मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.

हेही सांगून टाका.

बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्‍याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता.
हा रोख तुम्हालाही मान्य असेल. शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या. शहरी लोकही कधीतरी शेतकरी होतेच की.
तुमच्या दुसर्‍या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्‍याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्‍यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात.
आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:34 am | गंगाधर मुटे

बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्‍याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता. हा रोख तुम्हालाही मान्य असेल.

खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता? त्यांना जाऊ द्या ते बेभान झालेत. तारतम्याशी त्यांचा काही संबंध उरलेला नाही. आपण वाचाना माझे धागे. मिसळपावर उपलब्ध आहेत ना! मग सांगा मला.

शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या.

भरपूर आणि सविस्तर लेखन केले आहे मी. बोलणारे नुसतेच बोलतात. वाचतात कुठे?

तुमच्या दुसर्‍या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्‍याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्‍यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात.

त्या कवितेत मी फक्त जसे आहे तसे वास्तव मांडले आहे. कविता म्हणजे ग्रंथ नसतो की प्रस्तावनेपासून समारोपापर्यंतचा सर्वच वृत्तांत यायला पाहिजे.

आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.

मिसळपाववरिल १५-२० आयडींची झुंड म्हणजे संपूर्ण आंतरजाल नव्हे. हे झुंड सोडली तर कोणीच तापत नाहीत. त्यांना कविता कळते, लेख कळतो. त्यातले मर्म कळते.

मी एकाच वेळी माझे लेखन ४ संकेतस्थळावर, २ ब्लॉगवर, २५ फेसबूकगृपवर, ३५० व्हाटसप गृपवर प्रकाशित करत असतो. लेखन प्रकाशित केल्यावर किमान १०,००० लोक ते वाचतात. ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हे, हे तुम्हीच समजून घ्या.

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 4:55 am | संदीप डांगे

ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हे

कडक.

तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटते, कळत नाही म्हणजे त्यांना अक्कल नाही असे नाही. आयटीतल्या प्रॉडक्ट सायकलवर एखादा इथे लिहित असेल तर जसे तुम्हाला-मला कळणार नाही तसे त्यांना कळत नाही.

शेतीमधे भरमसाठ विषय आहेत व ते सर्व एकमेकांशी विचित्र पद्धतीने गुंतलेले आहेत हे प्रत्यक्ष फिल्डवर काम करायला लागल्यावर कळत आहे. ह्यातले ढोबळमानाने, सुटसुटीत पद्धतीने बातम्यांमधून येणारे विषय सर्वसामान्य पब्लिकला -जी स्वतः शेतकरी नाही- माहित होतात. प्रत्यक्ष अनुभव नसल्याने काही बाबतीतले आवश्यक तपशील तर्कशुद्ध विचार करतांना कमी पडतात व त्यातून गैरसमज होतात. शेतीविषयी इथे लिहितांना मला ह्या मर्यादा जाणवत आहेत. प्रत्येक ठिकाणची शेतीची पद्धत, मानसिकता, भौगोलिक परिस्थिती थोडीफार, कमीजास्त प्रमाणात बदलत असते. अगदी पाच-दहा किमीवरही दोन शेतातल्या एकाच पिकामधे फरक दिसून येतो, हवामान वेगळे असते. त्यामुळे एखाद्या भागातला शेतकरी दुसर्‍या भागातल्या शेतकर्‍याचे प्रश्न समजून घेऊ शकेलच ह्याबद्दल मला शंका वाटते.

दुसरे असे की तुम्ही कायम चळ्वळीत, संबंधित लोकांमधे राहत असल्याने, चर्चा करत असल्याने तुमचे सर्कल इथल्या वाचकांच्या सर्कलपेक्षा भन्नाट वेगळे आहे. तुम्ही आयुष्य ह्याच विषयाला वाहून घेतले असल्याने तुम्ही सतत कॄषीविषयक अनेक तपशीलांना मनात ठेवून पंधरावीस ओळीची कविता सादर करता. त्यामागचे संदर्भ इथल्या वाचकांना कळत नसल्याने गैरसमज होऊन तुम्ही फक्त वल्गना करता, बाकी काही नाही असे इथे वाटते. काहींच्या प्रश्नांना उत्तर मिळाली नाहीत अशीही तक्रार आहे. माझे अशांना आवाहन आहे की किमान तीन दिवस सुटी काढून मुटेसरांबरोबर घालवावा, ते काय काम करतात, कोणत्या लोकांमधे असतात, काय घड्तं हे सगळं फर्स्ट ह्याण्ड कळेल. मुटेसाहेब काही नाही म्हणणार नाहीत.

काही लोकांना अंगवळणी पडलेले डिटेल्स देणे जीवावर येते, कदाचित त्यामुळेच मुटेसरांना अशा प्रश्नांची उत्तरे देणे फोलपणाचे वाटत असावे हे प्रश्नकर्त्यांनीही समजून घ्यावे आणि वादावर पडदा घालावा असे माझे मत आहे.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 5:24 am | गंगाधर मुटे

तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटते

अत्यंत चुकीचे मत हे तुमचे. मिसळपाववर काय १५-२० च सदस्य आहेत का? त्यापेक्षा जास्त असेल तर उरलेल्यांना कसे काय समजते?

मी वारंवार सांगतो आहे की जो प्रॉब्लेम आहे तो फक्त १५-२० जनांच्या झुंडीचा आहे. संपूर्ण मिसळपावकरांचा नाही.

कविता कळत नाही तर वेडेवाकडे प्रतिसाद देण्याची ह्या झुंडीला गरजच काय? ज्याला कळेल तो चांगली म्हणेल किंवा वाईट म्हणेल.

कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्‍या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.

खटपट्या's picture

22 Jul 2016 - 4:56 am | खटपट्या

किमान १०,००० लोक ते वाचतात

सर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?

हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.

हेही जाहीर करुन टाका

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 5:11 am | गंगाधर मुटे

सर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?

मी १०,००० पैकी १५-२० म्हटल्यावर सर्वच झूंडशाहीत कसे काय येतील बुवा? तुम्हीच मला बेरीज्,वजाबाकी,गुणाकार, भागाकार करुन उत्तर सांगावे? मला प्रश्न विचारणारे हे काय १५-२० च आहेत? अन्य कुणीच नाही? का असा ध चा मा करता आहात?
माझ्या फेसबूकला भेट द्या, व्हाटसप गृपवर या तिथे तुम्हाला प्रश्न विचारांची आकडेवारी कळेल.

मिसळपावरील माझे मागील काही धागे उघडा. तिथे राडा घालणारे आणि कशापायी कोण करत होते हे ही शोधा. म्हणजे झुंडीतली नावे तुम्हालाच कळून चुकतील.

एवढा तमाशा का केला जात आहे, त्याची अनेक कारणे आहेत. पैकी सर्वच मी सांगणार नाही पण किरकोळ कारण असेही आहे की यांना मी मिसळपाववर नको आहे.

कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्‍या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:03 am | गंगाधर मुटे

कोणत्या कंपनीचे पत्ते आहेत? मेड इन इंडिया असेल तर एका पत्त्यात साधारणत: ४ हजामती होतात.
तुमच्या जवळ असलेल्या पत्त्यांच्या संख्येला ४ ने गुना व तितक्या लोकांच्या हजामती करा,

प्रश्न विचारले म्हणून उत्तर दिले बुवा.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 4:20 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

21 Jul 2016 - 6:51 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

मुटे सर फार लागलं नाही ना??
नै म्हणजे सामूहिक हल्ला झालाय तुमच्यावर!!म्हणून म्हणलं आपलं!!

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 5:28 am | गंगाधर मुटे

संपादित

कृपया व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळावी.

मितभाषी's picture

21 Jul 2016 - 6:58 pm | मितभाषी

सगळ्यआ व्रूदांपनो मजा करा. २०१९ पर्यंत. .हॅ हॅहॅ हम्म्म्मन

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 2:54 am | गंगाधर मुटे

मला नाही वाटकी २०१९ मध्ये ग्रहपालट होणार आहे.
तसाही मला काही फरक पडत नाही. २०१४ आधी राहू होता, आता केतू आहे कदाचित २०१९ मध्ये शनी येईल.

शेतकर्‍यांचा ग्रहपालट होण्याची काहीच चिन्हे नसल्याने मला सर्वांशीच दोन हात करत राहावे लागणार आहे.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 2:35 am | गंगाधर मुटे

,,,,,,,, ब्रेक के बाद ,,,,,,,,

मोदक साहेब,
मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत. त्यात काय चुकलं? ज्याला संक्षिप्त कळत नाही त्याला सविस्तर तरी कसे कळणार? 

काव्य समजायला काव्यबुद्धी पाहिजे आणि गद्य समजायला व उलगडायलाही विवेक, तारतम्याची गरज भासते.

तुम्ही खालील दिलेली कविता उलगडून व अर्थ लिहून दाखवा. तुम्ही पास झालात आणि मी काय म्हणतो हे तुम्हाला कळते याची मला किंचितशी जरी खात्री झाली तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन.

===========================================
दोन मूठ राख

अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...

म्हणालं

"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"

अस्तित्व हसलं......

म्हणालं

"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....

पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय

माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...

आणि

अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"

पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????

                         - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
===========================================

१) मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत

२) ...तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन

मुटे, तुम्ही नक्की काय तो एक स्टँड ठरवा. उत्तरे दिली आहेत की नाही. उत्तरे दिली असतील तर त्याच्या लिंका द्या. संक्षिप्त किंवा कसेही.

प्रश्न आणखी एकदा -

सगळ्याच सरकारांनी शेतकर्‍यांचा कसा काय घात केला..?

..आणि इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 4:55 pm | गंगाधर मुटे

इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)

मी वैयक्तीक टिका कुणावरच करत नाही. कुणी माझ्यावर केली तर उत्तरादाखल केली तर मी काय उत्तर देईन, हे मलाही माहीत नसते. त्यामूळे इथे धमकी वगैरे कुचकामी ठरते.

खालील ओळी मोदकराव तुम्हाला उद्देशून नाहीत.
त्यापेक्शा

१) यापुढे मिसळपाववर आलात तर याद राखा.
२) यापुढे कविता लिहाल तर याद राखा.
३) यापुढे सरकारवर टीका केली तर याद राखा.
वगैरे
अशा कुणी धमक्या दिल्या तर ते राष्ट्रहिताचे तरी होईल.

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 4:56 pm | गंगाधर मुटे

कुणी माझ्यावर केली तर उत्तरादाखल मी काय उत्तर देईन

असे वाचावे.

मोदक's picture

23 Jul 2016 - 5:05 pm | मोदक

उत्तरांच्या लिंका?

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 7:16 pm | गंगाधर मुटे

लिंक देतो असे मी म्हटलेले नाही.
पत्ता द्या म्हटले पुस्तक पाठवण्यासाठी.

swatantrya

आणखीही २४ पुस्तके आहेत. सर्व पुस्तकांची किंमत ४००० रु. चे वर जाईल.

पण जे पाठवायचे आहे ते पुस्तक पोस्टेजखर्चासह २५०/- च्या आसपास जाते. तरीही मी तुम्हाला

पैसे द्या म्हटले नाही फक्त पत्ता द्या म्हटले.

