मातृभूमीला 'माँ' म्हणण्याची गरज का?

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
13 Apr 2016 - 9:20 pm

उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः

समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.

पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच

प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.

आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा:

गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.

महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.

अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.

रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.

भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:

अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा.
पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.

तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो.

जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.

देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.

इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत..

ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.

१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते.

आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल.

हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

भंकस बाबा's picture

19 Apr 2016 - 3:27 pm | भंकस बाबा

एकतर महाभारतीय दाखले दिले की त्याची टिंगल उड़वायची व् सरल पद्धती सांगितली की त्यात व्यभिचार शोधयचा. म्हणजे गिरा तो भी टांग ऊपर!
जर सर्व उपाय करून थकल्यावर इच्छुक मातापित्यानि नैसर्गिक मार्ग अवलंबिला ,जो दुसरा कोणताही इलाज नसल्यामुळे आलेला आहे, तर त्यात गैर काय?
टिंगल उड़वायची असेल तर कुमारी माता प्रकरण जे एका धर्मात वंदनीय आहे त्याची उडवताना आम्ही दिसत नाही.

भंकस बाबा's picture

19 Apr 2016 - 3:31 pm | भंकस बाबा

तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का?
त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का?
टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात.
ही एखादी विकृति समजायची का?

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 3:34 pm | तर्राट जोकर

टिका करायची म्हणुन तुम्ही एकाच धर्माच्या पाठी हात धुवून लागलेले आहात.
ही एखादी विकृति समजायची का?

अगदी हेच निरिक्षण आणी हाच प्रश्न इथल्या अनेक आयडींबद्दल आहे. =))

नाना स्कॉच's picture

19 Apr 2016 - 4:02 pm | नाना स्कॉच

काय राव इतक्यातल्या इतक्यात म्हणजे हातच्या काकणात सुद्धा सेलेक्टिव रीडिंग??

ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती,

इतके ढळढळीत लिहिले आहे तरी दुर्लक्ष?? अर्थात ते सुजाण वगैरे चुकून कॉपी झाले ते नका तुम्ही मनाला लावुन घेऊ हो!

नुसते नाव वाचुन किती द्वेष कराल एखाद्याचा! असो

शिवाय
तुम्हाला कृत्रिम गर्भधारणेमधिल यशपयशाचे प्रमाण माहित आहे का?
त्यासाठी येणारा खर्च माहीत आहे का?

ह्याच्या बद्दल बोलायचे झाले तर बुआ ओके एक क्षण मानले की तुम्ही म्हणता ते खरे आहे पण मग नियोग विधीचे सगळे नियम पाळले जातात हे कोण सांगू शकेल? ते नियम पाळले गेले नाहीत तर नियोग विधी धर्मबाह्य असेल का?? माझा मुख्य आक्षेप आहे तो खुळचट नियमांना, नियोगी संबांध ठेवले त्यावेळी भावनाविहीन वातावरण होते की नाही हे कसे चेक करणार ह्याचे उत्तर द्याल कृपया करुन! , कसंय न लहानपणीपासुन सायंकाळी रामरक्षा म्हणली की आम्ही रामाचे चरित्र समजून घ्यायचो त्या "एकपत्नीव्रती रणकर्कश राम राम" अश्या रघुरामाचे आम्ही भक्त आहोत! म्हणून आम्हाला नियोग मुर्खपणाचा खेळ वाटतो, शिवाय कसं आहे की आमची रामभक्ति काय आहे हे तुम्हाला समजवुन द्यायला तुम्ही कोण्या पीठाचे शंकराचार्य लागून गेलेले नाही. त्यामुळे ज़रा हिशेबात रहा.

ता . क - परत वैयक्तिक होऊ नका!

भंकस बाबा's picture

19 Apr 2016 - 7:43 pm | भंकस बाबा

अपत्यप्राप्ति हे उद्विष्ट असेल तर त्याकडे बघा ना ! उग्गाच फाटे का फोडत् आहात.
रच्याकने रामरक्षा म्हणनारा पुरुष नसतो काय?

नाना स्कॉच's picture

19 Apr 2016 - 7:58 pm | नाना स्कॉच

तुम्हाला नियोगाचे नियम माहीती आहेत काय? नसल्यास एकदा मिळवून वाचा मग बोलु.

अन हो डोळसपणे रामरक्षा म्हणणारे रामचरित्राचे वाचक सुद्धा असतात अन प्रभुने घालुन दिलेल्या एकपत्नीव्रताचा आदरही करतात असो!

अन सुसंस्कृत माणसे उद्दिष्ट उर्फ़ साध्यच पाहात नसतात तर "साधन" सुद्धा महत्वाचे असते! एक कॉन्सेप्ट असते बघा साधनशुचिता म्हणून, बघा झेपली तर.

हे नियोगाचे नियम म्हणजे काय?
ते वेदांत आहेत, उपनिषदांत आहेत, आरण्यकांत आहेत,ब्राह्मणांत आहेत का पुराणांत आहेत का अजून कुठे आहेत?

तुम्हाला संदर्भ माहीत असल्यास नक्की इथे ते द्यावेत. मला ते ग्रंथ मिळवून नियम वाचायला आवडतील.

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 12:14 pm | mugdhagode

पुत्रकामेष्टी यज्ञ करुन मुल होते तर पुन्हा नियोग का करत होते म्हणे ?

