नमस्कार मिपा कुटुंबिय. सदर लेख हा विनोदनिर्मिती करुन तुम्हाला घटकाभर हसवण्यासाठी लिहिला आहे. कोणावरही वैयक्तीक शेरेबाजी वा टिंगल करणे हा उद्देश नाहिये. १% वास्तवाला ९९% कल्पनेची तर्री मारुन हि मिसळ बनवलेली आहे. कोणास ह्या लेखनामुळे वाईट वाटले, कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या तर 'अल्पवयीन, संपुर्ण शारिरीक वाढ झालेला पण बौद्धिक वाढ अपुर्ण असलेला गुन्हेगार' समजुन माफी करावी.
(हुकुमावरुन)
दिनांक :- १९/१/२०२५
स्थळ :- मिपा हाटेलाचे कार्यालय
नमस्कार मिपाकर, आपण मला ओळखताच, आम्ही मोगलगिद्दिकर.
'भाईंनी' आपली गाठभेट सोमण दप्तराच्या वेळी घालुन दिलीच आहे, त्यामुळे ऐतिहासीक दस्ताऐवजातील आमच्या अभ्यासाविषयी आपण जाणुन आहातच.
आपले हे मिपा फार पुर्वी जेंव्हा चांगले बाळसे धरु लागले होते, त्याकाळचे काहि ऐतीहासिक दस्ताऐवज आमच्या हातास लागले आहेत, जे आज आम्ही आपणापुढे सादर करत आहोत. त्या काळातील काहि सदस्यांनी एकमेकांस पाठवलेले वैयक्तीक संदेश त्या काळातील मिपाची परिस्थीती, तेंव्हाचे वातावरण व सदस्यांचे एकमेकांशी असलेले संबध दाखवुन जातात.
रुमाल क्र. १
ह्या मध्ये 'प्रभुणे' नावाच्या कोणा सभासदाने 'आगलाविया' ह्या सदस्यास पाठवलेल्या पत्रामध्ये, आगलाविया यांनी त्यांच्या एका लेखावर वैयक्तीक आकसाने विडंबनात्मक लेख लिहिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ह्या पत्रास दिलेल्या प्रत्युत्तरात आगलाविया यांनी चंपादक नावाच्या कोणा इसमानी मुळ लेखात काटछाट करुन त्या लेखाला वेगळे वळण दिले असल्याचा खुलासा करुन सर्वात शेवटी 'रात्री बसु, मग बोलु निवांत' अशी एक ओळ लिहिलेली आढळते. ह्याच दोघा सभासदांनी 'केशरकुमार' नावाच्या कोणा कविस त्याने केलेल्या कुठल्याश्या एका विडंबनात्मक कवितेबद्दल मात्र भरभरुन दाद दिलेली दिसते.
तात्या भयंकर ह्या मिपाच्या चालक मालक व संस्थापक असलेल्या व्यक्तीला आलेल्या संदेशातुन त्यांच्या जिवनाचे विविधांगी दर्शन होते.
एका पत्रात कोणा एका भगिनीने 'आजची खादाडी' ह्या सदरामध्ये तिच्या पा.कृ. चा फोटो आला आहे परंतु नाव मात्र अन्य कोणा भगिनीचे दिले आहे म्हणुन राग व्यक्त केला आहे, तसेच असे घडण्यामागे तात्यांना शनिवारी रात्री आलेल्या 'अतीरिक्त ताणाचा' हात आहे का अशी पृच्छा केली आहे.
ह्यांना आलेल्या बर्याचशा पत्रांमध्ये ते व त्यांचे मिपा सदस्य 'तसलेच' असल्याचा उल्लेख आढळतो. हे 'तसले' प्रकरण काय आहे त्याचा तपास मात्र लागत नाही. 'विकर्ण' नावाच्या सभासदाने तात्यांना पाठवलेल्या पत्रात ते खाजवुन खरुज काढणारे असुन फार गमजा मारतात असा आरोप केलेला आहे. आपण लवकरच मिपाच्या तोडिचे नविन हाटील काढुन तुमचा माज उतरवणार आहे अशी धमकी हि दिसते.
