मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतकर्याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!
शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ही काडी समजावी का?
वस्तूस्थिती आहे.
ह्या पुण्यात साध्या बाकरवडी बाबत पण एक वाक्यता नाही.
कुणाला चितळे तर कुणाला काका हलवाई ह्यांच्याकडची बाकरवडी आवडते.
आणि पुणेकर पत्ता पण व्यवस्थित सांगत नाहीत.
आपल्या चरणावर आस्वादासाठी माझा एक शेर अर्पण करतो;
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
या धाग्यावरील प्रतिक्रिया वाचून मनमुराद हसलो. खूप दिवसांनी इतक्या विनोदी प्रतिक्रिया वाचायला मिळाल्या. बहुत मझा आला!
सर्वजण लगे रहो!
हां ना राव...
पण ते एवढ्या जमलेल्या पत्त्यांचं आता काय करायचं?
आम्ही "नॉट अॅट होम" उर्फ "नाटेठोम" खेळत आहोत.
तुम्ही पण भाग घेवू शकता.
मुक्तविहारी साहेब, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, अपेक्षा एवढ्यासाठी नव्हती की मी तुम्हाला बर्याच वर्षापासून ओळखतो. तुमचा असा पैलू कवितेच्या बाबतीत कधी जाणवला नव्हता.
असो. हरकत नाही. परिवर्तन होतच असते. झुंडीत घुसून हात धुवून घेण्याचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही.
पण
झुंडीने मिळून एखाद्याचा अभिमन्यू करणे, फार रचनात्मक कार्य नसते. विजय मिळाला तरी तो पराक्रमी विजय नसतो.
आणि जर का पराजय झाला तर मेल्याचा मान त्याच्या वाट्याला येतो, असे माझे पहिल्या इयत्तेचे गुरुजी म्हणाले होते.
तुमच्यापर्यंत आज पोचवले. बाकी काही नाही.
काका, तुम्ही उगाच स्वतःचा अभिमन्यू करुन घेताय. मोद्क आदींनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दीली असतीत तर बाकीच्या लोकांनाही धाग्यातून माहीती मिळाली असती. असो.
खटपट्या साहेब,
मिसळपावर मला ६ पेक्षा जास्त वर्षे झालीत. माझे अंदाजे ५०० पेक्षा जास्त धागे आहेत. ३ काव्यसंग्रहाच्या संपूर्ण कविता आहेत. "वांगे अमर रहे" या पुस्तकातील सर्व लेख आहे. अप्रकाशित स्फूट लेखन आहे.
मी नवीन नाही. मी आजवर चिक्कार उत्तरे दिली आहेत.
मी या झुंडशाही आयड्यांना ओळखतो. यांच्या मनातला कावा जाणतो. यांची अंतिम इच्छा काय आहे हे ही जाणतो. हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.
त्यामुळे सध्या मी जो मार्ग निवडलाय, त्यापेक्षा दुसरा चांगला मार्ग उपलब्ध नाही.
(मोद्क आदींनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दीली असतीत तर प्रश्न मिटला असता हे तुमच भोळेभाबडे मत आहे)
हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.हेही सांगून टाका. बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता. हा रोख तुम्हालाही मान्य असेल. शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या. शहरी लोकही कधीतरी शेतकरी होतेच की. तुमच्या दुसर्या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात. आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.
बाकी सर्व प्रश्नकर्त्यांचा रोख "तुम्ही शेतकर्याला गरीब भोळा भाबडा दाखवता आणि तो तसा असण्याचे खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता" हा होता. हा रोख तुम्हालाही मान्य असेल.खापर शहरी चाकरमान्यांवर फोडता? त्यांना जाऊ द्या ते बेभान झालेत. तारतम्याशी त्यांचा काही संबंध उरलेला नाही. आपण वाचाना माझे धागे. मिसळपावर उपलब्ध आहेत ना! मग सांगा मला.