ठीक. इतके सोपे होते तर या पूर्वी पुस्तकाची माहिती द्यायची हो. पुढचे रामायण टाळता आले असते.

मी पुस्तक विकत घेवून वाचतो आणि काही शंका असतील तर नक्की विचारेन.

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:10 pm | संदीप डांगे

बहुतेक त्यांनी चारशे का सहाशे पाने असा उल्लेख केला होता असे आठवते. ते तुम्हाला पाठवतो म्हणाले. त्यातूनच ते मग तुमचा पत्ता मागायला लागले...

च्यायला धागा आहे की हडप्पामोहंजोदारोचे उत्खनन... ;)

मोदक's picture

23 Jul 2016 - 10:33 pm | मोदक

डांगे अण्णा.. त्यांनी पहिल्यांदा विधान नाकारले, नंतर म्हणाले ४०० / ५०० पानी उत्तर होईल ते पाठवायला हवे. याचा अर्थ हे पुस्तक असेल असे मला वाटले नाही आणि जरी असले तरी त्याच वेळी सांगायचे "असे असे पुस्तक आहे, वाचा." संपला विषय.

आता पुस्तक सुचवले आहेच तर मी चर्चेला पूर्णविराम देवून पुस्तक मिळवतो आणि शंका विचारतो. बघू..

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:44 pm | संदीप डांगे

ह्या सर्व गोंधळातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होवो, इतकीच इच्छा. त्यांनी तुम्हाला पुस्तके पाठवावी, तुम्ही ती वाचून आपला अभिप्राय द्यावा, म्हणजे सगळं कसं गोड होईल...

मोदक's picture

23 Jul 2016 - 10:51 pm | मोदक

:)

हे पुस्तक विकत घेवून वाचतो. नंतर पुढची पुस्तके घेईन.

मुटे काकांनी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही. :)

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 11:02 pm | संदीप डांगे

:) जैसा आप ठिक समझे..!

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 11:02 pm | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

सुबोध खरे's picture

22 Jul 2016 - 7:02 pm | सुबोध खरे

तुम्ही खालील दिलेली कविता उलगडून व अर्थ लिहून दाखवा. तुम्ही पास झालातअशा अटी टाकण्यासाठी तुम्हाला अधिकार कुणी दिला? तुम्ही कविता लिहिली आणि तिचा अर्थ दुसऱ्याला तुम्हाला हवा तसा आला नाही तर तुम्ही उत्तरे द्यायचा प्रयत्न करणार. आपण स्वतःला बृहस्पती समजता काय?
मग मी पण म्हणेन मी पाठवलेल्या रोमलिन सोमलिन कवितेचा अर्थ तुम्ही सांगा. जर तुम्ही पास झालात आणि मी काय म्हणतो हे तुम्हाला कळते याची मला किंचितशी जरी खात्री झाली तर मी म्हणेन कि तुम्हाला कवितेतील थोडेसे कळायला लागले.(तुमच्याच शब्दात)
सार्वजनिक स्थळावर "आपणच सर्वज्ञ आहोत" हा दावा आपण स्वतःला काय समजता याचा दर्शक आहे.

सुबोध खरे's picture

22 Jul 2016 - 7:03 pm | सुबोध खरे

अर्थ दुसऱ्याला तुम्हाला हवा तसा लावता आला असे हवे

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 3:41 am | गंगाधर मुटे

मा. संकेतस्थळमालक व संपादक मंडळ

मी काय रचनात्मक कार्य केले? हा प्रश्न काही आयड्यांची एक झुंड मला वारंवार विचारत आहे.

आपण केलेले रचनात्मक कार्य किंवा ज्याने आपली स्तुती होईल असे कथन स्वत:च्या श्रीमुखाने करण्याची भारतीय संस्कृती नाही असे मला वाटते. आत्मस्तुती तर निषिद्ध मानली गेली आहे. हे या झुंडखोर आयड्यांना कसे समजाऊन सांगू, हे मला कळत नाही आहे.

फ़ारफ़ार तर मी माझा संक्षिप्त परिचय देऊ शकतो. माझे काय कर्तुत्व असेल नसेल तर त्यांनी परिश्रम करून शोधावे. माझ्या कार्याविषयी माहिती घ्यायची असेल तर ही त्यांची गरज आहे. आत्मस्तुती करणे ही माझी अजिबात गरज नाही. मी करणार नाही.

संक्षिप्त परिचय

नाव         : गंगाधर महादेवराव मुटे

जन्म       : २७ फ़ेब्रुवारी १९६२

शिक्षण    : बी. एससी (गणित)

व्यवसाय : मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन, कापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती

प्रकाशित साहित्य : 
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१०

२) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२

३) “नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३

४) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३
५) “नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६
****

६) लोकमत, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविधवृत्तपत्रातून सातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता प्रकाशीत. 

७) पुणे, नाशिक व औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्‍या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पक्षिक “शेतकरी संघटक” मध्ये “वाङ्मयशेती” हे नियमित सदर लेखन.

ई-लेखन :         1] www.sharadjoshi.in 2] www.baliraja.com 3] www.gangadharmute.com

                       4] gangadharmute.wordpress.com 5] gangadharmute.blogspot.com 

                       या संकेतस्थळांची निर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.

फ़ेसबूक :          www.facebook.com/gangadharmute

फ़ेसबूक पेज :    www.facebook.com/my.net.farming ( माझी वाङ्मयशेती)

पुरस्कार :  १) स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय मराठी TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित “ब्लॉग माझा” या जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार 

२) मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट नेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत “वांगे अमर रहे” या ललितलेखाला पारितोषिक

३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा - २०११ या स्पर्धेत “कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापू” या कवितेस प्रथम पुरस्कार 

४) २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२ व्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “अंकूर वैभव” पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.
५) ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार - सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.

सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास.

          १)  १० जुलै २०१४ पासून स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर कार्यरत

          २)  जुलै २०१० पासून शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत

          ३)  नोव्हेंबर २०१४ पासून अ.भा.शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या संस्थापक अध्यक्षपदी कार्यरत.
          ४)  २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा येथे आयोजित पहिल्या व २०,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित दुसर्‍या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.

संपादकीय कार्य : 
१) १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग.

२) वर्धा येथे आयोजित पहिल्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "सारस्वताचा एल्गार" स्मरणिकेचे संपादन.
३) नागपूर येथे आयोजित दुसर्‍या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि "कणसातली माणसं" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन.

* * *

:  My Web :

www.baliraja.com   

www.sharadjoshi.in

www.gangadharmute.com 

www.shetkari.in

      : My Blogs :

gangadharmute.wordpress.com
gangadharmute.blogspot.com 

Facebook - www.facebook.com/gangadharmute

Facebook - www.facebook.com/groups/baliraja

You Tube - www.youtube.com/gangadharmute

Facebook Page - https://www.facebook.com/sharadjoshi.in -  शेतकरी संघटना - फ़ेसबूक पेज

Facebook Page - https://www.facebook.com/my.net.farming -  माझी वाङ्मयशेती - फ़ेसबूक पेज

इरसाल's picture

23 Jul 2016 - 11:24 am | इरसाल

हे वरचं सगळं ठीक आहे पण काम काय करता ? (कृ. ह. घे.)

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 2:50 pm | गंगाधर मुटे

माझे पोट शेतीवर आहे. मी शेतीच करतो.

मात्र पोट सोडून बाकी सर्व गरजा पूर्ण करायला माझा अन्य व्यवसाय आहे.

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 2:51 pm | गंगाधर मुटे

खेड्यातच राहतो आणि वर्षातील २७५ दिवस शेतीत घालवतो.

उडन खटोला's picture

22 Jul 2016 - 6:58 am | उडन खटोला

>>>>>मी एकाच वेळी माझे लेखन ४ संकेतस्थळावर, २ ब्लॉगवर, २५ फेसबूकगृपवर, ३५० व्हाटसप गृपवर प्रकाशित करत असतो. लेखन प्रकाशित केल्यावर किमान १०,००० लोक ते वाचतात.

सर, आज हमें यकीन हो गया, गंगाधर ही शक्तिमान है!

स्वारी शक्तिमान.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 7:33 am | गंगाधर मुटे

आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;

तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)

(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)

उडन खटोला's picture

22 Jul 2016 - 7:39 am | उडन खटोला

तो म्हणाला काव्य कसले?
'अभय' गझला फालतू या

आहे बरीक ठाऊक स्वतःला
दर्पणा का न पाहु या?
-आत्ताचप्रकाशित

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 7:56 am | गंगाधर मुटे

कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?

उडन खटोला's picture

22 Jul 2016 - 8:01 am | उडन खटोला

आहात अस्सल मातीतले, आहे जाण शेतीची
कशाला करता अपेक्षा आन्तरजालाच्या प्रितीची

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 8:04 am | गंगाधर मुटे

मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

उडन खटोला's picture

22 Jul 2016 - 8:11 am | उडन खटोला

फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!

आहे ना माहिती? मग कशाला उगाच रुसता???

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 8:13 am | गंगाधर मुटे

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

उडन खटोला's picture

22 Jul 2016 - 8:28 am | उडन खटोला

आता याचा अर्थ सुद्धा सांगा.
आम्ही टैम्पलिस.

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 8:43 am | गंगाधर मुटे

त्याचा अर्थ जाऊ द्या
हा नवा घ्या

उच्चांक गाठताना बेबंद धूर्ततेचा
उंटीणिला शिडीने चंगून चुंबते तो

उदय के'सागर's picture

22 Jul 2016 - 8:57 am | उदय के'सागर

काही नाही 400 एवढच म्हणायचं होतं :P

गंगाधर मुटे's picture

22 Jul 2016 - 9:27 am | गंगाधर मुटे

एक जाहीर प्रश्न

         याच धाग्यावर एक अस्तित्वहीन आयडी माझ्या नावावर आणि आडनावावर व्यंग कसायला लागली, तेव्हा त्या आयडीला वैयक्तीक पातळीवर टीका-टिपणी करणे अयोग्य आहे, असा सल्ला देणारा मिसळपावर कोणीच नव्हता का?
मला सल्ले द्यायला बर्‍याच आयडी सदैव उताविळ असतात, म्हणून या प्रश्नाचे प्रयोजन. बाकी विशेष काही नाही.

- गंगाधर मुटे

संदीप डांगे's picture

22 Jul 2016 - 10:15 am | संदीप डांगे

+१

अभ्या..'s picture

22 Jul 2016 - 10:17 am | अभ्या..

अगदी सहमत.

