व्यक्तिगतता नी व्यावसायिकतेचे नाते

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
12 May 2016 - 10:29 am

मिपा सदस्या अतिवास यांचे यशस्वी माघार हे रोचक अनुभवकथन वाचनात आले. त्या लेखात त्यांनी त्यांचे विवीध व्यक्तिगत दृष्टिकोण मांडले आहेत त्यातल्या एका दृष्टीकोणाने विशेषत्वाने लक्ष वेधले.

...'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) अशी एक 'सोयीची' विभागणी अनेक कार्यकर्ते करताना दिसतात. मला अशी विभागणी मान्य नाही. प्रत्येक गोष्ट - अगदी आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते अशी माझी धारणा आहे....

उपरोक्त वाक्याचा खिस पाडण्यासाठी मुद्दामच काही काँटेक्स्ट बाजूला ठेऊन विचारार्थ घेतले आहे.

उपरोक्त वाक्यात दोन दावे आहेत, पहिला दावा 'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' हा दावा पहिला यासाठी की हा दावा/विश्वास (पुर्वग्रह) आहे म्हणूनच 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करणार्‍या इतरांचा विश्वास/दृष्टीकोण 'सोयीचा' म्हणजे चुकीचा असल्याचा (अट्टाहासीक?) विश्वास आहे.

'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' आता हे वाक्य पुन्हा पुन्हा वाचा, वाक्य लिहिणारी व्यक्ती लेखिका अतिवास नाहीत असे गृहीत धरा, साधन शुचितेची तमा न बाळगणारे कुणि व्यक्त करत आहेत असा विचार करा आणि मग विनोद निर्मिती होते की 'आदर्श' आणि 'त्यागी' या शब्दांचे अर्थ बदलले जाण्याचा विषाद वाटतो ? हे ठरवा.

म्हणजे 'आपले सामाजिक आणि व्यावसायिक कामही - व्यक्तिगत असते' हे वाक्य नुसते वेगळे काढले तर काय होते आपण पाहीले आता दुसर्‍या भागा कडे येऊ; " 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करणार्‍या इतरांचा विश्वास/दृष्टीकोण 'सोयीचा' म्हणजे चुकीचा असतो (?)"

आता आपण एक सार्वजनिक जिवनातले वेगळे म्हणजे अजित डोवालांचे उदाहरण घेऊ, त्यांची व्यक्तिगत श्रद्धा त्यांना गोमांस वर्ज्य सांगते पण प्रत्यक्षात त्यांना गुप्तहेरम्हणून पाकीस्तानात काम करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी त्यांचे व्यक्तिगत जिवन आणि व्यावसायिक जबाबदारी यात फरक करावयास हवा की नको ? -प्रत्यक्षात व्यक्तिगत श्रद्धा आड न आणता त्यांनी त्यांची व्यावसायिक जबाबदारी ते पार पाडू शकले कारण 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात फरक करु शकतात हे महत्वाचे नाही का ?

आपण आता मिसळपाव संस्थळाच्या मालकांचे उदाहरण घेऊ त्यांचे व्यक्तिग दृष्टीकोण आस्तीक असतील वा नास्तीक असतील त्यांचे व्यक्तिगत दृष्टीकोण व्यावसायिकतेच्या आड येताना दिसत नाहीत आस्तीक आणि नास्तिक दोन्ही स्वरुपाच्या ग्राहंकांना त्यांच्या संस्थळावर व्यक्त होण्यापासून थांबवत नाहीत, हे महत्वाचे नाही का ?

भारताचे राष्ट्रपती, संसदेतील अध्यक्ष ते विधीमंडळातील अध्यक्ष सभापती ते निवडणूक घेणार्‍या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षापासून ते सर्वसामान्य शासकीय कर्मचार्‍यांपर्यंत सर्वजण सर्व साधारणपणे व्यक्तिगत विश्वास आणि व्यावसायीक जबाबदारी यांची गल्लत करत नाहीत.

"आपल्या भावना, आपली मूल्ये, आपले विचार यातूनच आपल्या बाह्य कृतींना वळण आणि दिशा मिळते." हे खरे आहे तुमचे व्यक्तिगत जिवनातील कौशल्य आणि इंटेग्रिटी तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जिवनात आणतानाच 'व्यक्तिगत’ (Personal) आणि ’व्यावसायिक’ (Professional) आयुष्यात गल्लत न करणे महत्वाचे नसते का ?

