..मला मात्र पत्नी गोरी हवी..
-------------------------------------
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी
जरा घेऊ वीम्याचा फायदा.
घरी एक साधी चोरी हवी.
( मला चोर अट्टल मानेन मी.
तिच्या स्पंदनांची चोरी हवी..)
असे एक संधी निसटायची.
जवळ फक्त बळकट दोरी हवी.
तुला भोगतो मी की तू मला?
कशाला हि मग शिरजोरी हवी?
हुश्श..आत घुसलो मी शेवटी
नको आणखी घुसखोरी हवी
किती प्रेम त्याचे काट्यांवरी
सरण म्हणुन बाभळिबोरी हवी.
---------------------------
+ कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
11 Jun 2016 - 2:17 pm | अविनाशकुलकर्णी
आवडली
11 Jun 2016 - 2:18 pm | अभ्या..
अं हं.
नोप्स
11 Jun 2016 - 2:18 pm | मारवा
तशी शक्यतोही कोरी हवी.
मला मात्र पत्नी गोरी हवी
इथे जो "कोरी" शब्द वापरला आहे तो कोणत्या अर्थाने आहे नेमका ?
"व्हर्जीन" या अर्थाने आहे की दुसरा कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे ?
त्यावर पुढच म्हणण अवलंबुन आहे.
11 Jun 2016 - 2:56 pm | कानडाऊ योगेशु
दुसर्या ओळीतली गरज जितकी जास्त त्याप्रमाणे कोरीचा अर्थ बदलु शकतो.!
11 Jun 2016 - 4:29 pm | पियू परी
इथे जो "कोरी" शब्द वापरला आहे तो कोणत्या अर्थाने आहे नेमका ?
"व्हर्जीन" या अर्थाने आहे की दुसरा कोणता अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे ?
त्यावर पुढच म्हणण अवलंबुन आहे.
11 Jun 2016 - 3:44 pm | मारवा
मग मात्र प्रकरण गंभीर आहे.
11 Jun 2016 - 7:08 pm | जव्हेरगंज
खिक्क!
12 Jun 2016 - 12:55 pm | रातराणी
नाही कळली :(