सचिन चांगला क्रिकेट खेळतो म्हणून त्याचे बाकी चुकीचे वागणे बोलणे अजिबात क्षम्य नाही
तसेच हे आहे
तुम्ही चांगल्या कविता लिहिता म्हणून तुमचा दुराग्रह, अपमानास्पद बोलणे, लोकांची अक्कल आणि लायकी काढणे या गोष्टी लोक का सहन करतील ?
तुम्ही हे सगळे केल्यावर लोकांनी तुमच्या कविते कडे बघून सगळे सहन करावे आणि नाही केले तर तुम्ही अन्याय झाल्याची , झुंड शाही ची ओरड करणार हे बरोबर वाटते का हे खरच एकदा शांतपणे विचार करुन बघा
शेवटी मान द्यावा आणि मान घ्यावा हे खरे
मी एरंडी च्या बिया पेरणार आणि झाडाला मात्र आंबे आले पाहिजेत हे शक्य आहे का?
मिपा वर अनेक उत्तम लेखक , देशप्रेमी, समाजसेवक, मान्यवर, आपल्या क्षेत्रात अतिशय यशस्वी अशी अनेक लोक आहेत . कुणाच्या लिखाणात तुम्हाला असा दुराग्रह दिसला ?
मीच एकटा त्यागी आणि समाजसेवक आणि बाकी सगळे संधिसाधू या विचारसारणीतून कृपया बाहेर या
लोकांचाही आदर करायला सुरुवात करा आणि मग लोकांच्या वागणुकीतला फरक बघा
अर्थात मला कल्पना नाही कि तुम्ही कितपत शांतपणे हे वाचाल
का परत वार करत सुटाल

अर्थातच या वर तुमचा परत ल

रुस्तम's picture

22 Jul 2016 - 7:04 pm | रुस्तम

बाडीस

कविता१९७८'s picture

23 Jul 2016 - 3:30 pm | कविता१९७८

सहमत, मुटेंनी कधीच स्वतःचे धागे सोडुन दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीत आणि त्यांना वाटतय की सर्वांनी त्यांच्या धाग्यावर त्यांची फक्त वाहवाईच करावी. ज्यांनी केली नाही त्यांना कविता समजत नाही असे त्यांचे मत. मग तो कुणी ही असो त्यांचा अपमान करत रहा ही त्यांची सवय. मी तर त्यांना शक्यतो कधी प्रतिसाद ही देत नाही तरी त्यांनी मला या धाग्यावर तुम्ही नियमित अस लिहिता आणि तसं लिहिता असे प्रतिसाद दिलेत. अशा आयडीला विनातक्रार झेलतय ते आपलं मिपा. चांगलय.

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 4:33 pm | गंगाधर मुटे

मुटेंनी कधीच स्वतःचे धागे सोडुन दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिले नाहीत

दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद दिलेच नाहीत असेही नाही पण जितके द्यायला हवे तितके देऊ शकत नाही. पूर्वीसारखा वेळ देऊ शकत नाही (पूर्वी पडीक असायचो) याचे शल्य मलाही आहे. मिसळपाववरच म्हणून नव्हे तर अन्य कुठल्याही संकेतस्थळावर, फेसबूकवर अथवा व्हाटसपवर देखील मी प्रतिसाद देऊ शकत नाही याला नाईलाज आहे आणि त्याला पर्याय नाही.
कारणेच सांगायची तर ....
१) एका व्यक्तीला असणार्‍या मर्यादा
२) दिवस फक्त २४ तासाचाच असणे
३) नित्यनेमाची कामे टाळून वेळ न वाचवता येणे उदा. जेवण
४) झोपेला अन्य पर्याय नसणे
५) दोनवेळेचे पोट भरण्यासाठी खाजगी कामांना वेळ द्यावाच लागणे

वगैरे...

पण दुसर्‍यांच्या धाग्यांवर प्रतिसाद न देणे हे चांगले नसले तरी गुन्हा नाही असे मला वाटते.

त्यांना वाटतय की सर्वांनी त्यांच्या धाग्यावर त्यांची फक्त वाहवाईच करावी.

असे मी म्हटले नाही. यापुढे तसे म्हणण्याची शक्यता नाही.

ज्यांनी केली नाही त्यांना कविता समजत नाही असे त्यांचे मत.

असे मी कधीही म्हटलेले नाही. एखाद्या व्यक्तीला म्हटले याचा अर्थ सर्वांना होत नाही.

मग तो कुणी ही असो त्यांचा अपमान करत रहा ही त्यांची सवय.

मी कुणाचाही अपमान करत नाही. मात्र मी म. गांधींचा वारस नसल्याने कुणी माझ्या एका गालावर मारली तर दुसरा गाल समोर करत नाही. मला देवाने हात दिले आहे आणि माझा अपमान करणार्‍यालाही देवाने गाल दिले आहेत, याचे मला भान असते, इतकेच.

मी तर त्यांना शक्यतो कधी प्रतिसाद ही देत नाही तरी त्यांनी मला या धाग्यावर तुम्ही नियमित अस लिहिता आणि तसं लिहिता असे प्रतिसाद दिलेत.

शितावरून भाताची परिक्षा होत असे म्हणतात.

अशा आयडीला विनातक्रार झेलतय ते आपलं मिपा. चांगलय.

हा सर्वस्वी मिपाचा निर्णय आहे. मी त्यावर मत नोंदवू शकत नाही.

सुबोध खरे's picture

24 Jul 2016 - 10:47 pm | सुबोध खरे

श्री गंगाधर गाडगीळ यांनी आपली एक आठवण लिहिली आहे ती अशी.
मला (श्री गंगाधर गाडगीळ याना ) साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले तेंव्हा असे वाटायला लागले की आपण आता प्रथितयश साहित्यिक झालो. माझा हा दंभ/ गैरसमज कीर्ती कॉलेज च्या एका कला शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याने खाड्कन जमिनीवर आणला. त्याने आपल्या मित्राला विचारले आपल्याला १२ मार्कांचा ज्ञानेश्वर आहे ना?
अमृतातेही पैजा जिंके असे लिहिणारा ज्ञानेश्वर १२ मार्काला मग गंगाधर गाडगीळ कोण्या झाडाचा पाला?
मी खाड्कन जमिनीवर आलो आणि मला सगळे हसत आहेत असा भास होत होता.
या आठवणींचा कोणाशीही वैयक्तिक संबंध नाही हे नमूद करू इच्छितो.

