रॉयल राइड... रॉयल एन्फ़िल्ड.... प्रश्नोत्तरी धागा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in तंत्रजगत
2 Oct 2014 - 6:26 pm

मिपा परीवारात बरेच रॉयल एन्फ़िल्ड उर्फ़ बुलेट चे चाहते अन मालक आहेत, ह्या धाग्याचा हेतु कुठल्या ही दुसर्या ब्रॅंड च्या बाईक ची खिल्ली उडवणे, किंवा पातळी उतरुन टिका करणे हा मुळीच नाही, फ़क्त स्टॅंड अलोन बायकिंग करण्यापेक्षा , एक ऑर्गनाईझ्ड बायकींग एफ़र्ट म्हणुन हा लेखन प्रपंच, मोदक ह्यांनी प्रथम ह्या धाग्याची कल्पना मांडली...

इथे अपेक्षित काय आहे ??

आर .ई. उर्फ़ बुलेट मालक असाल तर आपले अनुभव, कथन, मेंटेनंस टिप्स, इत्यादी आदान प्रदान, नसाल अन रॉयल एन्फ़िल्ड मधे रस असेल तर इथे प्रश्नोत्तराची हक्काची जागा, विकत घेण्यात रस नसेल तर कुठे ह्या बाइक्स उत्तम कंडीशन मधे भाड्याने मिळतील, कुठ्ली एक्स्पिडीशन आर ई वर केली तर मजा , आराम अन ऍडव्हेंचर द्विगुणीत होईल ही चर्चा इथे आपण करुयात.

तर श्रीगणेशा स्वरुप, काही योगदान माझे (मोदक ह्यांनी मला, आर ई ची ३५० च का घेतली, एकंदरीत अनुभव काय इत्यादी कथन करण्याची विनंती केली त्याला अनुसरुन)

१. मी क्लासिक ३५० का घेतली ??
अ. उत्तम संगम, ३.५ रॉ ताकद अन त्यातल्यात्यात बरे माईलेज (माझ्या पेशात खुप फ़िरावे लागते)
ब. जरासा ओल्ड वर्ल्ड चार्म, सदरहु मॉडेल हे रॉयल एन्फ़िल्ड ह्या अगदी सुरुवातीच्या डीझाईन्स वर आधारीत आहे
क. रोबस्ट बिल्ड, कमी देखभालीचा खर्च

२. क्लासिक ३५० चे फ़ायदे ??
अ. मजबुत तरीही जास्त जड नसणे
ब. ट्रेडीशनल कार्ब्युरेटर टेक्नॉलोजी (बायकिंग मधे हे मला महत्वाचे वाटले, ई एफ़ आय मधे फ़्युल पंप वापरले जातात ते ही इलेक्ट्रॉनिक चिप्स ने कंट्रोल्ड, त्यात पेट्रोल ही जास्त जाते, अन आडवळणाला काहीही प्रॉब्लेम आला तर लोकल मेकॅनिक त्यात काहीच करु शकत नाही, ह्या उलट कार्ब्युरेटर असला तर अगदी मेकॅनिक नसला तरी जुजबी माहितीवर आपण स्वतः डॅमेज कंट्रोल करुन परत ती बाईक वर्कशॉप पर्यंन्त आणु शकतो)
क. स्पेयर पार्ट्स ची निट अवेलेबिलिटी अन सर्विस सुलभ असणे, ९० मिनिट एक्स्प्रेस सर्विस मधे शोरुम ला हिची व्यवस्थित निगा घेतली जाऊ शकते.
ड. उत्तम मायलेज (बायकींग ला हे असणे बरे असते)
ई. उत्तम ट्रॅक रेकॉर्ड, शिवाय मायलेज उत्तम असल्याने सायलेंसर चेंज अन इतर अस्थेटीक मॉडीफ़िकेशन्स (हॅंडल बार चेंज, रीम व्हिल्स ) नंतर ही खिशाला काही विषेश चाट बसत नाही

३. क्लासिक ३५० चे तोटे ??

