उगा आग्रहाने बोलावले.
किती आज तेही सोकावले.
कुठे चोर दडला अकस्मात तो?
कुणी दार माझे ठोठावले..!!!
पुन्हा झूळुकिशि सख्य सांधले
पुन्हा एक वादळ घोंघावले.
तिचे बेत होते,तिला धार्जिणे.
तिने बेत माझे धुडकावले.
चितेला म्हणालो आईच तू!
किती छान मजला जोजावले.!
थव्यामागुनि निघाले थवे
कुणी दगड आत भिरकावले?
असो देव वा तू तत्सम कुणी.
असे कोण मजला रे पावले?
किती काळ मजला झुंजावले
अता दु:ख माझे थंडावले.!
जुन्या वेदनेने लळा लावला
सुखाला नव्या मी हुसकावले!
कुणी भक्त ना पावण्या जोगता
वरी देव सारे सुस्तावले!
सुखाला म्हणालो सरक ना पुढे!
किती सभ्यतेने गुरकावले!
किती घोषणा अन किती योजना
किती लोक सारे भांबावले!
समजलेच नाही मलाही तसे
(कुणाला कसे मीच समजावले?)
प्रिये योग झाला संभोग हा..
असे एकमेकास भडकावले!
सुदर्शन नको अन गीता नको
इथे बासरीनेच नादावले.
------------
अवांतर :
मिळाली तयाला मते भोपळा
उगा चिन्ह का भोपळा लावले!
तुझी चुंबने धुंद व्हॅम्पायरी
कुणी ड्रॅक्युला का तुला चावले
+ कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
28 May 2016 - 9:22 pm | जव्हेरगंज
..कुणी दार माझे ठोठावले..>>>>
मग उघडा की मालक, उगाच काव्य का म्हणून प्रसवले..
;)
28 May 2016 - 11:45 pm | कानडाऊ योगेशु
.
हॅ हॅ हॅ. इट वॉज अॅन अक्सिडँट असे समजा हवे तर.
ह्यावरुन एक पुणेरी मायलेकीचा अतिशय चावट कायप्पा जोक आठवला. ;)
शुभ वीकांत.
29 May 2016 - 4:49 am | चांदणे संदीप
ज ब र द स्त
S a n d y
29 May 2016 - 12:29 pm | प्रचेतस
भारीच झालेय.
योगेशु सध्या फॉर्मात आहेत.
15 May 2018 - 11:46 pm | रातराणी
चितेला म्हणालो आईच तू!
किती छान मजला जोजावले.!
_/\_ अप्रतिम !!