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 11:27 pm | गंगाधर मुटे

माझ्या एका हझलेचा (विनोदी गझल) एक शेर आठवला.

नकोस मित्रा मला जळू तू, अता न सामान्य राहिलो मी
कितीतरी जाड पुस्तकांचे, लिखान माझे तयार आहे

मिपावर पूर्वप्रकाशित

चंपाबाई's picture

25 Jul 2016 - 9:33 am | चंपाबाई

हा प्रसंग पुलं देशपांडेंचाही आहे ना ?

मला मुटेंवर फार एकतर्फी हल्ला होतोय वाटत असल्याने सहानुभूती वाटत होती.ती चुकच झाली.मुटे अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद देत असताना कारवाई करुन फक्त बोका ए आझम सारखा आय डी बॅन केला जावा हे दुर्दैव आहे.वैयक्तिक प्रतिसाद हे जर कारण असेल तर पत्ता मागणे काय सार्वजनिक कारण आहे?

कविता१९७८'s picture

23 Jul 2016 - 4:25 pm | कविता१९७८

काय म्हणतेस? बोका - ए - आझम चा आय डी बॅन केला गेलाय? आणि तो ही मु टें सारख्या आयडी मु ळे? असे असेल तर खरच दुर्देव आहे या मिपाचा , बोका - ए - आझम या सारख्या अत्यंत हुशार आणि अभिमानास्पद आयडी बॅन केला जावा आणि मुटेंसारखा दुराग्रही अभिमानी आयडी ज्याला मिपा वरच्या स्वतःच्या धाग्या खेरीज दुसर्‍या कुणाच्या धाग्यावर काडीचाही रस नाही, अशा स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍या अणि दुसर्‍यांची अक्कल / लायकी काढणार्‍या मुटेसारखा आयडीच्या वैयक्तिक प्रतिसादाकडे काणाडोळा केले जाणे हे काही पटले नाही , निषेध नोंदवते.

सामान्य वाचक's picture

23 Jul 2016 - 5:45 pm | सामान्य वाचक

बोका ए आझम हे खरच चांगले लेख आणि अनुवाद लिहायचे

अवघड आहे एकंदरीत सगळे

रुस्तम's picture

23 Jul 2016 - 11:18 pm | रुस्तम

सहमत

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 4:44 pm | गंगाधर मुटे

अत्यंत बहकल्यासारखे प्रतिसाद देत असताना

मी प्रतिसाद दिलेले नाहीत. केवळ उत्तरादाखल उपप्रतिसाद दिलेले आहेत.
मी कुणावर वार केला नाही फक्त स्वसंरक्षण केले आहे.

बोका ए आझम सारखा आय डी बॅन

मी तशी मागणी केलेली नव्हती.

वैयक्तिक प्रतिसाद हे जर कारण असेल तर पत्ता मागणे काय सार्वजनिक कारण आहे?

मी सर्वांना त्यांचे पत्ते मागीतलेले नाहीत. ज्यांच्या पत्त्यांची मला गरज भासली त्यांनाच मागीतली. सार्वजनीक द्या म्हटले नाही, मी माझा इमेल आयडी देऊन व्यक्तीगत पाठवा असे म्हटले.

मात्र का म्हटले ते येथे विस्तृत लिहित बसणार नाही. मराठी भाषा जाणणार्‍या कोणत्याही व्यक्तीला ते सहज कळू शकते.

महासंग्राम's picture

23 Jul 2016 - 5:07 pm | महासंग्राम

अशा रीतीने ४०० प्रतिसाद नोंदवून कविता विभागातील हा विक्रमी धागा ठरला आहे.

बोर्डमॅन मंदार

पैसा's picture

23 Jul 2016 - 5:08 pm | पैसा

या धाग्याचे दोन तीन वेळा चारशे झालेत.

महासंग्राम's picture

23 Jul 2016 - 5:13 pm | महासंग्राम

अर्रर्र मग प्रतिसाद उडवले गेले काय.... त्या अर्थाने मग १२०० झालेत ख्यिक

कविता आणि बहुतांशी प्रतिसाद ह्यांचा ३६ चा आकडा???

जयंत कुलकर्णी's picture

23 Jul 2016 - 5:23 pm | जयंत कुलकर्णी

जे काही चालले होते आणि चालले आहे ते मिपाला भुषणावह नाही. या असल्या चर्चांमधून कोणाचाही आयडी बॅन होणे हे तर फारच वाईट... मला वाटते एवढे झाल्यावर तरी सगळ्यांनी आपापल्या तलवारी म्यान कराव्यात व विधायक लेखनासाठी लेखणी उचलावी.....
शेवटी आपल्या सगळ्यांची इच्छा....

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 7:03 pm | गंगाधर मुटे

तुमचे अत्यंत योग्य असले तरी मी धागाकर्ता असल्याने या धाग्याची समारोपीय पोस्ट माझी असणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे.

मिपाला भुषणावह नाही

तसं असेल तर मी माझ्यापरिने एक पर्याय देऊ इच्छीतो की

हा धागाच उडवून टाकावा.

आनन्दिता's picture

23 Jul 2016 - 9:15 pm | आनन्दिता

बोका ए आझम बॅन होणे दुर्दैवी आहे. त्यांच्यावरची कारवाई मागे घेतली जावी ही विनंती.

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 9:42 pm | सतिश गावडे

हेच म्हणतो.

बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. इतर लोकांनी काही मत व्यक्त केले नाही याचा "इतरांना माझे लेखन आवडते" असा सोयिस्कर अर्थ त्यांनी लावलेला आहे.

प्रांता-प्रांतातील शेती वेगळी, तिची दुखणी वेगळी असतात हे सत्य मान्य करुनही एक शेतकरी कुटुंबात वाढलेला, शेतीत खेळलेला आणि लहानाचा मोठा झालेला मुलगा म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते की मुटेंच्या या असल्या पुढारीपणातून शेतकर्‍याचे काही भले होईल असे वाटत नाही. झाले तर नुकसान होण्याचीच शक्यता आहे.

ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे.

कविता१९७८'s picture

23 Jul 2016 - 10:02 pm | कविता१९७८

मुटे ईतके उद्घट आणि उर्मट वागुन त्यान्च्यावर अद्याप कारवाई का झालेली नाही हा मोठा प्रश्नय

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:05 pm | संदीप डांगे

१. बोका ए आझम, डॉ. खरे, मोदक, आदि जोशी इत्यादींचे काही प्रतिसाद खटकण्यासारखे असतीलही.
२. मात्र मुटे यांचे प्रतिसाद अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत.

गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही?

ही प्रसिद्धीला हपापलेली तथाकथित साहित्यशेती आहे. असल्या प्रसिद्धीलोलुप टंकनशेतीने गरजू शेतकर्‍यांना काडीचा तरी फायदा होईल का याबद्दल शंका आहे.
ह्याच्याशी मात्र सहमत आहे. तसेच तो त्यांच्या आवडीचा उद्योग आहे. करु देत. मिपावर आले म्हणून आपल्याला माहिती झाले, नस्ते आले तर कोण कुठले गंगाधर मुटे, काय काम करतात हेही कळले नसते. मिपाबाहेरच्यांना (किंवा त्या दहा हजार फॉलोअर्सशिवाय) तर अजूनही माहित नसेल

पाळेकर तीस वर्षापासून कार्यरत आहेत, वीस लाखाहून अधिक शेतकर्‍यांची आयुष्य बदललीत त्यांनी. तरी शहरी लोकांना आत्ता माहित झाले. मिसळपाववर झिरोबजेटशेतीचे तंत्रज्ञानाबद्दल धागे काढले असते तर त्यांचीही हुर्यो उडवण्यात आली नसती ह्याबद्दल खात्री देऊ शकत नाही. देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते. ;)

स्वामी संकेतानंद's picture

23 Jul 2016 - 10:13 pm | स्वामी संकेतानंद

देशी गायीच्याच गोमुत्राला पाळेकर समर्थन देतात. त्याबद्दल त्यांना 'आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे काय' व तत्सम प्रश्न विचारुन भंडावून सोडले असते.

हा प्रश्न प्रामाणिक वाटतो. भंडावणे वगैरे नाही. जेव्हा आपण एखादा दावा करतो तेव्हा तो शास्त्रशुद्ध फिल्ड एक्सपरिमेन्टद्वारेही सिद्ध करता आला पाहिजे.अनेकानेक शेतकर्‍यांना व्यक्तिगत चांगले अनुभव आले असतीलही आणि पाळेकरांचा अनुभव अतिशय दांडगा आहेच, पण तरीही जेव्हा हे नियंत्रित प्रयोगाद्वारे तपासले जाईल तेव्हा ते तसे सिद्ध व्हावे. यामुळे देशी गाईच्या गोमूत्राचे रासायनिक आणि जीवशास्त्रीय असे कोणते घटक आहेत ज्यामुळे विशेष फायदा होतो ते पण कळेल.

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:22 pm | संदीप डांगे

स्वामीजी, तुमचे म्हणणे खरे आहे पण माझ्या 'भंडावून सोडणे' ह्या शब्दाच्या वापरामागे इथेच वाचलेली एक आयुर्वेद बद्दलची चर्चा आहे. आयुर्वेद डॉक्टर आपल्या पद्धतीने समजवून नीट सांगत होते, प्रश्नकर्ता नुसता किस पाडत होता. असे अनेकदा अनेक बाबतीत झाले आहे.

अनेक कंपन्या आपल्या उत्पादनांच्या जाहिरातीत कैच्या कै दावे करतात, त्यांना कोणीही हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करा आणि मग बोला असे म्हणत नाही. मुकाटपणे उत्पादने वापरतात.

असो. एखादी गोष्ट वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेली आहे की नाही हे जाणून घेण्याची इच्छा असणे वेगळे. पण नुसतं आपल्याला पटत नाही म्हणून आपलेच म्हणणे रेटत भंडावून सोडणे वेगळे. तसे मिसळपाववर घडतांना पाहिले आहे इतकेच सांगायचे होते.

स्वामी संकेतानंद's picture

23 Jul 2016 - 10:29 pm | स्वामी संकेतानंद

100 टक्के सहमत.

अभ्या..'s picture

23 Jul 2016 - 10:18 pm | अभ्या..

सहमत,
आणि प्रसिद्धीलोलूप म्हणायला त्यांनी धागा काढणे एवढेच केले होते. ना खरडवह्यात येऊन ना व्यनि करून आवतण धाडले होते. ना व्हॅटसप वर पिंगत होते कि द्यारे मला प्रतिसाद. आधीच्या त्यांच्या बर्याच धाग्याना मर्यादीत प्रतिसाद होते. तेवढ्यावर भागले असते.
आता सांगा उचकवले कोण?
चुकीचा निवाडा करायला आपण कुणीच जज्ज नाही आहोत
सो इतके झाल्यावर मुटे तुम्हारा चुक्याच अशी भूमिका घेणे मला तरी पटलेले नाही.

