रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 12:32 pm | भटकंती अनलिमिटेड

आधी युनिकॉर्न वापरत होतो. थंडरबर्ड घेण्यास रॉयल एनफिल्डची क्रेझ हा एकमेव क्रायटेरिया होता. त्यातल्या त्यात बरी, थोडी ऍडव्हान्स फीचर्स असलेली (डिजिटल कन्सोल, दोन्ही डिस्कब्रेक, प्रोजेक्टर लाईट्स) टूरिंगसाठीची कंफर्टेबल सीट आणि रुंद हॅंडल्बार (तेही बदलून RD350चे टाकले आहे).

सुबोध खरे's picture

28 Jul 2016 - 12:45 pm | सुबोध खरे

आधी युनिकॉर्न वापरत होतो. थंडरबर्ड घेण्यास रॉयल एनफिल्डची क्रेझ हा एकमेव क्रायटेरिया होता.
सोळा आणे सत्य

थंडरबर्ड ३५० बद्दल बोलत आहात की ५०० बद्दल? ८० च्या पुढे ५०० चा पर्फोर्मन्स पण ३५० सारखाच आहे काय?

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 12:36 pm | टवाळ कार्टा

रॉयल एन्फिल्ड वापरण्यांर्यांनी असे लिहिले तर तो फाउल धरतात...

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 12:46 pm | भटकंती अनलिमिटेड

कुठल्याही गोष्टीचा फ़ॉलोअर असणे वेगळे आणि भक्त बनणे वेगळे. नाही का? ;-)

सोडा हो.. कुठे त्यांच्या नादाला लागताय..? त्यांना आजादी पाहिजे आहे. कशापासून हवी आहे ते त्यांना कळाल्यावर आपल्याला कळवतील. ;)

तुम्ही जरा इथे थंडरबर्डचे झक्कास फोटो चिकटवा.

"तुमच्या कॅमेर्‍याची कमाल + थंडरबर्ड" असे बघायला आवडेल.

महासंग्राम's picture

29 Jul 2016 - 5:17 pm | महासंग्राम

मोदकरावांशी कचकून बाडीस... येवू द्या फोटो

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2016 - 2:11 pm | अनिरुद्ध.वैद्य

थंडरबर्ड अथवा सगळ्याच बुलेट्स संबंधी हीच भावना होत चाललिए. क्रेझ मुळे घेतली, तसा वाईट पर्फोरंस नाहिये पण, आता ती नको वाटायला लागली आहे. व्हाय्ब्रेशन्स, स्लो स्पीड अन चेन ईश्युज आय्येम नॉट इम्प्रेस्ड.

केटीएम ३९० अथवा २०० उत्तम वाटत आहेत सध्या. होंडा सिबिआर सेकंड ऑप्शन.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 2:16 pm | भटकंती अनलिमिटेड

होंडा सीबीआरचे रायडिंग पोश्चर वैयक्तिक सोयीचे वाटत असल्यास (मी तिथे मार खातो) त्यासारखी आखुडशिंगी दुभती बाईक नाय कोणती. खूप लोक टूरिंगसाठी ही बाईक वापरतात. पॉवर आणि रिलायबिलिटीचा उत्तम मिलाफ आहे. फक्त शोरुमवाल्यांचा माज जरा जास्त आहे... म्हणजे बाईक टेस्ट राईडलाही देणार नाहीत. "बाहेर मित्राची चालवून बघा" असा अटिट्यूड.

अगदीच, आणि वर अजून थोडा पैसे ओतला तर लगोलग ABS पण येऊन जाईल. विथ ABS 35 हजार जास्त पडतात वाटत cbr साठी.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 2:38 pm | भटकंती अनलिमिटेड

ABSशिवाय सीबीआर घेऊच नका. हायस्पीड ब्रेकिंगमध्ये चाकं लॉक होऊन बॅलन्स जाणे, फिशटेलिंग होणे या गोष्टी अधिक घातक आहेत. वाट पहायला लागली तरी आता परफ़ॉर्मन्स बाईक घ्यायची तर एबीएसवाली घ्या. TNT25 फक्त या कारणामुळे मी घेतली नाही. पुढील टार्गेट KTM390आहे. त्यांच्या २०१७चे मॉडेल लॉंचची वाट बघतोय.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 3:14 pm | टवाळ कार्टा

विथ ABS 35 हजार जास्त पडतात वाटत cbr साठी.

