सोमवार सकाळची वेळ. साधारण नऊ वाजले असतील. सृष्टीला सुर्याने प्रकाशाने उजळून टाकले होते. रस्त्यावर प्रचंड रहदारी होती. गाड्यांचा आवाज.. हॉर्नचा आवाज याला साथ देत मध्येच एखादे विमान आकाशातून जात असल्याची हमी देत होते. प्रत्येक चौकामध्ये सिग्नलवर गाड्यांची रिघ लागली होती.सगळे लोक कार्यालयात जाण्याच्या गडबडीत होते. प्रत्येक जण धावपळ करताना दिसत होते. सिटी बसेस प्रवाशांनी खचाखच भरल्या होत्या. दुचाकी वाहनेदेखील रहदारीमध्ये आणि प्रदुषणामध्ये भर घालत होती.
एका साधारण सोमवारची ती साधारण सकाळ होती. पण, काहितरी विशेष आज घडणार होते. काय होते ते?????
स्टॉक एक्स्चेंज समोर, जसजसे घडयाळाचे काटे पुढे जाऊ लागले, तसतशी गर्दी वाढु लागली. मिडियावाले लोक त्या ऑफिसबाहेर उभे राहुन कॅमेर्यासमोर माइक हाथामध्ये दिमाखात धरुन काहितरी बोलत होते. जमा होणार्या लोकांमध्ये एक उत्साहाचे विचित्र वातावरण होते. स्टॉक एक्स्चेंजच्या ऑफिसवर लावलेल्या बोल्टवर ग्लोवसिंग एलईडीने काहितरी बातम्या येत होत्या. त्यातच एक बातमी प्रकाशित झाली......"तुरिना कस्न्ट्रक्शन्स टू बी लिस्टेड टुडे"
जवळपासच्या सर्व दुकानांमध्ये असणार्या बिझिनेस न्युजपेपरची हेडलाईनही तिच होती......."तुरीना कस्न्ट्रक्शन्स चा आय पी ओ आज लिस्ट होणार", "तुरीना कस्न्ट्रक्शन्स के लिस्टींग को लेकर इन्वेस्टर्समे दिलचस्पी", "व्हॉट विल बी लिस्टिंग प्राइस ऑफ तुरीना??", "क्या तुरीना रेकॉर्ड ब्रेकिंग लिस्टिंग करने मे कामयाब हो पायेगा??" अशा एक ना अनेक बातम्यांनी वर्तमानपत्रे सजली होती.
कदाचित या बातमीमुळेच वर्तमानपत्रांची रेकॉर्ड ब्रेकिंग विक्रि झाली होती.
दहा वाजले ......"मार्केट ओपन्ड" अशी बातमी प्रथम बोर्डवर दिसु लागली. सतत बदलणार्या बोल्टवर
लाल हिरवे खाली आणि वर जाणारे बाण दिसु लागले. लोकांचे चेहरे त्यानुसारच लाल हिरवे होत होते.
पण, तरिही बोल्टपेक्षा जास्त लक्ष लागले होते ते बोर्डवर.. आणि एवढयात बातमी झळकली..... "तुरीना लिस्टेड ऍट रेकॉर्ड ब्रेकींग प्राइस २६५२"
तुरीना कन्स्ट्रक्शन्सच्या अगदी मोठ्या, आलिशान आणि देखण्या ऑफिससमोर गर्दी वाढू लागली. ११ वाजता तुरीना कन्स्ट्रक्शनने प्रेस कॉन्फरंन्स बोलावली होती. त्यासाठी अगदी काही क्षण उरले होते. मिडियावाल्यांना, प्रेसवाल्यांना कॉन्फरंन्स हॉलकडे नेण्यात आले. अतिशय भव्य वाटणार्या त्या हॉलमध्ये सर्व प्रकारची तयारी करण्यात आली होती. डायसवर एका बाजुला टेबल आणि त्यामगे काही मखमली, मऊ खुर्च्या ठेवल्या होत्या. टेबलवर काही माईक ठेवण्यात आले होते. डायसमागच्या भिंतिवर अगदी मध्यभागी एक मोठा पांढरा पडदा लावला होता. डायसखालचा विस्त्रुत भाग खुर्च्यांनी भरला होता. प्रेस आणि मिडियावाल्यांनी तो हॉल निम्म्यापेक्षा किंचित जास्त भरला. मानवी स्वभावानुसार हॉलमध्ये येताच, लोकांची गडबड सुरु झाली. लोकांच्या बोलण्याने किंवा चुळबुळण्याने हॉल निद्रेतुन जागा झाला.
