योग दिवस २०१६

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
21 Jun 2016 - 1:06 am

आजच्या योग दिवसाच्या सर्वांना हार्दीक शुभेछा!!
आपल्यापैकी अनेक जण भारतात किंवा भारताबाहेर आपापल्या शहरात योग दिवसात सामिल होणार असेलच! या धाग्यावर त्यांचे फोटो अनुभव नोंदऊन योग दिव साजरा करावा असे वाटते.
सुरुवात माझापासूनच करतो..
सध्या योग प्रशिक्षक म्हणून वास्तव्य बगोटा कोलंबिया येथे आहे. मात्र योगदिवसाचा वर्ग घेण्यासाठी ५०० कि.मी दूर मेडेजिन या शहरात गेलो होतो त्या ही क्षणचित्रे...
r

ya

ew

rt

tr
yt

संस्कृतीअनुभव

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

21 Jun 2016 - 1:11 am | राघवेंद्र

अरे वा, योग दिन साजरा पण झाला का?

लाल टोपी's picture

21 Jun 2016 - 1:15 am | लाल टोपी

ब-याच देशांत २१ जून, मंगळवार, हा सुट्टीचा दिवस नसल्यामुळे १९ जून रविवार याच दिवशी योग दिवस साजरा करण्यात आला. तसे पाहिले तर कोलंबिया भारताच्या साडेदहा तास मागे आहे.

रेवती's picture

21 Jun 2016 - 5:22 am | रेवती

छान फोटू आहेत.
मीही योग दिवस साजरा केला..............फेसबुकातील योगाचे फोटू पाहून!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2016 - 5:42 am | डॉ सुहास म्हात्रे

उत्तम काम चालले आहे तुमचे ! सुंदर फोटो !

कोलंबियासारख्या दूरवरच्या देशात लोक योगासने करत असल्याची चित्रे पाहून आनंद झाला !

पद्मावति's picture

21 Jun 2016 - 2:02 pm | पद्मावति

वाह खूपच छान!
एक विनंती- कोलंबिया वर एखादी लेखमाला येऊ द्या. तिथल्या पर्यटन, संस्कृती आणि लोकांबदद्ल वाचायला आवडेल.

अभ्या..'s picture

21 Jun 2016 - 3:10 pm | अभ्या..

मस्त हो लालटोपी सर.
आम्ही पण शासकीय मैदानावर साजरा केला. अ‍ॅक्चुअली मी योगाला नव्हे तर रनिंगला जातो. सो गुरुजींसोबत थोडे थोडे योगसाधन.

फोटो मात्र नाहीत.

पिलीयन रायडर's picture

21 Jun 2016 - 6:52 pm | पिलीयन रायडर

योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां, पतंजलि प्रांजलिरानतोऽस्मि।।

योगसुत्रांमधुन मनाचा, व्याकरणशास्त्रातुन भाषेचा ( अष्टाध्यायी ग्रंथ) आणि वैद्यकशास्त्रातुन शरीराचा दोष दुर करणार्‍या (आयुर्वेद) श्रेष्ठ मुनी पतंजलींना मी हात जोडुन नमस्कार करते.

ह्या श्लोकाने आम्च्या योगासनांच्या वर्गाची सुरवात व्हायची. अमेरिकेत जिकडे तिकडे योगासनांचे वर्ग दिसतात पण अनेकदा तिथे वर्कऑट होतो, आसनं नाही. मोठ्या आवाजात गाणी लावुन त्यावर सेट्स करण्याला योग म्हणवत नाही. इथे एखादा अयंगार योग शिकवणारा क्लास असेल तर फार बरं होईल.

एक प्रश्न आहे. मी ३-४ महिने शिकलेलेल आहे त्यामुळे आसनं माहिती आहेत, पण प्राणायम मात्र नीट शिकायचा राहुन गेला. पुस्तक वाचुन अथवा व्हिडिओज पाहुन प्राणायाम करावा का?

लाल टोपी's picture

21 Jun 2016 - 7:56 pm | लाल टोपी

अगदी सुरुवातीला प्रशिक्षण घेताना शिक्षकाची उपस्थिती, मार्गदर्शन आवश्यक आहे तुमच्या क्षमता, शरीराची जडण घडण यानुसार शिक्षकाकडून शिकून घेल्यानंतर आपण पुस्तके किंवा इतर माध्यमांच्या सहाय्याने पुढील अभ्यास करु शकता सुरुवातीला मात्र योग्य शिक्षकाकडून शिकणे खरंच गरजेचे आहे.