१००+ च्या स्पीडला रस्त्यातला खड्डा / मूर्खासारखे ओव्हरटेक करणारे / सिग्नल न देता लेन बदलणारे / असेच इतर यझ लोक यांपैकी कोणत्याही कारणाने पॅनिक ब्रेकिंगमध्ये आपली वाट लागू नये हे समाधान मिळण्यासाठी 35 हजार जास्त नाही...आणि ५ वर्षे जरी बाईक चालवली तरी ७ हजार दर वर्षी म्हणजे महिन्याला जवळपास ५०० रुपये खर्च...फार स्वस्त मामला आहे

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2016 - 2:39 pm | अनिरुद्ध.वैद्य

त्यामुळे आत्ताच रायडींग पोश्चर सांगता येणार नाही, पण पुढे झुकुन ३०० ४०० किमि करणे जरा कठीणच वाटते. वेग वाढला की ते सुसह्य होण अन
त्यामानाने, ड्युकचे पोश्चर बर्‍यापैकी सरळ आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 3:09 pm | टवाळ कार्टा

ड्युकचे पोश्चर बर्‍यापैकी सरळ आहे

टूरिंगसाठी ड्युक बेकार आहे...सस्पेंशन खूप हार्ड आहे त्यामुळे छोटे छोटे खड्डेपण त्रास देतील

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 3:09 pm | टवाळ कार्टा

होंडा सीबीआरची टेस्ट राईड ठाण्यात मिळते बहुतेक...फोन करून विचारा

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2016 - 12:31 pm | कैलासवासी सोन्याबापु

आमचे डार्लिंगचा बद्धा हालत डाउन झालेनी भावसाह्येब , साला डस्ट ने डस्ट ने डस्ट, रेल्वेवाल्याने साला समोरचा ब्रेक लिव्हर ज्यमा क्येला कब्रस्तान मंदी, त्येला दुरुस्त/बदली करायचा खर्च कोण सांगेल काय भावसाह्येब मला?

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 2:12 pm | भटकंती अनलिमिटेड

फक्त लिव्हर डॅमेज हाय नी... मजुरी धरुन फारतर ५००/- च्या आतबाहेर काम व्हायला हवे.

कबीरा's picture

28 Jul 2016 - 1:54 pm | कबीरा

यामाहा 250cc ची एखादी 1-2 लाखापर्यंत बाईक असती तर एवढी डोक्याची मंडई करायची वेळच आली नसती.

- एक निस्सीम यामाहा भक्त.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 2:08 pm | भटकंती अनलिमिटेड

यामाहाच्या MT-03 वर नजर ठेवून असा. असाही १५०+ हा सेगमेंट आता कुठं लोकप्रिय होऊ लागला असल्याने फार लवकर मोठी रेंज अव्हेलेबल होईल अशी अपेक्षा नाही.

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 2:44 pm | कपिलमुनी

हा सध्याचा सर्वात चांगला ऑप्शन आहे.
सिटी + टूरींग दोन्ही साठी वापरता येइल आणि सिटींग पोश्चर सुद्धा चांगला आहे.

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 2:45 pm | कपिलमुनी

apache

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2016 - 2:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

गाववाले, अपाचे सिटिंग पोश्चर फॉल्टी हाय, कंबर राम म्हणायचे बाकी ठेवत नाय! आमच्या मित्राला डॉक्टर कडे जायला लागले, तवा ती नकोच

अद्द्या's picture

28 Jul 2016 - 2:54 pm | अद्द्या

अपाचे 200 बद्दल हि कम्प्लेंट नाहीए बहुदा..

