भारतीय आणि नग्नता

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
23 May 2016 - 11:03 am

आपल्याकडे नग्नता या शब्दाकडे आणि विषयाकडे अशा काही नजरेने पाहिले जाते कि अगदी काही गुन्हा किंवा पाप केलेले आहे . बाकी प्रत्येक जणच जन्माला येताना बिना कपड्यांचाच जन्माला येतो पण काही लोकांचा आक्षेप असू शकतो कि जन्माला येताना तर कुणाला बोलायला आणि चालायला आणि इतरही अनेक गोष्टी येत नाहीत पण त्या पुढे तो शिकतो ना मग या बाबतीतही तस का नाही .

बाकी या बाबतीत कपडे नक्की का घालावे आणि का नाही हाही एक मुद्दा असू शकतो अगदी लज्जा रक्षण , injury पासून बचाव , ऊन थंडी यापासून बचाव आणि अशी अनेक कारणे दिली जाऊ शकतात . हि कारणे मान्य पण खरच अस आहे का कि आपण शरीर रक्षणासाठी कपडे घालतो असे तर वाटत नाही . आपण भारतीय उपमहाद्विपीय प्रदेशातील वातावरण आणि इथला पोशाख पहिला तर अस नक्कीच नाही वाटत कि हे शरीरसाठी केल जातंय पूर्वीचे पोशाख म्हणजे धोतर किंवा स्रीयांमध्ये साडी हे पोशाख असे होते अस एकवेळ आपण म्हणू शकतो पण टाईट जीन्स आणि तसाच टाईट शर्ट हे कसे शरीर रक्षण करणार आहेत ? त्या टाईट जीन्समुळेतर genitals ला कोणत्याही प्रकारे हवा पोहोचत नाही . या उलट धोतर किंवा साडी यामधून काही प्रमाणात का होईना वायुविजन नक्की होत . बाकी genitals च तापमान इतर शरीरापेक्षा काहीस जास्त असत आणि त्यांचे तापमान नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते . याच कारणासाठी पुरुषांचे वृषण शरीरापासून काही अंतरावर असतात . काही जीन्स ज्या टाईट फिट किंवा टच स्कीन असतात त्यात वृषणचकाय पण पेनिससाठीही पुरेशी जागा असते किंवा नाही हे सांगणे अवघड आहे . बाकी आपल्या संपूर्ण आयुष्यात अगदी कोणत्याही वयात सार्वजनिक ठिकाणीही ज्याचे कधीही erection झाले नाही असा पुरुष सापडणे अवघड आहे . आता ज्या जीन्समध्ये normal penis लाही जागा नसते तिथे अशा position मध्ये या महत्वाच्या भागाची काय हालत होत असेल हे सांगायलाच नको . या प्रायवेट पार्टसला इतक तुच्छ का लेखल जात हे खरच न कळणार आहे . हे भागच स्त्री पुरुषांना त्यांच्या उमेदीच्या काळात सर्वोच्च सुख आणि आयुष्यभर आणखी एक महत्वाचे काम करतात . ते किती महत्वाचे आहे हे ज्यांना कधी लघवी अडली गेली आहे व ती होत नाही तेंव्हा कळते . कोणी म्हणेल याचा संबंध आतील भागाशी आणि या पार्टस आधी असलेल्या पार्टसशी संबंधित आहे पण त्या पार्टसमध्ये काही बिघाड नसताना हे काम हा भाग इमाने-इतबारे करत असतो . आणि इथली infections तर काय त्रास देतात ते सांगायलाही नको पण असे असूनही या भागाची काहीही काळजी घेतली जात नाही . अजिबात जागा नसलेल्या कोंदट ठिकाणी एव्हढ्या जास्त तापमानात हे private part शिजून निघत असतात पण आपल्याला आपल्या स्टाईलच पडलेलं असत . या उलट धोतर साडी हे तस पाहायला गेले तर खालून उघडेच असतात आपल सेमी-नग्नतेशी नात सांगत आपल्या शरीराची मदतच करत असतात . आता कोणी म्हणेल कि कोर्पोरेट ऑफिसमध्ये धोतर घालून जावे काय ? आणि आपण गेलो तरी त्याला परवानगी मिळेल का ? यावर उपाय आपल्यालाच शोधायला हवा . अगदी साडीही परिधान करताना पोट आणि पाठ काही प्रमाणात उघडे राहतात आणि हेच काम करतात .

