रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

म्हणूदे की. कोणती गाडी रिलायबल असते आणि कोणती नसते याचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव / आखाडे असतात. तुमचे मत ब्रह्मवाक्य समजून जगातल्या सगळ्यांने तसेच वागावे हा अट्टहास कशासाठी?

बाकी तुम्ही बुलेट वापरली आहे का? नसल्यास बुलेट न वापरता बुलेटबद्दल अधिकारवाणीने मत देत आहात याचा अचंबा वाटतो आहे. का ही पण लाल डबा सांडण्याची हौस समजावी..?

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 1:26 pm | टवाळ कार्टा

=))
वैयक्तिक प्रतिसाद

बर्र.. वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)

कपिलमुनी's picture

4 Jul 2016 - 1:30 pm | कपिलमुनी

पुलंचा सुप्रसिद्ध वाक्य आठवला! :)
मी भरपूर चालवलेल्या गाड्यांमध्ये cd 100, cbz , Thunderbird या आहेत. सर्वात रीलायबल cd 100 होती. (बजाजच्या डिस्कव्हर पेक्षा सुद्धा ) आणि सर्वात आरामदायक Thunderbird आहे.
बादवे रॉयल एन्फ़िल्ड च्या धाग्यवर चिरकुटांचा काय काम ?

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे?

लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:13 am | टवाळ कार्टा

तुमची डिस्कवर शहरातले रस्ते सोडून ऑफरोड किती चालली आहे? एका दिवसात ४०० / ५०० किमी पेक्षा जास्त किती वेळा चालली आहे?

वर्षातले किती दिवस एका दिवसात ४००-५०० किमी चालवले जाते?

लिंकबद्दल धन्यवाद. पण आत्ता या घडीला कोणती गाडी सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण आहे ते सांगा. (रॉयल एन्फिल्डच्याच प्राईजरेंजमध्ये.)

बर्याच आहेत...हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R...आणि यातल्या बहुतेक एन्फिएल्ड पेक्षा कमी किमतीला आहेत

बर्र... तुमची इथली मते आणि इतर ठिकाणची मते (मिपावरची नव्हे) यात जमीन आस्मानाचा फरक आहे असा मलाच भास होतो आहे की माझे काहीतरी चुकते आहे?

कॉलिंग कपिलमुनी आणि असलाच तर अनिरूद्ध दातार. :)

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 1:46 pm | टवाळ कार्टा

ती मते इथे देता का? बुलेटच्या तुलनेत वरिलपैकी कोणतीही बाईक जास्तच रिलायेबल आहे

म्हणून तुला सगळे जण अभ्यास वाढवायला आणि मोठे व्हायला सांगतात. तुझ्या मतांबद्दलचा प्रतिसाद सर्वगुणसंपन्न बाईक बद्दलचा आहे आणि तू फक्त रिलायबलिटीला पकडून बसला आहेस.

धाग्यातल्या पहिल्या वाक्यातला एक मुद्दा परत हायलाईट करत आहे..

ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही

बाकी बापुंनी धाग्यात आणखी काहीतरी खरडले आहे. वाचले नसल्यास आणखी एकदा वाचलेस तरी चालेल.

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 2:09 pm | टवाळ कार्टा

थोडक्यात पोपट मेला हे राजाला सांगायचे नाहीये

मोदक's picture

4 Jul 2016 - 2:19 pm | मोदक

नाही रे..

राजाने गरूड पाळला आहे आणि तू चिमणी पाळणे कसे स्वस्त आहे, खाण्यापिण्याचा खर्च येत नाही, पक्षीच पाळायचा आहे तर गरूडापेक्षा चिमणी कशी चांगली असे काहीतरी बोलत आहेस.

कपिलमुनी's picture

4 Jul 2016 - 1:36 pm | कपिलमुनी

तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही.
बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 1:46 pm | टवाळ कार्टा

तुम्ही स्पोर्ट्स बाईक आणी क्रुझर बाईक एका मापात तोलू शकत नाही.

