नेताजी सुभाषचंद्र बोस-एक असामान्य व्यक्तिमत्व

चिन्या१९८५'s picture
चिन्या१९८५ in जनातलं, मनातलं
24 Jan 2009 - 7:12 am

"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही | हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे ,उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा."
नेताजी सुभाषचंद्र बोस

काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती . नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की 'भारताला स्वातंत्र्य कशामुळे/कुणामुळे मिळाले?' या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच अशी त्यांच्याबद्दलची माहीती मिळवल्यावर माझी खात्री झालेली आहे.पण या इतक्या महान देशभक्ताला आमच्या देशाने कृतघ्नपणे अशी वागणुक दिली की त्याला आपल्या आयुष्यातली शेवटची दशके स्वतःची ओळख लपवत काढावी लागली.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणिने खुप प्रभावित झाले होते.त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता.आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजींबरोबर होते.पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता.त्यांच्या मते 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही.स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'पण गांधीजींबद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता.गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली.गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशांविरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला.काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?'तर सुभाषबाबु म्हणाले की 'मी जर बोलावल तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावल तर २० कोटी लोक सहभागी होतील्.' गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती ते एकदा म्हणाले होते की गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही.गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते. फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या.त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला.त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात्.आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत.सिंगापुरमध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले की "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल.मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही.मी मातृभुमिसाठीच जगेल तिच्यासाठीच मरेल.मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत.ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत. "

नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती.त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता.त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता.त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे,निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते.जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता.

स्वा.सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलही येथे उल्लेख करावासा वाटतो.सध्या नेताजीम्चे अनेक समर्थक डावे असल्याने ते याच्याकडे दुर्लक्ष करतात.पण हा मुद्दा इतिहासाच्या पानांत महत्वाचा आहे.बोस्-सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना 'ब्रिटीश अधिकार्‍यांचे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात.त्यापेक्षा दुसर्‍या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे.माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले.यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले.त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्'या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयांमध्ये वाटल्या.

नेताजी सुटुन काबुल्,मॉस्को नंतर इटली व जर्मनीत गेले.मुसोलीनी आणि हिटलरची त्यांनी भेट घेतली.त्यांची ओळख गुप्त ठेवण्यात आली.Orlando Mazzota ह्या नावाने ते ओळखले जात होते. जर्मनीमध्ये जर्मन सरकारने त्यांना 'Free India Radio' आणि 'Free India Cente'' सुरु करण्यास मदत केली.Free India Center ने 'जय हिंद' हा नारा दिला तसेच 'जन गण मन' हे राष्ट्रगीत बनवले आणि हिंदुस्तानीला राष्ट्रीय भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला.सुभाषबाबुंना 'नेताजी' किंवा Führer ही उपाधी देण्यात आली.जर्मन सरकारच्या मदतीने 'आझाद हिंद सेने'ची स्थापना केली व लष्करी शिक्षण भारतीयांना दिले गेले. सुभाषबाबुंनी स्वतः असे लष्करी शिक्षण घेतले.मार्च १९४२ मध्ये जेंव्हा नेताजी हिटलरला भेटले तेंव्हा त्यांनी भारतातही ब्रिटीशांविरुध्द क्रांतिकारक हल्ला करतील व बाहेरुन जर्मन सैन्य व आझाद हिंद सेना हल्ला करेल असे त्यांनी हिटलरला सुचवले. हिटलरने म्हटले की सशस्त्र असे काही हजारांचे सैन्यही काही लाख निशस्त्र क्रांतिकारकाविरुध्द यशस्वीपणे लढा देउ शकते.नंतर जर्मनीमध्ये हिटलरच्या उपस्थितीत आझाद हिंद सेनेतील सैनिकांना शपथ दिली गेली.त्यामध्ये हिटलरने म्हटले की "तुम्ही आणि तुमचे नेताजी ज्याप्रमाणे स्वतःच्या देशाला परकीय सत्तेला हाकलुन देण्यासाठी ज्या जिद्दीनी प्रयत्न करता आहात त्यावर मी खुष झालो आहे.तुमच्या नेताजींचे स्थान माझ्यापेक्षाही मोठे आहे.जिथे मी ८कोटी जर्मनांचा नेता आहे तिथे तुमचे नेताजी ४०कोटी भारतीयांचे नेते आहेत.सर्व बाजुंनी ते माझ्यापेक्षा मोठे नेते आणि सेनापती आहेत.मी त्यांना सॅल्युट करतो आणि जर्मनी त्यांना सॅल्युट करते.सर्व भारतीयांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी सुभाषबाबुंना त्यांचा führer म्हणुन मान्यता द्यावी.मला यात बिल्कुल शंका नाही की सर्व भारतीयांनी हे केले तर लवकरच भारत स्वतंत्र होईल". जर्मनीचा रशियाने चांगलाच प्रतिकार केल्याने सुभाषबाबुंनी जपानला जाउन त्यांची मदत घ्यायचे ठरवले आणि १३फेब्र.१९४३ साली ते पाणबुडीने जपानला गेले.

