अश्याच एका पावसाळ्या रात्री .........

एक एकटा एकटाच's picture
एक एकटा एकटाच in जे न देखे रवी...
24 Jun 2016 - 9:48 pm

अश्याच एका पावसाळ्या रात्री,
जेव्हा ती मला भेटली होती
लखलखत्या काळोखात,
तेव्हा तिच्या कानातली चांदणी चमकली होती

एकुलत्या एका शेडखाली
मला खेटुन ती उभी होती
अन माझ्या नकळतच्या स्पर्शाने
तिची ओली काया शहारत होती

बाहेर रस्त्यावरती पाउस मात्र,
एकसारखा कधीचा कोसळत होता
मला वाटलं की तोही तिच्यासाठीच
आज ज़रा जास्तीचा रेंगाळत होता

वाटलं की तिला कवेत घेउन
ह्या पावसात चिंब भिजावं
मिठीत तिच्या विरघळून जावं
अन स्वता:लाही विसरावं

ढगांच्या गडगडाटांनी घाबरून
ती अशी काही मला बिलगावी की,
हि धरणीही त्याला अशी कधी भेटत नाही,
पाहून त्या पावसाचीही जिरावी

पाउस ही आता जरा
जास्तच इरेला पेटला होता
वाऱ्याला हाताशी धरुन
आता खोलवर घुसखोरी करत होता

पण त्या वेड्याला ठावूक नव्हते की,
त्याची हि घुसखोरी माझ्या पथ्यावर पडत होती
तो जेव्हढा खोलवर घुसत होता,
ती तितकीच मला जास्त उमगत होती

त्यावर तो चिडला, चवताळला, वैतागला
शेवटी थकून विसावला
तशी ती माझ्यापासून दूर झाली
अन माझ्या स्वप्नांचा डोलारा कोसळला

मी काही बोलणार न बोलणार
इतक्यात तिची पाठमोरी काया दृष्टीआड झाली होती
अन ही धुंद संधी दवडल्याबद्दल
मग त्या पावसानेही मला शिव्याचीं लाखोली वाहिली होती

अश्याच एका पावसाळ्या रात्री
जेव्हा ती मला भेटली होती........

कविता

प्रतिक्रिया

स्पा's picture

24 Jun 2016 - 9:56 pm | स्पा

एखादी भयकथा येऊदे आता

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2016 - 10:40 pm | अत्रुप्त आत्मा

मी पांडुशी शमत हाय. भयकथाच पायजे अ'ता!

लखलखता काळोख ही उपमा-उपमेय जोडी समजली नाही. बाकी कविता छान.

किसन शिंदे's picture

26 Jun 2016 - 3:32 pm | किसन शिंदे

लखलखता काळोख??

क्षणात वीज चमकून काळोख लखलखतो.

खटपट्या's picture

29 Jun 2016 - 2:38 am | खटपट्या

ओके.

नाखु's picture

29 Jun 2016 - 10:35 am | नाखु

कवी तीला शोधतोय/आठवतोय आणि तुम्ही काळोखालाच कवटाळून बसलात ते, मिपा शारूखच्या* पुढच्या भयकथेत तुम्हाला भींतीतल्या भुताची जागा देण्यात येईल.

मिपा शारूखच्या* हे नामानिधान जुण्या आणि जाणत्या मिपाकराने दिले आहे तस्मात त्याचे निर्माते आम्ही नाहीत याची नोंद घ्यावी.

खुलासेदार नाखु

एक एकटा एकटाच's picture

7 Jul 2016 - 11:27 pm | एक एकटा एकटाच

मिपा

शारुख
?????????????

सूड's picture

29 Jun 2016 - 9:14 pm | सूड

बर्‍यापैकी

वटवट's picture

30 Jun 2016 - 10:25 am | वटवट

एक पोरगी संध्याकाळी, नाक्यावरती पहिली होती.... सारखं वाटलं एकदम

एक एकटा एकटाच's picture

4 Jul 2016 - 8:32 am | एक एकटा एकटाच

प्रतिसादासाठी मनपुर्वक आभार

खरतर ही कविता जुनी आहे.
कॉलेजमधे असताना लिहिलेली.

इंजिनिअरिंग करताना पनवेल ते बोरीवली अप डाउन करायला लागायचं. तेव्हा बेलापुरला ट्रेन सोडुन पुढचा प्रवास बेलापुर पनवेल एस टी ने करावा लागायचा.