१. जास्तच पॉवर हवी असल्यास ती नाही, "भारताची कल्ट हार्ले सम बाईक" असली तरीही ३५० सी सी आहे.
२. ८० किमी/ तास नंतर पुर्ण बाईक कंप पावते
३. कंपनी ने दिलेले टायर भंगार आहेत (बदलल्यावर काही प्रॉब्लेम नाही ड्राय अन वेट दोन्ही ट्रॅक्शन एन्वॉयरमेंट मधे)
४. कंपनी सायलेंसर साधा घेतला तर बरेचदा खड्ड्यातुन काढताना घासतो खालुन, ऑफ़ रोड घ्यावा तर कंपनी पॉलिसी मधे बाय बॅक किंवा एक्स्चेंज बसत नाही, दोन्ही बोकांडि बसतात सायलेंसर्स
५. कंपनी सायलेंसर चा आवाज ’बुले्ट आली बे’ अशी घोषणा करत नाही
६. फ़िटिंग्स अन बोल्ट्स मधे रस्टींग प्रॉब्लेम येतो ३-४ पावसाळ्यां नंतर

मला तरी मायलेज हा फ़ायदा इतर तोट्यापेक्षा मोठा वाटला सो मी घेतली, सद्ध्या ३-४ महिनेच झालेत, १५०० किमी झाले आहेत.

मोदक भाई, अन इतर , एकंदरीत हे फ़ायदे अन तोटे पाहुन मी क्लासिक ३५० घेतली आहे. :)

प्रतिक्रिया

जिन्क्स's picture

7 Oct 2015 - 12:19 pm | जिन्क्स

केबल्स (क्लच, अस्सेलरेटर) वेगळ्या लावल्या का? का आहे त्याच फीट झाल्या?

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 12:29 pm | भटकंती अनलिमिटेड

सार्‍या केबल्स त्याच आहेत. थंडरबर्डचे आधीचे हॅंडलदेखील बरेच मोठे असल्याने त्याच्या केबल्स पुरेशा लांबीच्या आहेत. एक वर्षाच्या आतील नव्या क्लासिकलादेखील लांबी काही एक्स्ट्रा आहे. पेट्रोलच्या टाकीखाली इलेक्ट्रिक केबल्सचे भेंडोळे गुंडाळून ठेवले आहे. त्याच्या आधीच्या जुन्या गाड्यांना कदाचित केबल्स बदलाव्या लागू शकतात.

मोदक's picture

7 Oct 2015 - 12:49 pm | मोदक

फोटोमध्ये एक केबल ताणल्यासारखी दिसत आहे. आणि जर ती अ‍ॅक्सलरेटर केबल असेल तर डावी़कडच्या टर्नला ती खेचली जात नाही याची काळजी घ्या.

बाकी तुमच्या रिव्ह्यू च्या प्रतिक्षेत.

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 2:40 pm | भटकंती अनलिमिटेड

आपण सांगितले आणि लगेच पार्किंगमध्ये जाऊन चेक केले. साधारण पाऊण फूट केबल अजूनही स्लॅकसाठी शिल्लक आहे.

चांगले आहे. लैच मोठी केबल दिली आहे रॉयल एन्फिल्डवाल्यांनी. ;)

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 1:08 pm | कपिलमुनी

हँडल स्ट्रेट आहे का ?
तसे असेल तर वळणावर , यु टर्नला त्रास होतो असा अनुभव आहे.
हँडलचा स्वतंत्र फोटो टाकता येइल का ? आर डी हँडल आहे का हे ?

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 1:18 pm | भटकंती अनलिमिटेड

होय. आरडीच!

तुम्ही अनुभवी आहातच.. तरीही एक सुचवत आहे.

सुरूवातीला पाबे घाट, कादवे घाट, सिंहगड घाट वगैरे घाटात राईड करा. काही अडचण आली तर लगेच घरी परतता येईल. पहिल्यांदाच लाँग राईडची मोठी रिस्क घेवू नका.

कपिलमुनी's picture

7 Oct 2015 - 3:14 pm | कपिलमुनी

आर डी हँडल ट्रॅफिक वगळता कंफर्टेबल आहे . अगदी हेअर पिन बेंडवर सुद्धा !
आणि थंडरबर्डला मस्त फिट होते .
२ वर्षे तेच वापरत होतो पण मग हिंजवडीच्या ट्रॅफिकमधे त्रास व्हायला लागल्यावर बदलऊन स्टॉक टाकले

भटकंती अनलिमिटेड's picture

7 Oct 2015 - 3:54 pm | भटकंती अनलिमिटेड

होय, आरडी हॅंडल क्लासिकपेक्षा थंडरबर्डला जास्त चांगले फिट आणि फील देते. नशिबाने मला ट्राफिकमध्ये सध्यातरी जास्त गाडी चालवावी लागत नाही. घर ते ऑफिस अंतर साडेचार किमी आहे. तेही मोकळा रस्ता रोज (इनो घेणे). त्यामुळे ट्राफिकचा रोजचा त्रास जाणवणार नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

8 Oct 2015 - 12:27 pm | अनिरुद्ध.वैद्य

ह्यात एक पूर्ण काळ्या रंगाच बघितलेलं, पण ते नेमक वेट्स लावलेलं नसल्याने थंडरबर्डला बसलच नाही. मला श्रीवाल्याने (भवानी पेठ) सांगितले होते कि बंद झाले म्हणून ;)

बाकी गाडी झकास दिसतेय. पोस्चरमध्ये कितपत फरक पडला आणि पाठीला काही ताण?

