मला ना कळे का ?... हे जग माझा मत्सर करे
जरी पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर चरे
प्रतिसादांच्या साखळीत शब्दाला शब्द जोडले गेले
जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले
कोणी सांगे समजून घ्या अन कोणी हलके घ्या
पण मग सांगा माझ्याच संगे का असे घडे ?
नावात माझ्या काय आहे जे इतके का टोचले ?
उत्तर शोधण्यासाठी मग मी आत्मपरिक्षण केले
द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले
कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले
शंकरराव
प्रेरणा आदरणीय वाहीदा
प्रतिक्रिया
22 Jan 2009 - 7:19 pm | कशिद
जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले....
22 Jan 2009 - 7:23 pm | शंकरराव
कशिदभाई,
बदल केला आहे धन्यवाद :-)
22 Jan 2009 - 7:41 pm | विनायक प्रभू
कविता छान.
लेख पण लिहा हो शंकरराव
22 Jan 2009 - 8:16 pm | परिकथेतील राजकुमार
>>लेख पण लिहा हो शंकरराव
== कोणावर हो गुर्जी ? इस्तृत सांगा की जरा.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
22 Jan 2009 - 8:28 pm | शंकरराव
प्रभुसर ,
लेखाचा प्रयत्न करीन
विषय शोधतो आहे ...
22 Jan 2009 - 9:41 pm | फटाकडी
एकदम छानच आहे कविता. मि कविता वाचणार्यातली नाही पण ही कविता आवडली. साधी आणि कळायला सोपी. :)
22 Jan 2009 - 9:42 pm | प्राजु
मिपाशी सगळ्यांचे नाते अगदी घट्ट जुळावे हीच ईशचरणी प्रार्थना.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Jan 2009 - 10:56 pm | विसोबा खेचर
वा शंकरराव, सुंदर काव्य.
द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले
कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले
लकी आहात तुम्ही! आमच्या द्वेषापायी तर सबंध एक ब्लॉग या मराठी आंतरजालावर चालवला जातो! ;)
तात्या.
22 Jan 2009 - 11:51 pm | अवलिया
मस्त... :)
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
23 Jan 2009 - 6:35 pm | शंकरराव
प्रतिसादकारांनी कवितेच्या तळटीपेवर कानाडोळा करित काहीही प्रतिक्रिया केलेली नाही... असे का बॉ ?
आमच्या आदरणीयांवर दोन शब्द सुद्धा नाही ??? च्छा...
ठिक आहे.
काही हरकत नाही. (काहि दिवसा पूर्वी हि मौलिक प्रतिक्रिया सखाराम गटणे ने मला ख.व. मध्ये लिहिली होती. त्यावेळी तिथे लेखी परवानगिचा डिस्क्लेमर टाकायला विसरला, म्हणून मी लेखि परवानगी न घेता ही मौलिक प्रतिक्रीया वापरत आहे)
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
सहमत