एकदा xbhp बघाच

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 3:10 pm | टवाळ कार्टा

अपाचे 200 ला सुध्धा forward stance आहे

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 3:16 pm | कपिलमुनी

फक्त नावे ठेउ नकोस !
काय घेउ नये सांगणे सोपे आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 4:55 pm | टवाळ कार्टा

ठिकाय...रॉयल एन्फिल्ड सोडून कुठलीही घ्या =))

सुबोध खरे's picture

28 Jul 2016 - 8:51 pm | सुबोध खरे

http://www.carandbike.com/bmw-bikes/g-310-r
सध्या हि घेण्याच्या विचारात आहे. नाहीतर टी व्ही एस अपाचे २०० RTR ABS पिरेली टायर सह. टी व्ही एस अपाचे १८० RTR वर बसून पाहिले. थोडीशी स्पोर्टी आहे पण हॅण्डल बार दुसरा घेतला तर आरामात सरळ बसता येईल.टी व्ही एस अपाचे १८० RTR चे सस्पेंशन उत्तम आहे. होंडा युनिकॉर्न इतकी आरामदायक गाडी दुसरी नाही.बुलेटचे सस्पेन्शनपण तितके चांगले नाही. या वयात आरामदायक गाडी असली पाहिजे हाच आग्रह आहे.

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 9:19 pm | टवाळ कार्टा

सध्ध्यातरी मलापण हिच आवडली आहे :) पण BMW ब्रँडमुळे कदाचीत २.५ लाखापर्यंत जाउ शकते किंमत :(
Duke-390 इतकीच किंमत ठेवली (२.१५ लाख on-road) तर नक्की विचार करेन (तेव्हा हातात पैसे असले तर)

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2016 - 10:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्या बाईकची वाट खूप दिवसांपासून बघतोय. ड्युक ३९० ला तगडी टक्कर देईल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2016 - 10:09 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्या बाईकची वाट खूप दिवसांपासून बघतोय. ड्युक ३९० ला तगडी टक्कर देईल.

भटकंती अनलिमिटेड's picture

29 Jul 2016 - 9:07 am | भटकंती अनलिमिटेड

BMW G310R या वर्षात भारतात लॉंच होणात नाही हे कंपनीने कन्फर्म केले आहे. म्हणजे बनणार भारतात पण युरोप मार्केटसाठी.

प्रत्येक गाडी ला काही ना काही असणारच आहे..
एवढे नकार असतील तर गप चालत जाणे परवडेल :)
शेवटी प्रत्येकाची चॉईस वेगळी.. मला तरी नवीन अपाचे प्रचंड आवडली आहे .

नॉर्मल चणीच्या आणि उंचीच्या माणसांना अपाचे परफेक्ट सिटी बाईक आहे. झिगझॅगसाठी कॉम्पक्ट आहे. खूप बाहेर आलेले पार्टस नाहीत. इंजिन परफॉर्मन्स अल्टीमेट आहे. मायलेज नाही बघायचे फक्त. लॉन्ग ड्राईव्ह आणि हायवे साठी खूप त्रास होतो पाठीला. पहिल्या तासातच अवघडते.

भटकंती अनलिमिटेड's picture

28 Jul 2016 - 2:58 pm | भटकंती अनलिमिटेड

कुठलीही गाडी घेण्यापूर्वी एकदा ती किमान दहा-पंधरा किलोमीटर नीट चालवून पहावी. अकारण शरीरावर कुठे दाब, ताण, ओढ बसत नाही ना याची चाचपणी करुन मगच निर्णय घ्यावा. थोडाफार सवयीचाही भाग असतो. उदा. क्रुझरबाईक्स चालवणार्‍यांना एकदम रेसर राईड झेपत नाही. पण किमान कुठे त्रास होत नाही याची खातरजमा नक्की करावी. शक्य झाल्यास ओळखीत कुणाकडे ती बाईक असेल तर एखाद-दोन दिवस आपली एक्स्चेंज करुन वापरुन पहावी.