प्रचेतस's picture

20 Apr 2016 - 12:16 pm | प्रचेतस

रामायणाचा काळ वायला गो.

पुत्रकामेष्टी यज्ञापेक्षा नियोग फारच स्वस्तात व्हायचा गो !

भंकस बाबा's picture

20 Apr 2016 - 1:31 pm | भंकस बाबा

कशी किलोत मोजतात काय ती?

नाना स्कॉच's picture

20 Apr 2016 - 2:07 pm | नाना स्कॉच

ओके म्हणजे ही कॉन्सेप्ट आपणांस झेपलेली नाही किंवा झेपणार नाही असे दिसते आहे. असो! तुम्ही बरोबर आम्ही चुक आमचे सगळे मुद्दे अन शब्द परत घेतो!

जो जे वांछिल तो ते लाहो! प्राणिजात!!

हो नाही झेपलि, मग काय म्हणणे आहे तुमचे?
एक पूरी दुनिया सोडली तर एकपत्नीव्रत पाळणारे तुम्हीच!
चायला विश्वामित्राला नाय झेपलि आणि इथे आम्हाला जमवायला सांगत आहेत.
विश्वामित्र इथे हिंदुचा प्रतिनिधि म्हणुन घेऊ नका, इतर धर्मात पण असे बहुत दाखले आहेत.

एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय. नियोग हा अपत्यप्राप्तीसाठी केला जातो. प्रणयाचा संबंध काय आहे त्यात? आणि जर आकर्षण असेल तर तो व्यभिचार कसा काय? तुमच्या व्यभिचाराच्या संकल्पना (नियोगाबद्दल) गंडलेल्या आहेत असं नम्रपणे नमूद करु इच्छितो.
आधुनिक काळात नियोगाच्या नावाने स्त्रीवर अत्याचार होत आहेत - हे जरा इस्कटून सांगा. अत्याचार हे कुठल्याही परिस्थितीत वाईटच. पण म्हणून नियोग कसा वाईट? हुंडा पद्धत वाईट आहे म्हणून लग्न वाईट असं म्हणाल का तुम्ही?
अजून एक. मी तुम्हाला मूर्ख म्हणालो नाही. तुमच्या विचारांना मूर्खपणा असं म्हटलं. त्याचा अर्थ तुम्ही मूर्ख आहात असा घेऊ नका. जर तसं तुम्हाला वाटलं असेल तर क्षमस्व.
मी विवाहबाह्य संबंध हे व्यभिचारात येतात, जर त्यात दोन्हीपैकी एक जोडीदार दुस-या जोडीदाराच्या विश्वासाचा गैरफायदा घेत असेल तर - असं मानतो. त्यामुळे बहुपत्नीत्व हा माझ्यालेखी व्यभिचार आहे. पण नियोग नाही.

नाना स्कॉच's picture

19 Apr 2016 - 5:00 pm | नाना स्कॉच

एकीकडे म्हणताय उत्कट प्रणय. नियोग हा अपत्यप्राप्तीसाठी केला जातो. प्रणयाचा संबंध काय आहे त्यात? आणि जर आकर्षण असेल तर तो व्यभिचार कसा काय? तुमच्या व्यभिचाराच्या संकल्पना (नियोगाबद्दल) गंडलेल्या आहेत असं नम्रपणे नमूद करु इच्छितो.

अहो माझ्या संकल्पना गंडलेल्या नाहीत बोका साहेब तर सभ्यतेच्या किमान मर्यादेमुळे मी इथे नीटसा बोलु शकत नाहीये, आपली परवानगी असल्यास मी व्यनि मधे माझे म्हणणे नीट मांडू शकेल.

आगाऊपणा बद्दल क्षमस्व

शिवाय तुमच्या एकंदरित वकुबावरुन आपल्याशी चर्चा करणे बुद्धिवर्धकच असेल ! माझ्याकडून जर चुक असेल तर्क तर मी बदलायला तयार असतो हे वे सां न :)

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2016 - 8:08 am | बोका-ए-आझम

मीही चर्चा करायला तयार असतोच.

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 11:09 am | mugdhagode

स्वतःच्या मुलीपासुन प्रजा उत्पन्न करणार्‍याला मुलगी काय समजणार ?

सतीश कुडतरकर's picture

15 Apr 2016 - 4:50 pm | सतीश कुडतरकर

hahhaaa

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 12:31 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तार्किक दृष्टीने पाहावयास गेल्यास आपण राहत असलेल्या किंवा जेथे जन्म झाला आहे अशा प्रांताला मातृ असे संबोधणे गैर वाटते.
मग प्रश्न हा पडतो कि पिता कोण?
तसेच देशाला "भारतमाता" असे संबोधून त्याला मूर्त स्वरूप देणे(मुर्ती) हेसुद्धा अप्रस्तुत वाटते.
शिवाय त्या भारतमातेला चार हात आहेत असे दाखवले आहे,मागे सिंह उभा आहे,एका हातात ध्वज आहे वगैरे दाखवले आहे.अजून 100 वर्षांनी लोकांचा असा समज व्हायचा कि भारतमाता नावाची कोणी देवी खरोखरच होऊन गेली कि काय?
तेव्हा मुर्त स्वरूप देणे हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे पण इथे तो गैरलागू आहे असे वाटते.