काही हॉलीवूड अभिनेत्री बेअर चेस्ट सीन करतात त्या उलट भारतीय अभिनेत्री कधी असे सीन करताना दिसत नाही (काही अपवाद वगळता ) . याला काय कारण असावे ? काही अभिनेत्री या डाएट आणि झिरो फिगरच्या अशा मागे लागतात कि त्यांच्या ब्रेस्टची पुरेशी वाढही होत नाही ( काही सन्माननीय अपवाद वगळून ) . मग ब्रेस्टला बाहेरून सपोर्ट वापरले जातात जेणेकरून ते योग्य प्रमाणात दिसावेत . आता बेअर सीनमध्ये या गोष्टीतर वापरता येणार नाहीत त्यामुळे सत्य समोर येऊ शकते . इथे कुणी असे सीन द्यावे अशी अपेक्षा नाही पण या कारणासाठी त्यांना हे करायला लागू नये असे वाटते . बाकी सस्तन प्राण्यांमध्ये स्री बाळाला स्तनपान करवते आणि पुरुषाला असे काही काम नसले तरीही त्याचे चेस्ट सपाट पोट आणि बरगड्याचा भाग या पेक्षा बरेच डेवलप असतात याला काही कारण नक्कीच असेल ना . कारण शरीर संबंधामध्ये जर स्रीचे स्तन आणि पुरुषाची काही प्रमाणात का असेन आपण मेद असलेली छाती कुशनसारखे काम करते . जर ते नसते तर एकमेकांच्या वजनाने आणि आवेगाच्या आलिंगनाने गुदमरण्याची स्थिती होऊ शकते .

इकडे सनी लिओनि आणि तत्सम नट्या आपले सुडौल शरीर दाखवत असतात . इथे म्हणण्याचा उद्देश हा नाही कि कोणी शरीर प्रदर्शन करावे किंवा कोणी ते करू नये . हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ते त्यानेच ठरवावे . त्याचा तो हक्क आहे . बाकी याचा कोणावर काही आणि कसा परिणाम होईल याबाबत असे आहे कि बरेचसे किशोरवयीन याच मार्गाने आपले कुतूहल याच मार्गे शमवत आहेत . हा मार्ग चूक किंवा बरोबर हे ठरवण्याआधी याला दुसरा काही पर्याय आहे का हेही सुचवावे . अनेक ठिकाणी लैंगिक शिक्षणाला सरळ सरळ विरोध केला जातो आणि मग अशा मार्गे हे लोक आपल्याला आवश्यक माहिती मिळवतात . असे किती लोक आहेत जे समुपदेशनाच्या मार्गाने जाऊ शकतात .

बाकी अंघोळ करताना सगळे कपडे काढून ( दुर्दैवाने अनेकांना हे सुख मिळत नाही . बर्याच लोकांना एकतर उघड्यावरच अंघोळ करावी लागते किंवा इतकी चांगली सोय नसते कि सर्व कपडे काढावे , त्यांना अंतर्वस्त्रांसोबत अंघोळ करावी लागते आणि जमेल तसे private पार्टस clean करावे लागतात ) जेव्हा आपण नैसर्गिक अवस्थेत असतो तेंव्हा वाटणारी मोकळीक , relax वाटणे याला काय कारण असू शकते ? एका अभिनेत्रीने मला घरात नैसर्गिक अवस्थेत राहायला आवडते असे म्हटले होते . अगदी हे जाहीर करावेच असे नाही पण किमान काही प्रमाणात तसे राहून आनंद मिळवणे चांगलेच . तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ? हा असाच आनंद इतरही बाबतीत नग्नता ( मोकळीक ) ठेवली तर नक्की मिळेल .