जपानमध्ये रासबिहारी बोस या क्रांतिकारकाने आधीच जपानी सरकारच्या मदतीने भारतीयांचे सैन्य उभे केले होते. नेताजी तिथे पोहोचल्यावर त्या सैन्याचे प्रमुख नेताजींना बनवण्यात आले.जपानच्या पंतप्रधान टोजोला नेताजी भेटले.टोजोने भारतीय स्वातंत्र्यचळवळिला पाठींबा दिला. जपान,सिंगापुर ,बर्मा,शहिद्-स्वराज्(अंदमान्-निकोबार्),इंफाळ येथील नेताजींची भाषणे खुप गाजली.जिथेजिथे ते गेले तिथे तिथे त्यांचे भरभरुन स्वागत झाले.५जुलै १९४३ साली आझाद हिंद सेनेचे त्यांनी नेतृत्व स्विकारले.त्यावेळी त्यात १३००० सैनिक होते.नेताजी म्हणाले की ''आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सर्वात अभिमानाचा दिवस आहे.एक वेळ अशी होती की लोक म्हणत होते की ब्रिटीश साम्राज्यात सुर्य कधीच मावळणार नाही.पण मी असल्या गोष्टींवर कधीच विश्वास ठेवला नाही.इतिहासानी मला शिकवले की प्रत्येक साम्राज्य अस्तास जाते.ब्रिटीश साम्राज्याच्या थडग्यावर उभे रहाताना आज लहान मुलालाही याचा विश्वास आहे की ब्रिटीश साम्राज्य आता इतिहासजमा झालेय.या युध्दात कोण जिवंत राहील आणि कोण धारातीर्थी पडेल मला माहीत नाही.पण मला हे नक्कीच माहीत आहे की आपण शेवटी जिंकुच.पण आपले युध्द तेंव्हाच संपेल जेंव्हा ब्रिटिश साम्राज्याच्या दुसर्‍या थडग्यावर म्हणजे दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर आपण परेड करु.हे सैनिकांनो त्यामुळे आपला एकच नारा असला पाहीजे-'चलो दिल्ली ,चलो दिल्ली'.मी नेहमीच असा विचार केला की स्वातंत्र्य मिळवण्यास भारताकडे सर्व गोष्ट्टी आहेत्.पण एक गोष्ट नव्हती,ती म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या सैन्याची.तुम्ही भाग्यवान आहात की भारताच्या पहिल्या सैन्याचे तुम्ही भाग आहात्."नेताजींना प्रचंड प्रतिसाद मिळत होता.लोक स्वतःचे सर्वस्व त्यांना अर्पण करत होते.नेताजींनी अल्पावधीत ४५,००० चे सैन्य उभे केले होते.त्यांना आर्थिक पाठींबाही भरपुर मिळत होता.श्रीमंत भारतीयांना नेताजींनी एकदा म्हटले होते की "तुम्ही लोक मला येउन विचारता की मी ५%-१०% मालमत्ता देउ का?पण जेंव्हा आम्ही सैन्य उभे करतो तेंव्हा सैनिकाला सांगतो की तुझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढ्.त्यांना आम्ही सांगु का की तुझ्या रक्ताच्या १०%पर्यंतच लढ म्हणुन्??गरीब माणस त्यांच्या आयुष्याची सर्व कमाई ,फिक्सेड डीपॉझिट्स सर्व काही देशासाठी देत आहेत्.तुम्हा श्रीमंतांपैकी कोणि आहे का जो आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करेल?".त्यानंतर इंफाळची मोहीम आखली गेली. नेताजी सैन्याला दिल्लीपर्यंत जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते.इंफाळवर हल्लेही सुरु झाले होते.आझाद हिंद सेनेने १५०० चौरस किमी चा भाग जिंकला होता व २५० मैल आतपर्यंत सैन्य घुसले होते.इंफाळ पडणार असे दिसु लागले.पण एप्रिल १९४४ मध्ये चित्र पालटले आणि मॉन्सुनच्या आगमनाने तर मोहिमेवर पाणी फिरवले.त्याचबरोबर जपानकडुन मदत येणेही बंद झाले.इंफाळची मोहीम ही दुसर्‍या महायुध्दातील सर्वात दुर्दैवी घटनांपैकी एक ठरली.भुक्,रोगराई,मृत्यु ,पाउस यांची ती एक दुर्दैवी कहाणी ठरली. नेताजी तेथेही खंबीर होते.कधीही बॉम्बहल्ला झाला की ते म्हणत 'माझा जीव घेईल असा बॉम्ब अजुन निर्माण झालेला नाही आहे.'

