सदर घटना फक्त पुण्यातच होऊ शकते!
दिनांक २१ एप्रिल २०१६ संध्याकाळचे साडेपाच वगैरे वाजले असतील…
पुण्यात जायचे होते सांगावीहुन, ह्यावेळी आती लहान, म्हणजे २दिवस पुण्यात मुक्काम असल्यानी चारचाकी नव्हती, त्यामुळे दुचाकीवरून पौड रोडला जायचं ठरवलं, आई बसली मागे, बसल्यावर १०मिनिटांनी म्हणाली आत्ता खूप ट्राफिक असेल, आपण 'ओला कैब' वगैरे बुक करायला हवी होती, पण त्यासाठी उशीर झालेला, आम्ही घर सोडून वेळ झालेला, आणि मध्येच कुठे दुचाकी वळवणार गहरी जाउन वेळ जाणार म्हणून आम्ही प्रवास अखंडीत ठेवला.
युनिव्हर्सिटी पर्यंत ट्रॅफिक नव्हते, पण चतुःशृंगी नंतर जे काय सुरु झालंय ट्रॅफिक, बाप रे बाप. त्यात माझ्या पुणेरी ड्रायविंगला आई पदोपदी 'मी चालवू का' अशी दाद देत होती, मी म्हणायचो अगं मी चालवतोय तशी चालवली नाही तर आपण आत्ता युनिव्हर्सिटीलाच असतो! फिल्म इंस्टीट्यूटच्या सिग्नलला परत तेच, 'मी चालवू का!?' मी शेवटी वैतागून उतरलो, म्हंटलं 'घे बाई, चालव!' निदान मागे बसून आईच्या शिव्या खाण्यापेक्षा व्हाट्सपिंग/फेसबुकिंग करावं! तर मागे बसल्या बसल्या मंदारचा फोन (माझा मित्र) त्यात त्या अती-छोट्या रस्त्यांवरच्या अती-प्रचंड ट्राफिक मध्ये मला त्याचं काही ऐकू येत नव्हतं, आई आपली चालवत होती मला डबलसीट घेऊन जमेल तसं, तिला एकटे चालवायला छान जमत असेल हो! पण कोणाला मागे घेऊन चालवणे वेगळी गोष्ट आहे, असो. माझा फोन चालूच होता 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मंदारला सांगत होतो…
सिग्नल आला नळ स्टॉप च्या अलीकडचा, आईनी वाहन थांबवले, माझा फोन चालूच, 'फोन वर आवाज येत नाही' असं मी मित्राला वारंवार सांगत होतो ते आईने ऐकले आणि वैतागून मला म्हणाली 'अरे, ऐकायला येत नाही तर… पुढे जाऊन बोल!' हे बाजूच्या दुचाकी वीराने ऐकले… तो उत्तरला "अजून कुढे पुढे जाऊ म्याडम?" मी आणि आईने त्या माणसाकडे पाहिले, आणि मी झालेल्या 'गलतफैमिली' वर हसत उत्तर दिले, (हातातला फोन तसाच ठेवत) 'अहो काका, तुम्हाला नाही बोलली ती, ती माझाशी बोलत आहे, मी फोन वर आहे, आणि मला आवाज येत नाही म्हणून 'पुढे जाउन बोल' असं सांगत्ये, तुम्हाला काही बोलली नाही हो ती!' हे ऐकताच मला तो ईसम म्हणतो कसा... 'अरे पण तू चालव की, आईला कशाला त्रास देतोयस!' ह्यावर मी अजून हसून म्हणालो, "अह्हो, सांगावीपासून मीच चालवतोय, मागच्या सिग्नल पासून आई चालावत आहे, तिला मागे बसून घाबरायला होतंय म्हणून!" हे वाक्य संपताच सिग्नल सुटला, आणि तो सिग्नल हिरवा होताच साहेबांनी जो काय पीकअप घेतला ते थेट सायकल लेन मध्ये, जिथे स्टील चे ३ खांब असतात, जीथे फक्त चालणारे किव्वा सायकल वालेच जाऊ शकतात, त्यात त्यांची ती छोटी दुचाकी त्यांच्या विराट कौशल्याने घुसवत साहेब गायब! शेवटी मी नळ स्टॉपवर आईला म्हणालो 'आई मी चालवतो आता गाडी, तू चालवत असशील नीट, पण एकटे चालवणे वेगळे आणि कोणाला मागे बसवून चालवणे वेगळे!' आईला माझा सल्ला पाटला (किंवा तिच्या कडे दुसरा पर्याय नव्हता, असं समजा), मग पौड रोड ला लागेपर्यंत त्या 'दुचाकी वीराबद्दल' आम्ही बोलत होतो!
