ग्लास झाले रिते सारे
भरा पेग तो नवा रे
भास अन आभास आता
संगतीला हवा रे ..
रात्र चढली अंगावरती
जरा सावरा जिवा रे
अंधाराच्या सोबतीला
लुकलुकणारा दिवा रे...
किती रिचविले हे आम्ही ग्लास ऐसे
किती उधळिले त्यावरी वेळ पैसे
किती रात्री आम्ही असे टुन्न झालो
रिते ग्लास ते पाहुनी सुन्न झालो...
प्रतिक्रिया
30 Jul 2016 - 4:33 pm | बरखा
ग- ग्लासा मागे ग्लास भरूनी गटागटा ते रिचविले
टा - टाळी लागली ब्रम्हानंदी तरी ग्लास भरती रे
री - रीते राहीना ग्लास कुणाचे, बाटल्यांची ती रांग वाढे
रोजच असती टून्न रात्री मग गटारी ला काय नवे?
2 Aug 2016 - 5:41 pm | ज्योति अळवणी
मस्त
30 Jul 2016 - 8:26 pm | अत्रुप्त आत्मा
पांडु मोड अॉन-
असा झाला तर तो सगळा प्रकार!
पांडू मोड अॉफ..
2 Aug 2016 - 6:54 am | बाजीप्रभू
गटारी अमावस्या हा सण प्राचीन संस्कृतीनुसार गटारांची, ड्रेनेजलाईनची पूजा करून साजरा करतात, या दिवशी सार्वजनिक गटारे जे आपल्या शहराला स्वच्छ ठेवतात त्यांच्या सन्मानार्थ त्यांची पूजा केली जाते.. जसे दसर्याला शस्त्रपूजन केले जाते, स्वरस्वतीपूजन असते, अगदी तसेच... यादिवशी आपापल्या परीने श्रमदान करावे असा प्रघात आहे. न थकता श्रमदान करता यावे यासाठी कँलॅरीयुक्त आहाराचे सेवन करावे जसे मांसाहार. ज्या सद्गृहस्थांना गटारीत उतरून श्रमदान करावयाचे आहे त्यांना मदिराप्राशनाची अनुमती शात्रात दिलेली आहे.... या दिवशी गटारीचे शास्त्रोक्त पूजन केल्यानंतर आनंदाचे प्रतीक म्हणून स्त्रियांनी झोका खेळण्याची प्रथा परंपरांगत चालत आली आहे. जसा झोका वर जातो, तसे आपण प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी, अनारोग्य आणि दुःखे खाली जाऊ देत हा त्यामागचा उद्देश आहे. पुरुषांनाहि झोका घेता यावा म्हणून मद्य प्राशनाचं प्रयोजन असावं असा कयास काही शात्रपंडित मांडतात. आपली संस्कृती म्हणजे थोतांड असं कायम धोशा लावणाऱ्या काही बुद्धीजीविंनी सामान्य लोकांत या सणाबद्दल एक भ्रम निर्माण केला आहे हे आपलं दुर्दैव आहे. आज पावसाळ्यात तुंबणारी गटारे हि या सणाचा मुख्य उद्देश दुर्लक्षित केल्यामुळे होत असावीत असं जाणकारांचं मत आहे.