थांबले ट्राफीक आता.
माग लवकर भीक आता.
शांततेचा पॅक्ट झाला
वाढले सैनीक आता
जा पुरा व्यवहार झाला
तुझि नको जवळीक आता!
लग्न झाले..ते हि झाले
चांगले सोशीक आता..
दु:ख झाले भोगुनीया
हासणे ऐच्छिक आता.!
(प्रश्न झाले मांडुनिया
उत्तरे ऐच्छिक आता!)
लागु केली कर्जमाफी
काढ लवकर पीक आता!
उंच त्याचा भाव नेला
वाढले भावीक आता...!
विसर सारे शीकलेले
एवढे तू शीक आता
चेहरा सभ्य दिसावा
शिकुन घे ही ट्रीक आता.
हा लढा अंतिम आहे
फक्त थोडे टीक आता
- कानडाऊ योगेशु
प्रतिक्रिया
9 May 2016 - 4:32 am | चांदणे संदीप
फक्त एकच तक्रार: गजलेच्या नियमांसाठी शब्दांना मोडणे-तोडणे काय योग्य वाटत नाही मला. म्हणजे बघा कधी कवितेतही असे घडते पण ते चांगल्या अर्थाने आणि सूचक असते किंवा तेवढ्यापुरते एखादा भाव निर्मितीकरता असते. अर्थात, हे माझे मत!
पुढच्या गजलेसाठी शुभेच्छा!! :)
Sandy
9 May 2016 - 1:07 pm | कानडाऊ योगेशु
धन्यवाद संदीप!
गीत जसे गायले जाते व कविता जशी वाचली जाते तशी गझल ही ऐकवण्याची गोष्ट आहे ह्या मताचा मी आहे. त्यामूळे ऐकताना जिथे र्ह्स्व दिर्घ उच्चारुनुसार ठरविले जाण्याची सूट जर गझल लिहिताना घेतली तर ते चालु शकेल असे वाटते. अर्थात गझलेच्या बाबतीत मी अजुन बालकच आहे. ( त्या अर्थाने ..जाऊ दे इथे सैराट चा संदर्भ नकोच !)
22 May 2016 - 11:44 pm | बाजीगर
हा गझलफाँर्म मला खूप आवडला. छान लिहीलत.
वाढले सैनिक आता /सोशिक आता/विसरण्याचे शिक आता या खूप चमकदार ideas वाटल्या.
मला हे एवढे आवडले कि मी ही काही प्रयत्न केला,अगदीच रहावले नाही.
गाभा-यात शिरता "तृप्ती",
झाले पुजारी नास्तिक आता
कन्हैया मोकाट फिरतो,
कुठे गेला "हार्दिक" आता
अर्थाची घासाघीस कशाला
छटेची नको झिगझीग आता
मतामताचा बाजार आला,
आपले मत विक आता
विचार छिन्नी,मी पाथरवट
असे उर्मी नैसर्गिक आता
नीट अध्यादेश हिट झाला,
धोरण हवे लवचीक आता
कसला महालायक तो,
झाला पनामा लीक आता
नवनिर्माण दुकान बंद होता,
काढ काही दैनिक आता
स्वप्ने मार्मिक,धार्मिक,पंचवार्षिक
येती, आहे तिथेच मी ठिक आता
संपली यमकेच जेव्हा,
काय लिहू अधिक आता