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या तथाकथित अपघाती मृत्युचे गुढ भारतात अनेक वर्ष होते.पण मुखर्जी कमिशनने दिलेल्या रीपोर्टनंतर हे स्पष्ट झाले आहे की त्यावेळी सुभाषबाबुंचा मृत्यु झाला नव्हता.तैवानने अशा प्रकारचा विमान अपघात झालाच नाही हे स्पष्ट केलेय्.असे म्हटले जाते की नेताजी त्यानंतर रशियात गेले होते.तेथे सायबेरीयात त्यांना ठेवले गेले होते.स्टॅलिनच्या मुलीने दिल्लीत पत्रकारांना हे स्पष्ट केले होते.सर्वपल्ली राधाकृष्णनही नेताजींना तेथे भेटले होते असे म्हणतात.त्यानंतर नेताजी चिनमधे गेले होते.त्यानंतर तिबेटमध्ये त्यांनी संन्यास घेतला.१९५६ मध्ये भारत सरकारने हे मान्य केले की जर नेताजी भारतात आले तर त्यांना 'वॉर क्रिमिनल' म्हणुन ब्रिटनला सोपवले जाईल्.त्यानंतर १० वर्षांनी इंदिरा गांधींनीही तेच सांगितले.या सर्व काळामध्ये अनेक नेताजींच्या सहकार्‍यांनी त्यांना बघितले होते.काही जर्मन अधिकार्‍यांनीही त्यांना बघितले होते.त्यानंतर सुभाषबाबु भारतात आले आणि बरेच लोक असे म्हणतात की ते 'भगवानजी' अथवा 'परदा बाबा' या नावानी रहात असत.आनंदमयी मा,अतुल सेन,लीला रॉय,प्रतिभा मोहन रॉय वगैरेंना भगवानजी भेटले.यापैकी बरेच नेताजींना पुर्वीपासुन ओळखत होते.त्याचबरोबर इतरही अनेक नेताजींच्या साथीदारांनी भगवानजी हेच नेताजी आहेत असे सांगितले.पण नंतर भगवानजींनी अनेकांशी भेट नाकारली.नेहरुंच्या मृत्युच्या वेळीही भगवानजी त्यांना श्रध्दांजली वहायला गेले होते व काही वर्तमानपत्रात तसे फोटोही आले होते.गोळवलकर गुरुजींनीही त्यांच्याशी त्यानंतर पत्रव्यवहार केला होता.जनता पार्टीचे खासदार समर गुहा यांनी शपथेनी सांगितले की नेताजी जिवंत आहेत.आणि त्यांनी अनेकांना तसे फोटोही पाठवले.भगवानजी गुहांवर चिडले आणि परत कधीही त्यांना भेटले नाहीत्.मोरारजी देसाई पंतप्रधान झाल्यावर त्यांनीही विमान अपघातात नेताजींचा मृत्यु झाला हे अमान्य केले.नंतर त्यांनीही 'नेताजी जिवंत आहेत व त्यांनी संन्यास घेतला आहे' असे सांगितले.भगवानजींनी ४ वेळा आपण नेताजी आहोत हे मान्य केले होते.भगवानजींच्या सामानामध्ये नेताजींची जर्मन दुर्बिण व खोसला कमिशनचे सुरेश बोस यांना दिलेले ओरीजिनल समन्सही सापडले.भगवानजी आणि नेताजी दिसायला सारखेच होते असे अनेकांचे मत होते.हस्ताक्षरतज्ञ बी.लाल कपुर यांनी नेताजींचे आणि भगवानजींचे हस्ताक्षर सारखेच आहे असे सांगितले होते त्याचबरोबर नेताजींची पुतणी ललिता बोस यांनीही भगवानजींचे हस्ताक्षर हेच नेताजींचे हस्ताक्षर आहे असे सांगितले.मुखर्जी कमिशन जरी नेताजी विमान अपघातात मारले गेले नाहीत व रेणकोजी मंदिरातील अस्थि त्यांच्या नाहीत असे सांगते तरी पुराव्यांअभावी 'भगवानजी हेच नेताजी आहेत' हे मान्य करत नाही.पण 'हिंदुस्तान टाईम्स्'ने घेतलेल्या शोधानंतर व अनेक नेताजींच्या सहकार्‍यांच्या म्हणन्याप्रमाणे नेताजी हेच भगवानजी होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सर्वात महत्वाचे व्यक्तिमत्व आहे असे मी वर म्हटलेय त्याचे स्पष्टीकरण देतो. नेताजींची इंफाळ मोहिम फसली पण तरीही आझाद हिंद सेनेच्या सैनिकांना जेंव्हा भारतात वॉर क्रिमिनल्स म्हणुन आणले गेले तेंव्हा त्यांना जनतेनी प्रचंड पाठींबा दिला.आझाद हिंद सेनेच्या फौजांच्या कर्तुत्वाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये एक प्रकारची अपराधीपणाची भावना निर्माण झाली.Commander-in-Chief असलेल्या Claude Auchinleck ने म्हटले की 'भारतीय सैनिकांमध्ये आझाद हिंद सेनेबद्दल आदराची भावना आहे.'त्यानंतर रॉयल इंडीयन अयर फोर्सच्या ५२०० सैनिकांनी आझाद हिंद सेनेच्या जवानांना होणार्‍या शिक्षांच्या निषेधार्थ बंद पुकारला.आणि त्यानंतर हीच बंदाची भुमिका भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये पसरली.त्याचबरोबर एचएमएस तलवार व जवळजवळ संपुर्ण भारतीय नेव्हीने उठाव केला व युनियन जॅक बर्‍याच जहाजांवरुन उतरवला.त्याचबरोबर मुंबईतील ६,००,०००गिरणि कामगारांनी बंद पुकारला.या व इतर सर्व घटनांकडे ब्रिटीशांचे लक्ष होते. नवनिर्वाचित ब्रिटीश पंतप्रधान क्लिमेंट ऍटली यांनी ब्रिटनच्या संसदेत हे स्पष्ट केले की 'ब्रिटीश भारतीय सैन्य आता काही ब्रिटीश सत्तेच्या ऐकण्यात राहीलेले नाही.त्यामुळे कधीही हे संपुर्ण सैन्य ब्रिटीशांच्या विरुध्द जाउ शकते.व दुसरीकडुन भारतात सैन्य पाठवणे शक्य नाही.त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे ब्रिटनला भाग आहे.'डॉ.आर्.सी.मुजुमदार यांच्या 'हिस्टरी ऑफ बेंगाल' पुस्तकाला कलकत्ता हायकोर्टाच्या न्यायाधिशांनी एक पत्र पाठवले होते ज्यात त्यांनी सांगितले की जेंव्हा ते राज्यपाल होते तेंव्हा पंतप्रधान ऍटलींशी त्यांची कलकत्त्यात भेट झाली.त्यावेळी चक्रवर्तींनी 'गांधीजींच्या 'भारत छोडो' आंदोलनाचा भारताच्या स्वातंत्र्य देण्यात किती वाटा आहे' असे ऍटलींना विचारल्यावर ऍटलींनी उत्तर दिले 'मि-नि-म-ल'.यावरुन हे स्पष्ट होते की आझाद हिंद सेनेच्या उदाहरणाने ब्रिटीश इंडीयन सैन्य आपल्या ऐकण्यात राहीलेले नाही हे ब्रिटीशांना कळल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले.त्यामुळे साहजिकच नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत सर्वात महत्वाचे योगदान दिल्याचे श्रेय द्यावेच लागेल व त्यांना अशा प्रकारचे सैन्य उभे करणास प्रोत्साहित करणार्‍या स्वा.सावरकरांचे अप्रत्यक्ष योगदान देण्याचे श्रेयही द्यावेच लागेल. कुशल वक्तृत्व्,त्यातुन सैन्याला आपले सर्वस्व देउन धाडस करण्याची प्रेरणा देण्याचे कौशल्य नेताजींमध्ये होते.लेखाचा शेवट नेताजींच्या सिंगापुरमधील एका भाषणाच्या ओळींनी करतो.त्यांचा धिरगंभीर आवाज्,त्यातील हृदयाला भिडणारी भाषा यामुळे आजची परीस्थिती पुर्णपणे वेगळी असुनही अंगावर काटा उभा रहातो. आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है|हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलोंका सामना करना है.आखिरमें कामयाबी मिलेगी | इस रास्तेमें हम क्या देंगे?हमारे हातमें है क्या?हमारे रास्तेमें आयेगी भुक,प्यास,तक्लिफें,मुसिबतें..मौत!!कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे ,उनमेंसे कितने लोग निकलेंगे..जिंदा रहकर|कोई बात नहीं है...हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे...कोई बात नही है| सही बात यह है,आम बात यह है के आखिरमें हमारी कामयाबी होगी...हिंदुस्तान आझाद होगा!!!

चिन्मय कुलकर्णी

इतिहासविचार

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

24 Jan 2009 - 9:05 am | सखाराम_गटणे™

छान लेख आहे,
नंतर येथेच प्रतिक्रीया देतो

नेताजी बाबुंच्या देशभक्तीला सलाम. आझाद हिंद सेनेचा वापर ब्रिटिशांविरुद्ध करुन भारतातुन इंग्रजी सैन्याचा पाडाव करण्याच्या साहसी मोहीमेला सलाम. दुसर्‍या महायुद्धात भारतीय वंशाच्या सर्व नाही तरी हजारो युद्धबंदी सैनिकांचे प्राण फायरिंग स्क्वाडच्या तोंडातुन वाचल्याबद्दल आदर.

बाकी बहुत सारा मसाला, दैवतीकरण इ इ ... चालू द्या...

भारतातील सुधारक लोकांनी अनेक दशकांपासुन चालवलेली देशी स्वातंत्र चळवळीला,
जपान, जर्मनीच्या आश्रयातुन जन्मास आलेली व जवळजवळ त्यांच्याच पुर्णता मदतीवर अवलंबुन असलेली, दुसर्‍या महायुद्धाच्या ब्रिटिशांना काहीश्या प्रतिकुल पार्श्वभुमीवर आझाद हिंद सेना भारताला स्वतंत्र करुन समर्थ नेतृत्व देण्यास पर्याय हे जरा "फार फेच्ड" नाही वाटत? कृपया यात नेताजींच्या देशभक्तीवर शंका घेत नाही की अहिंसेशी संबधीत एका नेत्याशी व नेताजींची जुगलबंदी लावुन देण्याचा विचार नाही. ह्या प्रतिसादावर चर्चा नेहमीच्या हे विरुद्ध ते मार्गाने कृपया नेउ नका.