भटकंती अनलिमिटेड's picture

8 Oct 2015 - 12:48 pm | भटकंती अनलिमिटेड

काळ्या रंगातही हेच हॅंडल मिळते. माझ्या एका मित्राने क्लासिकला असे काळे हॅंडल बसवले आहे. बारएंड वेट्स आपल्या आधीचेच लावले आहेत (त्याने आणि मी देखील). वर तो मधला आडवा बार असेल तर ५०/- किंमत जास्त.

पोश्चर अधिक आरामदायी झाल्यासारखे वाटते आहे. आधी मला जमिनीशी कोनात हॅंडलची ग्रिप असायची त्यामुळे अधिक काळ ब्रेक, ऍक्सलरेटर, क्लच वापरले की हातांना (फोरआर्म्स) आणि खांद्यांना रग लागल्यासारखे वाटे. परंतु याचे ग्रिप थोडे अधिक रुंद जमिनीला समांतर असल्याने आडवी ग्रिप (जी आपल्या हातांच्या पंजांची मनगटाची नैसर्गिक रचना आहे) मिळते आणि ताण जाणवत नाही. शिवाय या हॅंडलवर दोन्ही हात कोपरातून सरळ ठेवून आणि किंचित अंशात वाकवून बसण्याचे स्वातंत्र्य मिळते आहे. आधीच्या (स्टॉक) बारवर कम्पल्सरी हात कोपरातून काहीअंशी वाकवून बसावे लागे आणि त्याचा परिणाम खांद्याच्या स्नायूंवर जाणवत असे.

कपिलमुनी's picture

8 Oct 2015 - 1:52 pm | कपिलमुनी

हँडलचा बॅलन्स कसा आहे ?
काही लोकल मेड हँडलचा बॅलन्स , अँगल यांचा ईश्शू असतो म्हणून विचारला.

भटकंती अनलिमिटेड's picture

8 Oct 2015 - 2:13 pm | भटकंती अनलिमिटेड

हँडलचा अँगल वगैरे तिथे काऊंटरवर सपाट ठेवून सममिती आहे का, कुठे बाक वगैरे नाही ना हे पाहूनच घेतले. बॅलन्सलाही अजून तरी काही प्रॉब्लेम जाणवला नाही.

फोटोमध्ये ग्रीप कव्हर दिसत नाहीये. कंपनी देते तशीच ग्रीप वापरता का?

ग्रीप कव्हर वापरत नसल्यास एखादे मध्यम जाड असे कव्हर बसवून बघा. मला बुलेटसाठी अ‍ॅक्युप्रेशर इफेक्ट देणारे टोकाटोकांचे ग्रीप कव्हर मिळाले आहे. त्यामुळे आराम वाटतो.

भटकंती अनलिमिटेड's picture

8 Oct 2015 - 2:55 pm | भटकंती अनलिमिटेड

ग्लोव्ज वापरत असल्याने कंपनीने दिलेले ग्रिपच वापरतो आहे. पण हे कंपनीचे ग्रिप ग्लोव्ज नसताना कधी कधी पावसात नो-ग्रिप होतायेत.

अनुप कोहळे's picture

8 Oct 2015 - 9:05 pm | अनुप कोहळे

होय, मला पण पावसात ग्रीप चा प्रॉब्लेम आला होता. बर्‍याच वेळा हात पुसावे लागले होते.

कैलासवासी सोन्याबापु's picture

7 Oct 2015 - 10:15 pm | कैलासवासी सोन्याबापु

माझी क्लासिक ३५० वायरिंग चा फार ताप देते आहे काय प्रॉब्लम होतोय माहिती नाही साल पण हैंडल सरळ किंवा उजवीकड़े असले की सेल्फ उचलतच नाही हैंडल डावीकड़े करुन मारला की हाफ बटन स्टार्ट! सर्विस सेण्टर वाला म्हणाला की वायरिंग कट होत असते बदलली एकदा परत तोच प्रॉब्लम!! वैतागलो आहे राव!