बाकी सिग्नल वर ईतकी बडबड फक्त पुणेरीच करू शकतो, आणि त्यात मी ही अर्धा पुणेकर, तो सिग्नल अजून एक मिनटाचा वगैरे असता तर त्या माणसाचे नाव-गाव ही कळाले असते! असो…
ह्या सर्व भानगडीत फोन कधी कट झाला त्याकडे लक्षच गेले नाही. पुन्हा कधी (पुण्यात) मागे बसूनही फोन न घेणे हेच ईष्ट!
#साशुश्रीके । ०५ मे २०१६
प्रतिक्रिया
4 May 2016 - 7:46 pm | एस
बाकी पुणेकर दुचाकीस्वाराने हा लेखही सिग्नल सुटायच्या आधी टंकून प्रकाशित केला असता! आहात कुठे?
4 May 2016 - 7:51 pm | चांदणे संदीप
+1111111111
4 May 2016 - 7:57 pm | स्पा
असा सगळा प्रकार झाला तर
4 May 2016 - 9:25 pm | विजय पुरोहित
=))
4 May 2016 - 9:46 pm | विजय पुरोहित
त्यापेक्षा जिलबी लेख टाकून वेळ दवडू नका!
लेख टाकलात तर लोक वाचणारच आणि प्रतिक्रिया देणारच.
जर त्या झेपत नसतील तर रतीब टाकूच नये!
4 May 2016 - 8:06 pm | यशोधरा
थोडक्यात तुम्हांला डबलसीट गाडी चालवता येत नाही तर! डबलसीट घेता येईना, रस्ते वाकडे? :D
4 May 2016 - 10:10 pm | विजय पुरोहित
यशोधरा नावावरूनच तुम्हाला समजायला पाहिजे कि त्या साहेब नसून मॅडम आहेत. उगाच घाऊकात सगळ्यांचे अपमान करत सुटू नका.
4 May 2016 - 10:11 pm | विजय पुरोहित
समजायला पाहिजे की त्या मॅडम आहेत. साहेब नाहीत! उगाच घाऊकात सगळ्यांना दुरुत्तरे करत सुटू नका.
4 May 2016 - 10:34 pm | विजय पुरोहित
इथनं बाजार उठायला वेळ लागत नाही. पण नम्रतेने घेतलेत तर अगदी जीवलग दोस्त होतील इथे. बघा तुम्हाला काय पाहिजे इथे. थोडे ईतर लोक्स पण काय लिहितायंत ते वाचा, त्यावर प्रतिसाद द्या, मत मांडा. मग इथले महाडँबिस वाटणारे पण लोक्स मदतीला येतात. मी पण गेलोय यातून. पण उगाच दुरुत्तरे करत सुटू नका. त्याचे परीणाम त्रासदायकच होतात.
बाकी अगदी बिनधास्तपणे साॅरी म्हणा. मग बघा सगळे घेतात परत आपल्यात!!!
4 May 2016 - 10:47 pm | टवाळ कार्टा
त्यांचे जौदे...तुम्ही का इतके पेटलायत
4 May 2016 - 10:50 pm | विजय पुरोहित
दू दू दू टक्याभाऊ!!! तुम्हाला मुद्दा समजलेला नाही!
तुम्ही भ्रामक म्रमवादाचे बळी आहात!
चालु द्या निरर्थक अत्मरंजन!
5 May 2016 - 6:00 pm | अस्वस्थामा
हे नक्की मांत्रिक की बुवा.. कै कळेना झालंय राव.. ;)
4 May 2016 - 10:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
आँ अच्चं उत्तल नै द्यायचं शुशुशीके तै!!!
4 May 2016 - 10:28 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ओह सॉरी चुकुन नावाचा अपभ्रंश झाला शीशुशिके...सशु.....डॅमिट....नाव बदला ओ. केवढं अवघडं आहे टायपायला.
4 May 2016 - 11:37 pm | कानडाऊ योगेशु
नाव बदलायला ते काय महीला आहेत का? चांगले जनक पुरुष आहेत!
4 May 2016 - 10:40 pm | यशोधरा
बरं मग?
4 May 2016 - 11:19 pm | यशोधरा
ओ ताई, गाड्या वाढल्या तरी तुम्ही आपल्या रस्त्याने जा ना.
4 May 2016 - 11:21 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
बाहेरच्या लोकांना पुणेकरांचे स्किलसेटस कसे जमणारेत अत्मसात करायला? =))
4 May 2016 - 11:38 pm | यशोधरा
नै म्हैत :P पुणेकरांबद्दल बोलता बोलता स्किलसेटस आत्मसात वगैरे करायला वेळ मिळत नसणार.