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

चिनार's picture

23 May 2016 - 11:11 am | चिनार

अरे केहना क्या चाहते हो ?

तस खूप काही सांगायचं आहे आणि तस काहीच नाही .

आनन्दा's picture

23 May 2016 - 11:14 am | आनन्दा

ह्म्म... बोल्ड आहे, अश्लील नाही. बाकी मतप्रदर्शन करण्यास असमर्थ.

अनाहूत's picture

23 May 2016 - 11:57 am | अनाहूत

या मतप्रदर्शनासाठी आभार .

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 11:20 am | टवाळ कार्टा

शिव शिव शिव...क्काय हे...मिपावर असे चाल्ते का

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 11:20 am | टवाळ कार्टा

बाकी मी तर म्हणतो...अख्ख्या भारतात लुंगी हा कॉर्पोरेट पोषाख असावा... :)

दुसऱ्या आयडीने लॉग इन करायला विसरला का?

अनाहूत's picture

23 May 2016 - 11:54 am | अनाहूत

मी कोण काय म्हणेल याची फार चिंता नाही करत ; जे पटत , वाटत ते लिहितो त्यामुळे मला दुसऱ्या आयडीची गरज नाही भासत .

स्वप्नज's picture

23 May 2016 - 12:52 pm | स्वप्नज

माझा प्रतिसाद टका ला होता, तुम्हाला नव्हता अनाहूतजी...

अवांतर- काहीच नाही.

अनाहूत's picture

23 May 2016 - 1:48 pm | अनाहूत

Ohh माझा उगा चूकीचा गैरसमज झाला

बरोबर अस्लेल्या गैरसमजाला काय म्हंतेत तुमच्यात?

अनाहूत's picture

23 May 2016 - 2:35 pm | अनाहूत

ते मुद्दामच लिहीलय . बाकी बरोबर असलेल्या गैरसमजाला समज म्हणाव की गैरसमज ते नाही सांगाता यायच . व्याकरण पंडित सांगू शकतील .

प्रतिसाद तर 'रातराणी' यांनी दिला होता ना हो?

अनाहूत's picture

23 May 2016 - 2:36 pm | अनाहूत

:-)

सस्नेह's picture

23 May 2016 - 2:40 pm | सस्नेह

त्या स्वत:च्या आयडीने लॉगीन करायला विसरल्या वाटतं !

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 2:55 pm | टवाळ कार्टा

फारच सोज्वळ हैत त्या... =))

रातराणी's picture

23 May 2016 - 10:51 pm | रातराणी

ल्ल्ल्लुऊऊऊऊ

प्रीत-मोहर's picture

23 May 2016 - 3:08 pm | प्रीत-मोहर

आयडीघातकी प्रतिसाद?!!!!

राजेंद्र मेहेंदळे's picture

23 May 2016 - 2:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

<<मला दुसऱ्या आयडीची गरज नाही भासत .>>

तसेही अनाहूत नावावरुन तुमची ओळख कुठे पटते? त्यामुळे डु. आयडी वापरायची गरजच काय?
असो. मला हाफ चड्डी (मराठीत शॉर्टस ) वापरायला फार आवडते. आणि आपण लेखात सांगितलेले सगळे फायदे त्यामुळे मला मिळतात.वरती बनियन घालावा किंवा उघडेच राहावे याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे.
शिवाय ऑफिसमध्येही तसेच फायदे मिळवण्यासाठी काय वापरावे हे ही सांगावे.

अनाहूत's picture

23 May 2016 - 4:16 pm | अनाहूत

छे हो मी कोण पामर काही सुचवणारा , बाकी काय परिधान करायच नी काय हे ज्याच त्यान ठरवाव . शक्यतो स्वतःला comfortable वाटेल अस काही .

चांगल आहे , ऑफिसात करा सजेस्ट .