मग ही तुल्ना चालते?

बजाजच्या बाईकन जो रीलायबल म्हणएल त्यापेक्षा विनोद नाही

बुलेटच्या तुलनेत जास्तच रिलायेबल आहे

पी. के.'s picture

4 Jul 2016 - 2:08 pm | पी. के.

एवढा टोकाचा विरोध ????
आकडे काही वगळचे बोलतायत.
http://auto.ndtv.com/news/two-wheelers-sales-for-june-2016-positive-grow...

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:37 pm | अनिरुद्ध.वैद्य

आमच २०० किलोच धुड ७५ किलोच्या माणसास घेउन, निवांत डोंगररस्ते घाट फिरु शकतंय अन शिवाय ह्या स्पेक्स्वर ४०+ चा माय्लेजही देतय (सिटी ट्रफिक हा, भायेर आजुन जास्त) त आपण खुस.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:43 pm | अनिरुद्ध.वैद्य

अखीलेषचा ब्लॉग मी फॉलो करतो. त्याची अन माझी मतेही परफेक्ट जुळतात.

पण काये, एन्फिल्ड एन्फिल्ड है, और प्यार दिलसे होता है, दिमाग से नै ;) ;)
तेव्हा उगा काय लॉजीक बिजिक नका हो खपवत जाऊ एन्फिल्डवाल्यांसमोर.

कपिलमुनी's picture

4 Jul 2016 - 1:32 pm | कपिलमुनी

माझा ठाण्याचा मित्र कोनतीही नवी गाडी आली की नावे ठेवतो !
सर्वगुणसंपन्न आणि परीपूर्ण गाडी सापडली की सांग =))

तुमच्या ठाण्याच्याच मित्राने लिस्ट दिली आहे की..

हिरो होंडा करिझ्मा, बजाज पल्सर २२०, बजाज पल्सर २०० RS/AS/NS, होंडा CBR250R ( ..आणि टीव्हीएस मोपेड ;) )

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 1:52 pm | टवाळ कार्टा
अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

माझी थंडरबर्ड मोस्टली ९०%+ हिंजवडीच्या ट्रॅफिकमधेच चालली असल्याने हे स्प्रॉकेट खराब झाले असावे. बाकी त्याच ट्रॅफिकमुळे हाफ क्लच बर्याचदा असल्याने कदाचित क्लचही जात असावा. आता क्लच केबल बॅकपला घेतलीच आहे.

अनिरुद्धराव जुन्या स्कुटरची क्लच केबल टाकुन बघा. ती थंडरबर्डच्या केबल पेक्षा जाड आहे आणि तीच एक बसते थंडरबर्डला. क्लच लीवरला जिथे क्लचकेबल कनेक्ट होते तो भाग थोडा तासुन घ्या. बर्‍याच वेळेला त्या कारी भागामुळे केबल गतप्राण होते. हा उपाय मला बालाजी ऑटोमोबाइल्स कोथ्रुड याने दिला होता. ५ वर्षे झाली क्लच केबलला नो प्रॉब्लेम.

मार्मिक गोडसे's picture

4 Jul 2016 - 11:43 am | मार्मिक गोडसे

बाईकची चेन अतीघट्ट किंवा अतीसैल ठेवल्यास चेन व स्प्रॉकेट खराब होऊ शकते. धक्का मारून गाडी गिअरमध्ये टाकून चालू केल्यानेही चेनचे व स्प्रॉकेटचे नुकसान होते. वेळच्यावेळी बाईकची चेन अ‍ॅजस्ट व ऑइलींग केल्याने बाईकची चेन व स्प्रॉकेट खराब होत नाही. माझ्या बाबांच्या २००१ च्या स्प्लेंन्डरचे अजुनपर्यंत एकदाही चेन किंवा स्प्रॉकेट बदललेले नाही. (१लाख कि.मी.पेक्षा अधिक रनींग). क्लच प्लेट व क्लच केबलही अजुनपर्यंत बदललेली नाही. क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास व गाडी सिग्नलला न्युट्रलमध्ये ठेवल्यास क्लच प्लेटची झीज टाळता येते.

