प्रतिक्रिया वाचुन थोडासा प्रकाश पडला. पण प्रश्न अवघड होता. फुल फोकस ची गरज होती. गाडीने जाता जाता विद्याविहार ला रेल्वेचा 'उपरी उपस्कर कार्यशाळा' चा फलक बघितला. बघुया का ह्याचा उपयोग करुन असा विचार आला. 'उपरी उपस्कर कार्यशाळा' म्हणजे वरवरचे मेंटेनन्स.
घरी आलो. बघतो तर काय, महिला मंडळ जमलेले. बायकोच्या निपाणी वरुन शाळे पासुनच्या दोन मैत्रीणी आलेल्या. लग्नानंतर पहिल्यांदाच घरी आलेल्या. त्यातल्या एकीने तर सायकॉलॉजी मधे एम्.ए. केलेले. ग्रहदशा वाईट असली की असेच होते. ह्या बाईने एकदा बायकोकडे फोनवर 'तुझा नवरा कसा झोपतो' अशी विचारणा केली होती. 'झोपतो' म्हणजे, उजव्या की डाव्या कुशीवर. पोटावर की पाठीवर किंवा फिटल पोझिशन मधे. ह्यावर माणसाचा स्वभाव कळतो असे बायकोला सांगत होती. मी तर बाबा सर्व प्रकाराने झोपतो. तुला माहित नाही का? मग माझा स्वभाव ही कशी ठरवणार. असे म्हणुन विषय संपवला होता. नमस्कार,चमत्कार झाले. टी पॉय वर 'फेमिना' होते. मुखपृषठावर 'चोपडा' कुलोत्पन्न प्रियांका चा फोटो. आणि मोठ्या अक्षरात 'आपके पती आपसे कुछ छुपा रहे है क्या' असे हेडींग. तुमचे चालु द्या म्हणुन मी काढता पाय घेतला. ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले.
घरी येता येता आता प्रश्न भिजत ठेवता कामा नये असे ठरवले. खास मैत्रीणी येउन गेल्यानंतर नाहीच नाही. गृहसौख्यावर मंदीचे ढग जमा होताना दिसले.
प्रश्न अवघड असेल तर बेसिक कडे वळावे.
प्रश्नाचा मुळ श्रोत ध्यानात घ्यावा.
दलदलीत सापडल्यावर जास्त हालचाल (शानपती)करु नये.
माकड आणि पाचर ह्यांचे जुने नाते आहे.
पाचरीतुन लवकर सुटका केल्याने शेपटीला जास्त इजा होत नाही.
डोळा लागता लागता वरील गृहितके आठवली.
मंदी मधे संधी साधावी. मग कायमची चांदी असा निर्धार करुन झोपी गेलो.
संधी मिळाली की हो.
सकाळी कॉलेजला जाताना चिरंजीवानी प्रॅक्टीकल कोट ची मागणी केली.
मी त्याला लगेच विचारले, काय, रे प्रॅक्टीकलला डॅमॉन्स्ट्रेटर ने प्रॅक्टीकल समजवल्यावर ते प्रॅक्टीकल न करता एकदम परिक्षेत करायला तुला जमेल का?
हो.-चिरंजीव
कसे काय बॉ. (थोडी ढील दीली)
काय बाबा, आमच्याकडे डेमॉन्स्ट्रेटर पण पी.एच्.डी असतात. व्यवस्थीत एक्स्प्लेन करतात. लक्ष दीले की काहीही अवघड नसते. -चिरंजीव. नकळत का होइना चिरंजीवाने पांग फेडले.
तो कॉलेजला गेल्यावर मीच सुरुवात केली.
'तुझ्या प्रश्नाचे उत्तर कालच देणार होतो' पण तुझ्या सख्या आल्या होत्या म्हणुन तुला डीस्टर्ब केले नाही.
"नशिब माझे. मला वाटले त्यांच्यासमोरच सुरु होता की काय"- बायको
त्याचे असे आहे, माझे साहेब पी.ए़च्.डी होते पब्लिक हेल्थ चे. त्यांच्याबरोबर दर शनिवारी नेरळ ला जात असे. तेंव्हा ते एका हातात 'कॅप्स्टन ची सिगारेट' बेबी वोक्स वॅगनचा १२० चा स्पीड व माझा 'लोकशिक्षणाचा' तास अशी गंमत चाले. त्यात विषेश असे काही नसते. नेहेमीचे २१ प्रश्न असतात. त्यांची शिकवण्याची हातोटी खुप चांगली होती. के.इ.एम ला विषय नसलेले डॉक्टर पण त्यांच्या लेक्चरला येउन बसायचे. आणि माझ्यासाठी खास पद्धत वापरायचे. त्यांचा मी फार लाडका होतो. पेशंट बनुन प्रश्न परत विचारायचे. उत्तर चुकले की परत सांगायचे. असा कारभार होता. म्हणुनच मला 'यंगेस्ट मोटीवेटर' चे पदक पण मिळाले होते. अग ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या डोक्यावर नुसता हात ठेवल्याने रेड्याने वेद म्हटले.