नाखु's picture

23 May 2016 - 11:55 am | नाखु

आहे माझ्या अता सांगून्च सोडतो बघा बाबा काय म्हणतात ते :

"नाही निर्मळ मन काय करील साबण"

बाबांचा परात्पकारी शिष्य नाखु

मराठी कथालेखक's picture

23 May 2016 - 12:20 pm | मराठी कथालेखक

हे काय ओ ? कार्तिक कॉलिंग कार्तिक का ?

मराठी कथालेखक's picture

23 May 2016 - 12:21 pm | मराठी कथालेखक

काहीतरी चुकीचा प्रतिसाद गेला. please ignore..

नाखु's picture

23 May 2016 - 11:56 am | नाखु

आहे माझ्या अता सांगून्च सोडतो बघा बाबा काय म्हणतात ते :

"नाही निर्मळ मन काय करील साबण"

बाबांचा परात्पकारी शिष्य नाखु

मराठी कथालेखक's picture

23 May 2016 - 12:20 pm | मराठी कथालेखक

हुश्श...धागा उडण्याआधी वाचून घेतला...
बाकी धाग्यात शेवटी एक प्रश्न विचारलाय..

तुम्हालाही असा आनंद जाणवतो का ?

कोण कोण उत्तर देणार बरे याचं ?? :)
चला मी देतो... खरं तर हा खूप व्यक्तिगत प्रश्न आहे. पण माझं उत्तर नकरार्थी आहे (आणि म्हणूनच सहज सांगू शकलो का ?)..
मला वाटतंय नग्नता न आवडणारे लोक नग्नतेच्या प्रसंगांकडे 'नाईलाज' म्हणून पाहतात.
कुणी मानसशास्त्रज्ञ अधिक प्रकाश टाकू शकतील काय ?

चलत मुसाफिर's picture

23 May 2016 - 8:04 pm | चलत मुसाफिर

नक्कीच जाणवतो. वारंवार जाणवतो! :-)

रमेश भिडे's picture

23 May 2016 - 12:22 pm | रमेश भिडे

मोकळे व्हा. लेखकानं आपल्या अडचणी सांगून, वाचकांनी आपलं मत मांडून, कपडे काढून सर्वार्थाने मोकळे व्हा....

अभ्या..'s picture

23 May 2016 - 1:28 pm | अभ्या..

चांगलं लिहिलय राव.
निदान मनात येते ते तरी खुल्लम खुल्ला लिहिलेय. ह्या धाडसाबद्दल अभिनंदन.
पण काय आहे की...
इकडची फरशी अजून ओली आहे हो. ;)

प्रतिसादाबद्दल आभारी आहे . हळूहळू का होईना इकडची फरशी वाळावी म्हणून माझा आपला छोटासा प्रयत्न .

बोका-ए-आझम's picture

23 May 2016 - 2:13 pm | बोका-ए-आझम

शीर्षक वाचून माझा कलेच्या क्षेत्रातली नग्नता यावर काही असेल - खजुराहो वगैरे - असा गैरसमज झाला होता. पण या धाग्यावर तुम्ही काही अत्यंत समर्पक प्रश्न विचारलेले आहेत. उदाहरणार्थ tight jeans बद्दलचे.
मला वाटतं आपल्या आयुष्यातल्या फार थोड्या गोष्टी आपण भारतीय लोक स्वतःसाठी करतो. लोक्स अजून पूर्णपणे व्यक्तिवादी (individualistic) झालेले नाहीयेत. समाज काय म्हणेल या भीतीपोटी अनेक गोष्टी केल्या जातात किंवा नाहीत. त्यात कपड्यांसारख्या निरूपद्रवी गोष्टींपासून हुंड्यासारख्या महाउपद्रवी गोष्टीही येतात. अभिनेत्रींनी bare scenes न देण्यामागे हे एक कारण असू शकेल. अभिनेत्री सोनू वालियाने आकर्षण नावाच्या चित्रपटात काही बोल्ड सीन दिले होते. आणि ते सीन्स पाहात असताना तिचे आईवडिल थिएटरमधून उठून गेल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं आणि हे सांगत असताना तिचे डोळे भरून आले होते. तो अभिनय नसावा. तेवढा अभिनय तिला आला असता तर ती अभिनयसम्राज्ञी झाली असती.
म्हणजे एकेकाळी मिस इंडिया वगैरे असणाऱ्या अभिनेत्रीलाही असल्या गोष्टी बघाव्या लागलेल्या आहेत. शिवाय आपल्याकडे स्वघोषित संस्कृतीरक्षक दंडुके घेऊन तयार असतातच. एआयबीचं प्रकरण सर्वांना माहित असेलच. त्यावर तर मिपावरही चर्चा झाली होती.

