मारीचझंपीचे (बंगाली) कम्युनीस्ट ( )मृग ( )

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 Apr 2016 - 5:24 pm

आंतरजाल न्याहाळताना कोणतीशी दडपशाहींची यादी नजरे समोर उगवली, सहसा दडपशाहीच्या कथांमध्ये केवळ पात्रे बदललेली मनुष्य सर्वत्र सारखा असतो असा विचार करत फारसे डिटेल्स न वाचता वेगाने पुढे गेलो पण एक वेगळच नाव दिसलं मारीचझंपी, स्थळनामांची गमंत असते काय असेल या स्थळनामा मागे या उत्सुकतेने डिटेल्स उघडले. मारीचझंपी हे एक बेट आहे, पश्चिम बंगालच्या सुंदरबनातील एक संरक्षीत वन्यक्षेत्र हे लक्षात आलं.

माझ्या प्रमाणेच तुम्ही कितीही कम्युनीस्ट नसा काही भारदस्त भारतीय कम्युनीस्टांची नाव तुमच्या मनाच्या कुठेतरी चांगली जागाही अडवून असतात मग त्यात त्यांचा एखादा सादगीपूर्ण मुख्यमंत्री असतो, कुठे सोमनाथ चटर्जी असतात, कुठे सिताराम येचुरी असतात, तसचं एक नाव ज्योती बसूंच. ज्योती बसू अस एक नाव ज्याने पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री झाल्या नंतर काँग्रेसला न झेपलेले लँड रिफॉर्मची यशस्वी अंमलबजावणी करुन कसेल त्याची जमीन आणि भूमीहीनांना जमीन हे अधिक यशस्वीपणे करुन दाखवल हे आठवत होतो आठवण्याच कारण ज्योती बसूंनी बनवलेली कम्युनीस्ट बंगालची प्रतिमा आणि त्यांच्याच मुख्यमंत्रीय कारर्कीर्दी सुरवातीची मारिचझंपी घटना कम्युनीस्टांच्या सगळ्या बेस्ट ऑफ सकारात्मक प्रतिमेवर '?' चिन्ह उपस्थीत करणारी पण कुठेच वाच्यता न होणारी !

काय झालं या मारिचझंपीला ? जवळपास सहा हजार निर्वासीत कुटूंबांना (तिस-ते चाळीस हजार लोक) आरक्षीत वन्यक्षेत्रार अतीक्रमीत उद्घोषीत करुन हुसकाऊन लावल गेल. काय वावग होतं यात ? तांत्रिकदृष्ट्या ते पुर्णतः अतीक्रमण असावं आणि अतीक्रमण उठवणार्‍या प्रशासनाच्या उद्देश्यात खूप गैर असेलच असे नाही. मग प्रश्न कुठे आहे ? हे तथाकथिक अतीक्रमण करते बंगाली कम्युनीस्टांनी -ज्योती बंसूंनी- स्वतःच आमंत्रण दिलेले होते, सत्तेत विरोधीपक्षात असताना आश्वासन दिलेले होते सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्री महोदयांनी व्यक्तीशः जाऊन बोलावणे दिले होते. कोण होते हे अतीक्रमणकारी लोक ? १९४७ च्या फाळणी नंतर बांग्लादेशाचा राहता निवास सोडून यावे लागलेले हिंदू(-दलीत) निर्वासीत. बांग्लादेशातून आल्या नंतर सुरवातीस पश्चिम बंगाल मध्ये पाच निर्वासित कँपातून यांना ठेवल होत तत्कालीन काँग्रेस सरकारने पश्चिम बंगालवर लोकसंख्येचा ताण पडतो आहे असे सांगत या लोकांना उत्तराखंड, मध्यप्रदेश, ओरीसा अशा राज्यातून कँप उघडून देऊन सक्तीच स्थलांतर करवल यात काँग्रेसच्या भुमिकेत तथ्य असेलही पण बांग्लादेशातून स्थलांतर झालेल्यांना कदाचित कम्युनीस्ट त्यातल्या त्यात जवळचे असावेत आणि कदाचित त्यावेळच्या काँग्रेस समोर कम्युनीझम हे मोठे आव्हान असावे. प्रशासकीय कारण असो वा राजकारण काही असो पण सर्वच कँपातील निर्वासितांनी बंगाल सोडण्यास लावू नये म्हणून उपोषणे केलेली पण जसे काही वेळा राजा ऐकत नाही तसे इथे सरकारने/ काँग्रेसने आपले खरे केले १९४७च्या बंगाली निर्वासितांना भारतभर विखरुन दिले. असो एकुण १९७७ मधील आणिबाणी नंतर प. बंगालात कम्युनीस्ट सत्तेत आले तो पर्यंत सातत्याने कम्युनीस्टांनी या विषयावर भावनिक राजकारण करत भारतात विखुरल्या गेलेल्या बंगाली निर्वासितांना प.बंगालात वापस आणण्याच्या मोठ्या गप्पा केल्या. अगदी सत्तेत आल्या नंतरही त्यांचे मंत्री ओरिसात जाउन व्यक्तीशः जाऊन आमंत्रण देते झाले. आणि तब्बल तीस वर्षांनतरही बंगाली माणूस पश्चिम बंगालाकडे मोठ्यासंख्येने परतू लागला पण तो परततोय तो पर्यंत निवडून आलेल्या ज्योती बसू सरकारने पुर्ण कोलांट उडी मारत येऊ लागलेल्या दिड एक लाख लोकांना वापस जाण्यास सांगितले.

