सगळ्यांच्या फायनली परीक्षा आटपल्या प्रँक्टीसला पुन्हा सुरुवात झाली. परत एकदा सकाळ संध्याकाळच मैदान गजबजायला लागलं. ह्या सिजानला लागोपाठ ६ स्टेट लेवल खेळायच्या आहेत म्हणल्यावर पोरींनी पण जोर धरला होता. आम्हाला चांगलं रगडून घ्यायचा आप्पांचा प्लान होता. त्यातच अशी बातमी आली की नँशलचे सिलेक्टर ह्या टूर्नामेंट बघूनच १८ ची टीम सिलेक्ट करणार आणि मग कॅम्प लावून फायनल १२ काढणार. मग तर काय हाणा-मारीला ऊत आला. कबड्डी कमी आणि कुस्तीचा आखाडा जास्त वाटायला लागलं मैदान.
एवढ्या दिवसानंतर उतरले होते. सगळं अंग दुखत होते. ३ महिन्याच्या गँप नंतर उतरल्यावर दुसरे काय होणार ? तंगड्या गळ्यात आल्या होत्या. त्यातच पहिल्याच दिवशी ४ गुडघे,३ कोपरं आणि एका दाताचा बळी गेला.
सगळ्या साल्या मंद.... ज्युनियरच्या सेटच्या कार्ट्या..... नको तिथे रावडी गेम करायचा आणि सगळ्यांना मोडून ठेवायचं........ अजून म्यँचेस पण सुरु झाल्या नाही आणि मोडतोड सुरु झाली….
टीममध्ये मला सतत काही तरी बिनसलं आहे असं वाटत होत. मैदानावर पण राईट कॉर्नर आणि लेफ्ट टर्न जागेसाठी सगळ्या ज्युनियर मुली मीना, अंकू , यशोदा आणि पम्मी मध्ये मारामारी दिसली. एरवीएकत्र खेळणाऱ्या ह्या असं का करायला लागल्या मला कळेना.
थोड्या वेळाने क्लिक झाले, मी आणि तुप्या नव्हतो ना… म्हणून त्यांना आम्हाला साईडला करून त्यांची प्लेस पक्की करायची होती.
हा हा हा…. पागल पोरी…. ओपनमध्ये ह्या लावणार राईट कॉर्नर आणि लेफ्ट टर्न…
हाडाची काड आणि बोxx तूंतूनं ...... आल्याआल्या मी तुप्या आणि जागूला हि खबर दिली… तुप्या तर मस्त चवताळली आणि जगूने ग्राउंडवरच ग म भ च्या शिव्या द्यायला सुरुवात केली. अब आयेगा असली मजा… मी जागूला म्हणाले कि आत्ता फालतू खुन्नस काढायला नको जाऊया.... जरा थांबूया फिटनेसचे १२ वाजले आहेत ते निस्तरू मग बघू काय करायचं ते.... योग्याला पण हि खबर समजली पण नेहमी प्रमाणे मंद सारख बघून आणि चंपा सारखे हसून क्रेप बँडेज बांधत बसली.
त्या दिवसापासून आम्ही सब ज्युनियरच्या टोळीवर नजर ठेऊन होतो. नेहमीप्रमाणेच पण जरा शांतपणेच प्रक्टिस चालू होती.
फायनली ६व्या दिवशी ओपनचा सगळा सेट हजर झाला. मी, रूपा, जागू, संजू, तुप्या, रेश्मा, गीता, योग्या, पियू आणि दीदी.....
आत्ता कसं ग्राउंड भरल्यासारख वाटत होत..... सकाळ संध्याकाळ स्वत:ला रेमटवून बऱ्यापैकी अंग हलकं झालं होत. अजून २० दिवसांनी टूर होती. म्हणजे ३ रविवार सोडले तर १७ दिवस मिळत होते.... म्हणजे ३४ सेशन.... सेट बसायला १० सेशन पुरणार होती.... आणि ह्या ज्युनियरच्या टवळ्यांकडे बघायला पण काही सेशन मिळणार होती....
