मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 5:14 pm

नमस्कार.
मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर‍ मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल.
2. मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्‍या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्‍या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो. मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे.
3. ‘सांस्कृतिक महाराष्ट्र’ हा विषय स्वतंत्र पुस्तकाचा आहे. म्हणून या ब्लॉग मध्ये फक्‍त धावता आढावा घेतला आहे असंच म्हणावं लागेल.

- डॉ. सुधीर रा. देवरे

धोरणविचार

प्रतिक्रिया

चंपाबाई's picture

3 Jul 2016 - 8:42 pm | चंपाबाई

.?

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2016 - 11:53 pm | अत्रुप्त आत्मा

@@संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल.››› खाली लिंक देता ना, ब्लॉगची.. दरवेळी .. ! म्हणूनच म्हणता येईल/येते!

नाखु's picture

4 Jul 2016 - 8:50 am | नाखु

त्यांनीच सांगीतल्म ना की ते फक्त त्यांचे "अमुल्य विचारधन" देण्यासाठी मिपावर येतात अन्यथा त्यांच्याकडे इतरांचे धागे वाचायला/प्रतिसादायला अजिब्बात वेळ नाही.मुटे सरांइअतकेच बिझी आहेत ते कदाचित त्यांच्याच ओळखीतले असावेत.

तुम्ही आम्ही सामान्यजन एकमेकांचे वाचून काहीबाही खरडणारे करंटे मिपाकर.
खरं तर अश्या मौलीक आणि दशाम्गुळे व्यापुन राहणार्या माहीतीबद्दल देवरे साहबांचे तमाम मिपाकरांनी जाग्यावर (स्वतःच्या) उभे राहून आभार मानले पाहेजेत.

जय मिपा जय मिपाकर जय माझी आरती जय माझा ब्लॉग.
(देवरे सर खालची घोषणा तुम्ही उलट्या क्रमाने वाचली तरी चालेल)

खटपट्या's picture

4 Jul 2016 - 12:34 am | खटपट्या

फोटो टाका लवकर. नायतर कट्टा आभासी समजणेत येइल...

खटपट्या's picture

4 Jul 2016 - 12:37 am | खटपट्या

सॉरी धागा चूकला

विरेंद्रभौ,असा धागा चुकला ना तर लई घोळ होतो.

असा अनुभव घेतलेली
भिंगरी.

नूतन सावंत's picture

4 Jul 2016 - 8:44 am | नूतन सावंत

@ भिंगरी,तू कुठच्या धाग्यावर चुकाली नि काय घोळ झाला तेपण संगण!कमीत कमी दुवा तरी दे.

भिंगरी's picture

10 Jul 2016 - 12:18 am | भिंगरी

हा हा हा...........
मी नवखी होते तेंव्हा. , भरलेल्या खेकड्याच्या धाग्यावरची प्रतिक्रिया आणि माझ्या झटपट दहीवड्याची प्रतिक्रिया यात घोळ झाला होता. तू वाच म्हणजे तुला किती नवे पदार्थ शिकायला मिळतील.

प्रचेतस's picture

4 Jul 2016 - 8:56 am | प्रचेतस

नुसतंच गोलमाल.

वाचकांच्या जेन्युइन शंकांना ह्या धाग्यात उत्तरे असतील असं वाटलं होतं. सांस्कृतिक महाराष्ट्र ह्या धाग्यात काही चुका आहेत/ त्रुटी आहेत त्याबद्दल भाष्यही नाही.

माहितगार's picture

4 Jul 2016 - 9:00 am | माहितगार

मी उलट्या क्रमाने येतो.

१)

मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो. हे लिखाण मी ऑप लाइन करून पेस्ट करीत आहे.

माझ्या मते हा मुद्दा महत्वाचा आहे. एखादी व्यक्ती आंतरजालावर केवळ मोजक्या वेळेत शिस्तबद्द्ध ठरवलेले काम करत असेल आणि वेळेचा अपव्यय न करता आभासी जगा बाहेरच्या आपल्या उर्वरीत खर्‍या आयुष्यासाठी खर्च करत आहे आणि म्हणून इतर चर्चांमधला सहभाग कमी असेल तर अशा सहभाग मर्यादेवर केल्या गेलेल्या टिकेस काही अर्थ उरतो का किंवा कसे ?