ह्या ज्ञानेश्वराचा हात सतत सात वर्ष माझ्या डोक्यावर हात होता. त्यामुळेच मला 'प्रॅक्टीकल 'ची कधीही गरज लागली नाही.
बायको पण सेंटीमेंटल झाली 'गुरुशिष्य पुराण' कानावर पडल्यामुळे.
आणि सर्व काही सुरळीत झाले. सरळ झाले.
जाता जाता: आजपासुन 'उजव्या' कुशीवर झोपणार आहे. बरे असते असे बायकोची मैत्रीण म्हणते. मरे ना का ते शास्त्र. पाचरीतुन शेपटी सुटली हे महत्वाचे.
प्रतिक्रिया
22 Jan 2009 - 10:47 pm | अवलिया
चला उजवी तर उजवी ... सुटका महत्वाची.
'कॅप्स्टन ची सिगारेट' वरुन आठवले... त्याच्या इंग्रजी स्पेलिंगचा पुढुन आणि मागुन लाँग फॉर्म मस्त होतो.
इच्छुकांनी व्यनी करावा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 10:56 pm | सर्वसाक्षी
मास्तर,
सुटलो या भ्रमात राहु नका.
कैकयी ने एके काळी दशरथ राजाने दिलेला वर तिने राखुन ठेवला होता. राजा विसरला, ती नाही. वेळ येताच तिने वर मागितला. बायकांचे असेच असते. आपण सुटलो या आनंदात असतो आणि एक दिवस अचानक त्या प्रश्नाचे भूत उठते मग गोची होते.
मागे चीनला जाताना कौतुकाने तिथल्या मुलींसाठी भारतिय पद्धतिची कलाकुसर असलेले अंगरखे नेले होते, खरेदीला आमचे सौभाग्यही होते. नेलेले अंगरखे त्या मुलींना आवडले. मी खुश.
परत आल्यावर अचानक एक दिवस बायकोने गुगली टाकला. "बरे अगदी नेमके मापाचेच नेलेस! लहान नाही की मोठे नाही"
असो.
22 Jan 2009 - 11:07 pm | सर्किट (not verified)
सूंदर अनुभव !
(अवांतरः अंगरखे हा शब्द वाचताना उगाच अंगवस्त्र का वाटले, ते कळत नाही.)
-- सर्किट
22 Jan 2009 - 11:47 pm | चतुरंग
मागे एकदा आमच्या असिस्टंट्सना भेट देण्यासाठी मी भारतातून रंगीबेरंगी स्कार्फस नेले होते. खरेदीला अर्थातच सौ. होत्याच.
५ स्कार्फस घ्यायचे होते. दुकानात गेल्यावर सौंचा प्रश्न "साधारण वयं काय काय आणि पर्सनॅलिटी कशी कशी आहे?"
मी म्हटलं "का? त्याने काय फरक पडतो?"
सौ. : "म्हणजे त्या त्या वयाला आणि एकूणच साजेसे रंग आणि डिझाईन्स घेता येतील!"
बघितलात ना काय वस्ताद प्रश्न आहे! एकाच प्रश्नात किती गोष्टींची माहिती काढून घेतली बघा!
काय करणार बापडा सांगितली अंदाजे माहिती. बायकांचा संशयकल्लोळ कधीही संपत नाही हेच सत्य.
त्यामुळे प्रभूदेवा फार खूष होऊ नका अचानक एखाद दिवशी त्रिफळा उडायचा! ;)
चतुरंग
23 Jan 2009 - 9:50 am | विनायक प्रभू
स्टंट मास्टर, असिस्टंट्स ना गिफ्ट घ्यायला सौ. शोलेट डेरींग.
तुमचा भाग्यांक पण पाच का? वा वा वा.
22 Jan 2009 - 11:13 pm | अनामिक
आजपासुन 'उजव्या' कुशीवर झोपणार आहे
पण तुम्ही बेडच्या उजव्या बाजूला झोपता की डाव्या :? ?
अनामिक
22 Jan 2009 - 11:15 pm | अवलिया
पाचरीतुन शेपटी सुटली हे महत्वाचे.
शेपटी वापरली नाही तर गळते म्हणे.... पाचरीच्या निमित्ताने तरी वापरा
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
22 Jan 2009 - 11:24 pm | मुक्तसुनीत
सत्यकथन आवडले. लोणच्याप्रमाणे लग्नेसुद्धा मुरावी लागतात असे म्हणतात. विप्र सारख्यांचे लोणचे उत्तम मुरले असावे :-)
22 Jan 2009 - 11:51 pm | प्राजु
वा.. विप्र.! तुमच्या सौ न भेटावं म्हणते एकदा.