जसे काही वेळा राजा ऐकत नाही तसे काही वेळा प्रजाही ऐकत नाही. ओरीसातून आलेल्या सतीश मंडल या नेत्याने त्यांचा बंगाली समूह सुंदरबनातील मारीचझंपी या छोट्या रिकाम्या बेटावर नेला. बेटावर नव्याने आलेली हि पुर्वनिर्वासित बंगाली मंडळी हिंदू(-दलित) होती बांग्लादेशातून पशिम बंगाल, तिथून ओरीसा असा प्रवास करुन झाल्या नंतर नव्या बंगाली लोकात राहण्या स्वप्नांच्या खातर जवळच सर्व विकुन स्व खर्चाने बेटावर जाऊन राहीली वर्षाभरात बेटावर नव्याने आयुष्य आणि छोट्या अर्थव्यवस्थेची उभरणी मोठ्या कष्टाने केलेली. पण १९७९ येते तर कम्युनीस्ट तारणहारांची मने बदलली होती त्यांनी त्यांना सक्तीने जाण्यास सांगितले. ते नाही म्हणाले तर अन्नपाणी ब्लॉक केले न्यायालयाने अन्नपाणी ब्लॉक करु देण्यास मनाई केली तर त्यांना वेगळी जागा देऊन नव्हे अत्याचार करुन घालवले गेले. अत्याचार केला गेला असावा असे प्राथमीक वर्णनांवरुन दिसते पण एवढ्या सर्व वर्षात ते सातत्याने नाकारले गेले. त्याची ना कम्युनीस्टांना खंत न कोणत्या विरोधीपक्षाला खेद ! असे ते मारीचझंपी

मारीचझंपी या बेटाच्या नावाला काय म्हणाव योगायोग सुवर्णमृगाचा की मृगजळाचा ?

संदर्भ

https://en.wikipedia.org/wiki/Marichjhapi_incident#cite_note-mi2-3

https://bangalnama.wordpress.com/2009/07/06/the-silence-of-marichjhapi/

http://www.telegraphindia.com/1100118/jsp/frontpage/story_11996337.jsp

http://www.hindustantimes.com/kolkata/ghost-of-marichjhapi-returns-to-ha...

http://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/Wound-still-raw-for-Mari...

https://www.quora.com/What-really-happened-at-Marichjhapi

https://books.google.co.in/books?id=r7ar3x8KAOsC&pg=PA100&lpg=PA100&dq=m...

realindianews.blogspot.in/2012/06/hindutva-experiment-is-being-extended.html

https://en.wikipedia.org/wiki/Namasudra

इतिहासराजकारण

प्रतिक्रिया

लेख अत्यंत माहितीपूर्वक!
धन्यवाद!
मात्र मांडणी जरा विस्कळीत वाटली!

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:08 am | माहितगार

मात्र मांडणी जरा विस्कळीत वाटली!

हम्म अजून जरा खासकरुन अत्याचारांबद्दल लिहावयास हवे होते, वेळे अभावी सेव्ह करण्यात घाई झाली.

DEADPOOL's picture

19 Apr 2016 - 11:31 pm | DEADPOOL

हो हेच वाटलं मलाही!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2016 - 11:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडले.

-दिलीप बिरुटे

हे मारीचझंपी होताना केंद्रात अथवा प. बंगालात भा.ज.पा. सरकार असता तर कम्युनीस्ट आणि काँग्रेसने काय गोंधळ घातला असता असो.

खालील वाक्य बिरुटे सर आपल्यासाठी मुळीच नाही. व्यक्तीलक्ष तर्क दोषातून लेखकावर संशय घेणार्‍यांसाठी (कारण अशा लेखना नंतर ल्गोलग अशी मंडळी प्रतिसादासाठी येतात त्यांच्यासाठी आहे.