टवाळ कार्टा's picture

4 Jul 2016 - 11:57 am | टवाळ कार्टा

अग्दी अग्दी....पण इथेतर मुद्दलातच खोट आहे =))

स्पा's picture

4 Jul 2016 - 12:43 pm | स्पा

माझी यामाहा SZ (१५० सीसी ) ६५०००० किमी चालेलेली आहे , शहरात आणि ओफ्रोड , मजबूत रेम्ताव्लेली आहे
फक्त स्पिडोमितर बंद पडलेले , बाकी काही परत बदललेला नाही

स्पा's picture

4 Jul 2016 - 12:43 pm | स्पा

६५००० वाचावे

कपिलमुनी's picture

4 Jul 2016 - 3:23 pm | कपिलमुनी

तुमच्याच गाडीचा रंग बदलायचा होता का ?
( कंफर्म नाही म्हणून विचारले )

स्पा's picture

5 Jul 2016 - 11:55 am | स्पा

होय मुनीश्वर

अभ्या..'s picture

5 Jul 2016 - 12:11 pm | अभ्या..

फ्लोरोसन्ट ग्रीन कर.
परफेक्त हरणटोळ कलर.

स्पा's picture

5 Jul 2016 - 12:12 pm | स्पा

खिक्क

क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय?

मार्मिक गोडसे's picture

4 Jul 2016 - 1:40 pm | मार्मिक गोडसे

क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय?

http://www.motorcyclenews.com/new-rider/choosing-kit/2006/november/aug24...

भम्पक's picture

4 Jul 2016 - 9:04 pm | भम्पक

नमस्कार मित्रांनो.....
आम्हीही classic 350 घेतलीय. आपल्या क्लब मध्ये आमचेही स्वागत करा. 2 महिने झाले.....1 नाशिक, 1 भीमाशंकर आणि 1 कोपरगाव ट्रीप हाणली.फक्त आनंद बाकी काही नाही.
मनरावांच्या लडाख वृतान्तापासून पेटलो होतो.आता लडाख लाही जाऊन येईन.
बाकी बापूंना धन्स . जबर धागा काढून माहिती कक्षा वाढविली.

मोदक's picture

5 Jul 2016 - 9:49 am | मोदक

स्वागत.. स्वागत...

अभिनंदन..!!!!!

.

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

अन वेल्कम टु क्लब!

खटपट्या's picture

5 Jul 2016 - 1:59 am | खटपट्या

चांगली चर्चा. पण चर्चा स्प्रॉकेट वरून सुरु झाली आणि मग टीकाउपणाकडे झुकली. माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे गाडी चालवण्याच्या शैलीवरही अवलंबून आहे. गर्दीमधे गाडी क्लचचा वापर न करता फक्त अ‍ॅक्सीलेटर पीळून गचके देत चालवली तर स्प्रॉकेट लवकर जाण्याची शक्यता असते. आता हे आपण करताय की नाही हे कसे ओळखणार? मागे बसणारा गर्दीत जर आपणास सतत आपटत असेल तर आपण गचके देत गाडी चालवताय असे समजा. हे सर्व मी माझ्या अनुभवावरूंन सांगतो आहे. दुसर्‍यांना पटेलच अशी आशा नाही.

मार्मिक गोडसे's picture

5 Jul 2016 - 10:59 am | मार्मिक गोडसे

माझ्यामते स्प्रॉकेट खराब होणे गाडी चालवण्याच्या शैलीवरही अवलंबून आहे.

