अस्तित्व...
द्वेषाच्या वडवानलात
किनारा जळुन खाक होत आहे.
प्रश्न सागराचा नाही
किना-याच्या अस्तित्वाचा आहे.
अहंकाराच्या वणव्यात
वनराईचा कोळसा होत आहे.
प्रश्न माळारानाचा नाही
वटवृक्षाच्या अस्तित्वाचा आहे.
मत्सराच्या अग्नीमध्ये
हृदय पोळुन निघत आहे.
प्रश्न शरीराच्या एका भागाचा नाही
हृदयातील प्रेमाच्या अस्तित्वाचा आहे.
अमंगल कृष्णमेघांनी
आकाश व्यापून टाकले आहे.
प्रश्न अंधाराचा नाही
धरणीच्या अस्तित्वाचा आहे.
प्रतिक्रिया
24 Jan 2009 - 1:52 pm | अवलिया
कवितांच्या भडीमारात
वाचकांची दमणुक होत आहे
प्रश्न मिपाचा नाही
कवीच्या अस्तित्वाचा आहे
अहो काय बुंदिचे लाडवासारख्या कविता पाडताय.... एक एक वाचु तर द्या.
बाकी आम्हाला कवितेतले काही *ट कळत नाही हे जगजाहिर आहे.
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 2:01 pm | अंकुश चव्हाण
तुमच्या प्रतिक्रियेवरुनच तुम्हाला किती आणि काय कळते ते समजले.
असो प्रतिक्रियेबद्दल मी तुमचा आभारी आहे. दुसरी गोश्ट म्हणजे माझे अस्तित्व मिपा मिंवा तुमच्यासारख्या टिकाकारांच्या टिकेवर नक्कीच अवलंबुन नाही. त्यामुळे तुम्ही माझ्या अस्तित्वाची काळजी करु नका.
आणि जर वाचताना एवढाच त्रास होत असेल तर वाचु नका.
तुमच्या सारख्या प्रकांड पंडीतांना उलट उत्तर देण्याची ध्रुष्टता केल्याबद्दल पामराला मोठ्या मनाने (?) क्शमा करा.
24 Jan 2009 - 2:05 pm | दशानन
सहमत.
नवकवींना प्रोत्साहन देणे सोडून त्याचा हिरमोड करण्याची भाषा अवलिया तुम्हाला शोभत नाही... :( अतीव दुखः झाले माला हे पाहून !
बाकी,
चव्हाण साहेब ही कविता सुध्दा सुंदरच आहे !
आवडली.
फुलेशु !
लिहीत रहा !
आई जगदेबेंचा असाच वरद-हस्त तुमच्यावर लाभो !
जय महाराष्ट्र !
24 Jan 2009 - 2:11 pm | अवलिया
नवकवींना प्रोत्साहन देणे सोडून त्याचा हिरमोड करण्याची भाषा अवलिया तुम्हाला शोभत नाही... अतीव दुखः झाले माला हे पाहून !
खरे आहे. पण अशा रितिने तयार केलेले कवीच पुढे जगाच्या बजबजपुरीत टिकतील ना? की केवळ मनातले मनोगत मनातच ठेवुन वा वा छान छान असेच लिहायचा उपक्रम अंगिकारला तर मायबोलीच्या सेवेला नवीन कवी कसे मिळतील. आणि असे कवी तयार झाले नाही तर मिसळपाव खाता खाता कशावर चर्चा करणार?
चव्हाण साहेब ही कविता सुध्दा सुंदरच आहे !
आवडली.
मी कविता खराव आहे असे म्हटलोच नाही, कारण मला काही कळतच नाही
मी फक्त दमादमाने घ्या असे म्हटलो. कविराज हिरमुसले त्याला मी काय करु?
लिहीत रहा !
आई जगदेबेंचा असाच वरद-हस्त तुमच्यावर लाभो !
जय महाराष्ट्र !
हेच म्हणतो
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 2:15 pm | दशानन
>>>खरे आहे. पण अशा रितिने तयार केलेले कवीच पुढे जगाच्या बजबजपुरीत टिकतील ना? की केवळ मनातले मनोगत मनातच ठेवुन वा वा छान छान असेच लिहायचा उपक्रम अंगिकारला तर मायबोलीच्या सेवेला नवीन कवी कसे मिळतील. आणि असे कवी तयार झाले नाही तर मिसळपाव खाता खाता कशावर चर्चा करणार?
तुमचं मत बरोबर आहे साहेब, पण तुम्ही ज्या पध्दतीने प्रतिसाद दिला त्यानुसार नव-कवीचा हिरमोड होऊ शकतो, भावनेची कदर करा हेच म्हणेन मी !
बाकी,
आई भवानी तुमची ही मदत करो व कवितेतील गोडी तुम्हाला ही चाखावयास मिळो हीच अपेक्षा.. अजून काय लिहू !
लोभ असावा.
सुताराम सुटणे.
24 Jan 2009 - 2:18 pm | अवलिया
तुमचं मत बरोबर आहे साहेब, पण तुम्ही ज्या पध्दतीने प्रतिसाद दिला त्यानुसार नव-कवीचा हिरमोड होऊ शकतो, भावनेची कदर करा हेच म्हणेन मी !
मला लेखनकला नीट अवगत नाही. मी अजुन शिकत आहे. संभाळुन घेणे.