4 May 2016 - 8:06 pm | सूड
हे पुण्याबाहेरचे लोक असे पुण्यात येऊन नसत्या तक्रारी करत बसतात!! आमच्यावेळी असं नव्हतं.
4 May 2016 - 10:05 pm | सूड
अभ्यास वाढवा...
4 May 2016 - 9:10 pm | चाणक्य
हे तर काहीच नाही. एकदा कुमठेकर रोडला एका माणसाने सिग्नलला त्याचा चष्मा काढून पुसला आणि सिग्नल लागल्यावर तो निघून गेला. मला फारच माैज वाटली.
4 May 2016 - 9:16 pm | तर्राट जोकर
सिग्नल लागला की थांबतात ह्या पुणेकरांच्या शिस्तीचे कौतुक वाटले.
4 May 2016 - 9:53 pm | उगा काहितरीच
हा उपरोध समजावा काय ? ;-)
4 May 2016 - 10:14 pm | तर्राट जोकर
मी पुणेकर नाही... ;)
4 May 2016 - 9:51 pm | उगा काहितरीच
ते सांगावी म्हणजे सांगवी का ? नवी का जुनी ? रच्याकने मी पण सांगवीतच रहातो बरं जमल्यास भेटू कधी... ;-)
5 May 2016 - 4:41 pm | वगिश
मी पण
5 May 2016 - 4:49 pm | कैलासवासी सोन्याबापु
पप्पु महाजनचं खानदेश कट्टा सुरु आहे का हो अजुन ? पुलाच्या जवळ पेट्रोल पंपापुढले? सांगवी मधले गजानन महाराज मंदिर आमचा खास मानसिक अन भावनिक आसरा होता पुण्यात :)
5 May 2016 - 5:24 pm | उगा काहितरीच
मला काही खास नाही आवडलं तेथील जेवण... असते एकेकाची आवड. आहे अजून चालू ! बाकी गजानन महाराज मंदिराबद्दल सहमत. छान आहे मंदिर ...
5 May 2016 - 5:51 pm | कैलासवासी सोन्याबापु
आवड़ निवड सापेक्ष आहे/असते उका त्यामुळे तुमच्या मताचा आदर, अन्नाला नावे ठेऊ नये असे म्हणतात पण मेसमधुन रोज डब्यात येणारा "धोका" पचवला की एखाददिवस पप्पु बरा वाटे अन एखादाच् दिवस परवडे सुद्धा त्याकाळी ;) असो!
5 May 2016 - 9:49 pm | उगा काहितरीच
येथील जेवण इतर खानदेशी हॉटेलसारखेच तिखट असते त्यामुळे कदाचित आवडत नसावे मला . बाकी अन्नाला नावे ठेवू नयेत सहमत पण मेसवाल्यांचे अन्न याला अपवाद असावे.
-(मेसग्रस्त) उका
8 May 2016 - 12:21 am | त्रिवेणी
अगगा नको त्या मेसच्या आठवणी

4 May 2016 - 9:54 pm | sagarpdy
त्याचे १४ शब्द, तुमचे ३१
थोडक्यात अर्धवट पुणेकरच सिग्नल वर जास्त बोलतात.
10 May 2016 - 12:13 am | सतिश गावडे
सिंहगड रोड सारसबागेपासून सुरू होऊन सिंहगडावर संपतो. अठ्ठावीस किमीचा हा रस्ता आहे. तुम्ही लिहीलेली घटना या रस्त्यावर नेमकी कुठे घडली?
10 May 2016 - 7:15 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अगदी अगदी. सिंहगड रस्त्यावर थेट यु टर्न मारायला सिंव्हाचं काळीज आणि मांजराची चपळाई लागते म्हणे. चायला तिकडे सिंहगड रस्त्यावरचे रिक्षावाले आणि पीएमपीएमेल वाले ज्या दिवशी लेनची शिस्तं पाळती त्या दिवशी एकवीस तोफांची सलामी द्यायचा विचार आहे.
4 May 2016 - 10:42 pm | भक्त प्रल्हाद
एवढी घाई असताना इतकी माणुसकी फक्त पुणेकरच दाखवु शकतात.
5 May 2016 - 7:11 am | चांदणे संदीप
राग आला तरी चालेल - आपल्या डायरीतली फाडलेली पाने नका हो इथे चिकटवत जाऊ! कधीतरी तुमचे लेखन आवडलेलेही आहे. इथे मिपावर किती दर्जा राखून लिहिणारे लेखक/कवी आहेत, त्यांचे लेखन वाचले तरी लक्षात येईल आपल्याला कस लिहिलं पाहिजे, अभ्यास म्हणा हवं तर. सल्लाच आहे हा, कसा घ्यायचा ते तुम्ही ठरवा!