जरासे अजुन पुढे जाउन,
इंग्रजांना भारतातुन बाहेर काढणे हे जरी एक समान कार्य [आ. हिं.से व काँग्रेसप्रणीत चळवळ दोन्हीत] धरले तरी
लोकशाही मार्गाने समाजरचना, देशातील विविध संस्थाने एकत्रीकरण, सर्व भारतीयांना घटनात्मक अधिकार इ इ गोष्टी ह्या लोकशाही मार्गाने जाणार्‍या चळवळीत

साम्यवाद/एकाधिकाशाही/फॅसिझम यावर विश्वास असलेल्या [व दुसर्‍या महायुद्धानंतर त्वरीत सुरु झालेल्या आंतराष्ट्रीय शीतयुद्धाच्या पार्श्वभुमीवर] लष्करी नेतृत्वाखालील राजवटीत
सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते याबद्दल [गेल्या ६० वर्षाच्या जागतीक इतिहासाच्या उपलब्ध माहीतीवर] जरा साशंक.

दुसरे महायुद्ध व आझाद हिंद सेनेच्या नेत्यांचे परदेशातील कार्य ज्या काळात झाले आहे ते वाचा, मग त्यावेळी जे निर्णय झाले, ज्या आघाड्यांवर विजय/ पराभव झाले त्यावेळी मुख्य महायुद्धाची स्थीती काय याची त्या कालानुरुप सांगड घाला. स्व:तापुरता इतिहासाचा तटस्थ मागोवा घ्या. मागणं लई नाही लई नाही.

कोलबेर's picture

24 Jan 2009 - 9:36 am | कोलबेर

माहितीपूर्ण लेख.

त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती.ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणने होते.

हे वाचल्यावर मत सहजरावांसारखेच!

फरक इतकाच की, सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते, याबद्दल मी जरा साशंक नसून बराच साशंक आहे.

सर्वसाक्षी's picture

24 Jan 2009 - 9:43 am | सर्वसाक्षी

तो तसाही दुर्लक्षितच राहीला की!

आणि हुकुमशाही तर प्रस्थापितांचीही होतीच . निदान नेताजींनी आपले प्रामाणिक मत स्पष्ट मांडायचे धैर्य दाखविले.

कोलबेर's picture

24 Jan 2009 - 9:57 am | कोलबेर

तो तसाही दुर्लक्षितच राहीला की!

नाही. असे मला तरी वाटत नाही.

सामान्य माणसांच्या हक्कांबाबत बोलत असाल तर चीनकडे पाहिले असता असे मला अजीबात वाटत नाही.

(सामान्य माणूस) कोलबेर

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jan 2009 - 1:27 am | llपुण्याचे पेशवेll

>>आणि हुकुमशाही तर प्रस्थापितांचीही होतीच . निदान नेताजींनी आपले प्रामाणिक मत स्पष्ट मांडायचे धैर्य दाखविले.

अगदी सहमत. त्यामुळेच तर नंतर 'उषःकाल होता होता' म्हणायची वेळ आली. फक्त ते देखील लोकशाहीच्या नावावर सारे चेपवले गेले.
आणि सामान्य माणसाचे अधिकार जपण्याबाबत आजही जी परिस्थिती दिसते ती काही फार आशादायक नाही. त्यामुळे शेवटी सगळे शेवटी पॉईंट ऑफ व्ह्यू वर अवलंबून असते हेच खरे.

पुण्याचे पेशवे
Since 1984

चिन्या१९८५'s picture

25 Jan 2009 - 6:32 pm | चिन्या१९८५

मला नेताजींचा मुद्दा त्यांच्या जागेवर बरोबर वाटतो.ब्रिटन हे लोकशाहीचे राष्ट्र होते पण त्यांनीही भारतीयांवर अन्याय केलाच ना???मग नेताजींनी साहजिकच इतर विचारसरण्ञांचा अभ्यास करुन स्वतःचा मुद्दा मांडल्यास काय चुकले.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 11:02 am | नितिन थत्ते

नेताजींच्या देशभक्ती बाबत कुणालाच संशय नाही.

नेताजी सापडल्यास त्यांना वॉर क्रिमिनल म्हणून ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ असे भारत सरकारने ५० च्या दशकात मान्य केले असेल हे संभवत नाही (ब्रिटिशांनी ५० च्या दशकात अशी मागणी केली असणेही संभवत नाही).

हिटलरने नेताजींचे कौतुक केले असेल पण तो हे कौतुक का करत आहे हे न समजण्याइतके नेताजी दुधखुळे असतील असे मला वाटत नाही. शत्रूचा शत्रू म्हणून मदत करणे वेगळे आणि भारत स्वतंत्र व्हावा असे खरेच वाटणे वेगळे.

मुख्य म्हणजे जपान-जर्मनीच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव झाला असता हे जरी मान्य केले तरी भारत स्वतंत्र झाला असता की नाही हा प्रश्नच आहे. म्हणजे जपानने महायुद्धात फिलिपाइन्स वगैरे जिंकल्यावर त्यांना स्वातंत्र्य दिले नव्हते. ही गोष्ट सोडली तर नेताजींचे असामान्यत्व मान्यच आहे.

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 7:00 pm | चिन्या१९८५

खराटा , तशी मागणी करण्याची गरजच नव्हती. नेताजी देशात येउ नयेत हे नेहरुंचे मत होते.आणि अशी मागणी न करताही आम्ही त्यांना वॉर क्रिमिनल म्हणुन ब्रिटनला सोपवु असे भारताच्या तत्कालिन गृहमंत्री गोविंदवल्लभ पंत यांनी स्पष्ट केले होते.तेच इंदिरा गांधींनि १९६६ साली पुन्हा स्पष्ट केले

हिटलरने नेताजींचे कौतुक केले असेल पण तो हे कौतुक का करत आहे हे न समजण्याइतके नेताजी दुधखुळे असतील असे मला वाटत नाही.
नेताजींच्या फॅसिझमची विचारधारणा मुसोलिनीशी मिळतीजुळती होती,हिटलरशी नाही.दुसर म्हणजे जर्मनी वास्तव्यात नेताजींनी हिटलरच्या वंशवादावर आणि आक्रमकतेवर टिका केली होती.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

बगाराम's picture

25 Jan 2009 - 7:20 am | बगाराम

सहमत आहे. जपान आणि हिटलर असले साप पाळून नेताजी चूकच करत होते असे मलाही वाटते.