८ व्या दिवसापासून आप्पा ग्राउंडवर यायला लागले. आता खरी सालाटी निघणार होती पायाची. कारण त्यांचा क्रम फिटनेस सुधारणे मग स्किल सुधारणे आणि मग ग्राउंडवर उतरून समोरासमोर खेळणे असा असायचा... त्यामुळे त्यांनी प्रक्टिस घेतली कि प्लेयर फार मोडतोड न होता टुर्नामेंट खेळत असे. म्हणजे आम्हाला खुन्नस काढायला काहीही चान्स मिळणार नव्हता.
९ व्या दिवसापासून आमच्या रगडा पँटीसला सुरुवात झाली. २० मिनिटे न थांबता रनिंग, मग ५० फ्रॉग जम्प, मग ५ मिनिटे रनिंग, मग ५० परत फ्रॉग जम्प, मग २ मि. स्प्रिंट, मग ५० दंड बैठक मग, ५ मि. रनिंग, मग परत ५० दंड बैठकांचा अजून १ सेट, मग ५ मि. विश्रांती..... असं अजून साधारण तासभर वेगवेगळ्या वेळा लावून, कोन बदलून, आकडे मोजून आम्हाला पळवल्यावर त्यांना शांतता मिळाली. आम्ही स्ट्रेचिंग करताना आमच्याकडे बोक्यासारखे बघत आणि आपल्या मोठ्या मिश्या कुरवाळत म्हणाले, "आज काही मनासारखं झालं नाही बुआ... अजून फिटनेस सुधारण्याची गरज आहे... बोकडासारखे चरणं आजपासून बंद करा... बाकी काय, कसं आणि किती खायचं ते उद्या सांगतो". आम्ही एकमेकींकडे पाहत मनातल्या मनात म्हणत होतो आता अजून काय ह्या म्हाताऱ्याच्या मनासारखं करायचं.
सकाळ तर पार पडली होती. घरी पोचले तेव्हा आज आईने नाश्त्याची जबाबदारी मला दिलेली आठवली आणि रडू कोसळले… सडकून भूक लागली होती. घरात आजी असल्यामुळे नाश्ता करणे भागच होते. तिला ओम्लेट पाव वर पटवले. तिने पण बिचारीने गुरुवार असून अंड सहन केले. पोट भरल्यावर मस्त ताणून दिली.
क्रमशः
प्रतिक्रिया
27 Apr 2016 - 4:36 pm | क्रेझी
क्रमशः लिहावे कृपया.
सुरूवात विंटरेस्टींग वाटली, पुढचा भाग लवकर येऊ देत. चक दे इंडियाच्या सिनियर पोरी डोळ्यासमोर आल्या वर्णन वाचून :)
27 Apr 2016 - 6:00 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:00 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:00 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:00 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:01 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:01 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:01 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:02 pm | शि बि आय
अरे.. हो ते राहिलचं की..... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्दल
27 Apr 2016 - 6:04 pm | एस
छान सुरुवात. पुभाप्र.
27 Apr 2016 - 6:20 pm | मी-सौरभ
:)
27 Apr 2016 - 7:45 pm | मुक्त विहारि
पुढले भाग जरा लवकर् टाकलेत तर उत्तम.....
27 Apr 2016 - 8:21 pm | अनुप ढेरे
छान सुरुवात!
27 Apr 2016 - 10:08 pm | टवाळ कार्टा
भारी
27 Apr 2016 - 10:58 pm | देश
पुभाप्र
देश
27 Apr 2016 - 11:31 pm | अविनाश लोंढे.
मस्त
28 Apr 2016 - 12:39 am | अभ्या..
मस्त लिहिलेय एकदम.
च्यायला स्पोर्टसवालं लिहावं कुणीतरी ही लै इच्छा होती. त्यात कबड्डी म्हणजे मस्त मस्त.
येउ द्या फायनलपरेंत
30 Apr 2016 - 4:04 pm | पैसा
छान सुरुवात!