आता - माझा आयडी उडला तरी चालेल! हे विजय पुरोहित उर्फ मांत्रिक म्हणजे जाम बालिश प्रकरण आहे! सोबतीला डेडपुल म्हणजे टुकारवाडीतली बन्याबापूची जोडीच! आता येतील माझ्या प्रतिसादावर धावून....हरकत नाही. हा माझा पहिला "जाहीर" प्रतिसाद आयडींविरूद्ध लिहायचा! असले बालीश (पक्षी : टुकार/भिकार) वाद-प्रतिसाद वाचून इरिटेट होण्यापेक्षा आयडी घालवून वाचनमात्र झालेले बरे! म्हणजे, पुन्हा कितीही वैताग झाला तरी प्रतिसाद लिहिता येणार नाही! आता लिहिलाच आहे! ;)
जय महाराष्ट्र!
Sandy
5 May 2016 - 4:19 pm | आदूबाळ
याच्याशी सहमत आहे.
5 May 2016 - 5:32 pm | नाखु
ते थोडीच इतरांच वाचायला येतात मिपावर, ते तर निमिष भाऊंचे वर्गमित्र आहेत. इतराम्नी त्यांच लिखाण वाचायच अस्त आणि चान चान म्हणायच असतं.
तुम्ही नका लक्ष्य देऊ या नतद्रष्टाकडे उरलेली पानं पण चिटकवा डायरीची इथे... रोज एक या प्रमाणे (धुराळी धागे खाली तरी जातील) लोहा लोहेको काटता है !!
आप्ला अगदीच स्मरणशील नाखु.
5 May 2016 - 7:00 pm | प्रचेतस
आणि आपल्याच धाग्यावर महिनाभरानं परत धन्यवाद धन्यवाद करत सुटायचं असतं हे विसरलात नाखुन अंकल?
5 May 2016 - 11:03 am | काळा पहाड
पौड रोड म्हणजे पुणे नव्हे याची कृपया नोंद घ्यावी. पुण्याची हद्द सगळ्या पुलांच्या अलीकडे पर्यंत संपते याची सुद्धा नोंद घ्यावी.
अवांतरः पौड रोडला जायला से.बा.रोड हा काही जवळचा मार्ग नव्हे. मात्र जवळचा मार्ग सांगण्याचा आमचा कोणताही विचार नाही, याचीही कृपया नोंद घ्यावी.
5 May 2016 - 4:06 pm | वपाडाव
हेच्च लिहायला आलो होतो...
टंकनश्रम वाचव्ल्याबद्दल धन्स...
5 May 2016 - 1:00 pm | त्रिवेणी
5 May 2016 - 4:59 pm | सविता००१
मस्त स्मायली. अगदी हीच पोझ घेतली आहे मी आत्ता;)
5 May 2016 - 6:45 pm | palambar
नावावरुन काहितरि विन्टरेस्टिंग वाचायला मिळेल असे वाट्ले होते , पण... असो.
5 May 2016 - 8:44 pm | हकु
प्रतिसाद आहेत की इंटरेस्टिंग! (नेहमीप्रमाणेच ;) )
5 May 2016 - 7:37 pm | वैभव जाधव
असो!
6 May 2016 - 5:38 pm | shvinayakruti
भयंकर पाणचट
6 May 2016 - 6:01 pm | जेपी
पन्नाशी निमीत्त धागाकर्तेला एक नारळ आणी मुंबई-पुणे-मुंबई चित्रपटाची पायरेटेड सिडी देऊन सत्कार करण्यात येत आहे..
10 May 2016 - 12:09 am | रातराणी
नशीब मुंपुमुं २ नाही दिला =)) थोडक्यात वाचलात सशुश्रीके!
8 May 2016 - 5:28 pm | अभिजीत अवलिया
मुक्तपीठ. लेखापेक्षा प्रतिक्रिया उत्तम.
9 May 2016 - 2:04 pm | खटासि खट
मात्रूदीणाणिमीत्त तुमच्याकून असलच भारि गिफ्टची भेट प्रेझेण्ट मधि मीळणार हि १०१ टक्के खात्रिचि ग्यारण्टी व्हती राव.
सांगवी ते पुणं या जर्नीवर पिच्चर निघल लका. स्वप्निल जोशि अन श्रद्धा कपुर
10 May 2016 - 12:00 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटलं माझाच धागा वर आला का काय!
असा अनुभव फक्त पुण्यातच येऊ शकतो.