शेतकरी गरीब आहे पण त्यासाठी "नेहमीच" सरकार जबाबदार कसे हे तुम्ही उदाहरणासहीत पटवून द्या.भरपूर आणि सविस्तर लेखन केले आहे मी. बोलणारे नुसतेच बोलतात. वाचतात कुठे?
तुमच्या दुसर्या एका कवीतेत तुम्ही धरणाचे पाणी उद्योगाने पळवले असे लीहीता. पण शेतकर्याला शेततळी करुन स्वतःचे पाणी साठवून ठेवण्यासाठी कोणी रोखले नाही. सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेची शेतकर्यांना माहीती करुन द्या. सुपीक जमीनीतच शेततळे केले पाहीजे असे नाही. पडीक जमीनीचा वापर शेततळ्यासाठी करा. नेहमी सरकारकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा, श्रमदानाने काही प्रश्न सुटू शकतात.त्या कवितेत मी फक्त जसे आहे तसे वास्तव मांडले आहे. कविता म्हणजे ग्रंथ नसतो की प्रस्तावनेपासून समारोपापर्यंतचा सर्वच वृत्तांत यायला पाहिजे.
आंतरजालावर ९०% शहरी लोक असतात. त्यांना विनाकारण दोषी धरल्यावर ते तापणारच.मिसळपाववरिल १५-२० आयडींची झुंड म्हणजे संपूर्ण आंतरजाल नव्हे. हे झुंड सोडली तर कोणीच तापत नाहीत. त्यांना कविता कळते, लेख कळतो. त्यातले मर्म कळते. मी एकाच वेळी माझे लेखन ४ संकेतस्थळावर, २ ब्लॉगवर, २५ फेसबूकगृपवर, ३५० व्हाटसप गृपवर प्रकाशित करत असतो. लेखन प्रकाशित केल्यावर किमान १०,००० लोक ते वाचतात. ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हे, हे तुम्हीच समजून घ्या.
ही १५-२० आयडींची झुंड म्हणजे भूतलावरचे सर्वश्रेष्ठ विद्वान नव्हेकडक. तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटते, कळत नाही म्हणजे त्यांना अक्कल नाही असे नाही. आयटीतल्या प्रॉडक्ट सायकलवर एखादा इथे लिहित असेल तर जसे तुम्हाला-मला कळणार नाही तसे त्यांना कळत नाही. शेतीमधे भरमसाठ विषय आहेत व ते सर्व एकमेकांशी विचित्र पद्धतीने गुंतलेले आहेत हे प्रत्यक्ष फिल्डवर काम करायला लागल्यावर कळत आहे. ह्यातले ढोबळमानाने, सुटसुटीत पद्धतीने बातम्यांमधून येणारे विषय सर्वसामान्य पब्लिकला -जी स्वतः शेतकरी नाही- माहित होतात. प्रत्यक्ष अनुभव नसल्याने काही बाबतीतले आवश्यक तपशील तर्कशुद्ध विचार करतांना कमी पडतात व त्यातून गैरसमज होतात. शेतीविषयी इथे लिहितांना मला ह्या मर्यादा जाणवत आहेत. प्रत्येक ठिकाणची शेतीची पद्धत, मानसिकता, भौगोलिक परिस्थिती थोडीफार, कमीजास्त प्रमाणात बदलत असते. अगदी पाच-दहा किमीवरही दोन शेतातल्या एकाच पिकामधे फरक दिसून येतो, हवामान वेगळे असते. त्यामुळे एखाद्या भागातला शेतकरी दुसर्या भागातल्या शेतकर्याचे प्रश्न समजून घेऊ शकेलच ह्याबद्दल मला शंका वाटते. दुसरे असे की तुम्ही कायम चळ्वळीत, संबंधित लोकांमधे राहत असल्याने, चर्चा करत असल्याने तुमचे सर्कल इथल्या वाचकांच्या सर्कलपेक्षा भन्नाट वेगळे आहे. तुम्ही आयुष्य ह्याच विषयाला वाहून घेतले असल्याने तुम्ही सतत कॄषीविषयक अनेक तपशीलांना मनात ठेवून पंधरावीस ओळीची कविता सादर करता. त्यामागचे संदर्भ इथल्या वाचकांना कळत नसल्याने गैरसमज होऊन तुम्ही फक्त वल्गना करता, बाकी काही नाही असे इथे वाटते. काहींच्या प्रश्नांना उत्तर मिळाली नाहीत अशीही तक्रार आहे. माझे अशांना आवाहन आहे की किमान तीन दिवस सुटी काढून मुटेसरांबरोबर घालवावा, ते काय काम करतात, कोणत्या लोकांमधे असतात, काय घड्तं हे सगळं फर्स्ट ह्याण्ड कळेल. मुटेसाहेब काही नाही म्हणणार नाहीत. काही लोकांना अंगवळणी पडलेले डिटेल्स देणे जीवावर येते, कदाचित त्यामुळेच मुटेसरांना अशा प्रश्नांची उत्तरे देणे फोलपणाचे वाटत असावे हे प्रश्नकर्त्यांनीही समजून घ्यावे आणि वादावर पडदा घालावा असे माझे मत आहे.