चिन्या१९८५'s picture

25 Jan 2009 - 6:34 pm | चिन्या१९८५

मला नाही तसे वाटत्.शत्रुचा शत्रु तो मित्र असे मानुन नेताजी बरोबरच करत होते
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

पुण्याचे वटवाघूळ's picture

30 Jan 2013 - 1:37 pm | पुण्याचे वटवाघूळ

मुख्य म्हणजे जपान-जर्मनीच्या मदतीने ब्रिटिशांचा पराभव झाला असता हे जरी मान्य केले तरी भारत स्वतंत्र झाला असता की नाही हा प्रश्नच आहे.

छे हो असले प्रश्न विचारायचे नसतात.जपानी इंग्रजांविरूध्द लढताना आझाद हिंद सेनेची मदत घेत होते (म्हणजे परस्पर मरायला भारतीय आहेत--आपले नुकसान कमी), त्यांनी जरी ब्रिटिशांना हरवले असते तरी भारताला स्वांतंत्र्य दिले असते का असे काही म्हणजे काही विचारायचे नाही.कारण नेताजी अहिंसेने लढणारे थोडीच होते?

ही गोष्ट सोडली तर नेताजींचे असामान्यत्व मान्यच आहे.

अगदी असेच.

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 6:51 pm | चिन्या१९८५

गटणे,सहज्,कोलबेल,सर्वसाक्षी प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!

दुसर्‍या महायुद्धाच्या ब्रिटिशांना काहीश्या प्रतिकुल पार्श्वभुमीवर आझाद हिंद सेना भारताला स्वतंत्र करुन समर्थ नेतृत्व देण्यास पर्याय हे जरा "फार फेच्ड" नाही वाटत?
मला असे वाटते की माझ्या लेखामध्ये याला उत्तर दिलेले आहे शेवटच्या परीच्छेदात्.आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने ब्रिटीश इंडीयन आर्मीमध्ये ब्रिटीशांविरुध्द भावना जाग्रुत झाली व त्यामुळे पुढे काय होउ शकते याचा विचार करुन ब्रिटीशांनी भारताला स्वातंत्र्य दिले.ब्रिटनचे पंतप्रधान ऍटली हे मान्य करतात तर मग अजुन ठोस असा काय पुरावा देणार??

लष्करी नेतृत्वाखालील राजवटीत सामान्य माणसाचे अधिकार कसे जपले गेले असते याबद्दल साशंक
हा मुद्दाच वेगळा आहे.त्याच्यावर चर्चा होउ शकते पण ऑथॉरीटेरीअन रुलचे अनेक फायदे आहेत्.श्गिवाय सुभाषबाबुंनी तो रुल फक्त काही वर्षांसाठी असावा असे सांगितले.देशाची सामाजिक घडी व्यवस्थित बसली की लोकशाही स्विकारली जावी असे त्यांचे म्हणने होते.आझाद हिंद सेनेच्या कार्यातही त्यांचे वर्तन लोकशाहीस विरुध्द नव्हते तर उलट लोकशाहीवादी होते.

दुसरे महायुद्ध व आझाद हिंद सेनेच्या नेत्यांचे परदेशातील कार्य ज्या काळात झाले आहे ते वाचा, मग त्यावेळी जे निर्णय झाले, ज्या आघाड्यांवर विजय/ पराभव झाले त्यावेळी मुख्य महायुद्धाची स्थीती काय याची त्या कालानुरुप सांगड घाला.
असा अभ्यास माझा नाही असे तुम्हाला का वाटते???
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

सर्वसाक्षी's picture

24 Jan 2009 - 9:26 am | सर्वसाक्षी

चिन्मय,

एका चांगल्या लेखासाठी अभिनंदन. या व्यक्तिमत्वावर कितीही लिहिले तरी ते संक्षिप्तच वाटते. कितीही वाचले तरी ते अपुरेच वाटते. मागे आझाद हिंद सेना ही लेखमाला लिहिताना मी कहाणी नेताजींची, सुभाचंद्र बोस, सुभाषकथा, महानायक ही व अन्य काही भारतीय तसेच तात्सो हादियस या जपानी समकालिनाचे सुभाषचंद्र, रुडॉल्फ वुर्टॉग या नेताजींच्या जर्मन वास्तव्यातील सहकार्‍याचे 'साईन ऑफ टायगर' तसेच अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापिठाचे संशोधक पिटर होवर्ड फे यांचे 'दि फरगॉटन आर्मी' ही पुस्तके वाचली होती. बान ताकेझुमिची योरोझुप, मणीपूर सरकार, हिंदुस्थान टाईम्स (नेताजी प्रभाग), नेताजी रिसर्च ब्युरो यांची संकेतस्थळे तसेच जालावर असलेले कॅप्टन शाहनवाझ खान, गुरुबक्षसिंग धिल्लन, कॅप्टन लक्ष्मी, प्रेम सेहगल यांचे लेख वाचताना हे व्यक्तिमत्व केवळ किती महान व अनन्यसाधारण आहे ते लक्षात आले. केवळ आपले आवडते म्हणुन नसते गुण त्यांना चिकटवुन त्यांचा उदोउदो न करता त्याम्चे जिवनकार्य समजावुन घेण्यासाठी व अनेकाअनेक देश व देशवासीयांची त्यांच्याविषयीची भावना समजावुन घेण्यासाठी या वाचनाची मदत झाली व असामान्यत्वाचा साक्षात्कार घडत गेला. (१३ भगानंतर ही मालिका पूर्ण करु शकलो नाही याची लाज व खंत वाटते. मात्र इतक्या असामान्य व्यक्तिच्या असामान्य संग्रामाचा शोकांत लिहायला मन करत नाही हेही खरे आहे)

जो या देशाचा अधिकृत नेता नव्हता किंबहुना उपेक्षित व प्रस्थापितांकडुन अव्हेरला गेला होता त्याला जगातील अनेक देश राष्ट्रप्रमुखाचा सन्मान देतात, त्याच्या प्राणाची जबाबदारी घेतात, त्याच्या शब्दाखातर बासनात बांधलेली युद्धमोहिम नव्याने उभारतात, ज्याच्या शद्बाखातर हजारो हिंदुस्थानी 'करो सब निछावर, बनो सब फकिर' असे गात आपले सर्वस्व सोडुन दिल्लीकडे चाल करुन जातात व जो नेता परराष्ट्राची मदत घेताना देखिल ताठ मानेने सांगु शकतो की "माझ्या देशाला तुमची मदत हवी आहे, तुमचे सैन्य नको; प्रत्येक युद्धात सांडलेला पहिला रक्ताचा थेंब हिम्दुस्थानी असेल. मला तीन लक्ष सैन्य आणि तिनशे कोटी रुपये हवे आहेत आणि ते पैसे मी कर्ज म्हणून मागत आहे; स्वातंत्र्यानंतर माझा देश ते सव्याज फेडेल. मी जर स्वतंत्र हिंदुस्थानचा राष्ट्रप्रमुख झालो नाही तर मी दरोदार भीक मागुन ते पैसे जमा करीन व परतफेड करेन" - अशा महान व्यक्तिमत्वला प्रस्थापितांनी राष्ट्रद्रोही ठरविले हे भीषण सत्य आहे.

ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे.

कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम.

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 10:46 am | नितिन थत्ते

नेताजींची उपेक्षा आणि अवहेलना झाली हे मान्य नाही.

सर्किट's picture

26 Jan 2009 - 3:19 pm | सर्किट (not verified)

नेताजींची अवहेलना झाली, हे सर्वसाक्षींनी स्पष्ट केले आहे (अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विदापीठाच्या वाचनाचा दाखला देऊन), तरीही मान्य नाही ?

हा हंत हंत.

मला पूर्णपणे मान्य आहे की नेताजींची अवहेलना झाली.

(का कोण जाणे, माझ्या मनात सध्या "जय हो" ! असेच येते आहे. नेताजी, जय हो !)

-- सर्किट

चिन्या१९८५'s picture

26 Jan 2009 - 5:10 pm | चिन्या१९८५

सुभाषजी,सुभाषजी वो जान्-ए-हिंद आ गये| है नाझ जिसपे हिंदको वो शान्-ए-हिंद आ गये|

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 7:06 pm | चिन्या१९८५

सर्वसाक्षी, आपल्या लेखांची लिंक देता का????तुम्हाला माझा लेख कसा वाटला,त्याच्याबद्दल प्रतिक्रिया वाचायला आवडेल कारण तुम्हाला भरपुर माहीती आहे या विषयावरची.

खराटा,नेताजींची नक्कीच उपेक्षा झाली.विमान अपघातात त्यांचा मृत्यु झाला नव्हता हे तर आता मुखर्जी कमिशनने स्पष्ट केलेय्.मग पुढचे आयुष्य त्यांनी कुठे घालवले याचा शोध घेतल्यास भगवानजीच नेताजी होते असे अनेक मान्यवरांना वाटते.मग इतक्या महत्वाच्या नेत्याला आपल्या आयुष्यातील शेवटचे अनेक वर्ष स्वतःची ओळख लपवुन रहावे लागले ही त्यांची उपेक्षा नाही का???
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

बगाराम's picture

25 Jan 2009 - 7:23 am | बगाराम

>सर्वसाक्षी, आपल्या लेखांची लिंक देता का???

आमचा अनुभव सांगतो की सर्वसाक्षी तुम्हाला कसलीही लिंक देणार नाहीत. आपल्या लिखाणाचा कसलाही माग लागू द्यायचा नाही ही त्यांची खासीयत आहे.

सर्किट's picture

26 Jan 2009 - 3:26 pm | सर्किट (not verified)

चिन्या,

तुझ्या सर्वसाक्षींकडून पुरावे मागण्याच्या लायनीत मी आधी आहे.

मागे एकदा (मिसळपावावरील एका निषिद्ध संकेतस्थळावर) भगतसिंगाच्या फाशीसाठी मो. क. गांधी जबाबदार होते (इंग्रज सरकार नाही) असे विधान त्यांनी केले होते. त्याचा पुरावा मी अजूनही मागतो आहे.

त्यामुळे तुला काहीही पुरावे हवे असल्यास, तू लायनीत माझ्या मागे यावे, ही नम्र विनंती. (आज प्रजासत्ताक दिनानिमित्त एवढातरी सिविक सेन्स आपल्यात हवा राव ! विरुद्ध पार्टीक्डून बघू की किती सिविक सेन्स दिसतो ते! )

-- सर्किट

चिन्या१९८५'s picture

26 Jan 2009 - 4:58 pm | चिन्या१९८५

सर्वसाक्षींनी मला त्यांच्या लेखांच्या लिंक्स दिलेल्या आहेत्.छान लेखमालिका आहे त्यांची.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

26 Jan 2009 - 3:34 pm | नितिन थत्ते

त्यांचा मृत्यु झाला नव्हता हे तर आता मुखर्जी कमिशनने स्पष्ट केलेय्.

त्याच कमिशन ने भगवानजी हे नेताजी नव्हते असेही म्हटले आहे.

चिन्या१९८५'s picture

26 Jan 2009 - 5:01 pm | चिन्या१९८५

त्याच कमिशन ने भगवानजी हे नेताजी नव्हते असेही म्हटले आहे.
मान्य आहे.मी पण म्हणत नाही की तेच नेताजी होते.पण तसे म्हणायलाही बराच स्कोप आहे.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

अनिल हटेला's picture

24 Jan 2009 - 9:39 am | अनिल हटेला

ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे.

कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम.

अगदी असेच म्हणतो !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

दशानन's picture

24 Jan 2009 - 10:34 am | दशानन

नेताजी विषयी वाचलं की जीव तीळ तीळ तुटू लागतो.... च्यामायला एका निडर छातीच्या... देशभक्ताबरोबर जे काही त्या गांघी व त्याच्या मानसपुत्राने केलं... वाचलं की सुन्न होतो... !

ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे.

कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम.

हेच म्हणतो...

चिन्या फारच सुंदर लेख !!!
नेताजी हे Forgotten Hero ठरले ...

ज्याने स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये सिंहाचा वाटा उचलला त्या महानायकाला मिळालेली उपेक्षा ही अत्यंत क्लेशदायक आहे.

कसलीही आशा-अभिलाषा न बाळगता राष्ट्रासाठी सर्वस्व समर्पण करणार्या नेताजींना सादर प्रणाम.
असेच म्हणतो..

मदनबाण.....

Freedom is not given - it is taken.
Subhas Chandra Bose.

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 7:10 pm | चिन्या१९८५

अनिल हटेला ,जैनाचं कार्ट तुमच बरोबर आहे

धन्यवाद मदनबाण !!!

mamuvinod ,नेताजींचा मृत्यु कधी आणि कुठे झाला हेच माहीत नाही त्यामुळे खरी पुण्यतिथी माहीत नाही.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

mamuvinod's picture

24 Jan 2009 - 11:16 am | mamuvinod

काल म्हणजे २३ जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती होती .

कि पुण्यतिथि ?????????

बाकि लेख छान आहे.

लाख लाख सलाम

सुचेल तसं's picture

24 Jan 2009 - 12:24 pm | सुचेल तसं

नेताजींची जयंतीच आहे. त्यांची पुण्यतिथी १८ ओगस्ट ला आहे असं मानलं जातं.

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

दिपक's picture

24 Jan 2009 - 12:39 pm | दिपक

लेख आवडला. नेताजींविषयी नेहमीच काहीतरी गुढ राहिले होते माझ्या मनात ह्या लेखाने ते उलगडण्यास मदत झाली. अत्यंत माहितीपुर्ण लेख. इथे दिल्याबद्दल खुप धन्यवाद.