विप्र सारख्यांचे लोणचे उत्तम मुरले असावे
काय हो, केप्र शी तुमचं काही दूरच नातं आहे का? ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
23 Jan 2009 - 12:17 pm | नंदन
प्रतिक्रिया वाचल्यावर हेच डोक्यात आलं होतं प्रथम :)
विप्रकाका, दोन्ही भाग झकास!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
22 Jan 2009 - 11:51 pm | पिवळा डांबिस
तुमची बिनबोभाट सुटका होणार हे आम्ही आधीच जाणले होते!!!
ज्याला 'उपरी उपस्कर कार्यशाळा' म्हणजे वरवरचे मेंटेनन्स" हे समजते त्याला काय अवघड आहे?:)
पण एक गोष्ट जरा खटकली....
मी काढता पाय घेतला. ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले.
तुमचे गेले असतील हो, पण त्या बिचार्या ब्रिटिशाचं काय? त्याच्या दोन तासांच्या आयचा घो केलांत की तुम्ही!!! जरा "मित्राचाही विचार करत जावा" असं काही नाही का तुमच्या समुपदेशनात?:)
असो! तुमची सुटका झाली (असे तुम्हाला वाटत आहे) हे वाचून बरे वाटले. बाकी आम्ही सर्वसाक्षीशी सहमत आहोत!!!
:)
23 Jan 2009 - 7:36 am | रामदास
मास्तर विद्याविहार पर्यंतच गेलात हे बरे आहे.भायखळ्याला संभागीय अभियंता अशी पाटी आहे.
23 Jan 2009 - 12:04 pm | ब्रिटिश
ब्रिटीश बरोबर २ तास आनंदात गेले.
मास्तर शब्द न वाक्य जपुन वापरा. मीपावाले गोंधळ घालायला कमी करनार नाईत.
खि खि खि
अवांतर :ओय कागज के शेर, अकल के अंधे, तुम्हारी मां का .........
राज दादुस पळालास क काय ? कुट हाईस र ?
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)
22 Jan 2009 - 11:53 pm | चतुरंग
अवांतर : डाव्या कुशीवर झोपला तर पती 'वाममार्गाला' लागेल असा संशय होता की काय त्या मैत्रिणीला? :?
चतुरंग
23 Jan 2009 - 1:00 am | संदीप चित्रे
बायकोचे प्रश्न आणि सासूचे आगमन आधी सांगून होत नाही ;)
23 Jan 2009 - 7:19 am | सहज
ऑल इज वेल दॅट एन्ड्स वेल :-)
स्वगत - पण इथे नक्की एन्ड झाला का ही स्तुत्यप्रयोग मालीका चालुच रहाणार. शेपटी असली तर ती कधीना कधी अडकणारच ना ;-)
23 Jan 2009 - 8:50 am | विनायक प्रभू
सर्व महानुभवांचे अनुभव वाचल्यावर एक जाणीव झाली- मी एकटाच नाही आहे- पाचरीला घाबरणारा. धीर आला. अडीअड्चणीला नक्कीच मदत होइल.
23 Jan 2009 - 10:11 am | दशानन
आमच्या सारखे सुखी आम्हीच.... !
*बरोबर की नाही तात्या ;)
23 Jan 2009 - 3:08 pm | शंकरराव
घरी आलो. बघतो तर काय, महिला मंडळ जमलेले. बायकोच्या निपाणी वरुन शाळे पासुनच्या दोन मैत्रीणी.....
टी पॉय वर 'फेमिना' होते. मुखपृषठावर 'चोपडा' कुलोत्पन्न प्रियांका चा फोटो. आणि मोठ्या अक्षरात 'आपके पती आपसे कुछ छुपा रहे है क्या' असे हेडींग.
मास्तर,
विरोधिपक्षा कडुन दबाव तंत्र पुरेपूर वापरल जात आहे... जमलेले महिला मंडळ, 'फेमिना'..
सर्व कसे पूर्व नियोजित असावे...कदाचित
तात्याने चिरंजिवाला केलेला प्रश्ण सुद्धा ;-) ... संशयकल्लोळ
बाकी वर आठ्वलेले गृहितके अप्रतिम,
(अशा अवघड वेळी ही मस्तरांना गृहितके आठवावे .. आभ्यास जोरात दिसतो)
23 Jan 2009 - 5:50 pm | लिखाळ
मस्त मजेदार आणि उद्बोधक :)
सर्वसाक्षी आणि चतुरंगांचे प्रतिसाद सुद्धा मस्त.
लग्नाच्यावेळी गुरुजींनी मोठमोठ्याने केलेला 'सावधान'चा गजर नेहमीच कानात घुमत असतो :)
-- लिखाळ.
28 Jan 2009 - 2:44 pm | विजुभाऊ
शन्का : कोणत्या कुशी (त) वर झोपल्यावर पती राम मार्गाला लागतो