आई भवानी तुमची ही मदत करो व कवितेतील गोडी तुम्हाला ही चाखावयास मिळो हीच अपेक्षा.. अजून काय लिहू !
आई भवानी कडे दुस-या कवितेची गोडी मागितली आहे. बघु...
लोभ असावा.
आहेच
सुताराम सुटणे.
संभाळा. दुसरेच काही सुटेल
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
29 Jan 2009 - 7:50 pm | नितिन थत्ते
मी कविता खराब आहे असे म्हटलोच नाही, कारण मला काही कळतच नाही
हे वाक्य अंकुशना लागले असावे, कारण यातून तुम्ही कविता समजून न घेताच प्रतिक्रिया देत आहात असे वाटते.
थोडा लगाम.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
29 Jan 2009 - 7:55 pm | नितिन थत्ते
काल आणि आज मध्ये जरा जास्तच कविता आल्या. त्यामुळे वैतागले असतील.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
24 Jan 2009 - 2:12 pm | दिपक
कविता छान आहे. आणि अवलिया ह्यांनी चेष्टेने म्हंटले असावे.. कवी अकुंश राग मानु नका.. येउद्या अश्याच चांगल्या कविता...:)
पु.क.क.शु
24 Jan 2009 - 2:13 pm | अवलिया
बघा तुम्हाला कळले ते कविराजांना नाही समजले...
कविराज असे नाराज नका होवु बुवा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
24 Jan 2009 - 6:57 pm | अंकुश चव्हाण
नमस्कार,
तुमच्या उत्स्फुर्त (?) आणि प्रोत्साहनपर (?) प्रतिक्रियांबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुम्हाला जर मिसळपाव खाता खाता कविता वाचायच्या असतील तर अन्य पर्याय आहेत. माझ्या मते मिसळपाव.कोम हे एक खुले व्यासपीठ आहे जेथे कोणीही काहीही बोलु शकतो. अर्थातच त्याचा गैरफायदा घेणारेही आहेतच. त्यांमध्ये तुम्ही माझे नाव घेतलेत तरीही चालेल कारण तुम्ही या उप्पर काहीच करु शकत नाही. निदान यामुळे मिसळ्पाव या संकेतस्थ्ळावर कोणत्या प्रकारची माणसे येतात ते तरी समजले.
टीका योग्य शब्दांमध्ये केली तरच ती गोड लागते.
निरोपाची वेळ आहे. निरोप द्या.
क्रुपया मिसळपाव.कोम च्या सर्वेसर्व्यांनी माझे खाते बंद करावे ही विनंती. कवडीचुंबक लोकांबरोबर रहायची मला अजीबात इच्छा नाही.
क्शमा असावी.
24 Jan 2009 - 6:59 pm | दशानन
मित्रवर्य,
असा त्रागा करुन घेऊ नका !
असल्या लोकाच्या कडे दुर्लक्ष करुन आपले लेखन चालू ठेवा... हेच सांगतो !
मी राहीलात गेला तर मिपाला काहीच फरक पडत नाही पण मिपामुळे तुमच्या जिवनात चांगलाच फरक पडेल तेव्हा कृपया राग मानू घेऊ नका, काहीच फायदा नाही .. बाकी आपली इच्छा - प्रभु वाणी !
*******
सध्या आम्ही ... ह्यावर नाचतो आहोत !!!
अफलातून गाणं आहे... ए.आर. रहमान जबरदस्त !
24 Jan 2009 - 7:01 pm | अवलिया
कविराज
असा त्रागा करुन घेवु नका
मी 'तसलाच' आहे असे समजुन करा थोडे दुर्लक्ष
बघा.... पटत असेल तर चालु ठेवा लेखन...
मी तुम्हाला प्रतिसाद देत नाही... बास?
चालु ठेवा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
29 Jan 2009 - 7:59 pm | नितिन थत्ते
अवलियाजी,
श्रेयाताईंनी म्हटल्याप्रमाणे वाचू वाटलं वाचावं, प्रतिसाद द्यायची काही गरज नाही.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
25 Jan 2009 - 1:01 pm | सुचेता
हे काय झाले ??
डास झाले म्हणुन घर जाळायला का निघाले ??
25 Jan 2009 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अहंकाराच्या वणव्यात
वनराईचा कोळसा होत आहे.
प्रश्न माळारानाचा नाही
वटवृक्षाच्या अस्तित्वाचा आहे.
वरील चार ओळी विशेष आवडल्या. लिहित राहा !
-दिलीप बिरुटे
29 Jan 2009 - 3:33 pm | श्रेया
=D> सुंदर आहे
29 Jan 2009 - 7:53 pm | शंकरराव
अवलियच्या प्रतिसादांनी
मिसळ्पाव व्यापून टाकले आहे
प्रश्न अस्तित्वाचा नाही
कविराजांच्या मनाचा आहे
शंकराव
लिहीत राहा हो अंकुशपंत
काय पण हा रुसवा...
(आता ह्या रुसव्या वर एक काव्य खरड्तो )
29 Jan 2009 - 8:04 pm | नितिन थत्ते
कवीवर्यांनी गमन केलेले दिसते (रागावून?)
अवलियाचा जाहीर णीशेद.
खराटा
(येथे उत्तम काथ्या बारीक कुटून मिळेल)
23 Oct 2023 - 10:10 pm | रंगीला रतन
व्वा मस्त.