तुमच्या म्हटल्यानुसार मी तुमचे काही लेख वाचलेत, सर्वच नाही. तुमची भाषा, अभिनिवेश, मुद्दे इथल्या काही लोकांना कळत नाहीत असे वाटतेअत्यंत चुकीचे मत हे तुमचे. मिसळपाववर काय १५-२० च सदस्य आहेत का? त्यापेक्षा जास्त असेल तर उरलेल्यांना कसे काय समजते? मी वारंवार सांगतो आहे की जो प्रॉब्लेम आहे तो फक्त १५-२० जनांच्या झुंडीचा आहे. संपूर्ण मिसळपावकरांचा नाही. कविता कळत नाही तर वेडेवाकडे प्रतिसाद देण्याची ह्या झुंडीला गरजच काय? ज्याला कळेल तो चांगली म्हणेल किंवा वाईट म्हणेल. कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.
किमान १०,००० लोक ते वाचतातसर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?
हे कशासाठी एवढा तमाशा करतात हे ही जाणतो.हेही जाहीर करुन टाका
सर्व १०००० लोकांना कवितेतले विचार पटतातच असे नाही. काही उघडपणे बोलतात काही गप्प बसतात. ज्या आयडी उघडपणे प्रश्न विचारतात ते सर्व झूंडशाहीत आले का?मी १०,००० पैकी १५-२० म्हटल्यावर सर्वच झूंडशाहीत कसे काय येतील बुवा? तुम्हीच मला बेरीज्,वजाबाकी,गुणाकार, भागाकार करुन उत्तर सांगावे? मला प्रश्न विचारणारे हे काय १५-२० च आहेत? अन्य कुणीच नाही? का असा ध चा मा करता आहात? माझ्या फेसबूकला भेट द्या, व्हाटसप गृपवर या तिथे तुम्हाला प्रश्न विचारांची आकडेवारी कळेल. मिसळपावरील माझे मागील काही धागे उघडा. तिथे राडा घालणारे आणि कशापायी कोण करत होते हे ही शोधा. म्हणजे झुंडीतली नावे तुम्हालाच कळून चुकतील. एवढा तमाशा का केला जात आहे, त्याची अनेक कारणे आहेत. पैकी सर्वच मी सांगणार नाही पण किरकोळ कारण असेही आहे की यांना मी मिसळपाववर नको आहे. कृपया या धाग्यावर मला अधिक प्रश्न विचारू नये. या धाग्यावर शेवट पर्यंत कोणत्या लहेजात व कोणत्या शब्दात मला बोलायचे आहे, हे मी ठरवून टाकले आहे. चांगल्या चर्चेसाठी हा धागा उपयुक्त राहिलेला नाही. दुसर्या धाग्यावर नंतर कधी बोलुयात.
कोणत्या कंपनीचे पत्ते आहेत? मेड इन इंडिया असेल तर एका पत्त्यात साधारणत: ४ हजामती होतात.
