बायबल-कारी.

मुक्तसुनीत's picture
मुक्तसुनीत in जनातलं, मनातलं
22 Jan 2009 - 9:05 pm

प्रारंभी देवाने स्थलावकाश व समरभूमी निर्माण केली.

तेव्हा (समर)भूमी आय्डीविरहीत व शून्य होती, आंतरजालीय पृष्ठावर गांभीर्याचा अंधःकार होता आणि देवाचा आत्मा (आंतर)जालावर तळमळत राहिला होता.

तेव्हा देव बोलला, हास्यचैतन्याचा प्रकाश होवो आणि प्रकाश झाला !

देवाने हास्य-चैतन्य-प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने हास्यप्रकाश आणि प्रशासकी गांभीर्यांधार वेगळे केले.

देवाने हास्यप्रकाशाला दिवस आणि गांभीर्यांधाराला रात्र म्हण्टले ; हा पहिला दिवस.

मग देव म्हणाला, आंतरजालाच्या मध्यभागी अंतराळ होवो व ते आंतरजालास (म्हणजे त्यातील लोकांस एकमेकांमधे) विभागणारे होवो. आणि तसे झाले.

मग देव बोलला, आंतरजालाखाली आय्ड्यांचा एके ठिकाणी संचय होवो व अन्यत्र माणसे दृष्टीस पडीत. आणि तसे झाले. देवाने पाहिले की हे चांगले आहे.

मग देव बोलला , नवनवे आयड्या देणारी माणसे बनोत आणि ही माणसे त्या आयड्यांवर निरनिराळ्या नावाने वसोत आणि तसे झाले.

मग देव बोलला , हास्यचैतन्यमय दिवस आणि अन्यपामर रात्र ही भिन्न करण्यासाठी आंतरजालमंडळात ज्योती होवोत , ज्या इतरांना हास्यचिन्हे , हास्यऋतु, हास्यकारी दिवस व वर्षें दाखवणार्‍या होवोत.

पृथ्वीला हास्यप्रकाश देण्याकरता आकाशमंडळात त्या दीप होवोत आणि तसे झाले.

देवाने दोन मोठ्या ज्योती आणल्या. हास्यदिवसावर प्रभुत्व चालवण्याकरता संजोती आणि हास्येतर रात्रिलोकावर चालवण्याकरता जोतिनुजोती. देवाने पाहिले की हे चांगले आहे.

मग देव बोलला , आयडीजंतूच्या थव्यानी हास्यजाले भरून जावीत आणि पृथ्वीवरून अंतराळात हास्यपक्षानी उड्डाणे करावीत.

हास्यविरहित अंधारात जगणारे राक्षसी जलचर , प्रत्येक जातीचे सर्व आय्डी आणि प्रत्येक जातीचे सपक्ष प्राणी देवाने निर्माण केले.

मग देवाने आपल्या प्रतिरूपाचा मानव निर्माण केला , देवाचेच प्रतिरूप असा तो निर्माण झाला. नर व नारी अशी ती निर्माण केली.

देवाने त्यांस आशीर्वाद दिला : सफल व्हा , वृद्धी पावा , आंतरजातील सर्व जले व्यापूं टाका आणि आय्डीरूपी पक्षी बहुगुणित होवोत. हास्यप्रकाश व अन्यअंधार लोकांत तुमची च सत्ता चालो.

आपण निर्माण केलेले सर्व बहुत चांगले आहे असे देवाने पाहिले. मग सायंकाळ व प्रातःकाळ झाला.

इति बायबलकारी : उत्पत्ति : पाठ १

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

22 Jan 2009 - 9:43 pm | दशानन

काय बी नाय कळालं बघा :(

शक्यतो बुध्दीची कमी असावी माझ्या कडे... अथवा आजच्या दिवसामुळे माझी बुध्दी भ्रष्ट झाली असावी !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Jan 2009 - 9:47 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! बैबलकारीचा पाठ आवडला ! :)

>>हास्यदिवसावर प्रभुत्व चालवण्याकरता संजोती आणि हास्येतर रात्रिलोकावर चालवण्याकरता जोतिनुजोती.

हा हा हा =))

पुढील पाठासाठी शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे

धनंजय's picture

22 Jan 2009 - 9:52 pm | धनंजय

श्वापदांची (आणि तत्सम माणसांची) आहे, पण पुढे त्यांच्यातच वावरणारे (माणुसकी असलेले ईशप्रतिरूप) मनुष्य निर्माण होतील... हम्म...

तरी बरेच संकेत समजले नाहीत.