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 7:13 pm | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दिपक
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 6:13 pm | नितिन थत्ते

आंतरजालावर नेताजींच्या मृत्यूसंबंधाने शोध घेतला.
पूर्वी एक शाह नवाझ आयोग नेहरूंनी नेमला होता. नंतर खोसला आयोग इंदिरा गांधींनी नेमला होता. रालोआ सरकारने नंतर १९९९ मध्ये मुखर्जी आयोग नेमला.
मुखर्जी आयोगाने नेताजींचा मृत्यू १९४५ ला विमान अपघातात झाल्याचे नाकारले. कारण त्या सुमारास कोणताही विमान अपघात झालाच नसल्याचे तैवान सरकारने सांगितले.
परंतु भगवानदास नावाने अयोध्येत १९८५ पर्यंत राहणारी व्यक्ती नेताजी आहेत हे पुरेशा/सबळ (क्लिंचिंग) पुराव्याअभावी आयोगाने नाकारले. (भगवानदास व नेताजी यांचे अक्षर जुळत असल्याचा निर्वाळा फोरेन्सिक तज्ञानी देवूनही). तसेच नेताजी आता जिवंत असल्याचेही या आयोगाने नाकारले.
भारत सरकारने चौकशीत सहकार्य केले नाही असे आयोगाने नमूद केले आहे. तसेच जपान, रशिया व ब्रिटन या सरकारांनीही सहकार्य केले नाही.
एक प्रश्न पडला.

आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का?

दशानन's picture

24 Jan 2009 - 6:19 pm | दशानन

परंतु भगवानदास नावाने अयोध्येत १९८५ पर्यंत राहणारी व्यक्ती नेताजी आहेत हे पुरेशा/सबळ (क्लिंचिंग) पुराव्याअभावी आयोगाने नाकारले. (भगवानदास व नेताजी यांचे अक्षर जुळत असल्याचा निर्वाळा फोरेन्सिक तज्ञानी देवूनही). तसेच नेताजी आता जिवंत असल्याचेही या आयोगाने नाकारले.
भारत सरकारने चौकशीत सहकार्य केले नाही असे आयोगाने नमूद केले आहे. तसेच जपान, रशिया व ब्रिटन या सरकारांनीही सहकार्य केले नाही.
एक प्रश्न पडला.

बाप रे !

धक्कादायक आहे हे सगळे !

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

चिन्या१९८५'s picture

24 Jan 2009 - 7:16 pm | चिन्या१९८५

आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का?
शिळ्या कढीला उत आणन्याचा प्रश्न नाहीये तर सत्य खुप भयानक असु शकते त्यामुळे या सरकारांना काँट्रोव्हर्सीजमध्ये पडायचे नसेल. नेहरू या सगळ्यात मोठे व्हिलन असु शकतात असे बोसवाद्यांना वाटते
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

दशानन's picture

24 Jan 2009 - 7:18 pm | दशानन

नेहरुच्या इमेज पायी एका देशभक्ताला वाळीत टाकायचं :?

*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 8:09 pm | नितिन थत्ते

आयोगाच्या स्थापनेपासून २००४ च्या मे पर्यंत रालोआचे सरकार असूनही भारत सरकारचे सहकार्य का मिळाले नसेल? इतर देशांचे सहकार्य का मिळाले नसेल? शिळ्या कढीला पुनःपुन्हा ऊत आणून वायफळ चर्चा चालली आहे असे त्यांना वाटले असेल का?
शिळ्या कढीला उत आणन्याचा प्रश्न नाहीये तर सत्य खुप भयानक असु शकते त्यामुळे या सरकारांना काँट्रोव्हर्सीजमध्ये पडायचे नसेल.

की हा मुद्दा काँग्रेसला हाणायला कायमचा मिळत रहावा म्हणून मुद्द्याचा निकाल लागूच नये असा उद्देश असेल?

नेहरू या सगळ्यात मोठे व्हिलन असु शकतात असे बोसवाद्यांना वाटते

असे आहे ? की गांधी नेहरूंना ठोकण्यासाठी लोक बोसवादी, पटेलवादी किंवा सावरकरवादी असतात?

चिन्या१९८५'s picture

25 Jan 2009 - 6:38 pm | चिन्या१९८५

असे आहे ? की गांधी नेहरूंना ठोकण्यासाठी लोक बोसवादी, पटेलवादी किंवा सावरकरवादी असतात?
नाही असे आहे की नेहरुंचे आंधळे समर्थक इतरांना नेहमीच कमी लेखतात्.आणि कारण नसताना नेहरुंना जरुरीपेक्षा मोठे करतात
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

शंकरराव's picture

26 Jan 2009 - 3:06 pm | शंकरराव

सहमत

कलंत्री's picture

24 Jan 2009 - 8:25 pm | कलंत्री

भारताच्या संस्कृतीत चिरंजिव ही कल्पना आहे. ( अश्वथामा, बली, व्यास, हनुमान, बिभीषन, कृपाचार्य आणि परशुराम) हे सात चिरंजिव मानले गेले आहे. त्याचप्रमाणे नेताजी हेही आजही जिवंत असावेत असा बर्‍याच भारतीयांना वाटत असतेच. त्यांना आधुनिक चिरंजिव आपण समजु शकतो.

भारताच्या उभारणीत नेताजींचा मोठा हिस्सा असु शकला असता असे मला निर्विवाद पणे वाटते. नेताजी हे व्यक्तिमत्व सर्व सामान्य आणि सर्वधर्मीयांना मान्य असेल असेच होते. दुर्देवाने गांधी आणि नेताजी यांचा मतभेद-वाद आणि त्यातून नेताजींनी केलेला कॉग्रेस त्याग हा भारताचा न भरुन येणारा असे नुकसान होते. नेताजी जर आझाद हिंद सेनेच्या भानगडीत न पडते तर नेहरु -जीना या दोघांनाही ते एक समर्थ पर्याय ठरु शकले असते. कल्पनाविलासच करत आहे असे मी मान्य करत आहे आणि या आधारे असे सांगु इच्छितो की भारताची फाळणीही टाळण्याचे सामर्थ्य असणारे असे एकमेव व्यक्तिमत्व नेताजीच होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतरही नेताजी चांगली भूमिका उमठवु शकले असते.

चिन्मय यांनी अतिशय मूद्देसुद आणि संयत असा लेख लिहिला आहे.

नितिन थत्ते's picture

24 Jan 2009 - 8:37 pm | नितिन थत्ते

नेताजी जर आझाद हिंद सेनेच्या भानगडीत न पडते तर नेहरु -जीना या दोघांनाही ते एक समर्थ पर्याय ठरु शकले असते.