तुमच्या जवळ असलेल्या पत्त्यांच्या संख्येला ४ ने गुना व तितक्या लोकांच्या हजामती करा,
प्रश्न विचारले म्हणून उत्तर दिले बुवा.
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;
वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
मुटे सर फार लागलं नाही ना??
नै म्हणजे सामूहिक हल्ला झालाय तुमच्यावर!!म्हणून म्हणलं आपलं!!
संपादित
कृपया व्यक्तिगत टीकाटिप्पणी टाळावी.
सगळ्यआ व्रूदांपनो मजा करा. २०१९ पर्यंत. .हॅ हॅहॅ हम्म्म्मन
मला नाही वाटकी २०१९ मध्ये ग्रहपालट होणार आहे.
तसाही मला काही फरक पडत नाही. २०१४ आधी राहू होता, आता केतू आहे कदाचित २०१९ मध्ये शनी येईल.
शेतकर्यांचा ग्रहपालट होण्याची काहीच चिन्हे नसल्याने मला सर्वांशीच दोन हात करत राहावे लागणार आहे.
,,,,,,,, ब्रेक के बाद ,,,,,,,,
मोदक साहेब, मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत. त्यात काय चुकलं? ज्याला संक्षिप्त कळत नाही त्याला सविस्तर तरी कसे कळणार? काव्य समजायला काव्यबुद्धी पाहिजे आणि गद्य समजायला व उलगडायलाही विवेक, तारतम्याची गरज भासते.
तुम्ही खालील दिलेली कविता उलगडून व अर्थ लिहून दाखवा. तुम्ही पास झालात आणि मी काय म्हणतो हे तुम्हाला कळते याची मला किंचितशी जरी खात्री झाली तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन.
===========================================
दोन मूठ राख
अस्तित्वहीनाने एकदा
अस्तित्वाला आव्हान दिलं...
म्हणालं
"तुला लोळवायला दोन घटका
पुरेशा ठरतील.... माझ्यासाठी"
अस्तित्व हसलं......
म्हणालं
"जिंकणे किंवा हरणे... दोनपैकी एक
काहीतरी नक्कीच करू शकेन मी....
पण तुझं काय?
तुला ना नांव, ना गांव... ना हात ना पाय
ना बाप .......................... ना माय
माझ्याशी दोन हात करण्यापूर्वी
माझ्याशी बरोबरी कर
अंधुकसं का होईना...
पण स्वतःचं अस्तित्व तयार कर...
आणि
अभयपणे हे सुद्धा लक्षात घे की
मी संपलो तरी, मी नाहीच सरणार
माझी दोन मूठ राख तरी
नक्कीच उरणार....!"
पण
बिनमायबापाच्या लेकरा तुझं काय?????
- गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)
===========================================
१) मी तुमच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाही, हे खरे नाही. फ़रक इतकाच की संक्षिप्त दिली आहेत
२) ...तर तुमच्या प्रश्नांची मला जशी येते तशी उत्तरे द्यायचा मी प्रयत्न करीन
मुटे, तुम्ही नक्की काय तो एक स्टँड ठरवा. उत्तरे दिली आहेत की नाही. उत्तरे दिली असतील तर त्याच्या लिंका द्या. संक्षिप्त किंवा कसेही.
प्रश्न आणखी एकदा -
सगळ्याच सरकारांनी शेतकर्यांचा कसा काय घात केला..?
..आणि इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)इथून पुढे वैयक्तीक टिका केलीत तर जशास तसे उत्तर मिळेल. (धमकी समजणार असलात तर जरूर समजा.)मी वैयक्तीक टिका कुणावरच करत नाही. कुणी माझ्यावर केली तर उत्तरादाखल केली तर मी काय उत्तर देईन, हे मलाही माहीत नसते. त्यामूळे इथे धमकी वगैरे कुचकामी ठरते. खालील ओळी मोदकराव तुम्हाला उद्देशून नाहीत. त्यापेक्शा १) यापुढे मिसळपाववर आलात तर याद राखा. २) यापुढे कविता लिहाल तर याद राखा. ३) यापुढे सरकारवर टीका केली तर याद राखा. वगैरे अशा कुणी धमक्या दिल्या तर ते राष्ट्रहिताचे तरी होईल.
