रिमझिम रिमझिम पाऊसधारा
न्हाऊनी निघाला आसमंत सारा
बेधुंद अशा या क्षणी
साथ तुझी हवी साजणी
ओले ओले वृक्ष अन वेली
पानांवरून टपटपते पाणी
त्यात आठवली तुझी कहाणी
ओलावली मग डोळ्यांची पापणी
खळखळत वाहणा-या या नद्या
मिळतात सागराला सा-या
का न मग होई आपले मिलन
प्रश्न पडे हा फार गहण
भरारत वाहणारे हे वारे
आले अंगावर शहारे
दुःखाने मी कळवळतो
हृदयाच्या वेदनेने विव्हळतो
चिंब चिंब झाले माझे तन
दुःखाने भिजले माझे मन
आसवांचा आला आहे पूर
सापडेना आयुष्याचा सूर
प्रतिक्रिया
24 Jul 2016 - 3:43 pm | Bhagyashri sati...
छान लिहीलय, अजुन प्रयत्न करा
24 Jul 2016 - 7:16 pm | सुधीरन
धन्यवाद
28 Jul 2016 - 11:58 pm | माहीराज
खुप छान .. आवडली
29 Jul 2016 - 12:05 am | राधी
माफ करा पण ओढून ताणून यमक जुळवलेली अतिशय साधी कविता वाटली.