उडन खटोला's picture

23 Jul 2016 - 10:24 pm | उडन खटोला

असं मला देखील वाटतंय. अर्थात मी कोण म्हणा!

बोका ने मुटे दारु पिउन पडले असतील असं लिहिलं होतं. त्यावर हे आवडलं नाही असं लिहीलं होतं.
बाकि मुटे अथवा बोका हे दोघे सुद्धा मित्र अथवा शत्रु दोन्हि पैकी एकही नाहियेत.

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 10:31 pm | सतिश गावडे

माझ्या प्रतिसादाबद्दल म्हणत असाल तर मी ही शेतकरी कुटुंबातील असल्याने मला हा शेतकर्‍यांबद्दलचा कळवळा बेगडी वाटतो. हे असल्या कायम आक्रमक हल्ल्याच्या स्वरुपातील काव्यशेतीने शेतकर्‍याचे काहीही भले होणार नाही.

आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला.

आता ज्यांना विरोधी मते असणार्‍या धाग्यांवर आपली मते मांडूच नये असे म्हणत असाल तर प्रश्नच मिटला.

+११

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:49 pm | संदीप डांगे

शमत हायेच.. ;)

अभ्या..'s picture

23 Jul 2016 - 11:17 pm | अभ्या..

गावडे सर नमस्कार,
आपली भूमीका कळाली. आता असे धरून चालू कि मुटे सर पुढारीपण करताहेत. ओके. कुणाचे? आपले? शेतकऱयांचे? आपल्या प्रतिसादावर ठरणारे का त्यांचे पुढारीपण?
आपण दोघेही शेतकरी कुटुंबातले आहोत. ओके. काय फरक पडणारे आपल्या निषेधाच्या प्रतिसादाने?
त्यांची भूमिका बेगडी आहे. ओके. अस्सल भूमिका कुणाची आहे आपणास ठाऊक आहे का? आपणास म्हणजे आपणा सर्वानाच.
शेतकऱयांचे भले होणार नाही. ठीक आहे. ज्याने भले होईल अशे चार मार्ग आपण हुडकून काढू. काय म्हणता?
राहता राहिले विरोधी मत मांडूच नये का? अवश्य मांडावे. अगदी संदर्भासहित मांडावे.
धागा कवितेचा, कशाला करायचा काथ्याकूट? त्यावर धागाकरत्याने खुलासा द्यावा अशी अपेक्षा पण करू नये. प्रश्नच मिटतो. उत्तर दिलेच पाहिजे असा आग्रह होतो तेव्हा वेगळे वळण मिळते.

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 11:24 pm | सतिश गावडे

चालू द्या.

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 10:23 pm | सतिश गावडे

गावडेसर, दोन्ही विधानांत पक्षपातीपणा जाणवत नाही?

पक्षपातीपणा करायचा असता तर काही प्रतिसाद खटकले असं लिहीलंच नसतं. :)

संदीप डांगे's picture

23 Jul 2016 - 10:33 pm | संदीप डांगे

खटकण्यासारखे असतीलही. (डळमळीत विधान)
अतिशय उद्धट आणि उर्मटपणाचे आहेत. (ठाम विधान)

ह्यामुळे वाटले तसे..

सतिश गावडे's picture

23 Jul 2016 - 10:37 pm | सतिश गावडे

:)

शि बि आय's picture

23 Jul 2016 - 9:22 pm | शि बि आय

उठलीच पाहिजे ..... उठलीच पाहिजे...

बोकाभाऊंवरील बंदी उठलीच पाहिजे

चैतू's picture

23 Jul 2016 - 9:54 pm | चैतू
चैतू's picture

23 Jul 2016 - 9:54 pm | चैतू
चैतू's picture

23 Jul 2016 - 9:54 pm | चैतू
चैतू's picture

23 Jul 2016 - 9:54 pm | चैतू
उडन खटोला's picture

23 Jul 2016 - 10:10 pm | उडन खटोला

अरेरे!
अय्या!
आयला!
काय सांगता?
कैच्या कै...
शी बाबा!
हा अन्याव आहे.
बरं झालं.
का पण?

झालं?

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 10:16 pm | गंगाधर मुटे

बोका-ए-आझम - Tue, 19/07/2016 - 19:57
का स्वतःचा वेळ वाया घालवताय? मनोरुग्णांसोबत वादविवाद करायची एवढी हौस का आलीय आज तुम्हाला?
http://www.misalpav.com/comment/859096#comment-859096
------------------------
धाग्याचा सारांश:
बोका-ए-आझम - Wed, 20/07/2016 - 23:42
मै तो हूं पागल
ये कहूं हर पल
कर कोई हलचल
होने दे होने दे
होने दे होने दे होने दे
कोई दीवानगी...!
http://www.misalpav.com/comment/859875#comment-859875
------------------------

@अजया
@आनन्दिता
@शि बि आय

गंगाधर मुटेला मनोरुग्न आता कोण म्हणेल, असा प्रश्न पडलाय का तुम्हाला? तसे असेल तर तुम्ही तसा प्रतिसाद लिहिला आहे आणि मी वाचला आहे, अशी आपण समजूत करून घेऊयात ना!

कुणाचाही आयडी बॅन होणे दुर्दैवीच आहे. बोका-ए-आझमचा आयडी बॅन झाला काय किंवा बंदी उठवली काय, मला यात रस नाही.

आनन्दिता's picture

23 Jul 2016 - 11:02 pm | आनन्दिता

मुटे इथे तुम्ही लोकांची अक्कल, दानत काढलीत ते योग्य होतं काय?

प्रतिसाद देताना किमान सभ्यता पाळायला हवी.