समाजविचार

प्रतिक्रिया

बाकी काय नाही पण मिपामालकाचे उदाहरण पटले.
कुठल्याच विचारधारेला व्यक्त व्हायला त्यानी कधीच विरोध केला नाही.

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 11:47 am | मराठी कथालेखक

आपण बराच उहापोह केला आहे. पण तरी मला असे वाटते की तुम्ही लेखिकेचे वाक्य पुर्णपणे समजून घेतले नसावे. शिवाय हे वाक्य योग्य अनुषंगाने पाहिले पाहिजे
व्यक्तिगत आयुष्यात पुर्णपणे नास्तिक असताना त्या पूजन वगैरे करतात त्यावेळी असे वाटणे साहजिक आहे की आपण हे योग्य करत नाही. एकतर मनाविरुद्ध पूजा करणे हे त्रासदायक वाटू शकते त्याचवेळी आपण जमलेल्या इतर भाविकांची फसवणूक तर करत नाही ना असा एक अपराधीभाव पण वाटू शकतो.
आता हेच एखाद्या अभिनेत्याच्या बाबत नाही घडणार, तो नास्तिक असून अस्तिकाची भूमिका कोणत्याही दडपणाशिवाय पार पडेल.
मागे कोणत्यातरी खेळाडूने अशाच कारणास्तव दारुच्या जाहिरातीत काम करण्यास नकार दिला होता असे काहीसे आठवते.

आता अजित डोवाल याच्यांबद्दल : तुम्ही म्हणता तसे त्यांना गोमांस खाल्ले असेल तर त्यांना त्याचे वाईट वाटले असेल पण तरीही त्यांनी व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य पुर्णपणे वेगळे ठेवले म्हणून ते सहज गोमांस खाऊ शकले असा अर्थ घेणे योग्य नाही. याउलट त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही त्यांचा "देशाची सुरक्षा" हेच त्यांच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर आहे म्हणून ते धार्मिक प्राधान्यांना काही काळ बाजूला सारु शकले.

तसेच मिसळपाव संस्थळाच्या मालकांचे , समजा ते अगदी १००% अस्तिक आहेत असे मानू पण याचा अर्थ व्यक्तिगत आयुष्यातही ते इतर मते सहज आणि सहिष्णूपणे नक्कीच ऐकू शकत असतील (मित्रमंडळी, नातेवाईक ई सोबतच्या गप्पांत) म्हणूनच ते इथेही त्या विचारांना व्यासपीठ देतात. कल्पना करा की याबाबत व्यक्तिगत आयुष्यात ते टोकाचे असहिष्णू असते. कुणी 'ईश्वर नाही' म्हंटल्यावर चिडून जातात, त्याचा नेहमीच राग करतात तर त्यांनी मिपावरही सगळ्या नास्तिकांना बॅन करुन टाकले असते. म्हणजेच व्यक्तिगत आयुष्यात 'सहिष्णूता' (किवा दूसरा अधिक समर्पक शब्द) ही प्राधान्यक्रमात अस्तिकतेपेक्षा वर आहे आणि तेच त्यांच्या व्यावसायिकतेमध्येही परावर्तित झाले.

माहितगार's picture

12 May 2016 - 12:49 pm | माहितगार

गुड पॉईंट पण यावर अधिक बाजूने विचार करण्यास वाव आहे असे वाटते

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 4:55 pm | मराठी कथालेखक

हो ना.. पण अजून मातब्बर मंडळी फिरकली नाहीत इकडे :)

माहितगार's picture

12 May 2016 - 5:02 pm | माहितगार

:( फिर का करेंगे :)

यशोधरा's picture

12 May 2016 - 5:02 pm | यशोधरा

वाचतेय..

स्पा's picture

12 May 2016 - 5:08 pm | स्पा

काय वाचतात :D

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 9:13 pm | मराठी कथालेखक

क्रमशः नाहीये :)

यशोधरा's picture

12 May 2016 - 9:48 pm | यशोधरा

क्रमशः नसलं तरी तुमच्यासारख्या मातब्बर मिपाकरांची मतं तर आहेत ना! तीच वाचतेय :)
अजूनही इतर मातब्बर त्यांची मतं लिहितील, मग तीही वाचेन.

मराठी कथालेखक's picture

12 May 2016 - 11:22 pm | मराठी कथालेखक

काय मॅडम थट्टा करताय गरीबाची :)