अनेक कथा काव्य लेखक पाककृती लेखक प्रसवून निघून जातात इतरांच्या चर्चेत सहभागी होऊ शकतातच असे नाही. परिस्थीतीमुळे अथवा इतर कारणाने मौनव्रती चर्चेत सहभागी होऊ न शकलेल्या लेखक कविंवर मर्यादा सोडणार्‍या व्यक्तिगत टिकांकडे जर लेखक कवि दुर्लक्ष करत असतील तर काही वावगे आहे किंवा कसे ?

२)

मिपाचे बहुतेक सभासद इथे आपल्या खर्‍या नावाने न वावरता उर्फ नावाने वावरतात आणि प्रतिक्रिया लिहितात. आपली खरी ओळख लपून राहिल्याने अनेकदा प्रतिक्रिया मुद्देसुद न येता कोपरखळ्या मारण्यातून येत असतात, हे ही लक्षात आले. खर्‍या नावाने लिहिणे उत्तम असे माझे मत आहे. नाव लपले की नको ते बोलण्याचे धारिष्ट्य वाढते, ते चुकीचे आहे. म्हणून अनेकदा मी प्रतिक्रिया देण्याचे टाळतो.

व्यक्तीगत टिकांना प्रतिक्रीया न देणे, किंवा अगदी लेखावरील टिकेस प्रतिक्रीया न देणे हा ज्या त्या लेखकाचा अधिकार मान्य केलाच पाहीजे.

पण ओळख देऊन लिहीणारे मुद्देसूद लिहितातच आणि टोपण नावांनी लिहीणारे मुद्देसुद लिहीत नाहीत ही शुद्ध तार्कीक उणीव नाही किंवा कसे ? खुल्या मंचावर सर्व प्रकारचे टिकाकारही भेटणार कुठे उत्तर द्यायचे नाही, कुठे टोलवायचे आणि कुठे उत्तर द्यायचे हे ठरवण्याचे लेखकांना स्वातंत्र्य असावयासच हवे. टिकेस अथवा विरुद्ध मतांना हाताळता आले नाही याचा राग टोपण नाव वापरणार्‍यांवर आपणच नव्हे अनेक जण काढताना दिसतात. टोपण नावाने लिहिणारे लोक मनातील विचार आडपडदा न ठेवता लिहू शकतात मनातल्या मनात ठेवत नाहीत हि टोपण नावाने लिहिण्यातील वस्तुतः जमेची बाजू. त्यातील काही विचार चुकीचे असूही शकतात ते व्यक्त न होण्यापेक्षा व्यक्त झालेले आणि त्यांना सुसंगत उत्तरे दिली जाणे अधिक चांगले. असे माझे व्यक्तीगत मत

माहितगार's picture

4 Jul 2016 - 10:17 am | माहितगार

मिपा तल्या प्रतिक्रियांमध्ये कायम ‘ब्लॉगची जाहिरात’ असं काहीतरी माझ्या ब्लॉगबद्दल म्हटलेलं असतं. संपूर्ण ब्लॉग (लेखच) मी इथं देत असल्याने ब्लॉगची जाहिरात करतो असं कसं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे विकावू माल खपवण्यासाठी जाहिरात करावी लागते. माझे लेख म्हणजे विकाऊ माल नाही. ब्लॉगला मी कोणाचेही प्रायोजकत्व घेतले नसल्याने जितके जास्त लोक ब्लॉग वाचतील तेवढा प्रायोजकाचा फायदा होईल असंही काही नाही. म्हणून ब्लॉगची जाहिरात केली जाते असं का म्हणतात ते मला कळत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, आपले विचार मांडणे म्हणजे जाहिरात करणे असं होत नाही. लेखांतून विचार मांडलेले असतात. आणि संपूर्ण लेख जर‍ मिपावर वाचायला मिळत असेल तर माझ्या ब्लॉग साइटवर येऊन तो वाचा, असंही आवाहन मी करत नाही. म्हणून जाहिरात वगैरे म्हणणे चूक ठरेल.