टवाळ कार्टा's picture

7 Oct 2015 - 10:22 pm | टवाळ कार्टा

माझी आवेंजर पण हाच त्रास द्यायची...तशीच चालवायचो

भटकंती अनलिमिटेड's picture

8 Oct 2015 - 9:06 am | भटकंती अनलिमिटेड

वायरिंग हार्नेस घासते आहे कुठेतरी. बॉडीच्या पत्र्याला किंवा चॅसीला घासल्याने बॅटरीकडून येणारी वायर (बहुतेक इंजिन किल स्विच आणि स्टार्टर स्विच या दोन) एका ठराविक पोझिशनला गेली की शॉर्ट होते आणि करंट स्टार्टर मोटरपर्यंत पोचत नाही. तेच डाव्या बाजूला हॅंडल केले की शॉर्ट होत असलेली जागा मोकळी होऊन गाडी चालू होतेय. नक्की कुठे घासते आहे ते एकदा एकदम बैजवार पाहून एकदा घर्षणबिंदू सापडला की तिथे चांगल्या प्रतीच्या पर्मनंट टेपने (३एमसारखा) इन्सुलेट करुन घ्या. रेझिन ग्लूदेखील भारी काम करेल त्यावर.

बाबा योगिराज's picture

5 Dec 2015 - 12:33 pm | बाबा योगिराज

हां उपाय करुण बाघेन. माझा डिप्पर लाइट आणि इंडिकेटर एका टिपिकल पोसिशन्स ला चालू होतात.

क्लासिक ३५०, ३१ मे २०११ ला मिळाली होती. ५ -५.५ वर्ष झालित. गाडीच्या कुठल्या कुठल्या सुट्या भागांकड़े जास्त लक्ष्य द्यायला हव. माला वाटतंय की क्लच चा काही प्रॉब्लम असावा.

बाकी कंपनी मध्ये बिलकुल सर्विसिंग करु नए. माजोरडे आणि चोरच असतात सगळे.
बाहेरचा एक म्हातारा मेकैनिक बघुन ठेवलाय. प्रत्येक वेळी ५०००-५५००₹ खर्च करवतो, पण एकदम मस्त काम करुण देतो.

बुलेट बाबा.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 1:42 pm | टवाळ कार्टा

५०००/५५०० कार सर्व्हिसींगला लाग्तात ओ

बाबा योगिराज's picture

8 Dec 2015 - 11:25 pm | बाबा योगिराज

नै ना वो....
आता साडे तीन लीटर जर इंजिन ऑईलच लागत असेल तर खर्च असाही कामित कमी २५०० हजार च्या आसपास जातो. आणि प्रत्येक वेळी मी काहीतरी नाविन काम करूनच घेतो. जसकी ह्या वेळेस त्याला मुद्दाम दोन्ही चकांचे आउट काढायला सांगितले आहे. इंजिन मधील राबरी नळ्या बदलवानार आहे. झालच् तर ब्रेकचा थोड़ा प्रॉब्लम वाटला, नविन ब्रेक पैड्स.

ह्या वेळेस रंग काम काही करणार नाही जरा जास्तच खर्चिक होईल.
आणि असही बुलेट चालवायची म्हंटल्यावर वर्षकाठी कमीत कमी १२ ते १५ हजार लागतातच की वो टका भौ.
जेव्हड़ी जास्त काळजी घेणार, तेव्हड चांगलच की वो...

एका विशिष्ट पॉइंट वर चालू होणाऱ्या लाइट चा प्रॉब्लम सांगितला आणि काय झाल असेल ते ही सांगीतलय. नेमकं काय झालय ते सकाळी कळेल.

टवाळ कार्टा's picture

9 Dec 2015 - 11:47 am | टवाळ कार्टा

जौदे...याच्साठी मला RE आवडत नै

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 5:42 pm | बाबा योगिराज

गोठ्यात झोपणारास बैलाच्या शेन मुताची घान येते म्हंटल्यास कसे जमेल?

टवाळ कार्टा's picture

10 Dec 2015 - 1:21 pm | टवाळ कार्टा

खिक्क

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 5:43 pm | बाबा योगिराज

गोठ्यात झोपणारास बैलाच्या शेन मुताची घान येते म्हंटल्यास कसे जमेल?

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 5:43 pm | बाबा योगिराज

गोठ्यात झोपणारास बैलाच्या शेन मुताची घान येते म्हंटल्यास कसे जमेल?

एखादा शून्य जास्ती पडलाय का ओ

बाबा योगिराज's picture

9 Dec 2015 - 5:39 pm | बाबा योगिराज

वायर तूटलेली होती. नीट करुण घेतली. लाइट इंडिकेटर दोन्ही व्यवस्थित चालु झाले.