कुणी माझ्यावर केली तर उत्तरादाखल मी काय उत्तर देईन
असे वाचावे.
उत्तरांच्या लिंका?
लिंक देतो असे मी म्हटलेले नाही.
पत्ता द्या म्हटले पुस्तक पाठवण्यासाठी.
आणखीही २४ पुस्तके आहेत. सर्व पुस्तकांची किंमत ४००० रु. चे वर जाईल.
पण जे पाठवायचे आहे ते पुस्तक पोस्टेजखर्चासह २५०/- च्या आसपास जाते. तरीही मी तुम्हाला
पैसे द्या म्हटले नाही फक्त पत्ता द्या म्हटले.
ठीक. इतके सोपे होते तर या पूर्वी पुस्तकाची माहिती द्यायची हो. पुढचे रामायण टाळता आले असते.
मी पुस्तक विकत घेवून वाचतो आणि काही शंका असतील तर नक्की विचारेन.
बहुतेक त्यांनी चारशे का सहाशे पाने असा उल्लेख केला होता असे आठवते. ते तुम्हाला पाठवतो म्हणाले. त्यातूनच ते मग तुमचा पत्ता मागायला लागले...
च्यायला धागा आहे की हडप्पामोहंजोदारोचे उत्खनन... ;)
डांगे अण्णा.. त्यांनी पहिल्यांदा विधान नाकारले, नंतर म्हणाले ४०० / ५०० पानी उत्तर होईल ते पाठवायला हवे. याचा अर्थ हे पुस्तक असेल असे मला वाटले नाही आणि जरी असले तरी त्याच वेळी सांगायचे "असे असे पुस्तक आहे, वाचा." संपला विषय.
आता पुस्तक सुचवले आहेच तर मी चर्चेला पूर्णविराम देवून पुस्तक मिळवतो आणि शंका विचारतो. बघू..
ह्या सर्व गोंधळातून काहीतरी सकारात्मक निष्पन्न होवो, इतकीच इच्छा. त्यांनी तुम्हाला पुस्तके पाठवावी, तुम्ही ती वाचून आपला अभिप्राय द्यावा, म्हणजे सगळं कसं गोड होईल...
:)
हे पुस्तक विकत घेवून वाचतो. नंतर पुढची पुस्तके घेईन.
मुटे काकांनी पुस्तके पाठवण्याची आवश्यकता नाही. :)
:) जैसा आप ठिक समझे..!
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;
अन्नदाता या युगाचा जाहला उद्ध्वस्त आहे
फक्त कारण एवढे की अन्नधान्ये स्वस्त आहे
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
तुम्ही खालील दिलेली कविता उलगडून व अर्थ लिहून दाखवा. तुम्ही पास झालातअशा अटी टाकण्यासाठी तुम्हाला अधिकार कुणी दिला? तुम्ही कविता लिहिली आणि तिचा अर्थ दुसऱ्याला तुम्हाला हवा तसा आला नाही तर तुम्ही उत्तरे द्यायचा प्रयत्न करणार. आपण स्वतःला बृहस्पती समजता काय?
मग मी पण म्हणेन मी पाठवलेल्या रोमलिन सोमलिन कवितेचा अर्थ तुम्ही सांगा. जर तुम्ही पास झालात आणि मी काय म्हणतो हे तुम्हाला कळते याची मला किंचितशी जरी खात्री झाली तर मी म्हणेन कि तुम्हाला कवितेतील थोडेसे कळायला लागले.(तुमच्याच शब्दात)
सार्वजनिक स्थळावर "आपणच सर्वज्ञ आहोत" हा दावा आपण स्वतःला काय समजता याचा दर्शक आहे.
अर्थ दुसऱ्याला तुम्हाला हवा तसा लावता आला असे हवे
मा. संकेतस्थळमालक व संपादक मंडळ
मी काय रचनात्मक कार्य केले? हा प्रश्न काही आयड्यांची एक झुंड मला वारंवार विचारत आहे.