मला व्यक्तिशः हा विचार तर्कपूर्ण वाटतो. वर आत्मबंध ते खाली ब्लॉगची लिंक देतात अशी टिका करतात उलट लेखन कुठून घेतले याची लिंक असेल तर कॉपीराईट इत्यादी गोष्टी तपासणे सोपे होते. सही मधून ब्लॉगची लिंक देणे तसेहि मिपाच्या धोरणात बसते.

लेखन काथ्याकुट विभागात न टाकता जनातले मनातले हा साहित्य विषयक सदरात टाकले असेल तर लेखकास चर्चा अभिप्रेत आहे असे नाही तरी सुद्धा तुम्हाला तुमचे विचार नोंदवून ठेवायचे असतील तर ठेवा उत्तर देणे न देणे हि लेखकाची मर्जी. असे माझे मत आहे.

माहितगार's picture

4 Jul 2016 - 10:41 am | माहितगार

विशिष्ट विषयाचे अभ्यासक असलेल्या व्यक्ती/लेखकांनी आपल्या अभ्यास विषयाबाहेरील विषयावर लेखन करताना संदर्भ अधिक नेमके पणाने उधृत करावेत तसेच प्रतिसादातून त्रुटी नमुद केल्या गेल्यास त्यांची मनमोकळे पणाने दखल घ्यावयास हवी.

उत्तरे देताना कोणते प्रतिसाद आणि टिका निवडायच्या हे रिव्हीजीट करणे सयुक्तीक असु शकेल किंवा कसे. अभ्यासपूर्ण प्रतिसादांकडे दुर्लक्ष होते आणि व्यक्तीगत आणि असभ्य टिकांनाच उत्तरे प्रतिउत्तरे देण्यात आपण व्यस्त होतो असे होणे टाळणे सयुक्तीक असेल का याचा विचार व्हावा.

प्रचेतस माझ्या प्रमाणेच टोपणनावाने लेखन करतात आणि इतिहास विषयातील त्यांचे वाचन आणि लेखन पुरेसे मुद्देसूद असते. ते केवळ टोपण नावाने लिहितात म्हणून त्यांच्या टिकेची मनमोकळी दखल आपण घेत नसलो तर ते उठून दिसण्याची शक्यता असू शकते हे ही लक्षात घ्यावयास हवे.

प्रतिसादांमध्ये कुठे असभ्यता अथवा बेकायदेशीर जाणवले तर ते मिपासंपादकांना व्यनीतून ध्यानात आणून देता येऊ शकते.

हे खरे की अभ्यासपूर्ण आणि व्यक्तीगत नसलेल्या टिकांची त्यांनी मनमोकळी दखल घ्यावयास हवी पण त्याच वेळी आता पर्यंतच्या मिपाचर्चेतून कठोर टिकेसमोर डॉ. सुधीर देवरे यांनी प्रतिवादात त्यांचा समतोल ढळू दिलेला दिसत नाही. त्यांच्यावर आत्मस्तुतीची टिका होते पण त्यांच्या लेखनातील विनय आणि अगत्य या जमेच्या बाजू, त्यांच्या मर्यादा काही असतील तर त्यास पुरुन उरण्यास पुरेशा आहेत किंवा कसे याचाही विचार व्हावयास हवा असे वाटते.

माहितगार's picture

4 Jul 2016 - 10:57 am | माहितगार

मुख्य अभ्यास विषया व्यतरीक्त विषयात लिहिणे आणि त्यात क्वचीत एकाच बाजूने विचार लिहिणे हे बरेच -वस्तुतः बहुतेक- जण करतच असतात -त्यात परिपूर्णता नसण्याचा दोष शिल्लक असू शकतो, सुधिर देवरे यांनी अभ्यास विषयाच्या बाहेर मते प्रकट केली अथवा एकाच विचारांची बाजू घेतली तर त्यात मला वावगे वाटत नाही, त्यांनी मांडलेल्या बाजूशी सहमती नसेल तर प्रतिसादातून मुद्देसूद मांडण्यास काहीच हरकत नाही, पण विचारांशी असहमती आहे म्हणून शीष्टाचार सोडून व्यक्तीगत टिकेवर कुणी उतरत असेल तर ते स्पृहणीय नाहीच आणि त्याकडे डॉ देवरे दुर्लक्षकरत असतील तर असे दुर्लक्ष करणे सयुक्तीक असू शकेल असे वाटते.

