भूतकथा - कर्णपिशाच्च !

मंदार कात्रे's picture
मंदार कात्रे in जनातलं, मनातलं
14 Jul 2016 - 10:37 pm

कर्ण पिशाच्च

बांदिवडे गावात रामाचे जुने मंदिर होते. मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर होत्या . गावातील बाबू मेस्त्री हा सुतारकाम करायचा . त्याची रामावर फार भक्ति होती. पण त्याला मटक्याचा देखील नाद होता . रोज सकाळी रामाचे दर्शन घेवून बाबू कामावर जायला निघे आणि मग रस्त्यात समोर येणार्याो मुलांना थांबवून खाऊ /चॉकलेट द्यायचा अन विचारायचा की तुमचा आवडता अंक सांगा ... मग मुले जो अंक सांगतील तो आकडा तो लांज्याला मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन लावायचा ... जर आकडा लागला ,तर स्वारी खुशीत असायची .... मग रात्री राम मंदिरात भजन काय अन गाव जेवण काय ? सगळी धूमधमाल असायची ....

तर एक दिवस बाबू मंदिरातून दर्शन घेवून बाहेर पडला आणि त्याला कानात कोणीतरी बोलल्यासारख वाटलं ... त्याने आजूबाजूला पाहिलं ,कोणीच नव्हते ... म्हणून तो भास झाला असेल म्हणून दुर्लक्ष करून निघाला तेव्हा पुन्हा जोरात कानात आवाज आला की “आज सात नंबर लाव” ... मग मात्र बाबू ला वाटले की साक्षात रामप्रभूचा आदेश आहे, तर लावूया आज सात आकडा ... मग बाबूने अड्ड्यावर जाऊन सात आकडा लावला , आश्चर्य म्हणजे त्या दिवशी नेमका सात नंबर लागला आणि बाबू ला चक्क दहा हजार रुपये मिळाले !

बाबू मेस्त्री जाम खुश होता .... त्याच रात्री बाबूने गावातील भजन बोलावले ... आणि राम मंदिरात रात्रभर भजनाचे स्वर घुमत राहिले .... त्याच रात्री पुन्हा बाबू ला कानात आवाज आला ,”उद्या एक्का हाय बरका “...... बाबू एकदम खुश ..... दुसर्याब दिवशी लांज्याला जावून पुन्हा एक नंबर लावला ............. दुपारी एक नंबरच आला आणि पुन्हा बाबूला पाच हजार रुपये मिळाले .....

मग रोज बाबूला स्वप्नात किंवा कानात आकडे दिसू लागले.... नेमके तेच आकडे मटक्यात फुटत होते आणि बाबू ला रोज हजारात मिळकत होत होती.... मटक्या वाला रंगा सुद्धा आश्चर्यचकित झाला होता ... साल्या ह्या बाबूला रोज नंबर कसा लागतोय ? पण कुणालाच कोडे उलगडत नव्हते .... बाबूला विचारले तर तो “प्रभू रामाची कृपा “ म्हणून मोकळा होई....

बघता बघता बाबू लाखोपती झाला .... मग त्याला कानातल्या आवाजाने दारूचा गुत्ता चालू करायचा आदेश दिला ... मग त्याने गावात मोक्याच्या ठिकाणी एक बार चालू केला . आता बाबू चा बाबूशेठ झाला होता ... बार चांगलाच चालत होता कारण आसपास 10 गावात दारूचे दुकानाच नव्हते .

पण तेवढ्यात एक घटना घडली.... एक उनाड बैल रामाच्या मंदिरात घुसला आणि त्याने मंदिरातील मूर्ती ची नासधूस केली .... लगेच रात्री गावाने बैठक घेतली ... आणि मंदिरात नवीन मूर्ती बसवण्याचा विधी करण्याचा निर्णय झाला . बाबूने नवीन मंदिराला 5 लाख रुपये देणगी देण्याचे जाहीर केले . सगळ्या गावाने वाहवा केली ...

त्याच रात्री बाबू ला एक विचित्र स्वप्न पडले . स्वप्नात एक माकड आले आणि म्हणाले , अरे मी रामभक्त हनुमानाच्या आदेशाने आलोय . तुला कानात जो आकड्याचा नंबर ऐकू येत होता ना, तो काही रामप्रभूचा आदेश नव्हता . भगवान रामप्रभू कधीच असे मटका लॉटरी खेळांनार्यांजवर कृपा नाही करत , तुला जो आवाज येतो ते एक भूत आहे... करणपिशाच्च आहे ... आता तर तू लोकांना दारू प्यायला बार पण चालू केलास ...चांगले नव्हे हे ....लक्षात ठेव याचे परिणाम चांगले होणार नाहीत ............

