चो..पली ३

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
1 Jul 2016 - 3:29 pm

चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत
"ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली"
हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती?
"पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के"
अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे.
" हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर"
..................
तो आत आला.
बाबा सुद्धा बरोबर होते.
१.५ एकर शेती करणारा बळी राजा.
दुष्काळी भागातला.
कर्ज बाजारी. आर्थिक अवकळा स्पष्ट दिसत होती.
मुख्य शहरापासुन ६० किलोमिटर पत्र्याच्या शाळेतला.
मराठी माध्यम,दहावी ९०%
गणित ९९ सायन्स ९८
मिटींग ला बसलेल्या सर्वांना उत्सुकता होती.
मी सरुवात केली, उभा राहीलो कडक सॅल्युट ठोकला,
"सांग बाबा हे तु कसे काय केलेस"?
काहीही नाही सर खुप अभ्यास केला आणि घराची परिस्थिती बदलायचीच होती काही ही इलाज नव्हता.
त्याने बॅगेतुन रिझल्ट काढला.
पहीला कागद-़जे. ई. ई मेन्स- इंडिया रँक २५०
दुसरा कागद- जे. ई. ई. अ‍ॅड्वान्स-इंडिया रँक ३५०
त्याने ३ रा कागद काढला, मेडीकल सी.ई.टी महाराष्ट्र रँक ३५० (नायर हॉस्पिटल नक्की)
ही माहीती होम विझिट मधे कागदावर आलेले नव्हती.
"बायॉलॉजी पण घेतले होतेस"?
हो सर, वोकेशनल ची फी परवडणार नव्हती आणि क्लास तर शक्यच नव्हते.
"How did he manage this" चीफ ट्रस्टी म्हणाले
त्याने ४ था कागद काढला एआयपीमटी इंडीया रँक ४५०
मी तर खुर्चीतन पडायचा बा़की होतो.
सर्व ट्रस्टी हतबुद्ध.
चीफ ट्रस्टी चे डोळे पाणावले.
No more questions, no questions on financials, whatever he wants is sanctioned.बाळा तुला काय मदत पाहीजे ते सांग.
पहील्या सेमिस्टर ला लागणारे ७० हजार सँक्शन झाले,
चीफ ट्रस्टींनी माझ्या सारखाच कडक सॅल्युट ठोकला.
........
सहा महीन्याने त्याचा मेल आला. तो सर्व १७ आयआयटी मधे ९२ आला होता. अ‍ॅल्युमनी फंड मधुन त्या चे सर्व शिक्षण मोफत होणार होते, त्याला फाउंडेशन वर अवलंबुन राहण्याची गरज नव्हती. इंग्लीश मधे बोलायला आजही चाचपडणारा मुलगा खरगपुर आय आय टी मधे सर्व प्रोफेसरांचा लाडका झाला होता.
........
मला सतावणारा एक प्रश्न मी त्याला १५ दिवसांनी विचारला
त्याने दिलेले उत्तर.
सर, धाकटी चे शिक्षण, बाबांचे कर्ज, घराची परिस्थिती बघता मला १० वर्षे थांबायला परवडणार नव्हते म्हणुन आवड असुन सुद्धा मेडीकल केले नाही.
कुणीही १०वी च्या मार्कांवर " पवई कॉम्प" म्हटले की मयुर आठवतो आणि कडा ओल्या होतात.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

1 Jul 2016 - 3:55 pm | अनुप ढेरे

सुंदर!

नाखु's picture

1 Jul 2016 - 4:10 pm | नाखु

अस्सल हिरे समजणार (आणि नेम्के शोधणार ही)
कडक सलाम दोघांनाही (गुरू आणि शिष्य)

अस्सल (काच) नाखु

राजाभाउ's picture

1 Jul 2016 - 4:49 pm | राजाभाउ

+१
१००% सहमत,

लोथार मथायस's picture

2 Jul 2016 - 8:28 am | लोथार मथायस

सहमत

टवाळ कार्टा's picture

1 Jul 2016 - 4:11 pm | टवाळ कार्टा

सॅल्युट

पैसा's picture

1 Jul 2016 - 4:41 pm | पैसा

ग्रेट!