आदूबाळ's picture

4 Jul 2016 - 2:21 pm | आदूबाळ

माझ्या खवचट / तिरकस प्रतिक्रियेमुळे डाक्टरसाहेबांना त्रास होऊन त्यांनी हा लेख लिहिलेला दिसतोय. म्हणून जास्त विस्ताराने माझं म्हणणं मांडतो.

प्रत्येक मंचाचे आपापले गुणधर्म असतात. गुणधर्माच्या विरुद्ध काही केलं तर ते हास्यास्पद / वैतागास्पद होतं. (स्मशानात कोणी अमुक दुकानांतले पेढे फार छान असतात वगैरे सांगायला लागलं तर कसं वाटेल? किंवा बघण्यातलं उदाहरण म्हणजे अर्धग्रामीण भागांतल्या लग्नांत आसपासचे मा० आमदारसाहेब येऊन भाषणबिषण झोडतात. नवरानवरी बाजूलाच राहतात. वगैरे.)

मिपाचा गुणधर्म चर्चा करण्याचा, चर्चेची खिंड लढवण्याचा, तिरके तिरके होऊन दिसेनासे झाले तरी हिरीरीने प्रतिसाद देण्याचा आहे. बरं ते करायचं नसेल, तर किमान धाग्यावर येऊन "मला या बिंदूपुढे चर्चा करायची नाही" असं तरी सांगणं अपेक्षित आहे. पण उत्तरं न देणं, धाग्यावर न फिरकणं या लीळा केल्या तर मिपाकर झोडणारच.

इतरांचे धागे वाचा, तिथे प्रतिक्रिया द्या वगैरे सांगत नाही.

मात्र खरी गोष्ट, माझ्याकडे आंतरजालावर वावरायला इतका वेळ नाही. रोज मी सायंकाळी अर्धा तास येत असतो. इमेल करण्यासाठी आणि पाहण्यासाठी. ब्लॉग टाकतो त्या दिवशी एक तास देतो.

माझ्या वर्गात एक मुलगा होता. साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघायची, आणि नंतर सांगायचा, "मस्त पुल मारला होता, पण पट्ट्यात आला नाही रे. आला असता तर छकडीच होती."

साध्यासाध्या चेंडूंवर दांडी निघणे हा वेगळा विषय झाला -प्रत्येकाने पट्टीचाच बॅट्समन असले पाहीजे असेही नसावे - जगात तेंडूलकर आहेत आणि मला बॅटचा दांडा खाली धरायचा का फळी खाली धरायची माहीत नाही म्हणून मी कधी बॅंटींग करण्याचे स्वप्न उराशी धरुन आदूबाळच लंडी खेळतात म्हटले तर आकाश थोडेच कोसळणार आहे :)

असो माझ्या आणि अजूनही बरिच मंडळी इथे पडिक असतात म्हणजे प्रत्येकाकडे आपल्या सारखाच वेळ असेल असे गृहीत धरणे तार्कीक उणीवेचेही असू शकते किंवा कसे.

मिपावर खर्‍या/खोट्या नावाने वावरणे आणि वेळ नसणे याचा संबंध जोडला म्हणून हे लिहावंसं वाटलं. (म्हणजे: खर्‍या नावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद असणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी वेळात वेळ काढून उत्तर देणे. उलटः टोपणनावाने लिहिणे = प्रामाणिक प्रतिसाद नसणे ∴ प्रतिक्रियेला डॉ० साहेबांनी फाट्यावर मारणे.) म्हणजे, डॉ०साहेबांनी खरं/टोपणनाव असणे हे गृहितक धरून एक पुल मारला आहे. कधी पट्ट्यात येतो, कधी नाही येत.

बाकी डॉ० साहेबांकडे मिपावर व्यतीत करण्यासाठी १ मिलिसेकंद ते २४ तास या रेंजमधला कितीही वेळ असला तरी त्याला आक्षेप घेणारा मी कोण?

-----
अवांतरः "लंडी खेळणे" म्हणजे काय?