बोका ए आझम आपण आपला याबाबतचा दृष्टिकोन मांडला हे फार चांगल केल , या विषयाला अनेक पैलू असू शकतात त्यामुळ उत्तरही भिन्न भिन्न असू शकतात .

भोळा भाबडा's picture

23 May 2016 - 3:10 pm | भोळा भाबडा

बरोबर आहे.
अंघोळ ही पूर्णपणे नग्न होऊनच करण्याची गोष्ट आहे.
तसाही मानव हा एक प्राणीच आहे,
फक्त त्याची बौद्धिक पातळी ही सर्वोच्च असल्याने त्याला तीव्र भावना असतात आणि त्यापैकीच एक म्हणजे "लज्जा"
घरामध्ये ज्याला जसं कम्फर्ट वाटतं तसं रहावं,बाहेर मात्र असले माकडचाळे टाळावेत.

ज्याला जसं कम्फर्ट वाटतं तसं रहाव>>> हाच तर मूळ मुद्दा आहे अनेकांना अनेक कारणांमुळे स्वतःला कम्फर्ट वाटत तस राहाता येत नाही .

प्रियाजी's picture

23 May 2016 - 4:12 pm | प्रियाजी

अशा अवघड विषयावरील अतिशय सभ्य भाषेत लिहिलेला लेख आवडला. याच लेखात भारतातील जुन्या देवळांच्या आत व बाहेर असलेल्या नग्न/ अर्ध्ननग्न शिल्पांचा उल्लेख वा त्यावरील टिपण्णी अपेक्षित होती.

प्रतिसादाबद्दल आभारी आहे . यात अनेक मुद्दे थोडक्यात घेतले आहेत त्यांचा विस्तार करण्याची इच्छा आहे . ते लिहीताना आपण सुचविलेले मुद्दे उपयोगी पडतील

महेश_कुलकर्णी's picture

23 May 2016 - 4:45 pm | महेश_कुलकर्णी

नमस्कार,
आपण "धाडसाने" हा विषय मांडण्याचा आव आणला आहे परंतु ते करताना देखील जिथे जिथे धाडसी शब्द वापरायचे तिथे इंग्रजी शब्दांचा वापर केला आहे...
उदा:
बेअर चेस्ट सीन (ऊत्तान वक्ष)
Penis
erection

थोडक्यात तुम्ही पुन्हा एकदा मानसिकता दाखवत आहात की हे विषय आम्ही आमच्या भाषेत उच्चारात सुद्धा नाही... :)

मातृभाषेत हे फारच झणझणीत झाल असत , ते सोसवेल या पातळीवर आणण्यासाठी हा प्रयत्न .
बाकी धाडस वगेरे काही नाही यात . ख-या आयुष्यात घडलेल्या घटनेवरून यावर विचार करावा वाटल इतकच

चलत मुसाफिर's picture

23 May 2016 - 5:02 pm | चलत मुसाफिर

नग्नता ही लैंगिक/अलैंगिक या दोन्ही संदर्भातील असू शकते. एकेकाळी लिंगव्यवहार हा विषय निर्मळतेने आणि मुक्त-निरोगी मनाने हाताळण्याची क्षमता असलेली भारतीय संस्कृती दुर्दैवाने परकीय आक्रमण/प्रभाव यांच्या हिंस्र कचाट्यात सापडून पूर्णपणे स्वयंभीरू होऊन गेली. स्वतःच्या शरीराची लाज बाळगणे आणि ते शक्यतो झाकून ठेवणे योग्य, हे आपल्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या शिकवले जाऊ लागले. पण हळूहळू हे चित्र बदलेल (आणि आता ती वेळ येऊ घातली आहे) अशी आशा वाटते.

