मास्तर, हे तुम्ही सर्व फुकट का करता. कमीत कमी खर्च तरी घ्या. -इती ब्रिटीश
आज रेतीबंदरावर बाल्या उर्फ ब्रिटीश भेटला. समोर दिसला, त्याला माझा प्रोजेक्ट सांगितला. मागे त्याने "मास्तर्,आमच्या पाड्याकडे पण बघा" असे प्रतिक्रियेत मला आवाहन केले होते. समोर दिसल्यावर ते वाक्य आठवले आणि म्हटले चला करुन टाकु.
त्याला म्हटले, "बाल्या तुझ्या पाड्यावर इंग्रजी माध्यमाची शाळा आहे का? तो म्हणाला,"आहे की". चल, मग कामाला लाग. पाड्यावरच्या मुख्याध्यपकाला भेट आणि माझा कार्यक्रम ठेव. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना शेवटच्या महिन्यात तयारी वाढवण्याकरिता सराव परिक्षेचे पेपर देइन. ह्या सर्वाचा खर्च दर विद्यार्थ्यामागे सुमार साडेतीनशे असतो. पण पाड्याकरिता फुकट.
त्याच्या चेहे-यावर "काय पण वेड्झवा माणूस आहे" हे वाक्य उमटलेले वाचले. असो.
मिपावर असलेल्या सदस्याना विनंती: तुमच्या आजुबाजुला जर कोणी इंग्रजी माध्यमात किंवा सेमी इंग्रजी माध्यमात शिकणारे आपले मराठी विद्यार्थी असतील तर मला व्यंनि मधे कळवा. पोस्टेज सकट हे सराव पेपर त्यांच्या घरी पोचतील. हे पेपर अनुभवी शिक्षकांनी तयार केले आहेत. हा अनुभव आपल्या मराठी बांधवांपर्यंत पोचवण्यास मला आनंदच होईल. ह्या सेवेचे कुठलेही शुल्क घेतले जाणार नाही. हे करत असताना ज्या शिक्षकांनी मेहेनत घेतली आहे त्यांच्या कामाचे पैसे त्यांना पोचते करण्यात आले आहेत. (शिक्षकांना वाणी फुकट सामान देत नाही ह्याची जाणीव आहे मला) नेहेमीप्रमाणे ह्या कांमात मला रामदासांची मदत आहे हे वेगळे सांगायला नको.
१. मॅथ्स १ मॅथ्स२ सायन्स १ सायन्स२ चे दोन सेट.
२. संपर्क : व्यंनि.
३. पोस्टेज चा खर्च नाही. फक्त नाव, शाळा आणि घरचा पत्ता कळवा.
४. चर्चगेट ते पालघर व सी.एस्.टी. ते कर्जत्-कसारा मधील कुठलीही इंग्रजी वा सेमी इंग्रजी शाळा. ५. कितीही विद्यार्थी असले तरी चालतील.
ब्रिटीश ला म्हटले, अरे बाबा, दर वर्षी ठरवतो पैसे घ्यायचे पण साला आतडे नाय म्हणते रे. काय करु.
मागे एकदा सायन्स च्या प्रोजेक्ट मधे 'कॉमर्स चे काय करतो मास्तर बघु' अशी प्रतिक्रिया मी निर्विकारपणे झेलली होती. मीत्राचा राग काय मानायचा. राग ने येता त्या पासुन स्फुर्ती घेउन पुढच्या वर्षी कॉमर्स च्या विद्यार्थ्यांकरिता एक योजना राबवायची असे ठरले आहे. बघु, जमतय का? त्या अवलियाची इच्छा.
मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडुन तेवढे सहकार्य न मिळाल्यामुळे ' मराठी' माध्यमाकरता काही करु शकलो नाही ह्याचे वाईट वाटते.
जाता जाता:मला ३ जण भेटले होते. सर्व मिपाकरांचे फोन नंबर विचारत होते. मी त्याना म्हटले " देणार नाही" तुम्ही त्यांना घरी जाउन भेटा.
त्यांची नावे: सुख, शांती, आणि संपत्ती
आम्हाला ह्या प्रोजेक्ट मधुन कुठलीही प्रसिद्धी वा नाव नको आहे. ते गुप्तच राहील.
प्रतिक्रिया
16 Jan 2009 - 8:54 pm | पिवळा डांबिस
मास्तर,
अहो पेपर देणार म्हणताय ते कुठल्या इयत्तेचे? ते काही सांगाल की नाही?
त्याच्या चेहे-यावर "काय पण वेड्झवा माणूस आहे" हे वाक्य उमटलेले वाचले. असो.
तो तसा व्यवहारचतुर आहे! पन जल्ल्ला नावानच ग्येला!!!
नेहेमीप्रमाणे ह्या कांमात मला रामदासांची मदत आहे हे वेगळे सांगायला नको.
ते तर झालंच!! त्यांनी आत्ताच लोकप्रभात लेख लिहिलाय, या महिन्याचा कोटा दिला आता उनाडक्या करायला मोकळे (ह. घ्या!! काही म्हणा या रामदासाची भीतीच वाटते!! भारदस्त नांव घेण्याचा हा एक फायदा!!!)
मराठी माध्यमाच्या शिक्षकांकडुन तेवढे सहकार्य न मिळाल्यामुळे ' मराठी' माध्यमाकरता काही करु शकलो नाही ह्याचे वाईट वाटते.
