अनाथ आकाशला मराठी अम्मा लहानाचं मोठं करते. डोशाच्या गाडीवर कांदा कापत कापत आकाश बेगमपेठला शिकतो. (इथं अजयच्या आर्त सूरात एक दीनवाणं गाणं, मात्र ठेका तोच) Software Consultant बनून US ला onsite जातो.
इकडे अम्माची झोपडपट्टी redevelop होते पण सुनेने हाकलल्या मुळे अम्मा वृद्धाश्रमात शेवटच्या घटका मोजतेय. तिला भेटायला आकाश हैद्राबादला येतो.
तीची अंतीम ईच्छा म्हणून तीच्या अस्थी तीच्या मूळ गावच्या विहीरीत विसर्जन करायला तो करमाळ्याला येतो. आणी बघतो तर काय? विहिर चक्क कोरडीठक्क पडलीय. वारेमाप ऊस पिकवल्यामुळे सगळ्या जिल्ह्यातच पाण्याची बोंब आहे.
अखेर गावात पाणीची जलराणी दाखल होते. पाणी भरायला हि... झुंबड उडते. आणी त्यातच त्याला 'ती' दिसते. भेटि वाढतात, प्रेम जुळतं (अजय आणी श्रेयाच्या आवाजात फक्कड प्रेमगीत, ठेका मात्र तोच) आणी एक दिवस आकाशला त्या भयानक सत्याला सामोरं जावं लागतं.
त्याची 'ती' दुसरी तीसरी कोणी नसून त्याच्या मामाचीच मुलगी आहे. होय तोच तो प्रिंसमामा, ज्याच्यामुळं आकाशची होलपट झाली.
बास्.. आकाश तीला पळवून US ला घेऊन जातो. कंसमामा... Sorry sorry प्रिंसमामा US visa न मिळाल्यामुळं रागात धावत जावून विहिरीत उडी मारतो. मागून मामी धावत जाते.
मामीच्या चेहर्याचा closeup shot. डोळे चटकन् पाण्याने भरतात... मामी हंबरडा फोडते. मग camera विहिरीचा closeup, प्रिंसमामा आत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो..... No background score,
कारण उडी मारताना मामा विसरतो कि.. कि.. दुष्काळामूळं विहिर कोरडीठाक पडलीय. - सैरभैराट
प्रतिक्रिया
17 May 2016 - 1:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाट्सएपच्या सौजन्याने की स्वतंत्र लेखन आहे, स्वतंत्र लेखन असेल तर मनापासून वाचतो, नै तर मी फक्त सध्या शेवटच वाचला आहे....!
सैराट २ कसा असेल याची कल्पना सध्या सर्वत्र ढकला, ढकलीतुन चालु आहेच. पण, सैराट पार्ट २ चं सध्या काही डोक्यात नै, असं नागराज मंजूळे कालच दै. दिव्य मराठीला बोलले.
-दिलीप बिरुटे
17 May 2016 - 1:36 pm | प्रशु
स्वतंत्र लेखन आहे.
17 May 2016 - 1:03 pm | बबन ताम्बे
पण स्टोरी डबल का छापली गेलीय ?
17 May 2016 - 1:51 pm | प्रशु
चुकून झालंया... बदलायचं कसं ते माहित नाहि.
17 May 2016 - 1:07 pm | सुमीत
हसून हसून पुरे वाट, पण पाण्याचा प्रश्न नेमका मोठा दाखिवला आहे.
17 May 2016 - 1:19 pm | एस
ही: ही: ही: म्हणजे बघा, शेवटी सर्व समस्यांचे मूळ हे पाणी आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा. पण लोक काय करतात? पाणी उपसा आणि पाणी उडवा!
17 May 2016 - 2:02 pm | स्पा
ओके
17 May 2016 - 2:51 pm | सामान्य वाचक
,