सुबोध खरे's picture

10 Dec 2015 - 12:48 pm | सुबोध खरे

।हायला
आमच्या एकशिन्गीला( UNICORN) नउ वर्षात मिळून पण एवढा खर्च झालेला नाही.

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 4:51 pm | कपिलमुनी

१० वर्षे जुनी झाल्याने आणि सतत वजन्दार व्यक्तीमत्व बसल्याने गाडीचे सीट बदलायचे अहे.
काही टिप्स ? थंडरबर्ड ला स्लिट सीट टाकायचा विचार आहे,

ब्याकरेस्ट वाली बघा आवडते का

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 5:52 pm | कपिलमुनी

फोटू टाका की :)

मी या पूर्वी हा प्रश्न विचारला नसावा,

मला रॉयल एन्फिल्ड क्लासीक ३५० ला मागच्या सीटसाठी बॅकरेस्ट / बॅक सपोर्ट बसवायचा आहे. याबाबत तुमचा अनुभव काय?

इंदोर राईडमध्ये सीटची रूंदी कमी आहे हे जाणवले होते. त्यासाठी काय करावे? नवीन सीटचा प्लॅटफॉर्म घेवून फोमचे आकारमान वाढवावे का?

कपिलमुनी's picture

3 Dec 2015 - 7:24 pm | कपिलमुनी

Try old Thunderbird backrest

ते उंचीला कमी वाटते आहे.. निव्वळ कंबरेला सपोर्ट मिळण्याऐवजी कंबर + पाठीचा थोडा भाग असा सपोर्ट मिळावा अशी अपेक्षा आहे.

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 12:43 pm | कपिलमुनी

backrest

br2

br3

HD

आबा's picture

3 Dec 2015 - 7:07 pm | आबा

मी दोन महिन्यापासून क्लासिक ३५० वापरत आहे, धाग्यामध्ये सांगितलेला ८० के.एम.पी.एच. ला बाईक कंप पावण्याचा त्रास मला तरी जानवला नाही. पूर्वी डीझेल एंजीनची बुलेट वापरत असे, तीच्यामध्ये हा त्रास होता

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2015 - 8:17 pm | टवाळ कार्टा

बाब्बौ....टॉरस अज्जून आहे का तुम्च्याकडे??? एकदा चालवायला मिळेल का? :)

नाही ना, विकली वडीलांनी ४-५ वर्षापूर्वी
परंतू थोडेफार पैसे आले की परत विकत घ्यायची इच्छा आहे...

टवाळ कार्टा's picture

3 Dec 2015 - 10:29 pm | टवाळ कार्टा

आर्र्र....व्हिंटेज बाईक आहे ती

अभ्या..'s picture

5 Dec 2015 - 12:05 am | अभ्या..

गप्पे. टॉरस हायेत अजून ७-८ सोलापुरात. सूरज पण आहे दोघा तिघाकडे. घ्यायची का सांग. ५५ अ‍ॅव्हरेज आहे बघ डिझेल ला. सगळी बुलेटच आहे फक्त इंजिन किर्लोसकरचे आहे बहुतेक.

टवाळ कार्टा's picture

5 Dec 2015 - 9:56 am | टवाळ कार्टा

नक्को....पोरीपेक्षा जास्त नखरेल अस्ते ती ;)

खटपट्या's picture

5 Dec 2015 - 3:41 pm | खटपट्या

ही गाडी खरच चांगली आहे. पण वायब्रेशन एवढे आहे की गाडीवर बसल्यावर वरच्या खीशातले सामानपण बाहेर पडेल...

माझी रॉयल एन्फ़िल्ड.. Model Year : 1992

1

2

3

Model Year : 1990 असे वाचावे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

9 Dec 2015 - 5:51 pm | अनिरुद्ध.वैद्य

झ्याक मेंटेन हाय गाडी!

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 12:45 pm | कपिलमुनी

मेंटेंन आहे !
गाडीला नंतर बफींग / क्रोम प्लेटींग केलाय का ?

आसिफ's picture

26 Jan 2016 - 1:08 am | आसिफ

होय, ६ वर्षापूर्वी रंग आणि इतर किरकोळ कामे केली होती, २ महिन्यांपुर्वी इंजिनचे काम (वॉल्व जरा आवाज करत होते )निघाले, मग एकदा इंजिन खोलले आहे तर इतरही काय असेल तर करून टाकू म्हणून आमच्या नाग्यादा (नागेश मिस्त्री ) ने सुचविले.

मग हे बदलुया ते बदलूया , हे जुनं झालाय करत करत खुप सामान आणले गेले. मग लगे हाथ कलर आणि बफिंग चा विषय निघाला. म्हटलं ते ही करून टाकु .