बोका-ए-आझम's picture

21 Jun 2016 - 9:56 pm | बोका-ए-आझम

तुम्ही मेडेलिनमध्ये म्हणजे एकदम ऐतिहासिक शहरात आहात. एकेकाळी हे शहर ड्रग्जच्या साम्राज्याची राजधानी होती. पाब्लो एस्कोबारचं मेडेलिन कार्टेल आणि ओचोआचं काली कार्टेल म्हणजे जागतिक ड्रगलाॅर्ड होते.

काव्यगत न्याय कि आयरनी काय म्हणतात ते.
जिथे योगाचा उगम झाला असे मानतात त्या सुपीक भागावर उडता पंजाब काढावा लागतोय.

बोका-ए-आझम's picture

22 Jun 2016 - 11:41 pm | बोका-ए-आझम

:(

लाल टोपी's picture

21 Jun 2016 - 10:48 pm | लाल टोपी

ड्र्ग माफिया आणि कोलंबिया नाते तसे जुनेच आहे. पण माझी पोस्टींग मेडेजिन (स्थानिक उच्चार) ला नसून बगोटा येथे आहे केवळ योग दिवसाचा वर्ग घेण्यासाठी तेथे गेलो होतो.

सुधीर's picture

22 Jun 2016 - 10:46 pm | सुधीर

मस्त! चार महिन्यांच्या गॅप नंतर या महिन्यात पुन्हा चालू केलाय. पण सकाळी अंग थोडं सुस्तावलेलं असतं. मागच्या वर्षी तुम्ही दिलेल्या पुस्तकांच्या (अय्ंगार) पिडीएफ मध्ये एक उपाय असा होता की आंघोळ करून योगा चालू करावा. पण सकाळी दोनवेळा आंघोळ करण्याची चैन परवडणारी नाही आणि संध्याकाळी वेळ मिळत नाही. त्यामुळे सकाळी जसा जमेल तसा करतो.

सत्याचे प्रयोग's picture

22 Jun 2016 - 11:08 pm | सत्याचे प्रयोग

योग करुन आपणास सुस्तावा येत असल्यास तुमची काहीतरी चूक होत आहे. एकदम ताजेतवाने होते योग केल्याने. मी रामदेव बाबांचे शिबिराला सुट्टी टाकून पहाटे 4ला गेलो होतो वाटले थकवा येईल पण दिवसभर अजिबात थकवा नाही की सुस्ती नाही. उगीच सुट्टी घेतली वाटले. तेव्हापासुन योगा अंगीकारलाय

लाल टोपी's picture

23 Jun 2016 - 7:32 pm | लाल टोपी

दोन वेळा आंघोळ करायची गरज नाही, ईतर व्यायाम प्रकारांप्रमाणे योगाभ्यास केल्यानंतर घाम येत नाही. खरंतर श्वासोश्वासाची गती देखील बदलत नाही त्यामुळे योगाभ्यासानंतर आंघोळ करायची गरज नाही. तरीपण अभ्यास चालू ठेवा.

सुधीर's picture

23 Jun 2016 - 10:14 pm | सुधीर

माझ्या पूर्वीच्या ऑफिसातल्या प्रशिक्षकाने पावर योगा शिकावला होता... फक्त आठवढ्याचा एक दिवस... त्यात सूर्यनमस्कार जास्त होते. (जास्त म्हणजे १२) बाकी स्ट्रेचिंग एक्सरसाईज काही सेकंद अधिक आणि भरभर असायची. असो...
@सत्याचे प्रयोग योगा करून झाल्यावर नाही .... करण्या अगोदर सकाळी उठल्यावर स्नायू तितकेसे स्ट्रेच होत नाहीत जितके ते संध्याकाळी होतात.
बाकी योगा मध्ये मी हे एक अनुभवलं आहे की प्रशिक्षक बदलला तर चुकल्या चुकल्या सारखं वाटतं.

कैलासवासी सोन्याबापु's picture

23 Jun 2016 - 10:37 am | कैलासवासी सोन्याबापु

तुमचं कौतुक करावं तितकं कमी पडेल ही भावना ते फोटो पाहून झालेली आहे, आपले हार्दिक अभिनंदन अन पुढील योगकार्याकरता भरभरून शुभेच्छा

आपले हार्दिक अभिनंदन अन पुढील योगकार्याकरता भरभरून शुभेच्छा

+११११ हेच बोल्तो..!!

लाल टोपी's picture

24 Jun 2016 - 7:55 pm | लाल टोपी

सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार!
अभ्या, सोन्याबापू 'सर' नका म्हणू हो! आपल्या सर्वांचा मित्र म्हणुन राहण्यात जास्त आनंद आहे.
पद्मावती, कोलंबिया खरोखरच खूप सुंदर देश आहे. याबद्दल मालिका लिहायला सुरुवात केली आहे एक दोन आठवड्यात मिपावर येईल अशी धमकी देऊन ठेवतो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jun 2016 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवड्लं.

-दिलीप बिरुटे