एका डॉक्टर सभासदाने पाठवलेल्या पत्रात नविन निघालेले हाटील हे त्याचे नाव सार्थ करणारे असुन त्या हाटिलात तात्यांना चोरुन भजी खात असताना बघितल्याचा संशय / आरोप व्यक्त केला आहे.
'कोल्हापुरी कांदा' ह्या सदस्याचा तात्यांशी मोठ्या प्रमाणावर पत्रव्यवहार असावा असे आढळते. परंतु त्यांनी पाठवलेल्या जवळ जवळ सर्वच पत्रात कुठला ना कुठला धागा देउन, 'लेख टाकलाआहे, वाचा आणी तुमची प्रतिक्रीया सांगा.' असा विनंती वजा हुकुम केलेला आढळतो.
एका स्त्री सदस्याने कोणी 'पडिक कथेतील राजकुमार' व 'चिंतोबा' नावाचे सभासद आपला फोन नं. मागतात व सतत 'मयत री करणार का?' असे संदेश धाडत असतात ह्या बद्दल तक्रार नोंदवली आहे.
'एपमॅन उर्फ जंगलातील माणुस' ह्या सदस्याला आलेले अनेक संदेश हे अभ्यासपुर्ण नसले तरी ह्या सदस्याने इतर सदस्यांना पाठवलेले संदेश मात्र नक्किच विचार करायला लावणारे आहेत.
'सदाराम मटणे' ह्या सदस्यास पाठवलेल्या पत्रात 'एपमॅन' ह्यांनी आपल्या ८ पॅक चे व व्ही शेप चे विस्तृत वर्णन लिहिले असुन 'एका उडित सगळी कौले मोडुन टाकिन' असा एक इशाराही दिलेला आढळतो. 'एपमॅन' ह्यांनी 'कोल्हापुरी कांदा' ह्याला लिहिलेल्या एका पत्रात 'फाट्यावर मारणे' ह्या कलेचे विस्तृत रसग्रहण केलेले आढळते. तसेच ह्या पत्रामुळे मिपाच्या जन्मापासुनच अनेक न आवडलेल्या लेखकांना व त्यांच्या लेखांना सभासद 'फाट्यावर मारत' आहेत ह्या आमच्या विधानाला पुष्टिच मिळते.
'सदाराम मटणे' ह्यांना आलेल्या बर्याचश्या संदेशांमध्ये 'आता कौले फोडणे बस, काहितरी मोठे लेख येउद्यात, प्रतिभा वाया घालवु नका' असे सल्ले वजा हुकुम आढळतात. मटणे ह्यांनी संक्राती निमीत्ताने अनेक हितशत्रुंना पत्रे पाठवुन जुनी कटुता मिटवण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.
'कोल्हापुरी कांदा व 'पुणेरी ताई' ह्या सभासदांच्या मालकीची एखादी 'टंकसाळ' असावी असे त्यांना आलेल्या पत्रांवरुन जाणवते.
'काय आज भरपुर लेखांचा पाऊस पाडत आहात' 'तुम्ही मिपाचे सचिन तेंडुलकर , ब्रायन लारा आहात, लवकरात लवकर मिपाचे डॉन ब्रॅडमन राधाकृश्ण सावंत ह्यांचा विक्रम मोडा' अशा स्वरुपाची अनेक पत्रे दोघांच्या खात्यात आढळतात. एका सभासदाने ह्या दोन्ही व्यक्ती प्रत्यक्षात एकच असुन दोन नावांनी लेख लिहितात असा संशय हि एका खाजगी पत्रात व्यक्त केलेला आढळतो.
