वयम् अपि कवय:॥

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
25 Jul 2016 - 3:32 pm

मक्षिकेपरि चिवट। मनी मुळी बोथट॥
काव्य पाडुनि ओषट। संवेदना दाखवि॥१॥

मांडुनि भावनांचा बाजार। घेई फुकाचा कैवार॥
यासि शतोत्तरि चार। जोडे मोजुनि मारावे॥२॥

ऊर बडवि धडधडा। सदा फोडितसे हंबरडा॥
जणु एकटाचि बापुडा। सर्वांमाजि॥३॥

प्रसिद्धीची वखवख। मुखवटे घेई सुरेख॥
साहित्यशेतीचा काळोख। उजेड म्हणोनि दाखवि॥४॥

डास उडे पखियांपरि। काजवे तार्‍यांपरि॥
हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा॥५॥

अभय-गझलऔषधोपचार

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

25 Jul 2016 - 3:37 pm | प्रीत-मोहर

साधु कविवर!!! अतीव रोचते भवतः काव्यम्|

सूड's picture

25 Jul 2016 - 11:14 pm | सूड

धन्यवाद!!

स्पा's picture

25 Jul 2016 - 3:43 pm | स्पा

अगागा

बर्याच दिवसांनी मनसोक्त बाजार उठीवलास

नाखु's picture

25 Jul 2016 - 3:51 pm | नाखु

प्रतिसाद बाजार-हाट..

बाजार उठला ,हाट बाजूला.

बाकीचा साक्षीदार नाखु

संदीप डांगे's picture

25 Jul 2016 - 3:44 pm | संदीप डांगे

=)) =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2016 - 3:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान ! एक चरण वगळायला हवं होतं.
अशा वेळी प्रगल्भता आपलीही दिसली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

संदीप डांगे's picture

25 Jul 2016 - 3:49 pm | संदीप डांगे

४था ??

उडन खटोला's picture

25 Jul 2016 - 3:52 pm | उडन खटोला

२रा?

रुपी's picture

26 Jul 2016 - 12:27 am | रुपी

मला पण वाटते दुसराच..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2016 - 4:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"जोड़े मारणे" वगैरे हे काय रस्त्यावरचं भांड्न आहे का ? लोकांच्या टाळ्या मिळवायच्या असल्या तर त्या कुठेही मिळतील.
पण टीका शत्रुलाही आवड़ली पाहिजे. रचना शैली उच्च दर्जाची पण त्या ओळीने अतिशय गल्लीतल्या भांडनासारखं स्वरूप वाटलं

बाकी काही नाही. पण रचना मला आवडलीच आहे. (ती ओळ सोडून)

-दिलीप बिरुटे

गंगाधर मुटे's picture

26 Jul 2016 - 9:35 pm | गंगाधर मुटे

आता तुमचा "मुटे" होणार हे नक्की.
अहो. मिसळपाववर काही झुंडीच्या टीकास्त्राचे भक्ष व्हायचे नसेल तर असं मनातलं बोलू नका.

त्यांना काय आवडते, याचा विचार करून लिहावे, हाच सौदा फ़ायद्याचा राहू शकतो.

त्रिवेणी's picture

25 Jul 2016 - 4:11 pm | त्रिवेणी

चवथे चरण का????

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2016 - 3:50 pm | ज्ञानोबाचे पैजार

मस्त...
फार दिवसांनी लिहिले पण काय लिहिले.
मजा आली
पैजारबुवा,

काय पै.बुवा सगळी कडे मजा येतेय तुम्हाला हल्ली

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jul 2016 - 4:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

उगाच डोक्याला ताप करुन घेत बसण्यापेक्षा हे चांगले आहे ना?
पैजारबुवा,

स्पा's picture

25 Jul 2016 - 4:03 pm | स्पा

खिक्क

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 3:53 pm | टवाळ कार्टा

कं लिव्लय कं लिव्लय रं बाला...सूडक्याकडे सरस्वती पाणी भरायला आलेली काय रे? बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))

पगला गजोधर's picture

25 Jul 2016 - 3:56 pm | पगला गजोधर

बाकी नक्की बाण कोणाला मारलाय याबाबत संभ्रम निर्माण केलेला आहे =))

तळ्टिप पहा : अभय गझल

अभ्या..'s picture

25 Jul 2016 - 3:58 pm | अभ्या..

भारीच रे सुडक्या. आवडले शब्दप्रभुत्व.
.

