३ सुत्रे

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 May 2016 - 2:03 pm

हरयाणात हिस्सार रोड वर "लक्ष्मी प्रिसिजन" नावाचा एक कारखाना आहे..तिथे कामानिमित्त गेलो होतो कारखाना चालु असताना...
तिथे गुप्ता नावाच्या एका बनिया समाजातल्या माणसाशी ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या...
हा समाज व्यावसायिक असल्याने त्याने ३ सुत्रे सांगीतली...
१...साथी साथका..पैसा पास का..
२..वो सोना कीस कामका जो कान को काटे.
३..देन सच लेन झुटी...
त्याचे निरूपणं असे...
१...साथी साथका..पैसा पास का....आपणास अनेक दादा राम राम करणारे मित्र असतात..पण खरा मित्र तोच जो अडचणीच्या वेळी साथ देतो..नाहि तर म्हण आहेच.."फेसबुकावर हजार मित्र..बाहेर विचारत नाहि कुत्रं"
पैसा पास का....म्हणजे व्यवसायात उधारी असते..अनेकांचे येणे यायचे असते..
पण चेक हातात पडून वटे पर्यंत ते येणे कागदावर असते..पैसे तेच खरे जे घरच्या कपाटात असतात..अन्यथा ह्याच्य कडूनं ४ लाख.त्याच्या कडूनं १.५० लाख..इत्यादी कागदावर....
२...वो सोना किस कामका जो कान को काटे.....
व्यवसाय सुरू करताना माणूस अनेक आशा आकांक्षा बाळगून सुरू करत असतो..मी यव करेन त्यव करेन अशी जिद्द असते.पण अनेक अडचणी येतात,,
व्यवसाय जमत नाहि..कर्ज होते व धंदा डबघाईला येतो..अश्या वेळी माणसाचा जीव /भावना व्यवसायात अडकलेल्या असतात..आशा सुटत नाही..
पण अश्या वेळी असला बुडीत धंदा भावना बाजूला ठेवून विकून टाकून मोकळे होणे शहाणपणाचे..
कानातले सोन्याचे कर्ण भूषणं छान दिसते पण त्याच्या वजनाने कानची पाळी ओघळत असेल व त्रास होत असेल ते बाजूला काढणे शहाण पणाचे
३..देन सच लेन झुटी.....
व्यवसायात लेन देन असती..(डेटर/क्रेडिटर)...
व्यवसाय करताना आपली नियत साफ असते..देणेक-याचे पैसे आपण प्रसंगी पोट मारुन चुकवतो..पण ज्याच्या कडूनं येणे असते त्याची नियत काय आहे हे आपल्याला माहीत नसते..प्रसंगी अडचण आल्यास तो हात पण वर करू शकतो..
त्या मुळे "देन सच लेन झुटी..."
व्यवसायात अनेक प्रकारचे लोक्स भेटतात अनेक अनुभव येतात..त्या पैकी हा एक

धोरण

प्रतिक्रिया

गुड वन. यशस्वी व्यवसायाची काही मूलभूत तत्त्वे म्हणता येतील.

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 3:03 pm | किसन शिंदे

अर्रर्र!!

अकुंचे नाव वाचून मला ३ सुत्रे म्हणजे बर्म्युडा ट्रॅन्गलसारखे काहीतरी असावे असे वाटले होते. निराशा झाली.

अविनाशकुलकर्णी's picture

14 May 2016 - 3:12 pm | अविनाशकुलकर्णी

छ्या.कानफट्या नाव पडले राव समुहावर

अभ्या..'s picture

14 May 2016 - 4:52 pm | अभ्या..

न्हाय ओ अकुकाका, तसे काय न्हाय. तुमची बुध्दी अचाट आहे.
ह्या किस्न्याला काय उपेग बिजनेस टॅक्टचा. उगी काड्या करतय.
लिहा तुम्ही बिन्दास. आवडल्या मला.

हे किस्न्या सभ्य सभ्य म्हणता म्हणता आजकाल लै चावट बोलायलंय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'बर्मुडा' म्हटल्यावर चावटपणा नै तर दुसरं काय ?
किसनाकडून असा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. ;)

अविकाका, तुम्ही कै तरी पूर्णच चावटच लिहायला पाहिजे, अशी अपेक्षा करुन प्रतिसाद लिहिणार्‍या लोकांकडे दुर्लक्ष करत राहा. थोडं मेडियम चावट, प्रचेतस आणि मला चालतं, बाकीचं हलक्या फुलक्या लेखनाचे आम्ही आपले फ्यान आहोत, हे तुम्हाला तर माहित आहेच. तेव्हा लिहित राहा. :)

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

14 May 2016 - 8:21 pm | प्रचेतस

ते लिहित राहतीलच ह्याची खात्री आहे.
जातीचा हलवाई एक घाणा बाहेर काढल्यावर गिऱ्हाइकांकड़े दुर्लक्ष करून पुन्हा तन्मयतेने पुढचा घाणा तळायला घेतोच.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 May 2016 - 8:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

वल्लीसेठ, हल्ली आपले प्रतिसादही खुसखुशीत व्हायला लागले आहेत,
असं एक निरिक्षण नोंदवतो. जड, गंभीर, जगाचं कसं होणार पेक्शा हे बरं.