'पुणेरी ताई' ह्या टंकसाळ चालवण्या बरोबरच इतरही अनेक क्षेत्रात ज्ञान मिळवुन आहेत असे दिसते. त्यांना आलेल्या अनेक पत्रात अमका तमका लेख प्रदर्शीत करण्यासाठी कोणता दिवस चांगला आहे? भाग्यांकाचा भागाकार कसा करता येइल ? घरी पाणी थंड करण्यासाठी असलेला माठ हा भिंतीशी तिरक्या कोनात वाकडा ठेवल्यास काय फ़ायदा होउ शकेल ? केसातील उवांची अंडी समुळ नष्ट कशी करावीत ? नवर्याला न सांगता त्याची दारु कशी सोडवावी ? असे विविध प्रश्न विचारुन सल्ले मागितलेले दिसतात.
मिपावर अष्टपैलु व्यक्तिमत्व सतत बागडत असतात हा आमचा दावा ह्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध होतो.
'कोल्हापुरी कांदा' ह्यांना पाठवलेल्या एका खाजगी पत्रात प्रभुणे ह्यांनी त्यांना 'उगा बोंबलत इकडचे तिकडचे धंदे करण्यापेक्षा अभ्यासात लक्ष दे' हा दिलेला सल्ला सभासदांची एकमेकातील नात्याची विण किती घट्ट आहे हे दाखवुन देतो.
बिपिन सदावर्ते ह्यांना आलेल्या बर्याचशा पत्रात 'तुम्ही आमच्या गावात येता, आज भेटु उद्या भेटु करता व हळुच न भेटता निघुन जाता' असा एक तक्रारीचा सुर आढळतो.
'चिंतोबा' हे काहिसे आक्रमक सभासद असावेत असा त्यांच्या पत्रांचा अभ्यास केले असता अनुमान निघते. त्यांचे व 'जाहिदा' ह्यांचे पत्रयुद्ध हे अत्यंत अभ्यास करण्यायोग्य व चिंतनीय आहे. 'आम्ही मुर्खांशी वाद घालत नाही' ह्या वाक्यास त्यांनी दिलेले ' पण आम्ही घालतो' हे सडेतोड उत्तर त्यांच्या एकुणच करारी व्यक्तीमत्वाची जाणीव करुन देते.
'खोटा डॉन' ह्या साभासदांच्या पत्रांमध्ये त्यांचे व 'सदानंदमैत्री' ह्यांचे भारतीय चलनातील उत्पन्न व पार्श्वभागाखालील 'युरो'ची उब हे संभाषण अतिशय चिंतनीय आहे.
'पिवळा डांबरट' ह्या सभासदांना आलेल्या एका खाजगी पत्रात त्यांनी कोणा एका लेखकाच्या 'नविन विमानमार्ग' ह्या लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल त्यांचा निषेध नोंदवण्यात आला असुन, ते अनेक वर्षे अमेरीकेत राहतात त्याचा त्यांना गर्व आहे असा धडधडीत आरोप करण्यात आला आहे.
देशी परदेशी हा वाद मिपाच्या जन्मापासुन चालत आला आहे ह्या आमच्या अजुन एका दाव्याला येथे पुष्टि मिळते.
'दगडोपंत' हे सभासद थोर कवी असावेत असे त्यांच्या पत्रांवरुन वाटते. 'दोन ओळीत चारोळी कशी लिहावी, क ला वि न जोडता ता वरुन ताकभात कसे ओळखावे' हे पत्रांचे विषय त्यांच्या थोर व्यासंगाची साक्ष पटवुन देतात.
'तुमचा अभिजित' ह्यांना आलेल्या बर्याचशा पत्रात 'उत्तम परिक्षण, तुमच्याशी पुर्णपणे सहमत' आणी 'एक काम करा तुम्ही ना हे परिक्षण सोडुन दुसरे काहिही लिहा, आम्ही आनंदाने वाचु. तुम्हाला ओ कि ठो कळत नाही चित्रपटातला.' ह्या दोनच प्रकारच्या प्रतीक्रिया आढळल्या.
रुमाल क्र. २
ह्यात विशेषत: स्री सभासदांची पत्रे असुन त्यात उखाळ्या पाखाळ्या, नविन पाककृती, नवरा आंघोळीला जाताना पाकिट खिशातच विसरल्याने त्यांचा झालेला फायदा, ऑफिसच्या फोनचा वापर एकमेकींना फोन करण्यासाठी कसा करावा, कॉन्फरंस कॉल कसे करावेत इत्यादी विषयाला हि पत्रे वाहिलेली आढळतात.