हा निव्वळ यमके करि। म्हणोनि कवि जाणावा

हे तर जबरदस्तच.
बाकी अगदी विडंबनास परफेक्ट असा माल टाकलायस. ;)

सस्नेह's picture

25 Jul 2016 - 4:01 pm | सस्नेह

उस्फूर्त काव्य !की गझल ?
शतोत्तरी चार पुरेत का ?

औषध ऍण्टिबायोटिक क्याटेगरीतलं दिसतंय. लैच जहाल! ;-)

कविता१९७८'s picture

25 Jul 2016 - 4:14 pm | कविता१९७८

मस्त

आदूबाळ's picture

25 Jul 2016 - 4:47 pm | आदूबाळ

लोल! शार्प शूटर सूडभौ!

याची आठवण झाली. यात "वृंदगान" नावाचा एक कहर प्रकार होता.

याची आठवण झाली. यात "वृंदगान" नावाचा एक कहर प्रकार होता. >> हेच लिहायला आले होते.. :)

शब्दांवरची पकड भारी आहे..

संदीप डांगे's picture

26 Jul 2016 - 11:21 am | संदीप डांगे

दोघांच्याही प्रतिसादाना प्रचंड सहमती. एकच गोळी काम तमाम.

स्रुजा's picture

25 Jul 2016 - 6:01 pm | स्रुजा

___/\___ १००० कवि (पोएट , पोएट) की १ सूड भौ की !!

विवेकपटाईत's picture

25 Jul 2016 - 7:50 pm | विवेकपटाईत

कविता वाचतानाच कळले हा विषारी बाण कुणाच्या हृदयात लागणार आहे कदाचित लागला हि असेल.

गंगाधर मुटे's picture

25 Jul 2016 - 10:00 pm | गंगाधर मुटे

हृदयापर्यंत कसले पोचतात हो असले बाण. मोहिमेवर निघणारा कवच कुंडले परिधान करूनच निघत असतो मोहिमेवर.

माम्लेदारचा पन्खा's picture

25 Jul 2016 - 8:08 pm | माम्लेदारचा पन्खा

आयडी लपवा रे...आयडी वाचवा रे....
आयडी वाचवा तो चालला...आयडी वाचवा तो चालला...
मिपाकर ताळतंत्र की जय !

किसन शिंदे's picture

25 Jul 2016 - 9:09 pm | किसन शिंदे

शब्दसंपदा अफाट आहे पण असं तिरकसपणे बाण मारणं नाही पटलं.

कलीयुगातल्या किष्ण्या शी शहामत

तुमचं पण असं गुपचुप ताम्हिणीत जाणं नै पटलं, आम्ही काय बोल्लोय का? =))

दगडी माळेवर केलेलं काव्य आणि कोरस फार घडीव होतं.अभयारिष्टात यमकापेक्षा व्यथा सांडवली आहे ती भावली आहे.

दगडी माळेवर वृंदगानच होतं.

यमक्या गुर्जी नंतर यमक्या सूड चे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल

गंगाधर मुटे's picture

25 Jul 2016 - 9:35 pm | गंगाधर मुटे

v

हा धागा वाचला आणि हायसे वाटले.

आपल्यासंबंधी (एखाद्या व्यक्ती विशेषासंबंधी) स्वतंत्रपणे सात-आठ धागे निघतात आणि तेही मिसळपावसारख्या अग्रणी संकेतस्थळावर

माझं मलाच लई कौतूक वाटलंय राव.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अवांतर :
जोडे मोजुनि मारावे >>>> हे भडक शब्द टाळुनही रचना टोकदार करता आली असती. त्यामुळे असा शब्दप्रयोग टाळणे चांगले राहिले असते, असे मलाही वाटते.

बाकी रचना ठीकठाक. पुलेशू

नूतन सावंत's picture

26 Jul 2016 - 9:58 am | नूतन सावंत

सूड, आसूड चांगलाच चमकावला आहेस.