एवढ्यात एक नाजुक, सुंदर, कमनीय बांध्याची श्वेत साडी घातलेली सधारण पंचविशितली तरुणी डायसवर आली. तिच्या येण्याने संपुर्ण हॉल शांत झाला. काही क्षण असेच शांततेत गेले. डायसवर असलेल्या टेबलच्या अगदी विरुद्ध बाजुला उभ्या असलेल्या माईकच्या मागे ती सडपातळ आकर्षक शरीरयष्टी उभी झाली. आपल्या कोमल आवाजाने ती हळुवारपणे बोलू लागली....
"तुरीना कन्स्ट्रक्शन्समध्ये आपले स्वागत आहे. आजची प्रेस कॉन्फरंन्स बोलविण्याचा उद्देश म्हणजे तुरीनाचा ऱोडमॅप इन्वेस्टर्स आणि इतर लोकांपर्यंत पोहोचविणे हा आहे. याशिवाय लोकांमध्ये तुरीनाविषयीच्या कुतुहलाचे समाधान करणे आणि तुरीनाला लोकांपर्यंत पोहोचविणे हा विशुद्ध भाव यात आहे. लवकरच आपली भेट तुरीनाचे सिईओ मिस्टर तुषार दिक्षित, सिटिओ मिस्टर अनिकेत
पवित्रा, सिपिआरओ मिस्टर सुधिर जेट्टी आणि सिएफओ मिसेस रुषाली दिक्षित यांच्याशी होईल"
काही वेळातच एक जांभळी मखमली साडी घातलेली स्त्री आणि तीन काळा कोट घातलेली माणसे डायसवर आले. ते डायसवर येताच कॅमेर्याच्या फ्लॅशने संपुर्ण हॉल प्रकाशाने उजळुन गेला.
औपचारिक बोलणे झाल्यानंतर प्रथम एक काळा कोट घातलेला व्यक्ती उभा झाला. त्याच्या अगदी जवळ असलेल्या माईकवेज जवळ तो गेला. साधारण पाच फुट सात इंच असलेला तो शरीराने अतिशय मजबुत होता. गोरेपणाकडे झुकणारा सावळा तेजस्वी वर्ण असलेल्या त्याने डोळ्यावर चष्मा घातला होता. त्या चष्म्याच्या आयताक्रुती काचाच्या वरच्या अर्ध्या कडा काळ्या मेटलने पकडुन ठेवल्या होत्या.हाफ बॉडिचा तो चष्मा त्याच्या गोलसर नाकावर शोभुन दिसत होता. काळ्या कोटामधील पांढरे शर्ट छातीजवळ अगदी फिट्ट जाणवत होते. चष्म्यातुन आत्मविश्वासपुर्ण डोळ्यांनी त्याने संपुर्ण हॉलवर दृष्टी टाकली आणि तो प्रसन्न मुद्रेने बोलु लागला.......
प्रतिक्रिया
18 Jan 2009 - 1:06 am | सोनम
कथा एक टर्निंग पॉईट आल्यावर का क्रमश केली चेतन .पुढचा लेख लवकर डकवा.
18 Jan 2009 - 4:44 am | गोगोल
तीन तीन काळे कोट का बरे घातले होते त्या माणसांनी?
18 Jan 2009 - 10:06 pm | चेतन१२३प
प्रत्येकाने काळा कोट घातला होता...असे तीन माणसे