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 1:10 pm | मराठी कथालेखक

मातृभाषा म्हणजे "आईशी (आई-वडील असेही म्हणू शकतो) असलेली संवादाची भाषा" ना ? की भाषा हीच आई ?
मग मातृभूमी म्हणजे जिथे "जिथे जन्मलो /वाढलो ती भूमी" इतकाच अर्थ असावा असे मला वाटते.
बाकी कुणाला मातेसमान मानावे अथवा नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेच तार्किक मुद्दे ही आहेत (भूमी ही माता तर पिता कोण ई)
बरं समोरचा माणूसही त्याचा भूमीचा पूत्र आहे (तोही तिला माता म्हणतोय) , म्हणजे माझा बंधू झाला, तर मी त्याच्यावर अगदी भावाप्रमाणे बिन्दिक्कत विश्वास ठेवू का ?
बंधूत्वाबद्दलच बोलायचे तर जेव्हा एखाद्या देशात मोठी आपत्ती येते तेव्हा इतर अनेक देशांकडून मदतीचा ओघ येतो, म्हणजे मातृभूमी एक नसूनही बंधुत्व मानले जावू शकते ना ?
बाकी भाषा आणि संवाद संस्काराचा व सवयीचा भाग वेगळा. काही लोक येता जाता प्रत्येकाला (शेजारी, दुकानदार ई कुणीही) काका, काकू, मावशी, दादा , ताई ई संबोधने वापरतात. असे संबोधण्याने नाते निर्माण होते का ? नक्कीच नाही. पण हा फक्त सवयीचा भाग असतो. मला तरी उगाचाच कुणाला असे संबोधायला आवडत नाही (म्हणजे खास ओळख, जवळिक नसताना)

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 2:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तुमचे म्हणणे पटले.
पण,एका देवीप्रमाणे मूर्त स्वरूप देवून चार हात,मागे सिंह,एका हातात त्रिशूळ,दुसर्या हातात झेंडा वगैरे दाखवणे
गैर वाटते,हाच तर खरा मुद्दा आहे म्हणूनच त्याविरोधात फतवे निघतायेत.

सतिश गावडे's picture

15 Apr 2016 - 1:30 pm | सतिश गावडे

अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.

हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.

श्लोकामध्ये "अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त" हा उल्लेख दिसत नाही. प्रक्षिप्त साहित्य असेच तयार होत असावे काय? ;)

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 2:43 pm | mugdhagode

मीही हे लिहिणार होतो. उगाच मोहोळ उठवायला नको , म्हणुन लिहिलं नव्हतं

नाना स्कॉच's picture

15 Apr 2016 - 2:45 pm | नाना स्कॉच

महालोल!!

(आमच्यासहित सगळे तर्काची भादरायला लागले पण हे मुद्दल कोणीच लक्षात घेतले नाही राव)

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 2:51 pm | तर्राट जोकर

बराचसा माल गडबड आहे राव, किती आणी कुठे कुठे बघत बसायचं ;-)

प्रचेतस's picture

15 Apr 2016 - 3:11 pm | प्रचेतस

मी तर हा श्लोक रामायणात वाचलेलाच आठवत नाहीये.

नाना स्कॉच's picture

15 Apr 2016 - 3:30 pm | नाना स्कॉच

घ्या! नैले पर दैला !!

पण पटाईत सरांचा वाल्मिकी रामायणाचा अभ्यास दांडगा आहे ! ते नक्की सांगतील रेफेरेंस

तंवर वेट एंड वॉच

जेपी's picture

15 Apr 2016 - 7:28 pm | जेपी

तंवर वेट एंड वॉच >>>
हे..
तंवर वेटर एंड स्कॉच ..अस वाचल गेल =))=))

नाना स्कॉच's picture

15 Apr 2016 - 7:45 pm | नाना स्कॉच

ओ आय सी!! असा सगळा प्रकार झाला तर एकंदरित!!

तरीच म्हणले टोटल का जुळेना! कुठल्या ब्र व्रात्य पोराने बाटलीतुन 2 टाक मौज काढून त्यात पाणी भरले!!

असो!! ढ़ोसु *आनंदभरे

*आनंद = ग्लास

=)) =))

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 3:43 pm | mugdhagode

शाळेत असताना माझी मातृभूमी निबंध आला की सुरुवात या श्लोकाने व्हायची.

पण रामाला मातृभूमी म्हणजे नेमकं काय अपेक्षित होतं ? अयॉध्या ? भारतदेश ? भारतात पूजल्या जाणार्‍या हिंदू देवांची रिजर्व ब्यान्कम्हणजे लंका ना ? रामाच्या मातृभुमी संक्ल्पनेत लंकाही असायलाच हवी होती ना ?

अब्दालीही परकीय , लंकाही परकीय ... मग संघाच्या अखंड हिंदुस्तानाच्या नकाशात अफगाणिस्तान ते लंका व्हाया म्यानमार का दाखवतात ?

प्रचेतस's picture

15 Apr 2016 - 4:29 pm | प्रचेतस

मुग्धे..मुग्धे...!!!
श्लोक नीट वाच की गं.

तुला मातृभूमि हा शब्द कुठे दिसला ते सांग की गं.

