" मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही आणि मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुख साध्य होण्याजोगं आहे."
मी अलीकडे गोव्याला गेलो होतो.विमानात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेले गृहस्थ गोव्यातले स्थाईक रहिवाशी होते.माझं त्यांच प्रवसात बोलणं झालं त्यावेळी मला हे कळलं. त्यानी माझ्या गोव्यातल्या मुक्कामात दोन दिवस वेळ काढून आपल्या गावात येण्याचा आग्रह केला.मला सुद्धा गोव्यातल्या खेडेगावात जायला आणि जाऊन राहायाला अंमळ बरं वाटतं. मी त्याना येण्यापूर्वी फोन करून कळवतो असं सांगितलं.एक दिवस वेळात वेळ काडून मी त्यांच्याकडे दोन दिवस राहायला गेलो होतो.
गोव्याचे लोक उपजतच प्रेमळ आणि पाहूण्याचं आदरातिथ्य करण्यात अगदी कसबी.मुळात एकच दिवस राहायला जाण्याचा मी बेत केला होता.पण त्यांच्या प्रेमळ आग्रहाला बळी पडून आणखी एक दिवस राहिलो.
त्यांच कुक्कुटाचं फार्म अप्रतीम होतं.तसंच जवळच त्यांच राहाण्याचं टुमदार घर पण सुंदर होतं.
सहाजीकच मी त्यांना ह्या व्यवसायात कसे उद्दुक्त झाला?म्हणून प्रश्न केला त्यावर ते मला म्हणाले,
"काही वर्षापूर्वी मी आणि माझ्या एका मित्राने मिळून गोव्याजवळ एका खेड्यात थोडी जागा घेऊन एक छोटसं कुक्कुट फार्म काढायचं ठरवलं.बरोबरीने जवळ पास एक छोटसं घर असावं म्हणून स्थानीक वस्तीतल्या एका माणसाला घर बांधायचं कंत्राट दिलं.त्यावेळी आम्ही त्याच्या बरोबर खर्चाचा विषय काढला नाही.आम्हाला माहित होतं की तो इमानदार आहे.अतिशय गरिबीत दिवस काढल्याने शाळेतलं शिक्षण न झाल्याने त्याला जेमतेम वाचायला यायचं.पण तसा तो हुषार होता.अनुभवाचा आधार घेऊन त्याने योजना आखून ते घर बांधलं.घर छान होतं.इमान ठेऊन बांधलं होतं.अगदी मजबूत घर होतं.जसं आम्हाला हवं होतं तसं.
पण जेव्हा त्याने आम्हाला सर्व खर्चाचं बिल दिलं तेव्हा मला धक्काच बसला.त्याचा एकूण खर्च इतका कमी होता ते पाहून मी त्याला म्हणालो,
"हे बघ,तुला ह्यात कसलाच फायदा दिसत नाही"
त्यावर तो गृहस्थ शांतपणे म्हणाला,
"मला भरपूर फायदा आहे.मला आणखी काहीही नको."
आणि बिलाच्या बाहेर तो एक पैसाही घ्यायला तयार नव्हता.
आमच्या घराच्या समोर रस्ता ओलांडल्यानंतर तो राहयाचा.त्याचं छोटसं घर होतं. बायको मुलांबरोबर तो राहायचा.लहानसहान कामं करायचा.कधी त्याची तक्रार नसायची.जरी कठीण परिस्थितीतून त्याला जावं लागलं तरी तो नेहमीच सदासुखी दिसायचा.
एक गीतेचं मोठ्या अक्षरातलं पुस्तक त्याच्या जवळ पाहिलं.वाचणं त्याच्या हाताबाहेर होतं.पण एक एक शब्द हळू हळू उच्चारून तो एक एक अध्याय वाचायचा.आणि त्याउप्पर गीतेतल्या निर्देश केलेल्या उपदेशाप्रमाणे रहायचा.मी त्याला विसरूंच शकत नाही.माझ्या पहाण्यातला हा खराच सुखी माणूस होता.हे बघूनच मला सुचलं की,बुद्धिमान आणि दोषदर्शी लोक त्याच त्याच सांगितलेल्या गोष्टीचं प्रकटन करीतच असतात की सुखाचा उद्देश्य साध्य होणं महाकठिण असतं.खरंतर अतिबुद्धिमान लोक सुद्धा चुकी करू शकतात.मी मानतो की,दुःख,विफलता आणि निराशा असूनही मानवाला ते सोसावं लागत असतानाही सुखही साध्य होण्याजोगं आहे.मला वाटतं सर्व जगातले आपआपल्या प्रांतातले अनेक स्त्री आणि पुरूष सुखी पण असण्याचा संभव आहे.जसा हा माझा समोरचा शेजारी आहे.
आपल्या मानव-जातीला पूर्ण सभ्यता आणायला अजून खूप पल्ला गाठायचा राहिला आहे.आणि माझा विश्वास आहे की समजूतदार आणि सामान्य असलेल्या माणसातली भलाई ही त्याच्यात असलेल्या बुराईवर नक्कीच कुरघोडी करील.