कल्पना छान आहे. पुढील भाग वाचण्यास उत्सूक आहे.

सहज's picture

22 Jan 2009 - 9:56 pm | सहज

मस्तच.

बैबलकारी प्रवचनपाठ असाच चालु राहु दे!!!

अवांतर- केवळ जालावरच्या टुकार दिवाळी अंकासाठी भले भले जंतु जंतुला असे चिकटुन बसत आहेत की बस्स!

कोलबेर's picture

22 Jan 2009 - 10:04 pm | कोलबेर

अवांतर- केवळ जालावरच्या टुकार दिवाळी अंकासाठी भले भले जंतु जंतुला असे चिकटुन बसत आहेत की बस्स!

जालावरचे टुकार दिवाळी अंक?? काहीही...

उपक्रम, मनोगत, मायबोली, सुरेश भट. ईन इ.इ. सर्वांचेच दिवाळी अंक आम्हाला आवडले.

समस्त आंतरजालीय मंडळींनी (मिपाकरांनी सुद्धा) ह्या अंकाना भरभरुन दाद दिलेली आहे.

बाकी जंतू जंतू वगैरे चालू द्या त्याच्याशी आम्हाला काहीही देणेघेणे नाही..

पण ऑनलाईन दिवाळी अंकाना उगाचच टूकार वगैरे म्हणून काय साधले ते समजले नाही.

सहज's picture

22 Jan 2009 - 10:34 pm | सहज

भाग १ दुवा

बाकी जालावर दिवाळी अंक भावना दुखावलेल्यांनो,

तुमचे हिरो, देवगडाच्या ऋषीचे गुणगान करताना बजभजपुरीत गटारी खेळताना दिसत आहेत व ते दिवाळी अंक संपादक देखील आहेत ह्यावरुन ते सर्व दिवाळी अंक व त्याचे संपादक कमरेचे काढुन, गांजा ओढून देवगडच्या ऋषिला भजायची प्रथा पाळतात असा निष्कर्ष काढु नका.

;-)

कोलबेर's picture

22 Jan 2009 - 10:44 pm | कोलबेर

आमचे 'हिरो 'कोण, ह्याबाबतीत तुमचा गाढ गैरसमज झालेला दिसतो..

'कुणाची तरी पोटदुखी बघुन, आमच्या भावना दुखावतात' ह्या गैरसमजा इतकाच! ;)

(बाकी आमच्या प्रतिसादांचा चांगला अभ्यास सुरू आहे!
चालू द्या..खरडवह्यातुन मैदानावर स्वागत!) ;)

विनायक प्रभू's picture

22 Jan 2009 - 10:44 pm | विनायक प्रभू

दिवसाला एक पुरे. आजचा कोटा झालेला आहे. पुरे करा. अर्थात ही विनंती आहे. बाकी तुमची मर्जी.

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jan 2009 - 9:59 pm | llपुण्याचे पेशवेll

हाहाहा. 'मुक्त'क आवडले. :)
आधी बैल-बकरी असे वाचले चूकून. :)

पुण्याचे पेशवे
Since 1984

अविनाशकुलकर्णी's picture

22 Jan 2009 - 10:27 pm | अविनाशकुलकर्णी

हे करत असतानाच त्याने हॅकर नावाचे सैतान हि निर्माण केले..व त्यांचे कडे व्हायरस नावाचे अस्त्र हि दिले..पण त्यावर हि मात केली गेली..ऍन्टी व्हायरस नावचे उश:पास्त्र निर्माण झाले अन सत असत हा युगा युगाच संघर्ष हि सुरु झाला

छोटा डॉन's picture

22 Jan 2009 - 10:39 pm | छोटा डॉन

मुसुमहाराज मिसळपावकर ( आत्ता कस्सं एकदम किर्तनकारासारखं वाटलं ), आत्ता जे काही तुम्ही सांगितलत त्यातलं आम्हाला कायबी कळालं नाही बघा ...