जननी जन्मभूमिश्च अशी सुरुवात आहे की गं. म्हणजे माता आणि जन्मभूमि. ह्यात मातृभूमि तुला कुठे दिसली गं? जन्मभूमि म्हणजे जिथे जन्म झाला ती भूमि. ह्यात मातृ पितृ कुठे येतो गं?

अब्दालीही परकीय , लंकाही परकीय ... मग संघाच्या अखंड हिंदुस्तानाच्या नकाशात अफगाणिस्तान ते लंका व्हाया म्यानमार का दाखवतात ?

तेव्हाचा भूभाग अशोकाच्या साम्राज्याचा हिस्सा होता गं.

ती ती नाही तो आहे त्याचा वरचा प्रतिसाद नीट वाचा

प्रदीप's picture

15 Apr 2016 - 8:43 pm | प्रदीप

:)

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 10:28 pm | mugdhagode

प्रचू डार्लिंग .... मीही तेच लिहिले आहे .. त्या काळात जन्मभूमी हीच कल्पना होती.... कारण तेंव्हा आपापल्या राज्यात किंवा जवळपासच लोक जन्मायचे... नवरा आफ्रिकेला ... बायको तिथं बाळंतली.. जन्मस्थान आफ्रिका ... मातृभूमी भारत ... असले प्रकार तेंव्हा नव्हते.

त्यामुळे जन्मभूमी हाच शब्द होता.

आज तालुका जिल्हा गाव राज्य अशी विभागणी असल्याने जन्मस्थान या गोष्टीला बर्थ सर्टिफिकेट पुरतेच महत्व आहे. आणि मातृभूमी म्हणजे देश ... नागरिकत्व देणारा .. भारत .

म्हणुनच मी विचारलं की रामाला जन्मभूमी शब्दात नेमकंकाय अपेक्षित होतं ? अयॉध्या की जंबूद्वीप / भारतवर्ष / इंडिया ?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2016 - 10:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रचू डार्लिंग

अत्मबंध सर कुठे अहात तुम्ही?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 10:45 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

mugdhagode नावाचा आयडी माझा नाही- : मुग्धा गोडसे
:::

कपिलमुनी's picture

15 Apr 2016 - 10:54 pm | कपिलमुनी

गुलाब फुलले !!

किंवा नाही हे बघ बरं बाळ मुग्धा. उगाचच प्रचू डार्लिंगला त्रास देऊ नकोस. तो ऐकून घेतो म्हणून काय कडेवर बसशील लगेच?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

18 Apr 2016 - 12:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो ऐकून घेतो म्हणून काय कडेवर बसशील लगेच?

=)) =))

स्मायल्या परत अणा रे.

या संदर्भात, श्री. तारेक फतेह यांची मुलाखत आठवली. जरूर बघावी:

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 4:04 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

हम्म दुसरं काही नसलं कि,
तारक फतेह,तस्लिमा नसरीन,जावेद अख्तर यांची उदाहरणे येतात लगेच.

दिग्विजय भोसले's picture

15 Apr 2016 - 3:53 pm | दिग्विजय भोसले

ऐसीवर ऋषीकेश यांनी दिलेली इमेज इंटरेस्टिंग आहे.
यालाही भारतमाता कि जय म्हणणार का?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 4:01 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

=))=))

पैसा's picture

15 Apr 2016 - 4:17 pm | पैसा

ती पाकिस्तान अन बांगलादेशची घाण आमच्या देशात अजिबात नको! आणि आमची कोणतीच माय बुरख्यात कधी राहू नये!

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 4:22 pm | mugdhagode

पुणेरी मुलींचा बुरखा चालेल का ?

पैसा's picture

15 Apr 2016 - 4:51 pm | पैसा

तो बुरखा असतो काय!

नाखु's picture

16 Apr 2016 - 10:56 am | नाखु

मुग्धाला, बुरखा आणि स्कार्फ यातला फरक सम्जत नसेल तर कठीण आहे !
दादुला समजून घ्या की हा प्रतिसाद आणि हेत्वारोप (नक्की)जुना, फक्त आय्डी नवीण आहे !

बुवा रोज(ची) निशी तून साभार

काळा पहाड's picture

17 Apr 2016 - 11:06 pm | काळा पहाड

लांडक्यांना असे फरक कळत नसावेत. ही घाण पार्टिशन्च्या वेळीच घालवायला हवी होती. आता 'गुजरात' करावं लागतंय. हे राम!

दिग्विजय भोसले's picture

15 Apr 2016 - 5:07 pm | दिग्विजय भोसले

मुद्दा तो नाही,
"भारत मात कि जय" या घोषणेमध्ये राष्ट्रवाद नसून त्याला धर्मवादाची किनार आहे.
एरवी चित्रांमध्ये दाखवल्या जाणर्या भारतमातेला एखाद्या हिंदू देवीचे स्वरूप दिलेले आहे,त्यामुळे ते काहींना खटकते,
याऊलट एखादी मुसलमान स्त्री भारतमाता म्हणून दाखवली तसेच सिंह,त्रिशूळ या हिंदू प्रतिंकांव्यतिरिक्त दुसरी प्रतिके दाखवली तर चालेल का?
असा प्रश्न त्या घोषणेवरून राळ उडवणार्यांना आहे.अर्थात त्यांना तसे चालणार नाही.
म्हणजेच याऊलट काही कट्टर मुसलमानांनादेखील हिंदू प्रतिके चालणार नाहीत.म्हणून त्या कथित भारतमातेचा जयजयकार करण्यात त्यांना आकस वाटतो.
असा सरळ मुद्दा आहे हा.