आपण केलेले रचनात्मक कार्य किंवा ज्याने आपली स्तुती होईल असे कथन स्वत:च्या श्रीमुखाने करण्याची भारतीय संस्कृती नाही असे मला वाटते. आत्मस्तुती तर निषिद्ध मानली गेली आहे. हे या झुंडखोर आयड्यांना कसे समजाऊन सांगू, हे मला कळत नाही आहे.
फ़ारफ़ार तर मी माझा संक्षिप्त परिचय देऊ शकतो. माझे काय कर्तुत्व असेल नसेल तर त्यांनी परिश्रम करून शोधावे. माझ्या कार्याविषयी माहिती घ्यायची असेल तर ही त्यांची गरज आहे. आत्मस्तुती करणे ही माझी अजिबात गरज नाही. मी करणार नाही.
संक्षिप्त परिचय
नाव : गंगाधर महादेवराव मुटे जन्म : २७ फ़ेब्रुवारी १९६२ शिक्षण : बी. एससी (गणित) व्यवसाय : मुक्त पत्रकार, शेती, शेतीविषयक संशोधन, बिजोत्पादन आणि विपणन, कापसाच्या अनेक संकरित वाणांची निर्मिती
प्रकाशित साहित्य :
१) “रानमेवा” (काव्यसंग्रह) नोव्हेंबर २०१० २) ” वांगे अमर रहे” (ललित लेख संग्रह) जुलै २०१२ ३) “नागपुरी तडका” E-book (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१३ ४) “माझी गझल निराळी” (गझलसंग्रह) नोव्हेंबर २०१३
५) “नागपुरी तडका” (काव्यसंग्रह) फ़ेब्रुवारी २०१६
**** ६) लोकमत, तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, देशोन्नती व अन्य विविधवृत्तपत्रातून सातत्याने लेखन. विविध नामांकित दिवाळी अंकातून अनेक कविता प्रकाशीत. ७) पुणे, नाशिक व औरंगाबाद येथून प्रकाशित होणार्या शेतकरी संघटनेचे मुखपत्र असलेल्या पक्षिक “शेतकरी संघटक” मध्ये “वाङ्मयशेती” हे नियमित सदर लेखन.
ई-लेखन : 1] www.sharadjoshi.in 2] www.baliraja.com 3] www.gangadharmute.com 4] gangadharmute.wordpress.com 5] gangadharmute.blogspot.com या संकेतस्थळांची निर्मिती आणि त्यावर सातत्यपूर्ण लेखन.
फ़ेसबूक : www.facebook.com/gangadharmute फ़ेसबूक पेज : www.facebook.com/my.net.farming ( माझी वाङ्मयशेती)
पुरस्कार : १) स्टार माझा/ए.बी.पी माझा या लोकप्रिय मराठी TV वृत्तवाहिनीतर्फ़े आयोजित “ब्लॉग माझा” या जागतिक पातळीवरील स्पर्धेत २०१० आणि २०१२ मध्ये gangadharmute.wordpress.com या ब्लॉगला सलग दोनदा पुरस्कार २) मेहता पब्लिशिंग हाऊस आणि मी मराठी डॉट नेट संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरजालीय स्पर्धेत “वांगे अमर रहे” या ललितलेखाला पारितोषिक ३) मी मराठी डॉट नेट, व्दारा आयोजित आंतरराष्ट्रीय पातळीवरील कविता स्पर्धा - २०११ या स्पर्धेत “कुठेलुप्त झाले फ़ुले भिम बापू” या कवितेस प्रथम पुरस्कार ४) २०१३ मध्ये दर्यापूर येथे भरलेल्या ५२ व्या अ.भा. अंकूर मराठी साहित्य संमेलनात साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल “अंकूर वैभव” पुरस्कार व सन्मानचिन्ह देऊन गौरव.
५) ’माझी गझल निराळी’ या गझलसंग्रहाला अंकूर वाङ्मय पुरस्कार - सन २०१३ चा अ.भा. अंकूर साहित्य संघाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार.