आमचा गावाकडं चंद्रभागेतिरी असेच किर्तन/ प्रवचनाचे फड रमतात, त्यात "बाबा, महाराज लोक" सुरवातीला असचं काहीतरी "तर महाराजा, भगवान श्रीकॄष्णाने गीतेत असं सांगितलं आहे " असे अगम्य बोलतात.
आमच्यासारखी भोळीभाबडी अजाण व अडाणी जनता एकदम बाबरुन जाते व अचंब्याने बाबाकडे पाहु लागते ...
मग "विठ्ठल, विठ्ठल " असा एक गजर झाल्यावर बाबा एक दिर्घ श्वास घेतात व एकदम कारुण्यमय दॄष्टीने जनसमुदायाकडे पाहतात...
मग त्यांना दया येऊन ते आत्तापर्यंत जे काही बोलले त्याचे "निरुपण" सुरु करतात ...
शेवटी एकदाचे "तर अशा प्रकारे भगवंताने आपले अवतारकार्य पुर्ण करुन हा सर्वसानाम्यजनांचा भवसागर तारुन न्हेला " असे सस्पष्ट निरुपण केले की मग आमच्या डोक्यात प्रकाश पडतो ....
मग पुन्हा एकदा " विठ्ठलऽऽऽ विठ्ठलऽऽऽ , बोला पुंडरीक वरदा हरी विठ्ठल " चा गजर होऊन प्रवचन संपते व आम्ही कपाळाला अभीर-बुक्का लाऊन व प्रसादाचे सारखफुटाने खात खात "बाबा नक्की काय म्हणाले" याची चर्चा करत घरी येतो ...

तर तात्पर्य असे की "सर्वसामान्यांच्या भाषेत निरुपण केले तरच हे बैबलातले महाज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचेल. अन्यथा आम्ही असेच अंधःकारात राहु" ....

अजुन काय बोलु ???
------
( वारकरी ) छोटा डॉन

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Jan 2009 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अहो डानराव,

तुम्ही तर प्रतिसाद कसे पाडायचे यावर मार्गदर्शनपर लेख लिहिता आणि एवढसं अंधःकारमय अज्ञान नाही लपवता येत तुम्हाला? छ्या!
आणि हो तो लावतात तो अबीर-बुक्का हो ... भलताच गैरसमज होईल नाहीतर! :-D

(मलातरी कुठे काय कळलंय म्हणा, पण काय फरक पडतो?)

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

सर्किट's picture

22 Jan 2009 - 10:47 pm | सर्किट (not verified)

मुख्य म्हणजे, सगळे कळले. सफरचंद भक्षणाविषयी कधी लिहिताय ?

पाठ २ कधी ?

-- सर्किट

अवलिया's picture

22 Jan 2009 - 10:50 pm | अवलिया

सफरचंद भक्षणाविषयी कधी लिहिताय ?

वरती लेख वाचल्यावर अगदी हाच प्रश्न मनात आला होता... तर तुम्ही तो टाकला हे पाहुन बरे वाटले.

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

छोटा डॉन's picture

22 Jan 2009 - 10:51 pm | छोटा डॉन

अहो सगळेजण कळाले , आवडले असा प्रतिसाद देताय खरं , पण उदाहरणार्थ आम्हाला सांगणार कोण ?
कोणितरी हे "सत्कार्य" कराच ...!

उगाच आमचे फ्रस्ट्रेशन वाढत जाते.

------
छोटा डॉन

कोलबेर's picture

22 Jan 2009 - 10:52 pm | कोलबेर

बराचसा कळला..

हास्यदिवसावर प्रभुत्व चालवण्याकरता संजोती आणि हास्येतर रात्रिलोकावर चालवण्याकरता जोतिनुजोती

.

हे मस्तच 'बनी' ची आठवण आली.

अश्या आणखी कोपरखळ्या असत्या तर अजुन मजा आली असती.

दुसर्या भागात येतीलच बहुदा :)

विसोबा खेचर's picture

22 Jan 2009 - 10:47 pm | विसोबा खेचर

मुक्तराव,

लेखन एकदम हटके! येऊ द्या अजून.. :)

तात्या.

अवलिया's picture

22 Jan 2009 - 10:53 pm | अवलिया

मुक्तराव

अतिशय छान... आवडले.
असेच येवु द्या
आणि हो... बनी काय मंदिमुळे येत नाही का?

--अवलिया

अवलियाची अनुदिनी

लिखाळ's picture

22 Jan 2009 - 11:05 pm | लिखाळ

वाहवा ! संकेतस्थळांचे जेनेसीस (की संकेतस्थळावरच्या भांडणाचे?) आवडले.
अनेक संदर्भ लागले नाहीत..पण मी त्याचे काही वाईट वाटून घेत नाही. सर्व समजले की अजून पुढचे समजून घ्यायचा ताण वाढत जातो.
सफरचंद खाण्याचा कार्यक्रम नक्की कसा लिहिणार? असा प्रश्न पडला.

संकेतस्थळावरची भांडणे म्हणजे युद्ध लहान आणि त्याची बखर मोठी अशी गत. :)
-- लिखाळ.