पैसा's picture

15 Apr 2016 - 5:11 pm | पैसा

रहमानचं माँ तुझे सलाम ऐकताना आणि भारत माता की जय म्हणताना काही वेगळे वाटते का?

दिग्विजय भोसले's picture

15 Apr 2016 - 5:21 pm | दिग्विजय भोसले

खरं आहे,
पण तोच तर प्राॅब्लेम आहे ना!
उसके लिए दिल बडा होना चाहिए|

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 6:01 pm | mugdhagode

रहमानने माँ असा शब्द वापरलाय , पण विशिष्ट एखादी मूर्तीचा आग्रह नाही.

पैसा's picture

15 Apr 2016 - 6:06 pm | पैसा

मग? भरतमातेची विशिष्ट मूर्ती असते का?

मराठी कथालेखक's picture

15 Apr 2016 - 6:26 pm | मराठी कथालेखक

रहमानने म्हंटल म्हणून प्रत्येकाने म्हणावे असा आग्रह धरण्यात अर्थ नाही. किंवा कुणी तसे म्हणत नाही म्हणून तो देशद्रोही ठरत नाही.
तसे मुंबईत अनेक इतर धर्मी गणेशोत्सवही साजरा करतात. म्हणून प्रत्येकाने केला पाहिजे असे नाही.
आपल्या प्रतिज्ञेतही कुठेच भूमीला माता म्हंटलेले नाही.

दिग्विजय भोसले's picture

15 Apr 2016 - 7:18 pm | दिग्विजय भोसले

बरोबर आहे.
शिवाय असे मूर्त स्वरूप देणे कितपत योग्य आहे
हे एक
आणि हे दुसरे

प्रदीप साळुंखे's picture

15 Apr 2016 - 7:36 pm | प्रदीप साळुंखे

हीच ती भारतमाता!!
तिने 15 ऑगस्ट इसवी सन 1947 रोजी इंग्लंडच्या गोर्या दैत्याचा वध केला.
हीच ना?

मुळगावकरांचे दुर्गादेवीचे चित्र काय हे?

प्रदीप साळुंखे's picture

15 Apr 2016 - 8:16 pm | प्रदीप साळुंखे

नो आयडिया,पण त्या धाटणीचं वाटतयं.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 7:53 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

लोल =((
चक्क दहा हात!!!

चित्रातल्या मागच्या नकाशाच्या सीमा बघा.. सगळ्या त्या घाणीसकटच भारतवर्षाची स्वप्न बघणारे आहे बरेच जण :-)

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2016 - 8:15 am | बोका-ए-आझम

पाकिस्तान आणि बांगलादेश कुठे दाखवलेत त्यात? काश्मीर पूर्ण दाखवलेला आहे पण तो तसाही अधिकृत नकाशांमध्ये दाखवला जातोच.

विवेकपटाईत's picture

19 Apr 2016 - 7:39 pm | विवेकपटाईत

एका मातीत जन्मलेल्या लोकांची पूजा पद्धती वेगळी असली तरी ते याच भूमीचे पुत्र आहे. भारत मातेच्या हातात क्रॉस, कडा किंवा चांद सितारा दाखविला तात्पर्य वेगवेगळ्या वस्त्रांत दाघ्विली तरी ती भारत माताच राहणार. हे समजणे आवश्यक आहे.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 4:12 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

संपादकीय मधून डांबरट शेलकी भाषा वापरून इतरांवर टिकेची झोड उटवणे हेच "शो"सेनेचे काम हाय.
राम मंदिर हा भाजपचा मुख्य अजेंडा असणार नाही हे चांगलेच झालं कि?
त्यांना विकासाच्या अजेंड्यावरच लोकांनी सत्ता दिली आहे केंद्रात.

mugdhagode's picture

15 Apr 2016 - 8:17 pm | mugdhagode

विरोधात होते तेंव्हा ते बोलायचे सत्ता द्या , मंदिर वही बनायेंगे.

सत्ता मिळायावर बोलले की पूर्ण्बहुमत नाही.

आता सत्ता व पूर्ण बहुमत दोन्ही आहे. आता बोलतात की राम व विकास यांचा संबंध नाही. !

यांची बदलती रूपं पाहून साक्षात मारीचही ढसाढसा रडेल.

रमेश आठवले's picture

16 Apr 2016 - 7:10 am | रमेश आठवले

हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्या साठी सुद्धा आपण सरकार, भाजपा आणि संघ यांनाच जबाबदार धरणार काय ?

बोका-ए-आझम's picture

20 Apr 2016 - 8:18 am | बोका-ए-आझम

यांची बदलती रूपं पाहून साक्षात मारीचही ढसाढसा रडेल.