कपिलमुनी's picture

28 Jul 2016 - 3:17 pm | कपिलमुनी

पुण्यात बाईक रेंटने मिळतात त्या शॉर्ट टूर ( लवासा - महबळेश्वर) अशा वापरून ठरवू शकता

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 5:33 pm | टवाळ कार्टा

कुठे?

कबीरा's picture

28 Jul 2016 - 5:01 pm | कबीरा

रायल एनफिल्ड सोडून बाकी गाड्या कचकड्याच्या म्हणणारे अचानक अपाचे चे गोडवे कसे हो गाऊ लागले

अनिरुद्ध.वैद्य's picture

28 Jul 2016 - 5:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

ख्या ख्या ख्या ;) तरीही, बाकि गाड्या कचकड्याच्याच !

म्हणून त्यातल्या त्यात बरी गाडी सुचवली आहे
कचकड्याची घ्यायची आहेच तर ही बरी =)

मोदक's picture

28 Jul 2016 - 6:04 pm | मोदक

:=))

आम्ही तुमच्या कंपूत कबीरा

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2016 - 5:06 pm | कैलासवासी सोन्याबापु

६ लाख किलोमीटर बायकिंग, त्यातले 4 एकाच बाईकवर, ह्याला अनुभव म्हणता येईल का? :O ;)

त्या बाईक आणि रायडर दोघांना सा.न.

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2016 - 7:19 pm | कैलासवासी सोन्याबापु

रायडर मी, सा.न. नको,
बाईक सीबीझी एक्सट्रीम मॉडेल २००६ , २०१४ ला विकली , तिला मात्र तुमच्या शेजारी बसून दंडवत, दर ५००० किमीला इंजिनऑइल अन चाकात हवा सोडून मॅन्टीनन्स नाही, सर्विस सेन्टरला फक्त धुवायला नेत असे,टायर बदलले होते, एमारेफ बटन ग्रीप बाकी गाडी चुम्मा! लॉंग राईड मध्ये कधीच धोका नाही, सीट देवघरातल्या पाटा सारखी, एकदम ऐसपैस, फक्त पिलीयन रायडर जो कोणी असेल त्याचे कंबरडे मोडत असे, थोडी उंच ढुंगण होते, बाकी लफडे नाही

तरीही आता एन्फिल्ड सुचवतो मी :D

नितीन पाठक's picture

28 Jul 2016 - 5:07 pm | नितीन पाठक

Pulsar 220 कशी आहे ? बुलेट ऐवजी Pulsar 220 घ्यावी का ?
मिपाकार Pulsar 220 गाडी बद्दल सांगतील का ?
बुलेट चे बजेट जास्त होतेय. Pulsar 220 गाडी अंदाजे रू. १ लाखापर्यंत जाईल. १५० सीसी सोडून दुसरे काही ऑप्शन आहे का ?

टवाळ कार्टा's picture

28 Jul 2016 - 5:08 pm | टवाळ कार्टा

Pulsar 220 पेक्शा Pulsar 200 NS बघा

कैलासवासी सोन्याबापु's picture

28 Jul 2016 - 5:10 pm | कैलासवासी सोन्याबापु

Electra घ्या न भाऊ! ;)

नितीन पाठक's picture

28 Jul 2016 - 5:13 pm | नितीन पाठक

मला Pulsar 220 F बद्दल विचारायचे होते. Electra ची किंमत किती आहे ?

गणामास्तर's picture

28 Jul 2016 - 5:37 pm | गणामास्तर

पल्सर च्या वाटेला अजिबात जाऊ नका. एक लाख रुपये घालवायचा लायकीची नाहीच ती गाडी.
बाकी कुठलीही घ्या पण बजाज च्या मागे इतके पैसे नक्कोचं.
Electra 1.15 च्या आसपास असेल.