अनाहूत's picture

23 May 2016 - 5:08 pm | अनाहूत

नक्कीच

सूड's picture

23 May 2016 - 5:14 pm | सूड

नक्की काय झालंय?

अनाहूत's picture

24 May 2016 - 7:01 am | अनाहूत

फार काही नाही नेहमीचच पण विचार करायला लाऊन गेलं , लिहीन त्याबद्दल सविस्तर .

पण...काही जमल नाही.
असो.

ही थोडीशी पूर्वकल्पना किंवा टिजर आहे ...

विवेकपटाईत's picture

23 May 2016 - 8:14 pm | विवेकपटाईत

धागा विचार करण्या सारखा आहे. अपन पश्चिमी पोशाखला महत्व देतो आहे. सभ्य दिसण्यासाठी. माननीय चिदंबरम लुंगी घालूनच मंत्रालयात येत होते. मल्याळी लोक लुंगी घालण्यात कमी पण वाटून घेत नाही. आपल्या वातावरणाला योग्य कपडे आपण ५०-६० वर्षांपूर्वी घालत होतो. पण शिक्षण वाढले आणि कपडे हि बदलले. सभ्य सुशिक्षित दिसण्याची किंमत पण मोजावीच लागते.

विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना एक मंत्री मंत्रालयात आणि कधीकधी परदेशातही असा भारतीय पोषाख घालू शकतात पण इतर लोक साध ऑफिसमध्ये पण अस नाही करू शकत .

नमकिन's picture

23 May 2016 - 8:28 pm | नमकिन

अवस्था होता मोकळे होउुन धर्म बुडत नाहीं तोही भारतात हे तर आपण से रे जाणतोच.
अंतर्वस्त्रासाठी पण एकाने (उडीया) हा प्रश्न विचारला होता मला एकदा, बाहेरच्या कपड्याना प्रोटेक्शन असे मी म्हटले होते.
परदेशात न्युड बीचेस, न्यूड क्लब असतात जिथे सर्व व्यवहार मोकळा-ढाकळा (बीभत्सता टाळून) निसर्ग सान्निध्यात व्यतीत करतात. तुनळीवर सापडेल. ब्राझील कार्निवल तरळला, असो.

उगा काहितरीच's picture

23 May 2016 - 8:30 pm | उगा काहितरीच

लेख पटला... उद्यापासून अॉफिसमधे ३/४ !

अशी धडाडी हवी . बाकी त्यावर मिळालेल्या प्रतिक्रियाही इथे शेअर करा .

सुबोध खरे's picture

23 May 2016 - 8:33 pm | सुबोध खरे

काही हॉलीवूड अभिनेत्री बेअर चेस्ट सीन करतात त्या उलट भारतीय अभिनेत्री कधी असे सीन करताना दिसत नाही काही अभिनेत्री या डाएट आणि झिरो फिगरच्या अशा मागे लागतात कि त्यांच्या ब्रेस्टची पुरेशी वाढही होत नाहीआजकाल जवळ जवळ १००% भारतीय अभिनेत्री यांचे शरीर सौष्ठव हे "प्लास्टिक सर्जन"ने घडवलेले असते. यात चेहरा, स्तन, कंबर, पोट ई सर्व येते. हॉलीवूड मधील परिस्थिती याहून फार वेगळी नाही. फरक एवढाच आहे तेथे बापाच्या जहागिरीवर पोरं बसायला येत नाहीत, शिवाय दुबई, अबू धाबी, कराची वरून ठरत नाही कि पुढच्या सिनेमात काम कोण करणार आणी त्यांचा सिनेमा "प्रकाशित" केंव्हा होणार.