सामाजिक कार्य : १९८२ पासून शेतकरी चळवळीत सक्रीय सहभाग. अनेकदा तुरूंगवास.
१) १० जुलै २०१४ पासून स्वतंत्र भारत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महासचीव पदावर कार्यरत २) जुलै २०१० पासून शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत ३) नोव्हेंबर २०१४ पासून अ.भा.शेतकरी मराठी साहित्य चळवळीच्या संस्थापक अध्यक्षपदी कार्यरत.
४) २८ फ़ेब्रुवारी व १ मार्च रोजी वर्धा येथे आयोजित पहिल्या व २०,२१ फ़ेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार.
संपादकीय कार्य :
१) १२ व्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशानिमित्ताने प्रकाशीत करण्यात आलेल्या “पुन्हा एकदा उत्तम शेती” या स्मरणिकेसाठी कार्यकारी संपादक म्हणून कार्यभाग. २) वर्धा येथे आयोजित पहिल्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "सारस्वताचा एल्गार" स्मरणिकेचे संपादन.
३) नागपूर येथे आयोजित दुसर्या अ.भा.शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त प्रकाशित "शेतकर्यांचा स्वातंत्र्यसूर्य" युगात्मा शरद जोशी गौरवविशेषांकाचे आणि "कणसातली माणसं" या प्रातिनिधीक शेतकरी काव्यसंग्रहाचे संपादन. * * * : My Web :
www.baliraja.com www.sharadjoshi.in www.gangadharmute.com www.shetkari.in
: My Blogs :
gangadharmute.wordpress.com
gangadharmute.blogspot.com
Facebook - www.facebook.com/gangadharmute Facebook - www.facebook.com/groups/baliraja You Tube - www.youtube.com/gangadharmute
Facebook Page - https://www.facebook.com/sharadjoshi.in - शेतकरी संघटना - फ़ेसबूक पेज Facebook Page - https://www.facebook.com/my.net.farming - माझी वाङ्मयशेती - फ़ेसबूक पेज
हे वरचं सगळं ठीक आहे पण काम काय करता ? (कृ. ह. घे.)
माझे पोट शेतीवर आहे. मी शेतीच करतो.
मात्र पोट सोडून बाकी सर्व गरजा पूर्ण करायला माझा अन्य व्यवसाय आहे.
खेड्यातच राहतो आणि वर्षातील २७५ दिवस शेतीत घालवतो.
>>>>>मी एकाच वेळी माझे लेखन ४ संकेतस्थळावर, २ ब्लॉगवर, २५ फेसबूकगृपवर, ३५० व्हाटसप गृपवर प्रकाशित करत असतो. लेखन प्रकाशित केल्यावर किमान १०,००० लोक ते वाचतात.
सर, आज हमें यकीन हो गया, गंगाधर ही शक्तिमान है!
स्वारी शक्तिमान.
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर;
तो म्हणाला काव्य कसले? 'अभय' गझला फालतू या
(लेखणीच्या पाभरीने जीवजंतू त्रस्त आहे)
(मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
तो म्हणाला काव्य कसले?
'अभय' गझला फालतू या
आहे बरीक ठाऊक स्वतःला
दर्पणा का न पाहु या?
-आत्ताचप्रकाशित
कसा जोम यावा खुरटल्या पिकांना, नवे बीज ते अंकुरावे कसे?
तणांचाच जेथे असे बोलबाला, तिथे अन्य काही रुजावे कसे?
आहात अस्सल मातीतले, आहे जाण शेतीची
कशाला करता अपेक्षा आन्तरजालाच्या प्रितीची
मातीत राबताना इतके कळून आले
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
फुकटात ठोस जखमा! प्रत्येक घाव सस्ता!!
आहे ना माहिती? मग कशाला उगाच रुसता???
शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही
आता याचा अर्थ सुद्धा सांगा.
आम्ही टैम्पलिस.
बडोदा खादाडी साठीच जास्त फेमस आहे.