माहितगार's picture

4 Jul 2016 - 3:54 pm | माहितगार

ह्म्म.. विचारांचा (मग ते कोनतेही असोत) मुकाबला विचारांनी करणे सोडून बरीच मंडळी टोपणनावे आणि डूआयडींवर तोंडसूख घेत असतात हे मलाही तर्कदूष्टपणाचेच वाटते.
....
लंडी खेळणे म्हणजे लबाडी करणे : लहान मुले खेळताना (कि भांडताना) तक्रारीसाठी वापरतात असा एक वाक्प्रचार

शीष्टाचार सांभाळून व्यक्तीगत न होता बाकी कठोर टिका होण्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. हे.वे.सां.न.ल.

कपिलमुनी's picture

4 Jul 2016 - 3:37 pm | कपिलमुनी

तुमचा मराठी टायपिंग स्पीड किती आहे ?

माहितगार's picture

4 Jul 2016 - 3:46 pm | माहितगार

का हो ? कै चुकले काय ? स्पीड अ लिटल अबाव्ह अ‍ॅव्हरेज असावा असा माझा स्वतःचा गैरसमज पण सहसा विचार करत शोध घेत लिहिल्याने बर्‍यापैकी कमी भरतो :)

विवेकपटाईत's picture

6 Jul 2016 - 7:36 pm | विवेकपटाईत

डॉक्टर साहेब,

१. एकदा अंतर्जालावर लेख टाकल्यावर आपल्याला अपेक्षित प्रतिक्रिया कधीच मिळत नाही. आपल्याला बुआ जेवढ्या तिखट प्रतिक्रिया येतात तेवढच आसुरी आनंद मिळतो. (या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील.

२. आपल्या ब्लॉगचे नाव देणे म्हणजे आपल्या ब्लॉगचा प्रचार करणे. आपण उच्च शिक्षित आहात, आपल्याला याचा अर्थ माहितच असेल. पण त्यात गैर काय.वाचक संख्या वाढविण्यासाठी असे करावेच लागते. मिपाव धोरणात बसत असेल तर चालेल.

माहितगार's picture

6 Jul 2016 - 7:44 pm | माहितगार

या साठी पण भाग्य पाहिजेल, आपल नशीबच फुटके अश्या प्रतिक्रिया कमीच मिळतात). काही तरी मिपावकारांना बोचणारे लिहावे असे वाटते. किमान प्रतिक्रिया तरी मिळतील. आपल्या या लेखाला भरपूर प्रतिक्रिया मिळतील.

:) सहमत आहे, प्रतिक्रीया न येऊन लेखनासाठी केलेली मेहनत वाया जाणे याला मिपा भाषेत फाट्यावर मारणे (दुर्लक्ष करणे) म्हणतात. लेख दुर्लक्षीला गेला प्रतिक्रीयाच नै आली आणि डोके खाजवावे लागते, डाक्टरांना प्रतिसाद मिळताहेत उत्तरांची अपेक्षा असते त्या साठी डाक्टरांसारखे भाग्य लागते.

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 8:03 pm | सतिश गावडे

काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले.

असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो.

आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

सतिश गावडे's picture

6 Jul 2016 - 8:03 pm | सतिश गावडे

काहीतरी गरमागरम खडाजंगी वाचायला मिळणार म्हणून धागा उघडला तर नुसत्या माहितीने गार करणारे प्रतिसाद वाचायला मिळाले.

असं नाही करायचे. आमचा मूड हॉप होतो.

आणि हो, मी हा प्रतिसाद माझ्या खरोखरच्या नावाने दिला आहे.

नाखु's picture

7 Jul 2016 - 2:25 pm | नाखु

आणि खोटी खोटी नावे या साठी वेगळा काथ्याकुट मा.गावडे सरांनी ट्म्कावा ही विनंती.

अखिल मिपा असेल मुद्दा तर हुद्दा नाही तर गुद्दा या मुखपत्रातील संपादीत अंश.

संकलक नाखु

बॅटमॅन's picture

7 Jul 2016 - 11:50 pm | बॅटमॅन

त्यात काय. फेबुवरच्या ग्रूप्समध्ये खर्‍या नावाने वावरतातच की लोक. तिथेही मस्त हाणामारी चालते. मिपावर आयडी काढून येतात म्हणूनच टीका चालते वगैरे कै खरं नै कै.