मिपाचा एक गट चालवत असलेल्या साखर कारखान्याच्या अध्यक्षा 'ताई पाटिल' ह्यांच्या पत्रांचा येथे विशेष उल्लेख करावा लागेल.
त्यांना आलेल्या एका पत्रात 'कुटिल' नावाच्या एका सभासदाने पर्शियन गालिच्यावरचा फ्रिज व शेणानी सारवलेल्या जमिनीवर उभा केलेला फ्रिज ह्याचा जो तौलनीक अभ्यास केला आहे त्यात अभ्यासुंना जरुर मोठा खजीना सापडल्याचा आनंद होईल.
'तपस्वी' नावाच्या एका सभासदानी ताईंना पाठवलेल्या पत्रात कोणी 'सुनैना' नाव धारण करणारे/ करणारी सभासद कारखान्याच्या मिटिंग मध्ये जातिपातिचे राजकारण आणत असल्या बद्दल खंत व्यक्त केली आहे. ह्या पत्रास पाठवलेल्या उत्तरात ताईंनी 'आम्ही ह्या प्रकाराची जातिने दखल घेतली असुन कारवाईस प्रारंभ केला आहे' असे करारी उत्तर दिलेले आढळते.
'सुनैना' ह्यांना लिहिलेल्या पत्रात 'सदानंदमैत्री' ह्यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिला असुन, हि वेळ व हे व्यासपिठ ह्या प्रकारच्या जातीय चर्चे साठी योग्य नाही असाहि एक सल्ला दिलेला दिसतो.
ह्या पत्रास उत्तर म्हणुन पाठवलेल्या पत्रात 'देशभक्ती करणे हा गुन्हा आहे का ? असा काळजाला हात घालणारा प्रश्न विचारुन सुनैना पुढे म्हणतात कि वास्तवात कोणा संताजी फायर ब्रिगेडच्या माणसानी ह्या प्रकारास आधी सुरुवात केली असुन मी फक्त त्याचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे.'
'जाहिदा' ह्या अशाच एका आक्रमक स्त्री सदस्याचे रंगलेले पत्रयुद्ध 'भक्तसुमीत' ह्या सदस्याच्या हस्तक्षेपामुळे मध्येच थंडावल्याचे दिसते.
'कर्नल' ह्या स्त्री सभासदानी जवळजवळ सर्व सभासदांना पाठवलेली फळे, फुले ह्यांची छायाचित्रे आम्हाला 'अकल्पिता फुलझेले' हिची पुन्हा एकदा आठवण करुन देउन गेली.
जाता जाता 'कमाल मुलगा' ह्यांच्या संदेशां विषयी लिहायचा मोह आवरत नाहिये. ह्या विवाहीत सभासदास मोठ्या प्रमाणावर स्त्री सदस्यांचे संदेश आलेले आढळतात व सर्व संदेशात 'अरे तु अजुन ऑफिस मध्ये कसा काय ?' असा एकच प्रश्न वारंवार विचारलेला आढळला.
ह्यावरुन एकतर 'कमाल मुलगा' हे ऑफिस मधुन रोज लवकर पळुन जात असावेत अथवा बायकोच्या भितीने घरी जातच नसावेत असे अनुमान आम्ही काढलेले आहे.
पुन्हा लवकरच भेटु. अशाच आपल्या जुन्या सदस्यांची आणखी काही पत्रे घेउन !
नमस्ते,
आपलाच
अ.शे.मोगलगिद्दिकर
प्रतिक्रिया
19 Jan 2009 - 1:35 pm | संताजी धनाजी
सही रे. मस्त लिहिले आहेस! फार आवडले. अजुन असे काहीतरी येवुद्यात :)
- संताजी धनाजी
19 Jan 2009 - 1:38 pm | सोनम
आपण सर्वाच्या लेखनाबाबत लिहिले आणी तुमचे स्वतःचे लेखन नाही लिहिले. :T :T :T
काय हो बसल्या बसल्या कोणाची ही ख्.व्.वाचता काय? आणि त्यावर लेख लिहिता. :? :?