अजया's picture

1 Jul 2016 - 4:52 pm | अजया

मुलाला वाचायला देत आहे!

क्या बात है! ह्या लेकराची ही खरी जिद्द आणि त़ळमळ परिस्थिती बदलायची. ही आयुष्यभर अशीच राहो ह्या शुभेच्छा. वाचताना अंगावर काटा आला, खरेच.

प्रभूमास्तर हाच प्रश्न गेल्या भागात ईचारणार होतो.
काहीच पैसा नाहीय पण अचाट बुद्धीमत्ता आहे अशांना पुढची शैक्षणिक स्वप्ने शक्य आहेत का सद्यकाळी,
उत्तर मिळाले.
आनंद झाला मनापासून

आदूबाळ's picture

1 Jul 2016 - 5:36 pm | आदूबाळ

जबरदस्त!

सुबोध खरे's picture

2 Jul 2016 - 10:04 am | सुबोध खरे

+१००

धनंजय माने's picture

1 Jul 2016 - 5:40 pm | धनंजय माने

खासच! मास्तरांनी चांगला अनुभव लिहिला आहे

सतिश गावडे's picture

1 Jul 2016 - 5:41 pm | सतिश गावडे

अशी मुलं अपवादात्मक असतात. जन्मतःच बुद्धीमतेचं वरदान मिळालेली.

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 7:37 pm | संदीप डांगे

+१. सर्वसामान्यपणे तीच रोलमॉडेल असतात, दुर्दैवाने. :(

विनायक प्रभू's picture

1 Jul 2016 - 5:45 pm | विनायक प्रभू

पुर्ण महाराष्ट्रात दर वर्षी असे सुमारे १०० मयुर असतात. पण मी एकटा ही माहिती पोचवणार कशी?

संदीप डांगे's picture

1 Jul 2016 - 7:38 pm | संदीप डांगे

+१०००. आपण सगळे मिळून पोचवू...

उल्का's picture

1 Jul 2016 - 7:55 pm | उल्का

तुमची लेखमाला वाचतेय.
मुलांची दहावी-बारावी ह्यातून हल्लीच गेल्यामुळे खूप जवळचा विषय आहे.
अनुभव असल्याने बरंच काही उपयुक्त इथे शेअर करावेसे वाटत होते.
इतक्यात तुम्ही व्यापक स्वरूपात ही मालिकाच सुरु केलीत हे खूप चांगले झाले.
पालकांना खरच गरज असते.
पुलेशु.

बोका-ए-आझम's picture

2 Jul 2016 - 1:03 am | बोका-ए-आझम

मयूरला शुभेच्छा! वडलांच्या कष्टांची जाणीव असलेला मुलगा योग्य ठिकाणी गेला याचा आनंद आहे.

मितभाषी's picture

2 Jul 2016 - 5:20 am | मितभाषी

चांगली लेखमाला सर.
माझ्या मित्राचा मुलगा (थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती) खरगपूरला आयआयटी करतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2016 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मयूरच्या अनुभव वाचतांना हळवा झालो.
मास्तर, असं स्वच्छ आणि स्पष्ट लिहित जा.

-दिलीप बिरुटे
(प्रभु मास्तर भक्त)

मोहन's picture

5 Jul 2016 - 4:41 pm | मोहन

सहमत

शेवटचा ट्विस्ट एकदम भारीच. __/\__

मुक्त विहारि's picture

2 Jul 2016 - 9:48 am | मुक्त विहारि

पुभाप्र.

नीलमोहर's picture

2 Jul 2016 - 9:54 am | नीलमोहर

भारी !!

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jul 2016 - 11:13 am | डॉ सुहास म्हात्रे

प्रेरणादायी ! व्यवसाय शिक्षण मार्गदर्शन वर्गांतून अश्या मुलांची माहिती दिली पाहिजे.

स्नेहल महेश's picture

2 Jul 2016 - 11:24 am | स्नेहल महेश

जबरदस्त!

तिमा's picture

2 Jul 2016 - 11:28 am | तिमा

मानलं मयूरच्या जिद्दीला. एक कडक सलाम.

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Jul 2016 - 4:32 pm | बिपिन कार्यकर्ते

मास्तर!

_/\_