तुमचे डू आयडी बघून तो इतका रडला की त्याला dehydration झालं, हे तुम्हाला माहित आहे का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2016 - 7:34 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मां नको तर मुस्लिमांनी अम्मी म्हणावं, क्रिश्चनांनी मम्मी म्हणावं. हा.का.ना.का. आणि जमत नसेल तर बॅगा भराव्यात. चपला घालाव्यात आणि शेजारच्या देशात अथवा रोमला फुटावं.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

15 Apr 2016 - 8:00 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

तुम्हाला मुद्दा कळाला नाही.
त्याला धर्माचं अधिष्ठान आहे,भूमीला/प्रांताला/देशाला अम्मी असं नाही म्हणत ते!! ते एकेश्वरवादी आहेत,अल्लाह सोडून दुसर्या कोणाचं गुणगान/पूजा ते करीत नाहीत,मात्र त्यांचं देशावर प्रेम आहे असे ते वारंवार सांगतात कि शिवाय जय हिंद ही घोषणासुद्धा देतात.
:
:
बाहेर जा असे म्हणणे म्हणजे थोडं अतिच होतयं.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2016 - 9:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

ओह त्यांची विचारसरणी म्हणजे धार्मिक अधिष्ठान आणि हिंदु विचारसरणी म्हणजे भगवा दहशतवाद हे विसरलो होतो. माफ करा हां.

मी कुठे त्यांना देशद्रोही म्हणतोय? मी सांगतोय चार लोकं जसे वागतायत तसे वागा. उगीचं वेगळा बुट काढुन तेढ कशाला वाढवायची? एवढी वर्षं कोणी भारतामाता, इंडिया, हिंदुस्थान वगैरे नावांनी बोलत होते तेव्हा कोणाला शष्प काय फरक पडत नव्हता. आताचं आम्ही मां म्हणणार नाही, भारत माता म्हणणार नाही वगैरे मुद्दे चव्हाट्यावर मांडायची काय गरज होती? म्हणु नका पण बोंबलुन जाहिर करुन वाद निर्माण करायच्या मागचं राजकारणं लैचं वाकडं आहे हे वेगळे सांगणे नं लगे.

बाकी वमनटंकनसुरांनी बुचाचं औषधं घ्यावं असं सुचवतो. म्हणजे धाग्यावर अवांतर पातळ होणार नाही.

दर्गा काय असतो? अल्ला समोर मस्तक झुकल पाहजे ,मग मोइदुन चिश्तिच्या नावाने का गळे काढले जातात? दयेवर जगणं पाप आहे तर मग सबसिडी घेताना धर्म बूड़त नाही काय? इथे हजची व् इतर सर्व सब्सिडी गृहीत धरली आहे. देहदान ही संकल्पना मुस्लिम मौलवी वा विचारवंत कधी चर्चतील का? जर हे निकष लावले गेले तर अवयव दानासाठी मुस्लिम कधीच पात्र ठरू शकणार नाही. इतर अनेक प्रश्न आहेत.
आपल्या मिपावर अनेक जानकार आहेत, वेळोवेळी त्यांना पुळका येत असतो. जरा स्पष्ट करतील काय?

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

16 Apr 2016 - 7:52 am | खालीमुंडी पाताळधुंडी

खरं आहे.
घोषणा देणार नसतील तर त्यांनी गप्प बसावे,उगाच गाजावाजा करून फतवे काढायची गरज नव्हती.
पण तुम्ही दुसरी बाजू समजून घेणार आहात का?
कोणत्याही गोष्टीचं दैवतीकरण करण्याची गरज काय?
देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप कशासाठी? भारतमातेचं मंदीर कशासाठी ? मग उद्या मंदीराबाहेर दुकाने लागतील.धूप,अगरबत्ती,फुले वाहिली जातील.आपण त्या पुराणवृत्तीतून बाहेर कधी पडणार?
देश हा देश आहे, दॅट्स ऑल!

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 Apr 2016 - 8:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

देशाला देवीसारखं मूर्त स्वरूप कशासाठी? भारतमातेचं मंदीर कशासाठी ? मग उद्या मंदीराबाहेर दुकाने लागतील.धूप,अगरबत्ती,फुले वाहिली जातील.आपण त्या पुराणवृत्तीतून बाहेर कधी पडणार?

ह्या गोष्टीशी सहमत. लोकं कशाचा बाजार बनवतिल ते काही सांगता येत नाही. तुम्ही म्हणता तसं होउही शकेल.

पण तरीही देश हि संकल्पना धर्मापेक्षा मोठी असायलाचं हवी.

नाना स्कॉच's picture

16 Apr 2016 - 10:50 am | नाना स्कॉच

पण तरीही देश हि संकल्पना धर्मापेक्षा मोठी असायलाचं हवी.

प्रचंड सहमत! अन माझ्यामते हाच खाल मुंडी... साहेब ह्यांचा मुद्दा आहे! देश हा धर्मापेक्षा मोठा असला पाहिजे, हे समान लागु असेल जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य!.

पुन्हा एकदा बोलतो की आपापल्या वैयक्तिक आयुष्यात ज्याला जसे वाटेल त्याने तशी राष्ट्राची आराधना करावी / करू नये . त्याला आक्षेप घ्यायचा कोणालाच अधिकार नसावा कारण तो एक मुलभुत संवैधानिक हक्क असेल किंबहुना आहेच.

हे खरं आहे पण असं होत नाही. धर्म ही संकल्पना देशापेक्षा जुनी आहे. इस्लाम आणि ख्रिश्चानिटीमध्ये तर ती अनेक देशांना व्यापून उरलेली आहे. त्यामुळे देश हा धर्मापेक्षा मोठा असतो, असायला पाहिजे हे मान्य पण तसं होणं कठीण आहे.