आझाद हिंद सेनेचा मुद्दा सोडला तर आम्हाला नेताजी मान्यच. समर्थ पर्याय तर ठरलेच असते.
सर्वधर्मीयांना मान्य होणे किंवा फाळणी टाळण्याची क्षमता वगैरे जर-तर च्या गोष्टी आहेत. पण त्याही शक्यतेतील धरता येतील.

चिन्या१९८५'s picture

25 Jan 2009 - 7:02 pm | चिन्या१९८५

जरी नेताजी सर्वधर्मियांमध्ये प्रसिध्द होते तरीही त्यांना मुस्लिमांनी जिन्नांच्या वरचे स्थान दिले असते असे वाटत नाही.फाळणीच्या काळात नेताजी असते तर सिव्हिल वॉरसारखी परीस्थिती उद्भवु शकली असती. नेताजींनी काँग्रेस सोडली हे बरोबरच केले.गांधीजींनी नेताजींना वर येउ दिले नसते कारण नेताजींचा अहिंसेवर इतका विश्वास नव्हता.'चर्चेच्या टेबलवर कुठलाही प्रश्न सुटलेला नाहीये' असे त्यांचे मत होते.शिवाय तडजोड करण्यासही त्यांचा साफ विरोध होता.कॉंग्रेसमध्ये असताना नेताजींच्या नेतृत्वगुणांना फार कमी वाव मिळत होता.सावरकरांच्या शब्दात 'हालवेल वगैरे ब्रिटीशांचे पुतळे उखडण्यासारख्या क्षुल्लक चळवळीत नेताजी आपले सामर्थ्य आणि वेळ वाया घालवत होते.' आझाद हिंद सेना हे तर नेताजींचे यश होते.भारतासाठी लढणार्‍या ४५,००० सैनिकांची फौज त्यांनी उभी केली. नेताजी वजा आझाद हिंद सेना म्हणजे साखर वजा गोडपणा आहे असे मला वाटते.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

कलंत्री's picture

25 Jan 2009 - 10:41 pm | कलंत्री

भारताचा स्वातंत्र्य लढा हे जगातील इतिहासातील आगळे वेगळे असे प्रकरण आहे. आपण जितके समझता तितके सोपे आणि सरळ असे नाही. यात अनेक व्यक्तिमत्त्वे आहेत, स्नेह आणि संघर्ष आहेत, आदर्श आणि देशप्रेमाची चढाओढ आहे, त्याग आणि तपश्चर्याची प्रत्येकाची अजोड असे कार्य आहे, आणि तुलनाच करावयाची असल्यास थोडेफार महाभारतातील कथानकाशी करता येईल.

आपण जीना, नेहरु, सुभाषचंद्र बोस आणि गांधी यांचा समग्र अभ्यास केला तर आपणास थोडीफार उकल होण्यास मदत होईल.

तुर्त इतकेच.

चिन्या१९८५'s picture

26 Jan 2009 - 4:02 am | चिन्या१९८५

बरोबर आहे.पण नेताजींनी आझाद हिंद सेना स्थापन केली नसती तर तेही फारस काही करु शकले असते असे वाटत नाही.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

25 Jan 2009 - 12:05 am | विसोबा खेचर

सुंदर लेख..!

(नतमस्तक) तात्या.

सर्किट's picture

26 Jan 2009 - 3:29 pm | सर्किट (not verified)

तात्या,

तुझे बरे चालले आहे.

अनुश्का असो, की नेताजी, तू नेहमी नतमस्तक ! ही प्वालिसी बरी आहे. अंगिकारावी म्हणतो !

-- सर्किट

प्रियाली's picture

25 Jan 2009 - 1:33 am | प्रियाली

बाकी दोन्हीकडचे वाद नेहमीसारखेच. :)

चिन्या१९८५'s picture

25 Jan 2009 - 7:04 pm | चिन्या१९८५

धन्यवाद तात्या आणि प्रियालि
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

Anjali patil's picture

26 Jan 2009 - 11:54 am | Anjali patil

नेताजी प्रमाणे आक्रमक प्रत्येकाला असण आज काळाची गरज आहे.आपण नेताजी बाबत दिलेली माहिती फारच अमुल्य आहें. नेताजी प्रमाणे लडावु व्रुत्ती जवळ आज प्रत्येक तरुणामध्ये असणे गरजेचे आहे.जेणि करून आपण २६/११/२००८ च्या परिस्थीतीला धार्याने तोंड देण्याचे धाड्स निर्माण करू शकतो.

चिन्या१९८५'s picture

26 Jan 2009 - 5:16 pm | चिन्या१९८५

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद अंजली पाटील्.तुमचे म्हणने १००% पटले.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

27 Jan 2009 - 6:06 am | चिन्या१९८५

नेटवर ही माहीतीही मिळाली
Bhagwanji had confided in many, who came in his close contact, that he was not
afraid of punishment he could get under the international law , but he hated the
low level of politics prevailing in India and the turn India has taken after
independence. He also felt that the new world order would have sought action
against him, which Indians would have never allowed. Thus his appearance would
create havoc to his country and sufferings to the people.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

चिन्या१९८५'s picture

27 Jan 2009 - 5:16 pm | चिन्या१९८५

बरेच लोक विमान अपघाताची थिअरी मानतात कारण त्यांच म्हणन असत की नेताजी जिवंत असते तर ते परत आले असते.अशाच एका प्रश्नाला दुसर्‍या वेबसाईटवर दिलेले उत्तर इथे पेस्ट करतो-
ते पुढे आले नाहीत म्हणजे ते पळपुटे झाले असे म्हणने साफ मुर्खपणाचे आहे.सावरकर विरोधकही त्यांच्यावर अंदमानानंतर काय वगैरे प्रश्न विचारुन ते स्वातंत्र्य्वईर नव्हतेच वगैरे चहाटळ बदबड करत असतात्. नेताजी पुढे का आले नाहीत याची नक्की कारणे माहीत नाहीत पण मला तरी संन्यास घेतल्यानंतर संन्याशाने जुन आयुष्य विसरायच असत हे कारण जास्त बरोबर वाटत्.बाकी ते पुढे का आले नाहीत हे त्यांनाच माहीत्.पण ते पुढे आले नाहीत म्हणजे ते अपघातातच मृत्युमुखी पडले हे मानणे जेंव्हा त्याच्याविरुध्द अनेक पुरावे उपलब्ध असुनही हे मला तरी साफ चुक वाटते.तथाकथित अपघातानंतरचे जे शरीर मिळाले होते त्यात व्यक्तिचा चेहरा दिसत नव्हता तसेच त्यानंतरही आझाद हिंद सेनेचे काही सैनिकांनी नेताजींना पाहिले होते

बघा- http://gandharvablog.blogspot.com/