19 Jan 2009 - 1:38 pm | सखाराम_गटणे™
'सदाराम मटणे' ह्या सदस्यास पाठवलेल्या पत्रात 'एपमॅन' ह्यांनी आपल्या ८ पॅक चे व व्ही शेप चे विस्तृत वर्णन लिहिले असुन 'एका उडित सगळी कौले मोडुन टाकिन' असा एक इशाराही दिलेला आढळतो. '
'सदाराम मटणे' ह्यांना आलेल्या बर्याचश्या संदेशांमध्ये 'आता कौले फोडणे बस, काहितरी मोठे लेख येउद्यात, प्रतिभा वाया घालवु नका' असे सल्ले वजा हुकुम आढळतात. मटणे ह्यांनी संक्राती निमीत्ताने अनेक हितशत्रुंना पत्रे पाठवुन जुनी कटुता मिटवण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.
सत्य
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
19 Jan 2009 - 2:03 pm | अनिल हटेला
एकदम सही रे परा !!
आंदे और भी !!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
19 Jan 2009 - 2:06 pm | बिपिन कार्यकर्ते
पर्या,
मस्तच रे.
खरं तर अश्या प्रकारचे लेखन मिपावर खूप झाले आहे आणि त्याचा आता कंटाळा आला आहे. त्याच भावनेतून वाचायला सुरूवात केली. पण इतकं मस्त लिहिलं आहे तू की आवडलंच च्यायला!!! तुझा खवंचा अभ्यास (खरं तर व्यासंग हाच शब्द योग्य आहे) खूपच थोर आहे. पु.ले.शु.
आणि हो, प्रेमाचे लोक आहेत, तक्रारी करतातच भेटत नाही म्हणून. त्यांचं प्रेमच दिसतं त्यातून. ;)
बिपिन सदावर्ते
19 Jan 2009 - 2:09 pm | विनायक प्रभू
आगलाविया वर 'प्रभुणे' ची नाराजी शक्यच नाही असे आजवरचा इतिहास सांगतो. लेखकाने "धोतीचा रुमाल' केलेला आहे कदाचित अंमळ अम्मलाखाली. असो.
लेख छान आहे.
21 Jan 2009 - 10:34 pm | विनायक पाचलग
खुप छान
अभ्यास्पुर्ण खरडवही वाचन कसे करावे याचे उत्तम विवेचन
असो आम्ही सरांची आज्ञा शिरसावंद्य मानुन मिपावारी कमी केली आहे
पराच्या खरडवहीचा अभ्यास कोणी केला आहे का
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
19 Jan 2009 - 2:12 pm | राघव
लय भारी... मस्त लिहिलेत :)
'मयत री करणार का?'
=)) =))
मुमु़क्षु
19 Jan 2009 - 2:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
परा, तुम्ही मी बिझी असताना मला फोन करून मज्यशि मयत री करन्र क?
अवांतरः खवंचा अभ्यास बराच केलेला दिसतोस.
अतिअवांतरः झक्कास लिहिलं आहेस.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
20 Jan 2009 - 11:27 am | परिकथेतील राजकुमार
>>परा, तुम्ही मी बिझी असताना मला फोन करून मज्यशि मयत री करन्र क?
== मला ओल्ख करुन घ्यय्ला अव्देल
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
19 Jan 2009 - 4:13 pm | अवलिया
तुमच्या साठी सप्रेम भेट
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Jan 2009 - 4:15 pm | सखाराम_गटणे™
खरी नावे वापरली असती तरी फारसे बिघ्डले नसते.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
20 Jan 2009 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार
>>खरी नावे वापरली असती तरी फारसे बिघ्डले नसते.
== हे म्हणजे 'रामसे बंधुंनी' विधवा विवाहावर अनुबोधपट काढल्यासारखे वाटले असते.
;)
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
19 Jan 2009 - 4:41 pm | धमाल मुलगा
=)) =)) =))
च्यायचं ह-ल-क-ट-शि-रो-म-णी!!!!!