जव्हेरगंज's picture

23 May 2016 - 8:45 pm | जव्हेरगंज

आजकाल जवळ जवळ १००% भारतीय अभिनेत्री यांचे शरीर सौष्ठव हे "प्लास्टिक सर्जन"ने घडवलेले असते.

खरंच काय ?
धक्कादायक माहिती !!!

तुषार काळभोर's picture

23 May 2016 - 9:29 pm | तुषार काळभोर

शिल्पा
शिल्पा

ऐश्वर्या

http://sharephotostory.com/wp-content/uploads/2015/06/Karishma-Kapoor.jpg

हे केवळ वयपरत्वे झालेले बदल नाहीत, तर कृत्रिम बदल आहेत.

सुबोध खरे's picture

25 May 2016 - 11:08 am | सुबोध खरे

यात धक्कादायक काहीच नाही.
सर्जरीची किंमत १ लाख रुपये.
टीनपाट नट नट्याना सुध्दा लाखात
आणि अग्रगण्य नट नट्यांना कोट्यावधी रुपये एका चित्रपटाचे मिळतात.
मग काय पैसा फेको तमाशा देखो.
उगाच अमुक तमुक नटीची फिगर "कसली" आहे म्हणून खुश व्हायचे दिवस गेले.
"पैसे" असतील (फेकायची तयारी असेल आणि चार पाच महिने रुग्णालयाच्या चकरा मारायची तयारी असेल) तर तुमची बायको सुद्धा "वळण"दार/ कमनीय होऊ शकते.

पिलीयन रायडर's picture

25 May 2016 - 12:11 pm | पिलीयन रायडर

आणि अर्थात बायकोची तशी इच्छा असेल तर.. नवर्‍याला नुसतं वाटुन उपयोग नाही ना...

सुबोध खरे's picture

25 May 2016 - 12:38 pm | सुबोध खरे

ते तर ओघानेच आले
"चार पाच महिने रुग्णालयाच्या चकरा मारायची तयारी असेल"
हि तयारी बायकोचीच असावी लागेल नवर्याची असून काय उपयोग?
:) :) :) :) :) :)

स्वप्नज's picture

25 May 2016 - 1:07 pm | स्वप्नज

"आणि अर्थात बायकोची तशी इच्छा असेल तर.. नवर्‍याला नुसतं वाटुन उपयोग नाही ना..."

अगदीच बरोबर...नवर्‍याला नुसतं वाटुन उपयोग नाही

कंजूस's picture

23 May 2016 - 8:49 pm | कंजूस

विषय उत्तेजक आहे परंतू विकिछाप लिखाण करावं लागलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 May 2016 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाय द वे, नग्नतेची खुप मोकळीक देऊ नये, त्यामुळे संवेदना बोथट होऊ शकतात. जे आहे ते बरं आहे, भो ! असे वाटतं.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 9:58 pm | टवाळ कार्टा

काही होत नाही...संवेदना बोथट होत असतील तर खुशाल वय झाले असे समजावे =))

वपाडाव's picture

24 May 2016 - 10:47 am | वपाडाव

शार्प-नर बाळगा...!

-अवांतर : भयंकर विस्कळीत लेख
मत - आपल्याला बॉ बॉक्सर आवडते. होस्टेलच्या वैट सवयी.

चांदणे संदीप's picture

24 May 2016 - 11:16 am | चांदणे संदीप

विख्खी वुख्खू विख्खी....धागाकर्त्यासाठी भविष्य काळातील लेखनासाठी काही विषय सुचवितो,

१. भारतातील नग्नता आणि चिडीचूप डोंगरावरचे जंगल!
२. भारतातील नग्नता आणि श्या, आज विसरलोच!!

;)

Sandy

अनाहूत's picture

25 May 2016 - 9:37 am | अनाहूत

:-)

टवाळ कार्टा's picture

25 May 2016 - 10:46 am | टवाळ कार्टा

ते वख्या विख्खी वुख्खू असे आहे :)

चांदणे संदीप's picture

25 May 2016 - 11:03 am | चांदणे संदीप

ब्वॉर्र! :)