तेव्हा एक मुलगी मला नेहमी सकाळी बेलापुर एस टी स्टेंडवर दिसायची. ती बहुतेक भारती विद्यापीठमधे शिकत असावी कारण नेहमी त्या स्टॉप पर्यंत तिची मला सोबत असायची.

छान होती "ती" दिसायला. गोल चेहरा, कुरळे केस, तपकिरी डोळे, पाठीवर बेग आणि कानात हेडफ़ोन. बर्याचदा जिन्स आणि कुर्ता ह्या पेहरावात असायची. कधी कधी कुर्त्याच्या जागी टी-शर्ट ही असायचा पण जीन्स ही फिक्स होती. स्टॉपच्या एका टोकाला टेकून गालावर रुळणाऱ्या तिच्या बटांचा कुरळेपणा आपल्या बोटांनी अजुन वाढवत असायची. मी त्या स्टॉपच्या दुसऱ्या टोकाला उभा राहून तिला त्रास होणार नाही ह्याची काळजी घेत जितक शक्य तितक जास्त तिला न्याहाळत असायचो. ती आपल्याच धुनकीत असायची, सारखी गुनगुनत असायची. मी तिला असं चोरून पहाताना कधीकधी अचानक ती माझी नजर पकडायची. मग मी घाबरून जायचो. पुढले काही क्षण तिच्याकडे पहायचोच नाही.

पण पुन्हा ये रे माझ्या मागल्या.

माझ्या अश्या चोरून पहाण्याच तिला नक्की काय वाटत होत हे मला माहीती नाही. पण एक दोनदा मला असं जाणवलं होतं की तिने माझी चोरी पकडल्यावर माझी होणारी गडबड बघून ती गालातल्या गालात हसायची बहुतेक.

हळूहळु मी स्टॉपवर तिच्या अगोदर येउ लागलो. आज ती कुठल्या रंगाचा ड्रेस घालून येईल ह्याचे अंदाज बांधु लागलो. एखाद दिवशी ती नेहमीच्या वेळेवर नाही आली तर तिच्या येण्याच्या आशेवर एक दोन एस टी सोडु लागलो. ती आली नाही दिवस फार वाईट जायचा माझा.

मला बर्याचदा वाटायच की आपण बोलावं तिच्याशी. पण कधी तसा चान्स मिळाला नाही तर कधी चान्स होता तर हिम्मतच झाली नाही. हां सिलसिला वर्षभर चालला. पण बेलापुराच्या बस स्टॉप मधल्या त्या दोन टोकांमधलं अंतर कधीच कमी झालं नाही.

आणि अचानक मग एका दिवसानंतर तीच येणंच बंद झालं. एक दिवस...दोन दिवस....एक आठवडा...महीना........मी मात्र तिच्या वेळेवर नेहमी हजर असायचो मी वेळाही बदलून पाहिल्या पण ती पुन्हा कधी दिसलीच नाही. स्टॉपच्या त्या रिकामी टोकाला विचारावसं वाटायच की," तुला तरी ती काही बोलली का? की परत कधी येणार आहे?".

पण तो काही बोलला नाही......

बहुतेक त्यालाही ती न सांगताच गेली होती.......माझ्यासारखी

आता कधी पुन्हा त्या स्टॉपवरुन गेलो की पुन्हा ती आठवते. तशीच स्टॉपच्या एका टोकाला उभी राहून गालावर रुळणार्या बटांना आपल्या बोटांनी अजुन कुरळे करताना. पण आता मी तिच्याकडे चोरून पहात नाही अन तीही मी तिच्याकडे असं चोरून पहातो म्हणुन लपून हसत नाही.

- एक एकटा एकटाच

(ह्या कवितेतले काही संदर्भ त्यावेळच्या माझ्या तिच्याबद्दलच्या फ़ेंटसी नुसार मी मुदामुन बदलले होते. जसे बसस्टॉपची शेड केली. दिवसाची रात्र आणि रोमान्स वाढवायला थोडा "पाउस" आणला.

माझी "तुझी वाट बघता बघता..." ही कविताही जेव्हा मला जाणवलं की "ती" मला बहुतेक आता कधीच ह्यापुढे दिसणार नाही तेव्हा लिहिली होती......

मला माहीतीय की सिच्युअशन फ़िल्मी वाटत असली तरी ह्यातली माझी "हिरोईन" मात्र खरी होती.)

प्रमोद देर्देकर's picture

5 Jul 2016 - 7:27 pm | प्रमोद देर्देकर

आवडली.