बाकी, तुम्ही काढलेल्या दोन्ही अनुमानात तथ्य आहे बरं! ;)
सदानंदमैत्री हे उपनाम तुफ्फान आवडलं रे!
प्रभुणे आणि आगलाविया ह्यांच्याविषयीदेखील मस्तच निरिक्षण!
लढ..लढ बाप्पू.... लय खास!!!
19 Jan 2009 - 5:00 pm | योगी९००
'लेख टाकलाआहे, वाचा आणी तुमची प्रतिक्रीया सांगा'
तात्यांसारखे अनुभव अजून बर्याचजणांना आले असावेत..
ह . ह . पु. वा.
खादाडमाऊ
19 Jan 2009 - 9:57 pm | टारझन
के व ळ अ प्र ति म !! (ह्या वेळी खरंखरं) मस्त बे चोच्या ...
काही ठिकाणी खुदकन् हसु आलं
टारझन- द एपमॅन
19 Jan 2009 - 11:06 pm | बिपिन कार्यकर्ते
खुदकन् हसणारा टार्या कसा दिसत असेल त्याची कल्पना करून खदाखदा हसू आलं.... ;)
बिपिन कार्यकर्ते
19 Jan 2009 - 11:16 pm | चतुरंग
एकवेळ उंबराला फूल येईल पण... :?
चतुरंग
19 Jan 2009 - 11:19 pm | पिवळा डांबिस
टाऱोबा, तुझा एक फोटो टाक रे, खुद्कन हसतानाचा!!
पाहुयात तरी,
"गोडगोजिरी लाजलाजरी टारूताई खुद्कन हसली"
कशी दिसते ती?
:)
20 Jan 2009 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार
>>काही ठिकाणी खुदकन् हसु आलं
== ती ठिकाण आम्हाला चांगली माहित आहेत परिकथेतील टाराक्षसा !
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
19 Jan 2009 - 11:00 pm | छोटा डॉन
एकाहुन एक जबरदस्त टोप्या उडवल्या आहेत रे परा, क्लासच ...!
लै लै लै हसलो वाचताना.
एकदम जबरदस्त "व्यासंग" दिसतोय तुझा खरडवह्यांचा, चालु देत ...
बाकी धम्या म्हणतो तसे आमच्या परममित्राचे "नवे नाव" फारच आवडले.
आम्ही यापुढे त्याला ह्याच नावाने संबोधु ...
>>उडित सगळी कौले मोडुन टाकिन' असा एक इशाराही दिलेला आढळतो.
खल्लास ऽऽऽऽ
बाकी सांगायचा मुद्दा असा की "खरडवह्या" ह्या खर्याच पडद्यामागच्या हालचाली, राजकारणे, डाव्-प्रतिडाव, पुढची धोरणे ह्यांचा अनुमान काढण्यासाठी फार उपयोगी येतात.
"खरडावह्यांचा स्वागत मजकुर" ही अजुन एक अभ्यास करण्याजोगी बाब आहे.
येऊ दे त्याच्यावरही ...!
पुलेशु ...!
------
छोटा डॉन
19 Jan 2009 - 11:31 pm | आपला अभिजित
उत्तम लिहिले आहे!!
`पत्रकामेष्टी' हेच शीर्षक योग्य झाले असते लेखाला.
19 Jan 2009 - 11:53 pm | प्राजु
पुढचा भाग कधी.
ये तो शुरूआत है भाई! सह्ही सह्ही लिहिलं आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Jan 2009 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार
>>पुढचा भाग कधी.
== वरती खोटे खोटे वाह वाह म्हणणार्या कोणी आमचा पत्ता शोधुन हात पाय न मोडल्यास लवकरच !
:>
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
20 Jan 2009 - 11:42 am | विसोबा खेचर
मस्त, खुशखुशीत लेखन! :)
पुन्हा लवकरच भेटु. अशाच आपल्या जुन्या सदस्यांची आणखी काही पत्रे घेउन !
वाट पाहतो साहेब! :)
तात्या.