असं? मराठीच्या शिक्षकांकडून? आश्चर्य आहे!!!!:)
बाकी शांतीला आमचा नंबर द्यायला हरकत नाही....
:)
या लेखाला पहिला प्रतिसाद देणारा अजून एक वेडझवा!!!
पिवळा डांबिस
16 Jan 2009 - 9:04 pm | विनायक पाचलग
सर अक्खे कोल्हापुर माझ्या नावे
उपक्रम लोकांपर्यंत पोहोच्ववायची जबाबदारी मी घ्यायला तयार आहे
फक्त घेणे न घेणे लोकांच्या हाती
बाकि विप्र ना व्यनि टाकायला गेलो तर हे उठुन गेलेले
असो
आणि हो तो शेवटचा तीन वाला स मो सं आम्हाला देखील आला होता
आपला,
(लै पोर दोस्त असणारा)येडझवा विनायक विद्यार्थी
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले
17 Jan 2009 - 11:29 am | विनायक प्रभू
शेवटचे सांगतो. परत नाही सांगणार. तुझी जबाबदारी तुझे करियर. फोटोवरुन तरी वाटते की ताकद आहे. समाजसेवेचा माज करायचे काम तुझे नाही. दैदिप्यमान करियर मिळाले की कळव तु सांगशील तिथे येईन.
तुझे लिखाण वाचुन असे वाटते की तुझी प्रायॉरिटीमधे काही तरी गडबड आहे. सांभाळ स्वतःला.
17 Jan 2009 - 9:22 am | विनायक प्रभू
पेपर दहावी बोर्डाचे आहेत.
18 Jan 2009 - 9:49 pm | पिवळा डांबिस
थॅन्क्यू!
16 Jan 2009 - 11:21 pm | नंदा प्रधान
तुमचा अंमळ वेडझवेपणा आवडला. नावे देणार नाही म्हणत रामदास बुवांचे नाव टाकलेतच. असो.. तुमच्या ह्या कार्याला शुभेच्छा! ती फोकलीची पोरं मात्र हा वेडझवेपणा हलके न घेता जड घेतील अशी अपेक्षा.
नंदा
17 Jan 2009 - 1:01 am | विसोबा खेचर
मास्तर,
शुभेच्छा..
तात्या.
17 Jan 2009 - 9:32 am | विनायक प्रभू
काल रात्री रामदासांकडे चर्चा केल्यानंतर खालील स्पष्टीकरण.
मी ह्या प्रकल्पात कुठल्याही मिपाकरांकडून एकही कपर्दिक घेतलेली नाही. आणि देवाच्या दयेने गरज लागणार नाही.
मागे एकदा 'वर्गणी गोळा करण्याकरिता मिपा चा उपयोग' असा प्रश्न काढला होता. असो असतात काही काही विघ्नसंतोषी. सर्व मिपाकरांचा लोभ पुरे आहे.
आणि ह्या प्रोजेक्ट मधे मनापासुन सहभाग आला तर मग काय विचारता. आनंद ही आनंद
आपला नम्र चावट थेरडा
वि.प्र.
17 Jan 2009 - 9:46 am | सुनील
लष्कराच्या भाकर्या भाजणारे तसे अंमळ येडझवेच असतात म्हणा!!
शुभेच्छा!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
17 Jan 2009 - 11:28 am | विजुभाऊ
मास्तर लश्करच्या भाकरी भाजणारे हे सगळे असलेच.
चल्ता है. आपण आपल्या मस्तीत जगत जावे.
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
18 Jan 2009 - 6:32 pm | पाषाणभेद
आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
-( सणकी )पाषाणभेद
18 Jan 2009 - 10:50 pm | पात्र
आपल्या उपक्रमास हार्दिक शुभेच्छा.
19 Jan 2009 - 9:24 am | अवलिया
सर्व मिपाकरांचे फोन नंबर विचारत होते. मी त्याना म्हटले " देणार नाही" तुम्ही त्यांना घरी जाउन भेटा.
त्यांची नावे: सुख, शांती, आणि संपत्ती
माणुस मेल्यावर काय शिल्लक रहाते? काहिही नाही. प्राण नष्ट होतात. शरीर मृत्तिकेच्या वा अग्निच्या स्वाधीन केले जाते. चार दिवसांनंतर सगळे विसरुन जातात. असे असले तरीही काही नावे कराल मृत्यु आणि विस्मृतीच्या वरदानावर मात करुन शिल्लक आहेत. त्याला कीर्ति म्हणतात. ती माणसे सुखी होती का? त्यांच्या आयुष्यात शांती होती का? त्यांच्याकडे संपत्ती होती का? अनेकांसाठी याचे उत्तर नकारार्थीच येईल. पण तरिही ती माणसे अमर आहेत. त्यांनी कर्तृत्व केले. लोकांनी त्यांच्या कामाचे नगारे वाजवले. माझ्या मते मला काय म्हणायचे आहे ते मी नीट सांगितले आहे.
मरावे परी कीर्तिरुपी उरावे !!!!
आपल्या कार्याला शुभेच्छा !!!
--अवलिया
अवलियाची अनुदिनी
19 Jan 2009 - 11:35 am | विनायक प्रभू
तुम्ही सांगितले, मला कळाले.
ह्याला म्हणतात मरणोत्तर कसले तरी चक्र.
19 Jan 2009 - 10:52 am | मॅन्ड्रेक
आपल्या कार्याला शुभेच्छा !!!
kinnari
एक क्षण भाळ्ण्याचा - बाकि सारे सांभाळ्ण्याचे.