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 9:08 pm | टवाळ कार्टा

भावविश्वाचा पुढचा भाव कधी येतोय??? तुम्ही घोस्ट रायटर म्हणून काम बघणार हाहात म्हणे =))

घोस्ट रायटर नाही. स्टोरीतले घोस्ट म्हणून रोल आहे त्याचा

अविनाशकुलकर्णी's picture

14 May 2016 - 8:54 pm | अविनाशकुलकर्णी

धन्यवाद दादा

मला धन्यवाद दिलात ना अकुकाका?
हे धत्ताड तात्तड़ धत्ताड तट्टड.
झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट.

सतिश गावडे's picture

14 May 2016 - 9:47 pm | सतिश गावडे

याड लागलं का? :)

आपन आज पंगाट बुंगाट झिंगाट आन सैराट है.
लका अक्कूकाकांनी तुला जिनगणीत एकदा तरी प्रतिसाद दिलेला आठवतंय का?
तस्मात "याड लागलं याड़ लागलं"

चांदणे संदीप's picture

14 May 2016 - 5:06 pm | चांदणे संदीप

लक्षात घ्या, जीवनात जर तुम्हाला पुढे जायचे असेल आणि सर्व हितशत्रूंपासून सावध राहायचे असेल तर ह्या ३ गोष्टी कधीही कोणाला सांगू नका.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कधीच कुणाला सांगायच नाही म्हटल्यावर नाहीच्च! =))

Sandy

अभ्या..'s picture

14 May 2016 - 5:23 pm | अभ्या..

च्यामारी सॅन्डीबाबा,
कोण कुठला बेपारी आडनाव गुप्ता, बनिया असून अक्कुकाकासारख्या माणसाला त्यांनी बिझ्नेस टॅक्ट्स शिकवल्या मुफ्त मदी.
तुझेच अति नखरे.
मराठी माणूस ह्यामुळेच मागे पडतो हं.

सतिश गावडे's picture

14 May 2016 - 9:05 pm | सतिश गावडे

मी तर अगदी भारावून गेलो या तीन सुत्रांनी. या सुत्रांचे एक चित्र प्रिंट करून मी भींतीवर लावले आहे.

a

किसन शिंदे's picture

14 May 2016 - 9:51 pm | किसन शिंदे

धन्या सर, तुमची परवानगी असेल तर मी ही या बहुमोल चित्राची एक प्रिन्ट काढू इच्छितो, जी मला माझ्या वर्कस्टेशनवर लावायची आहे.

सतिश गावडे's picture

14 May 2016 - 9:59 pm | सतिश गावडे

लावा की. तुमच्यासाठी काय पन. काल पन आज पन आनि उद्या पन. हितं पन आनि तितं पन.

धन्या मनातुन म्हणत असल, "कर तिज्यायला, कायतरी कर."

टवाळ कार्टा's picture

14 May 2016 - 11:44 pm | टवाळ कार्टा

तुमच्यासाठी काय पन. काल पन आज पन आनि उद्या पन. हितं पन आनि तितं पन.

हितं पन आनि तितं पन म्हंजे कुटं कुटं ओ गाव्डेसर

देशपांडे विनायक's picture

15 May 2016 - 12:00 pm | देशपांडे विनायक

हे पण पाठ असलेले बरे !!
पुस्तकस्तु या विद्या परहस्त गतं धनं
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तत धनं
[ लिखाणातील चुका दुर्लक्षित कराव्यात ही विनंती ]
विद्येचा आणि धनाचा उपयोग करण्याची वेळ आली असता
पुस्तकात असलेले ज्ञान [ जे तुम्ही आत्मसात केले नाही] ते ज्ञान नाही आणि दुसर्याकडे असलेले [ तुमचे स्वतःचे ] धन हे धन नाही
पण याचा अनुभव घेण्याची वेळ कुणावर येऊ नये अशीच प्रार्थना अनुभव घेतल्यापासून करत आहे