मला वाटतं आपण अधीक अधीक सुधारलेल्या जगाची वाटचाल करणार आहो.ज्या जगात युद्धाचा नावनीशा नसेल.ज्या जगात माणूस स्वार्थी आणि आत्मकेंद्रित राहून दुसर्याच्या हिताबद्दल दुर्लक्षीत नसेल.आणि ज्या जगात दुसर्या बद्दल जातीद्वेषामुळे आणि धर्मावरच्या विश्वासामुळे असहिष्णुता नसेल-जी अज्ञानामुळे होऊ शकते-हे सर्व रीतिरिवाज भुतकाळातच राहतील.
मला असही वाटतं की,अशा गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे की,जीवनात आणि हृदयात सहजता असावी,संबंधात सरलता असावी राजकारण नसावं.कठोरपणा आणि नीचपणा हे अक्षम्य पाप आहे असं मनोमनी मानलं जात असावं.
प्रसन्न राहण्याची नैतिकता भौतिक गोष्टीतून येत नाही तर ती आनंदी मनातून येते.हे जग स्वारस्य असण्याचं सुंदर ठिकाण आहे. सौहार्दपूर्ण मेहनत करणं हे सुखसमाधानीचं गुपीत आहे."
त्याचं हे सगळं ऐकून मला वाटलं की किती माणसं आशावादी असतात.गोव्यातल्या एका लहानश्या खेड्यात राहून किती दूरवरचा विचार करतात.कदाचीत हे गृहस्थ सुद्धा गीतेतले अध्याय वाचून आपली वैचारीक पातळी इतकी उंचावून घेऊन माझ्यासारख्या आल्यागेल्या पाहूण्यावर उत्तम प्रकाश पाडू शकतात.मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण,
"आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं."
त्यांच्या चेहर्यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला.
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
23 Jan 2009 - 9:48 am | विसोबा खेचर
मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण,
"आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं."
त्यांच्या चेहर्यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला.
कृष्णा, खूप छान लिहिलं आहेस रे! वाचून खूप बरं वाटलं!
तात्या.
का माहीत नाही, परंतु आज अचानक आपला एकेरी उल्लेख करावासा वाटला. त्यामागील आपुलकीच्या भावना समजून घ्याल याची खात्री आहे!
23 Jan 2009 - 11:05 am | मैत्र
सामंतकाका,
छान लेख आहे. आवडला.
23 Jan 2009 - 11:08 am | वृषाली
छान लेख!!!!!!
23 Jan 2009 - 11:14 am | दशानन
सुंदर !
23 Jan 2009 - 6:10 pm | लिखाळ
फार मस्त :)
हुशारी, चलाखी आणि बुद्धी यांत आपण फारसा फरक करत नाही. पण विस्डम - बुद्धी ही नेहमीच सत्शील-सात्विक असते असे मला वाटते.
आपल्या आत जे आहे तेच आपल्याला बाहेर दिसते या उक्तिचा प्रत्यय आपले अनुभव वाचताना येतो. तुम्हाला प्रत्येक प्रसंगी कुणी सत्शील चांगला मनुष्य भेटतो आणि त्याच्या कडून तुम्हाला काही चांगले घ्यावेसे वाटते हे विशेष आहे.
-- लिखाळ.
23 Jan 2009 - 6:59 pm | शंकरराव
लिखाळराव
विस्डम चे मस्त विस्लेषण .
वो काका मिपाकरांनाही गोव्याला जायचे आहे, जरा पत्ता द्या ना त्या सद् ग्रुहस्थांचा
दोन दिवस गीतापाठ दोन्ही वेळी कोंबडी रस्सा ...आ हा हा
;-)
23 Jan 2009 - 6:44 pm | अनामिक
काका सुंदर लेख!
लिखाळ यांच्याशी सहमत.
अनामिक
23 Jan 2009 - 10:11 pm | चतुरंग
अतिशय साध्या माणसांकडून आयुष्याचा मोठा विचार मिळतो तेव्हा धक्का बसतो आणि अभिमानाची पुटं खरवडून निघतात!
हृद्य आठवण.
चतुरंग
23 Jan 2009 - 11:55 pm | सर्किट (not verified)
सामंतकाका,
अतिशय सुंदर लेख.
मीही मोठ्या अक्षरातलीच पुस्तके वाचतो.
-- सर्किट
24 Jan 2009 - 12:18 am | शितल
सामंतकाका,
अगदी सुंदर लिहिले आहे. :)
24 Jan 2009 - 1:10 am | रेवती
छान लेख!
कोणता माणूस आपल्याला काय शिकवून जाईल सांगता येत नाही.
अर्थात त्यासाठी खुलं मन असणं आवश्यक आहे.
धन्यवाद!
रेवती