बाबू एकदम जागा झाला , अंग घामाने ओलेचिंब झाले होते ....... त्या रात्री काही त्याला झोप लागली नाही .... म्हणून तसाच बार मध्ये जावून एक बाटली घेवून बसला ..... बघता बघता बाटली संपवली आणि तिथेच आडवा झाला ....

त्या प्रसंगानंतर बाबूचे चित्त थार्या.वर नव्हते...त्या दिवसापासून तो कानात येणार्याल आवाजाकडे दुर्लक्ष करू लागला ... पण कानठळे आवाज वाढतच गेले .... त्यामुळे त्याचे कशातच लक्ष लागेना .... मग त्याला दारू प्याविशी वाटू लागली .......सारखा दारू दारू अन दारू ... 24 तास नशेत असायचा ... वर्षभरात लिव्हर डॅमेज झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये अॅडमिट करावे लागले . डॉक्टर नी टेस्ट केल्यावर सांगितले की दारुमुळे हार्ट ला पण धोका आहे... बाबूची बायको ज्याम घाबरली . अनेक ज्योतीशांकडे जाऊन तिने बाबूची पत्रिका पाहिली ,पण उपाय सापडेना . मग शेवटी धामापूर गावचा प्रसिद्ध मांत्रिक धावजी बाबा याच्याकडे गेली आणि आपली सगळी रामकहाणी ऐकवली . धावजीबाबाने मग ध्यान लावून पाहिले आणि सांगितले की ,बाबुरावच्या पाठी जे भूत होते ते साधे सुधे नाही, एक कर्णपिशाच्छ आहे . त्याने तुम्हाला मदत केली त्यापाठी त्याचा काहीतरी स्वार्थ असणार ... आपल्याला मोठा कालिका देवीचा होम करून बलिदान करावे लागेल . भरपूर खर्च येईल .....बाबूची बायको म्हणाली कितीही खर्च येवूदे ,मी करीन .पण ही भानगड मिटवा ....

मग पन्नास हजार खर्च करून धावजी बाबाने होम केला . रेड्याचा बळी कालिका मातेला दिला . होम पूर्ण होताना धावजीसमोर कर्णपिशाछ उभे राहिले .... बोल तुला काय पाहिजे? का धरले बाबूशेठ ला? त्यावर ते भूत बोलले की माझे श्राद्ध करा . मी या गावात 100 वर्षापूर्वी होतो ....माझे नाव वामन ..... मला दारू प्यायचा शौक होता , पण बायको दारू पीवू देईना म्हणून मी आत्महत्या केली ..... मग भूत झालो आणि रामाच्या देवळाजवळ च्या पिंपळावर राहू लागलो ... हा बाबू माझ्या चुलत्याचा नातू .... त्याला मदत करावी म्हणून मी त्याला मटक्याचे नंबर सांगितले ... पण नंतर हा मला विसरला ... आणि म्हणून मी त्याच्या शरीराचा ताबा घेवून दारू प्यायला लागलो .......... मला मोक्ष हवा आहे ... नाशिक ला जावून माझे श्राद्ध करा म्हणजे मी मुक्त होईन...........

मग बाबूला घेवून बायको नाशिक ला गेली व तिथे विधिनुसार श्राद्ध घातले .... वामन ला मोक्ष मिळाला .... बाबू च्या प्रकृतीत फरक पडला आणि दारूची सवय सुटली ..... ! गावात नवीन राम मंदिर उभे राहिले आणि बाबूशेठ रोज संध्याकाळी मंदिरात भजन आरती ला जाऊ लागला .....आणि पुढे रामभक्त बनला !

(*"भुताटकी" या सुप्रसिद्ध फेसबुक पेज वर पूर्वप्रकाशित !)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

हीः हीः हीः. कर्णपिशाच्च बेवडं निघालं. भारी कथा.

viraj thale's picture

14 Jul 2016 - 11:46 pm | viraj thale

मस्त

खटपट्या's picture

15 Jul 2016 - 1:07 am | खटपट्या

चांगलीय

धनंजय माने's picture

15 Jul 2016 - 1:42 am | धनंजय माने

हे झालंय. किती वेळा तेच झाड़???
-पार्वती ढ माने

कात्रे साहेबांच्या विनोदी कथा ज्याम आवडतात

सामान्य वाचक's picture

21 Jul 2016 - 2:34 pm | सामान्य वाचक

पूर्ण करा बर आधी

आकडे कोकणाच्या मानाने अवास्तव वाटले पण शेवटच्या खुलाशाने जीव पारंबीवरून खालती भांड्यात पडला.