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jul 2016 - 11:25 am | डॉ सुहास म्हात्रे

=)) =)) =))

विवेकपटाईत's picture

26 Jul 2016 - 3:08 pm | विवेकपटाईत

अवांतर म्हणून, कुणाला जोडे मारणे सौपे असते. मी स्वत:कृषी भवन मध्ये १३ वर्ष आणि प्रधानमंत्री कार्यालयात शेती हा विषय बघणाऱ्या अधिकार्याच्या खाली किमान ३ वर्ष तरी कार्य केले आहे. सरकारी नीती मुळे आपल्या देशातील शेती चौपट होते आहे, हे निदान मला तरी कळते. ग्राहक हिताच्या नावाने परदेशी पामोलीन (७०%) ग्राहकांच्या गळ्यात ओतले जात आहे. दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला (हि क्रांती घडली नसती तर आज कदाचित भारत दुग्ध निर्यातक असता) ( या वर एक लेख लवकरच लिहिणार आहे). आता डाळी विदेशातून येणार. पण किती दिवस असे चालेल. आपल्या देशाची लोक संख्या बघता या व्यवसायात आपल्याला आत्म निर्भर होणे गरजेचे आहे. ग्राहक हिताच्या नावाने शेतकर्यांचे शोषण करणे सोडण्याची गरज आहे. प्रती हेक्टरी शेतकर्याला किमान भाव किती मिळाला पाहिजे हे निर्धारित करणे गरजेचे आहे. मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.

सातवा आयोग खून वर सरकारलाच शिव्या देणाऱ्या निष्क्रिय* सरकारी बाबूंची तळमळ आम्हाला कळेल तो सुदीन

*सक्रीय बाबूंनी उगा अंगावर येऊ नये

दुग्ध क्रांतीच्या नावावर गोपालकांचा व्यवसाय चौपट केला

हे अमुल ला उद्देशून आहे का? यावर आवर्जुन लिहा.

मुटे साहेबांची तळमळ मला तरी कळते.

ओके मान्य. पण यावर आमच्यासारख्या असंवेदनशील शहरी लोकांना कळेल अशा भाषेत प्लीज लिहा आणि आम्ही मूर्खासारख्या शंका विचारल्या तर आमच्या बुद्धीवर शंका घेवू नका.

कसे आहे.. आंम्हाला पण अनेक प्रश्न पडतात. ते पडतात कारण आंम्ही पूर्णवेळ शेती करत नाही. त्यामुळे नक्की काय? कसे? असे विचारल्यानंतर "मग शेती करा आणि उत्तरे मिळवा" असे उत्तर देणे सोपे असते पण त्याने आमचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात आणि (कदाचित) खरी असणारी तळमळ रडगाणे वाटू लागते.

तुमच्याकडून एका अभ्यासपूर्ण लेखमालेच्या प्रतिक्षेत.

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2016 - 3:32 pm | अत्रुप्त आत्मा

=))
सुडूक कुजकं हडूक,
मारतय जोरात धुडुक.

साऱ्याचं इतकं सारं येताना
तुमची प्रतिभा का खुडुक,
टाका एखादी जिलबी
बुडवा आता तांब्या बुडुक.
.
यमकहराम

अत्रुप्त आत्मा's picture

26 Jul 2016 - 4:41 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-049.gif

खटपट्या's picture

26 Jul 2016 - 9:58 pm | खटपट्या

लयंच भारी.
गंडा बांधला पायजे. दोन वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे शिक्षक.
तांब्याकाव्य = गुर्जी
आसूडकाव्य = सूड

सुडक्या लेका आज ते गाडीच्या साईडबाराला गुंडाळण्यासाठी दोर आनायाला बाजारात गेलेलो, तिथे बैलांसाठी चाबूक पण होते. ब्रँडेड बरंका. बालाजी नाथ चाबूक नावाने. खाली मजबूत आणि मुलायम असे छापलेले चक्क.
च्यायला तुझ्या कवितांची आठवण आली. ;)

सूड's picture

26 Jul 2016 - 10:44 pm | सूड

=)) =)) लैच!!