चतुरंग's picture

22 Jan 2009 - 11:24 pm | चतुरंग

एकूण वाचनीय प्रकार वाटतोय त्यामुळे पुढल्या पाठात काय होणार ह्याची उत्सुकता आहे. कदाचित पुढल्या भागातून आधीच्या न कळलेल्या भागाचे काही धागेदोरे हाती लागतील असे वाटते!
येऊदेत.

(खुद के साथ बातां : रंगा, अजून तू बिगरीतच आहेस, म्याट्रिकपर्यंत जायला किती बरं पाठ लागतील तुला? घाल हिशोब! :? )

चतुरंग

विनायक प्रभू's picture

23 Jan 2009 - 9:23 am | विनायक प्रभू

रंगासेठ,तुम्ही जर बिगरीत तर आम्ही जन्माला यायची वाट बघतो आहे. असो.
मुक्तसुनित राव संदर्भ लागले नाही म्हणुन तुम्हाला क्रिप्टीक म्हणणार नाही.
आम्ही ह्या इतिहासात मंद आहोत ह्याची जाणीव आहे. पण शुद्ध 'वस्त्रहरण' असल्याची
जाणिव झाली.

विकास's picture

22 Jan 2009 - 11:35 pm | विकास

मस्त! हे पहील्या दिवसातील का सातव्या दिवसातील?

आंतरजातील सर्व जले व्यापूं टाका

ह्याचा काहींनी चुकीचा अर्थ घेतला असवा... त्यामुळेच व्यापून टाकायच्या ऐवजी "व्याप" होवू लागले. ;)

असो.

शशिधर केळकर's picture

23 Jan 2009 - 12:46 am | शशिधर केळकर

मला तर हा उपक्रम 'इसवी सनातील उपनिषदे' वगैरे प्रकारचा वाटला!
त्यामुळे सफरचंदाची गरज नाही भासली.

<<हे करत असतानाच त्याने हॅकर नावाचे सैतान हि निर्माण केले..व त्यांचे कडे व्हायरस नावाचे अस्त्र हि दिले..पण त्यावर हि मात केली गेली..ऍन्टी व्हायरस नावचे उश:पास्त्र निर्माण झाले अन सत असत हा युगा युगाच संघर्ष हि सुरु झाला>> हे पण भारी!

नंदन's picture

23 Jan 2009 - 4:08 am | नंदन

धमाल लिहिले आहे. कोलबेरपंतांप्रमाणेच बनीची आठवण झाली. "कां की आकाशातल्या बापाला दया येऊन त्याने अमुक अमुक केले", अशी कांकू करत ज्यांची बर्‍याचदा सुरूवात होते, त्या शब्दशः भाषांतरित केलेल्या मराठी बायबलमधल्या (किंवा मॅथ्यूचे शुभवर्तमान) वाक्यांची याद पुन्हा जागी झाली. तो लहेजा उत्तम सांभाळला गेला आहे :)

[पुढच्या काही भागांत बनी सॅम्युएल जॅक्सनच्या थाटात, 'द पाथ ऑफ द राईचस मॅन इज बिसेट ऑन ऑल साईड्स बाय द इनिक्विटीज ऑफ द सेल्फिश....' चा तो प्रसिद्ध संवाद म्हणते आहे, अशी काही सिच्चैशन घालता येईल काय? ;).]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

23 Jan 2009 - 4:40 am | मुक्तसुनीत

प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

बेसनलाडू's picture

23 Jan 2009 - 4:53 am | बेसनलाडू

मजा आली.
(हसरा)बेसनलाडू

रामदास's picture

23 Jan 2009 - 7:53 am | रामदास

छान झालं आहे लिखाण.काही शंका आहेत पण त्या नंतरच्या निरुपणात फिटतील असे वाटते.भाग २ बद्दल उत्सुकता आहे.

एकलव्य's picture

23 Jan 2009 - 10:08 am | एकलव्य

... आमची तशी पीएचडी असूनही आम्हाला काहीही कळले नाही. थोडे थोडे कळले असे वाटतयं खरं पण ते उगाचच वाटलेलेही असू शकते.

(अज्ञानावर दांडगा विश्वास बाळगून असलेला) एकलव्य

सुनील's picture

23 Jan 2009 - 10:18 am | सुनील

काही रूपके उलगडली, काही नाही. पण एकंदरीत लेखन प्रकार आवडला. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वृषाली's picture

23 Jan 2009 - 10:39 am | वृषाली

पार डोक्यावरुन गेलं!!!!!

"A leaf which falls from a tree goes wherever wind takes it. Be the wind to drive others, not the leaf to be driven by others."