शैलीवरच !!!
गाडी चालवण्याची शैली बॅले नृत्यासारखी असावी, ब्रेकडान्ससारखी नसावी.

आता हे आपण करताय की नाही हे कसे ओळखणार?

मागे बसणारा तुमचे खांदे सतत चेपत नसेल तर समजावे आपण गाडी व्यवस्थीत चालवत आहोत.

एक सदस्य एका प्रतिसादात ..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते. असे म्हणतो व क्लच निट अ‍ॅजस्ट केल्यास म्हणजे नक्की काय? असा प्रश्नही विचारतो. viva चा प्रकार वाटतोय

खटपट्या's picture

5 Jul 2016 - 11:12 am | खटपट्या

सहमत

मोदक's picture

5 Jul 2016 - 12:02 pm | मोदक

मीच तो सदस्य.

तुमच्या मते नक्की काय चुकले आहे माहिती देण्यात आणि प्रश्न विचारण्यात?

मार्मिक गोडसे's picture

5 Jul 2016 - 12:23 pm | मार्मिक गोडसे

तुमच्या गाडीला आणखी एक क्लच केबल बसवून घ्या. एक वापरातली आणि दुसरी बॅकप. पहिली गेली की फक्त हँडल आणि इंजिन येथे सुरूवातीचे आणि शेवटचे टोक बसवायला लागते.
..क्लच केबल खूप जास्त ताणून बसवली असेल तर लवकर तुटू शकते.

ज्याला बाईकची क्लच केबल जोडता येते, ताणून बसवल्याचे तोटेही माहीत आहे, त्याला क्लच निट अ‍ॅजस्ट कसा करावा हा प्रश्न पडावा ह्याचे आश्चर्य वाटले.

माझ्या माहितीप्रमाणे "क्लच अ‍ॅडजस्ट करणे" म्हणजे फक्त केबलचा ताण नीट करणे असे नाही. क्लच लिव्हरच्या प्लाय पासून ते क्लचकेबल चोक / जाम होणे पर्यंत अनेक प्रकार असू शकतात म्हणून "क्लच नीट अ‍ॅडजस्ट करणे" म्हणजे नक्की काय करणे असा प्रश्न पडला.

मार्मिक गोडसे's picture

5 Jul 2016 - 1:10 pm | मार्मिक गोडसे

रोजच्या वापरातील बाइकची क्लच केबल जाम झालेली मी तरी बघितलेली नाही.
तुम्हाला इतकी जास्त तांत्रिक माहीती असतानाही तुम्ही प्रश्न विचारला म्हणून viva चा प्रकार वाटतोय असे म्हटले.

मोदक's picture

5 Jul 2016 - 1:55 pm | मोदक

असो. धन्यवाद.

बुलेट आणि इतर बाईक्स ची तुलना वाचून मजा वाटली , आणि xbhp वर वाचलेलं एक वाक्य आठवलं

a motorcycle is a very personal thing, almost like a women. Each of us have our own likes and dislikes so my advice to you is to buy the motorcycle that fits your best idea of what is ideal.

स्पा's picture

5 Jul 2016 - 11:56 am | स्पा

भारीच

अनिरुद्ध.वैद्य's picture

5 Jul 2016 - 3:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

सुरेख मांडलय लेखकाने.

पी. के.'s picture

5 Jul 2016 - 11:37 am | पी. के.

३Desert Storm

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Jul 2016 - 12:03 pm | कैलासवासी सोन्याबापु

.

डेझर्टस्टॉर्मला फक्त सॅल्यूट

मोदक's picture

5 Jul 2016 - 12:04 pm | मोदक

+१११

अभ्या..'s picture

5 Jul 2016 - 12:13 pm | अभ्या..

लोकं घेऊन मोकळे झाले अभिजीतराव,
तुमचे काय? :(

तेजायला काहून थांबला बे , होऊदे खर्च

मी फ्लेक्स बनवतो त्याचे टेन्शन नको