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 6:32 pm | सुबोध खरे

<strong>जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य
हे मान्य परंतु भारतीय घटनेपेक्षा आमच्या धर्माचे पुस्तक जास्त श्रेष्ठ आणी आमच्या वैयक्तिक कायद्यात ढवळाढवळ करण्याचा घटनेलाही अधिकार नाही असे म्हणणार्याबद्दल आपले काय म्हणणे आहे? ज्यांना या भूमिचे कायदे मान्य नाहीत त्यांनी तरी येथून चालते व्हा असे आपण म्हणणार? का त्यांना पण आपली घटना, आपले कायदे यांची पायमल्ली करूनही राहू द्या (सहिष्णूपणाचे धोरण ठेवून) असे म्हणणार?

तर्राट जोकर's picture

21 Apr 2016 - 7:00 pm | तर्राट जोकर

चतुराईने दोन असंबद्ध मुद्दे एकत्र आणून एक दुसर्‍यास जोडून हवे तेच प्रक्षेपित करणे हा जुना खेळ झाला आता खरे साहेब. 'भारतमाताकी जय म्हणा नाही तर चालते व्हा' हे म्हणणे आणि 'देशाचे कायदे पाळा अन्यथा चालते व्हा' हे म्हणणे दोन अतिशय वेगळ्या गोष्टी आहेत. एकास विरोध म्हणजे दुसर्‍यास सहमती असा अर्थ तर होत नाहीच.

घटना, कायदे, पायमल्ली इत्यादी शब्द खुबीने पेरलेत. असे वा तसे, तुम्हाला भारतात मुस्लिमच नको आहेत हे एकदाचे स्पष्ट बोलून टाका आता. म्हणजे कोणाला देशभक्ती, सहिष्णुता, पुरोगामीपणाचे सर्टीफिकेट्स वाटत बसण्याची गरजच पडणार नाही.

सुबोध खरे's picture

21 Apr 2016 - 8:16 pm | सुबोध खरे

strong>जे भारताला माता म्हणू इच्छित नाहीत त्यांना सुद्धा अन जे भारतमातेला अष्टभुजा महिषासुर मर्दिनीच्या रुपात पाहतात त्यांना सुद्धा! 'भारत माता की जय' न म्हणणाऱ्या जनतेने त्यांचे धर्मादेश त्यांच्या घरात ठेवावे हे जितके सत्य तितकेच तिला दैवी मूर्ती म्हणून दर्शवणाऱ्या जनतेने 'तिचे त्याच रुपात अभिवादन करा नाहीतर तुम्ही देशभक्त नाही किंवा तुम्ही चालते व्हा' असे म्हणू नये हे देखील सत्य
हे मान्य

हे वाचले नाही काय? पहिला भाग STRONG केला होता तो आला नाही हे दुर्दैव.
परंतु जे AIMPLB ( मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळ) आम्ही "भारतमाता की जय" म्हणणार नाही म्हणते तेच फतवा काढून सांगत आहे कि "तीन वेळा तलाक मध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानणार नाही". आपण "एकाच" मंडळाबद्दल बोलत आहोत तेंव्हा मुद्द्यात घोळ नाही.
तुम्हाला AIMPLB ( मुस्लीम वैयक्तिक कायदा मंडळ) "आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मानणार नाही" म्हणते त्याबद्दल काय म्हणायचे आहे ते स्पष्ट म्हणा.

नाना स्कॉच's picture

15 Apr 2016 - 8:09 pm | नाना स्कॉच

तुम्ही पुण्याचे का हो साहेब??

तर्राट जोकर's picture

15 Apr 2016 - 7:46 pm | तर्राट जोकर

धाग्यावर वमनांची सुरुवात झाली. बोला रामकृष्ण हरी...

चेक आणि मेट's picture

15 Apr 2016 - 10:01 pm | चेक आणि मेट

,

गामा पैलवान's picture

19 Apr 2016 - 1:55 am | गामा पैलवान

लोकहो,

मुस्लिमांनी मातृभूमीला आई म्हणण्यावरून इतकं चर्वितचर्वण झालं हे पाहून मौज वाटली. मातृभूमीच्या नावाने राजकीय पक्ष तुर्कस्थान, अझरबैजान, रशिया, युक्रेन आणि चक्क मंगोलियामध्येही आहेत. तिथे कुठेही इस्लाम खतरेमे पडंत नाही. इथल्या मुसलमानांना काय धाड भरलीये भारतमाताकी जय बोलायला?

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 2:07 am | तर्राट जोकर

देशातल्या सगळ्या मुसलमानांचे तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र पोचले काय? उगा आपले सेन्सेशनल बुद्धीभ्रम करणारे विषय काडायचे आणि असा नाय तर तसा मुसलमानांवर ठपका ठेवायचे निमित्त उकरुन काडायचे. चर्चितचर्वण नक्की कोण करत आहे ह्याचा जरा तुम्हीच विचार करा पैलवान.

कोनतरी बोलतो भारतमाताकी जय म्हटलंच पाहिजे त्यावर दुसरा बोलतो नाय बोलनार ज्जा. कोनतरी टीनपाट फतवे काडनार, कोनतरी मुखमंत्री देशात राहण्याचा अधिकार नाही बोलनार, कोनतीतरी पार्टी कायदा करायचं बोलनार, कोनतरी फुटपट्टी घेउन बसनार कोन देशभक्त कोन नाय.

