नुकताच तुझ्या आठवणींचा बहर
मजला पुरता वेढुन गेला
भरदार फुललेला गुलमोहोर
पावसान पुरा झोडुन गेला !!
कळेल तुला त्या तेथे दुरवर
आठवांचा पायरव वाजुन गेला
आवरताना चांदणे हे शुभ्रतर
रात माझी जागवुन गेला !!
निनाद्ताना पावसाची सर
मजला पुरता झींगुन गेला
कधि ना तुला कळ्णार
गंध तुझा हा वेडावुन गेला!!
सुचेता सुळे
प्रतिक्रिया
20 Jan 2009 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून येऊ द्या ! अशाच सुंदर कविता.
20 Jan 2009 - 11:39 pm | प्राजु
आवरताना चांदणे
ही कल्पना फार छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jan 2009 - 11:49 pm | विसोबा खेचर
कधि ना तुला कळ्णार
गंध तुझा हा वेडावुन गेला!!
वा! छान आहे कविता..
21 Jan 2009 - 12:38 pm | सुचेता
प्रतिक्रिया देणार्या सर्वांची मनापासुन आभारी आहे.. आपल्या प्रतीसादाने हुरुप आला, वेळेचा प्रश्न असल्याने सध्या तरि मोठे काहि लिहीता येत नाहि पण पुढे नक्की लिहिन
सुचेता.
21 Jan 2009 - 12:45 pm | वृषाली
छान आहे कविता...