2016 - 12:44 pm | चतुरंग
चोक्कस! :)
4 Aug 2016 - 10:33 am | सपे-पुणे-३०
+ 1
2 Aug 2016 - 10:15 am | रामदास
वॉश रुम मधून बाहेर आल्यावर हातावर चार वेळा साबण फासून दहा वेळा हात धुणारी मुलं आठवून हसायला आले.
2 Aug 2016 - 12:06 pm | जागु
तुम्ही खुप पॉझिटिव्हली पाहीलत तिच्याकडे पण समाजात वावरताना तिच्या अशा वागण्याने तिच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो. सगळेच तिला समजून घेतील असे नाही. त्यामुळे ती बरी होईल ह्या आशेवर दिवस ढकलण्यापेक्षा मानसोपचार तज्ञाकडून उपचार करुन घ्यावा असे माझे मत आहे.
2 Aug 2016 - 12:47 pm | विनायक प्रभू
तिला समजुन घ्यावे अशी तिची अपेक्षा नाही. ज्याला तुम्ही आजार समजता आणि त्याचा तुम्हाला काही त्रास आहे का?
उदा: टी.बी.
मग मानसोपज्ञ, सप्रेसंट औषधे आणि त्याचे दुरगांमी वाईट परिणाम पेक्षा आपोआप कमी होईल ह्याची वाट बघणे केंव्हाही योग्य.
2 Aug 2016 - 1:02 pm | जागु
आम्हाला सवय झाली आहे, पण पाहुणे आले की अवघड होते. विषेशतः लहान मुले आली तर पंचाईत होते. आणि त्यांना समजावुनन सांगता सांगता नाकी नउ येतात. आणि मग ओ.सी.डी,सायकीअॅट्रीस्ट च्या हलक्या आवाजात चर्चा सुरु होतात. कंटाळा आलाय, काय करावे ते कळत नाही.
तिच्या आईला जे अनुभव येतात त्यावरून मी वरची पोस्ट टाकली आहे. कौन्सिलिंग केल्याने दुष्परीणाम नाही होणार.
2 Aug 2016 - 12:08 pm | पाषाणभेद
आपण चांगलेच आहात गुर्जी पण तरीही अनयाच्या आयुष्यात या आजाराबद्दल सकारात्मक घडो हीच ईच्छा.
3 Aug 2016 - 9:50 pm | अनुप ढेरे
मस्तं आहे लेख. अजून साइड पकडता आलेली नाहिये पण.
3 Aug 2016 - 11:51 pm | रातराणी
हम्म.
4 Aug 2016 - 10:20 am | सुबोध खरे
प्रभू सर
जे आहे ते आहे त्याचा हसत स्विकार करा,आपोआप जाईल हे."
हे पटले नाही.
आईला मुलीला कवेत घ्यायचे होते तरीही मुलगी तयार नाही याचा अर्थ तिची स्वच्छतेबद्दलची कल्पना प्रमाणाबाहेर टोकाची(अतिशयोक्तीची) आहे.
कोणाशीही हस्तांदोलन करीत नाही मग बस मध्ये किंवा रेल्वेत चढणार कशी? केवळ स्वतःच्या गाडीत आणि ती सुद्धा जंतुनाशकाने धुवून?
उद्या नोकरीवर गेली तर वरिष्ठांशी कसे वागणार? हस्तांदोलनानंतर जर ती हात धुते हे कळले तर वरिष्ठ कितिही हुशार असेल तरी समजून घेणार नाहीत. (प्रत्येक माणसाचा अहं असतोच)
आईवडिलांशी मिळून मिसळून वागली नाही तर एक वेळ समजू शकतो. पौगंडावस्थेत असे होऊ शकते. पण समवयस्क मुलांशी मिळून मिसळून वागू शकली नाही तर अतिहुशार असूनही सार्वजनिक जीवनात अपयशी होण्याची शक्यता जास्त आहे. अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात.
हुशारी हा एक गुण झाला. पण इतर अवगुण असतील तर हुशारी आपली चमक दाखवू शकत नाही असे असंख्य वेळेस सिद्ध झालेले आहे.
या केस मध्ये( जर प्रत्यक्ष असेल तर) हि मुलगी मंत्रचळेपणा( OCD) या आजाराची शिकार झालेली आहे किंवा त्याच्या कडेवर उभी आहे.
वेळेत उपचार झाले नाहीत तर हुशारी असून फुकट जाण्याचीच शक्यता जास्त आहे.