२०१५ च्या शंभर वर्षांपासुनच्या आधीपासून लोक भारतमाताकी जय बोलत आलेत, हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई. सगळे भारतीय. तेव्हा बहुतेक हे आज शिकवणी घ्यायला उपटलेले झोपलेले असतील. परत झोपलेत निवांत, तर आनंद होईल.

विवेकपटाईत's picture

19 Apr 2016 - 7:43 pm | विवेकपटाईत

हा लेख केवळ आपल्या देशाच्या संबंधित नाही अपितु सर्व देशांच्या जनतेच्या दृष्टीकोनातून लिहिला होता. मुख्य म्हणजे सिरीया, इराक यथे जे चालले आहे, त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 8:18 pm | तर्राट जोकर

दोन समुदाय एकमेकांना भीडतात तेथे प्रत्येकदा मायभूमी हा संदर्भ नसतो. धर्म हा ही संदर्भ नसतो. ज्यांना भिडायचेच आहे त्यांना कुठलेही कारण पुरते. आपला लेख फारफेच्ड वाटला. असो हे माझे वैयक्तिक मत.

तजो,

१.
>> देशातल्या सगळ्या मुसलमानांचे तुमच्याकडे प्रतिज्ञापत्र पोचले काय?

नाही हो. माझ्याकडे फक्त दारूल उलूमचा फतवा पोहोचलाय.

२.
>> उगा आपले सेन्सेशनल बुद्धीभ्रम करणारे विषय काडायचे आणि असा नाय तर तसा मुसलमानांवर ठपका
>> ठेवायचे निमित्त उकरुन काडायचे.

मुसलमानांवर सरसकट ठपका येऊ नये म्हणून तर मातृभूमी पक्षाची उदाहरणे दिली आहेत. जर तुर्कस्थानात मातृभूमी पक्ष उभारी घेऊ शकतो तर भारतात का नाही?

३.
>> चर्चितचर्वण नक्की कोण करत आहे ह्याचा जरा तुम्हीच विचार करा पैलवान.

दारूल उलूमला कसलीही चर्चा न करता सरळ फतवा काढायची काय गरज होती?

४.
>> कोनतरी बोलतो भारतमाताकी जय म्हटलंच पाहिजे त्यावर दुसरा बोलतो नाय बोलनार ज्जा. कोनतरी टीनपाट
>> फतवे काडनार, कोनतरी मुखमंत्री देशात राहण्याचा अधिकार नाही बोलनार, कोनतीतरी पार्टी कायदा करायचं
>> बोलनार, कोनतरी फुटपट्टी घेउन बसनार कोन देशभक्त कोन नाय.

वरील कथनात 'भारतमाताकी जय' च्या जागी 'पाकिस्तान पाहिजे' टाका. कोणतरी टिनपाट म्हणजे महमंदअली जिना समजा आणि कोणतरी मुख्यमंत्री म्हणजे बंगालचा मुख्यमंत्री सुहरावर्दी म्हणून धरा. बघा, असाच गोंधळ १९४६ साली उडलेला होता. त्यातूनच पुढे पाकिस्तानची मागणी लादण्यात आली.

सदैव सावध राहिलेले बरे, नाहीका?

५.
>> २०१५ च्या शंभर वर्षांपासुनच्या आधीपासून लोक भारतमाताकी जय बोलत आलेत, हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई.
>> सगळे भारतीय. तेव्हा बहुतेक हे आज शिकवणी घ्यायला उपटलेले झोपलेले असतील. परत झोपलेत निवांत,
>> तर आनंद होईल.

सहमत. दारूल उलूम गप्प राहायला शिकले तर सगळीकडे आनंदी आनंद होईल.

आ.न.,
-गा.पै.

तर्राट जोकर's picture

20 Apr 2016 - 10:32 am | तर्राट जोकर

बरोबर आहे. तुम्ही दारुल उलुम ला सिरियसली घेणार, ओवेसीला सिरियस्ली घेणार कारण तुमची इच्छित कर्मे ते लोक करत आहेत. सगळ्या पांढर्‍या कागदावरचा छोटासा डाग तो तुम्ही दाखवणार आणि बोलणार हे बघा हा अख्खा कागद काळा आहे. तुम्ही ठरवूनच टाकले तर अधिक काय बोलणे. असो. धन्यवाद!

mugdhagode's picture

20 Apr 2016 - 10:44 am | mugdhagode

ख्रिस्चनांच्या देशात राहुन ते हिंदुभुमी म्लेंच्छ बळकवणार , याची चिंता करतात.

तर्राट जोकर's picture

20 Apr 2016 - 10:51 am | तर्राट जोकर

पोटं भरल्यावर करण्याच्या चिंता करायला कोणाचं काय जातं. असो. चालु द्या.

गामा पैलवान's picture

20 Apr 2016 - 6:37 pm | गामा पैलवान

तजो,

>> सगळ्या पांढर्‍या कागदावरचा छोटासा डाग तो तुम्ही दाखवणार

हे बरोबर बोललात. पाकिस्तान आधी छोटासा डागच होता. खुद्द पाकिस्तानी प्रांतातल्या मुस्लिमांनाही पाकिस्तान नकोच होता. तरीपण असंख्य हिंदूंचे बळी घेऊन उत्पन्न झालाच ना? शत्रू, आग, साप आणि कर्ज कधी छोटे म्हणू नयेत.

आ.न.,
-गा.पै.