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 10:49 am | कैलासवासी सोन्याबापु

वेळकाळ न पाहता कानात बोलणाऱ्या भुताला कर्णपिशाच म्हणतात होय! आज क्लिअर झाले! आजवर असे कानात बोलणाऱ्या भुताला आम्ही बायको म्हणायचो अन समजायचो!! =))

संजय पाटिल's picture

15 Jul 2016 - 11:24 am | संजय पाटिल

=))

टवाळ कार्टा's picture

15 Jul 2016 - 11:55 am | टवाळ कार्टा

मिपावर बायकांच्या विरोधात लिहिणारे आयडी हेवनवासी होतात...

चिनार's picture

15 Jul 2016 - 12:58 pm | चिनार

बापूंचा हा प्रतिसाद सौ. सोन्याबापू ह्यांच्यापर्यंत पोहोचला तर बापूंना मिपावरून वेगळं हेवनवासी करण्याची गरजच पडणार नाही !!

बापू...कृ.ह.घ्या

मग कानात फक्त एकच वाक्य घुमत राहील "तरी मी सांगत होते"
.
.
(बापू, टेकलाईट)

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 3:50 pm | कैलासवासी सोन्याबापु

लगा घाम फुटला गारठ्यात!

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 3:49 pm | कैलासवासी सोन्याबापु

असल्या शक्यता वर्तवणारे तुमच्यासारखे हलकट मित्र आहेत हे आमच्या मागील जन्मातील पापाचे कर्मफळ बरंका चिनार भाऊ !! =)) =))

आमचा हलकटपणा जाऊ द्या हो बापू, तो दिवसेंदिवस वाढतच जाणार :-)...पण शक्यता चुकीची वर्तवली असल्यास जोड्यानं हाना..:-)

कैलासवासी सोन्याबापु's picture

15 Jul 2016 - 3:52 pm | कैलासवासी सोन्याबापु

इतरांच्या बायकांबद्दल नाही हो लिहलं , माझ्या लग्नाच्या बाईली बद्दल बोलतोय (दोघांच्या घरच्यांनी अर्धा अर्धा खर्च वाटून लग्न लावले होते)

तरीही हेवनवासी होण्याची शक्यता असतेच!

ट्रेड मार्क's picture

16 Jul 2016 - 2:27 am | ट्रेड मार्क

मिपावर बायकांच्या विरोधात लिहिणारे आयडी हे वनवासी होतात.

असे पाहिजे का?

राजाभाउ's picture

15 Jul 2016 - 12:00 pm | राजाभाउ

हा हा हा :))

John McClain's picture

15 Jul 2016 - 3:42 pm | John McClain

हा हा हा :D

फरक आहे बापू, आपला कथानायक त्या पिशाच्चाचं सगळं ऐकत होता :प

कैलासवासी सोन्याबापु's picture

16 Jul 2016 - 1:51 am | कैलासवासी सोन्याबापु

आम्ही मटके खेळत नाही स्रुजा ताई पण आम्हीही कथानायकच आहोत (मनःपूर्वक का मारूनमुटकून ह्या बाबतीत मात्र आमची झाकली मूठ सवा लाख बरंका)

स्रुजा's picture

16 Jul 2016 - 2:33 am | स्रुजा

हाहा, गुड सेव्ह हां बापू. (स्वगतः मनःपूर्वक असतं तर कशाला बापूंनी (रिडः नवरे लोकांनी) गुलदस्त्यात ठेवलं असतं ? :प सांगायची गरज नाही पण ह.घ्या ;)

नाखु's picture

15 Jul 2016 - 11:47 am | नाखु

कात्रीशीर कथा

समाधान राऊत's picture

16 Jul 2016 - 1:55 pm | समाधान राऊत

राहु
द्या

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 12:12 pm | महासंग्राम

तुमच्या दैनिकात स्थान कथेला...

महासंग्राम's picture

21 Jul 2016 - 12:13 pm | महासंग्राम

तुमच्या दैनिकात स्थान द्या या कथेला.

मुक्त विहारि's picture

15 Jul 2016 - 1:05 pm | मुक्त विहारि

बादवे.

नहमी कर्ण पिशाच्च का असते? कर्ण हडळ का नाही?

किंवा,

ब्रह्म संमंध असतो, तशी ब्रह्म कुमारिका का नाही?

जाणकारांनी प्रकाश टाकावा.

पिशाच्च असले तर कर्णाचेच. हडळ ती कोणतरी मिसेस कर्ण असेल तिची.
बाकी ब्रम्हाकुमारी कुठेतरी वाचल्यासारखे वाटतेय.

मुक्त विहारि's picture

15 Jul 2016 - 5:31 pm | मुक्त विहारि

वेगळ्या.

आणि हे ब्रह्मसंमंध वेगळे.

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jul 2016 - 7:36 pm | अत्रुप्त आत्मा

हिही ह्ही ह्ही!