आपल्या लेखात तिच्या हुशारीचे जरा "जास्त" कौतुक होताना दिसत आहे आणि हुशारीमुळे इतर अवगुण झाकले गेल्यासाखे दिसत आहेत.
जाता जाता-- हुशारीचे नऊ प्रकार आहेत असे मानले जाते. https://en.wikipedia.org/wiki/Theory_of_multiple_intelligences
http://skyview.vansd.org/lschmidt/Projects/The%20Nine%20Types%20of%20Int...
यातील गणिताच्या हुशारीला आपल्याकडे अवास्तव महत्त्व दिले जाते.
असे असूनही सर्वात जास्त सत्ता किंवा पैसे हा गणिती हुशार पेक्षा भाषिकLinguistic Intelligence आणि परस्पर संबंधातील हुशारInterpersonal Intelligence (People Smart”) व्यक्ती मिळवताना जगभर दिसतात. उदा वकील, राजकारणी आणि सनदी नोकर.
हे लोक शास्त्र आणि गणितातील हुशार लोकांना( डॉक्टर इंजिनियर इ.) हे आपले बटीक बनवून वापरताना दिसतात.
4 Aug 2016 - 10:37 am | गवि
म्हणूनच मला उलट ही एक मनोव्यापार थीम बेस्ड गूढकथा वाटते. कथेतले सर / टीचर हे त्या मुलीचा मंत्रचळ नुसता इग्नोर करत असते तर इंपोर्टेड डिसइन्फेक्टंट वगैरेचा स्टॉक का पुरवत राहिले असते? असं पुरवणं हे उलट खतपाणी घालणारं आहे.
यात सर तिला फक्त स्वतःच्या कंट्रोलमधे ठेवू इच्छितात आणि त्यासाठी वारंवार निर्जंतुकीकरण करणार्या बाटल्या पुरवतात, मनोविकाराची शक्यता झटकून टाकतात.. अशाही अँगलने पाहता येईल (लेखकाला अभिप्रेत नसेलही, तरीपण)..
किॅवा पाण्याने सतत हात धुणे या मंत्रचळापासून दूर होण्याची एक मधली स्टेप म्हणजे पाण्याऐवजी हँड सॅनिटायझर वापरणे असंही असेल का? जर तसा हीलिंग उद्देश सरांचा असेल तरीही मानसिक विकार / समस्या सरांनी अॅक्नॉलेज , मान्य केली असंच होईल.
4 Aug 2016 - 10:41 am | डॉ सुहास म्हात्रे
+१
थोडीशी पुस्ती...
अशी एकलकोंडी मुलं( जर हा मनोविकार नाही असे निदान झाले तर) फक्त संशोधनासारख्या क्षेत्रात टिकू शकतात.
हे दोनएक दशकांपूर्वी शक्य होते. पण...
आधुनिक संशोधनात "स्वतःला प्रयोगशाळेत बंद करून संशोधन करणारा एकांडा संशोधक" हे समिकरण आता जुने झाले आहे. उच्च प्रतीचे आधुनिक संशोधन करण्यासाठी "अनेक (बर्याचदा अनेक देशांत विखुरलेल्या) संशोधकांचे आणि त्यांना मदत करणार्या तंत्रज्ञांचे मोठे गट" कार्यरत असतात. त्यामुळे अश्या विविध विषयांचे आणि विविध पात्रतेचे तज्ञ एकत्रितपणे काम करत असलेल्या गटांचे यशस्वी नेतृत्व करू शकेल अश्या "उत्तम प्रबंधक" असलेल्या संशोधकालाच यश मिळते आणि त्याचे नाव प्रबंधावर सर्वप्रथम असते. महत्वाच्या विषयावरचा एकांड्या लेखकाचा शास्त्रिय प्रबंध भूतकालात जमा झालेला आहे.
5 Aug 2016 - 5:42 am | कंजूस
सुगम आणि शास्त्रीय दोन्ही आवडले.
5 Aug 2016 - 10:56 am | स्पा
हल्लीच्या मुलांची नाटके वाढत चालली आहेत असे वाटते
पूर्वी साला घरी आम्हाला धु धु धुवायचे काही फरक पडायचा नाही, शाळेत इतका मार पडलेला असायचा कि घरचा मार काहीच नसे.
वर मास्तरांनी केलेले लाड पाहून डोळ्यात पाणी आले
5 Aug 2016 - 7:31 pm | अभ्या..
हा ना भावड्या.
परत मार खाउन वर तोंड करुन बोलायची सोय नसायची.