* एनी वे मी गेल्या २४ तासाच्या आत परस्पर विरोधी राजकीय पक्षांवर म्हणजे दुसर्‍या धाग्यातून भाजपा सरकारवरही टिका केली आहे तेव्हा तरीही ज्यांना मी विषीष्ट चष्मे लावतो वाटते त्यांनी तसे वाटून घ्यायचे की निष्पक्षतेचा आदर करावयाचा हे पहावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2016 - 7:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण कितीतरी जूने जाललेखक आहात एका मोठ्या लेखन प्रकल्पाची जवाबदारी आपल्याकडे मी पाहिली आहे, पाहात असतो, तेव्हा जालावर कितीतरी लोक येतात, ते काहीही बोलू शकतात हे आपण गृहीत धरतोच तेव्हा काही टिकांना उत्तरे द्यायची तर व्यक्तिगत रोखाच्या टिकांना फाट्यावर मारायचं :)

सारांश : लिखते रहो.

-दिलीप बिरुटे

पैसा's picture

19 Apr 2016 - 12:56 pm | पैसा

कोण आवाज उठवणार होते या लोकांच्या बाजूने?

माहितगार's picture

19 Apr 2016 - 1:05 pm | माहितगार

हा काळ इंदीरा गांधींना पाडून नुकत्याच नव्याने निवडून आलेल्या मोरारजी देसाई आणि राज्यात ज्योतॉ बसूंच्या उदो-उदोचा होता त्या उदो उदोत यांची दखल घेण्याची माध्य्मांना गरजही पडली नसेल. पण एकेका झोपडपट्टी बाबत राजकारण करणार्‍या आणि येता जाता मानवाधिकारांच्या गप्पा करणार्‍या कम्युनीस्टांच्या नैतीकतेत हे सर्व कुठे बसते. १९५० मध्ये बंगालातून इतरत्र निर्वासितांना जबरदस्तीने विखुरताना बंगालच्या लोकसंख्येचा सॅच्युरेशन पॉईंट आल्याचे तत्कालीन काँग्रेसने सांगितले १९५० नंतरच बंगालची लोकसंख्या वाढली नाही का ? वाढलेल्या लोक्संख्येला आजचा बंगालही झेलतोच आहे ना असो.

प्रतिसादा बद्द्ल आभार

बहुपक्षीय निवडणुका आणि त्या राजकारणात एक पक्ष म्हणून भाग घेणे हाच कम्युनिझमचा मोठा पराभव नाही का? मग निवडणुका जिंकण्यासाठी ते असले प्रकार करतील यात काही विशेष नाही. लोकांचा असंतोष चिरडून टाकायला कम्युनिस्ट राजवटींनी जगभर जे काही केले, करत आहेत त्याचाच कित्ता या लोकांनी बंगालात गिरवला.

बंगाल्यांच्या स्थलांतरामुळे आसाम वगैरे भागात मोठे प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. या सुरुवातीच्या काळानंतर जे बंगाली मुस्लिम लोक बांगला देशातून आले, त्यांची संख्या कित्येक पटीत असावी. बांगला देशातून आलेले हिंदू आणि मुस्लिम दोन्हीचे साधारण बरोबर आकडे कोणी दिल्यास आभारी राहीन. नंतर ममता दीदी तर बांगला देशी मुस्लिमही आमचेच म्हणत आहेत. कालाय तस्मै नमः|

(ताजा कलमः आताच सेन्ससचे आकडे पाहिले त्याप्रमाणे २००१ ला भारतात सुमारे ३० लाख बांगलादेशी आहेत. त्यातले २० लाखावर आसामात आहेत. मात्र बेकायदेशीरपणे भारतात रहात असलेल्या लोकांचा हा आकडा नाही. तो कदाचित २ कोटीही असू शकेल. या लोकांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर काय भयानक ताण पडत असेल विचार करू शकत नाही. दर वर्षी सुमारे एक लाख बांगलादेशी बेकायदेशीर रीत्या भारतात येऊन रहातात असा अंदाज आहे.)

माहितगार's picture

19 Apr 2016 - 11:12 pm | माहितगार

पुर्वबंगालातील जनतेस निर्वासीतपणाचा शाप मिळाला का काय कुणास ठाऊक तिकडे मयन्मार मध्ये रोहिंग्यांची अशीच काही समस्या असावी, १९४७ मध्ये आणि १९६४ मध्ये हिंदुंचे स्थलांतर करवले गेले १९७१ मध्ये लोकशाही आधीकार आणि भाषा समस्येमुळे हिंदू मुस्लीम असे एकत्रित स्थलांतर झाले आणि त्या नंतर चालू असलेले स्थलांतर आर्थीक कारणांनी होत आले आहे. मुख्य म्हणजे पुर्व आणि पश्चिम बंगाल दोन्हीकडे लोकसंख्या वाढीवर नियंत्रण घातले न गेल्याने नजिकच्या प्रदेशांवर अधिक ताण पडला आहे. अशात मोदी सरकारने सीमा विवादावर पडदा टाकुन सिमा नियंत्रणास प्राधान्य दिल्याने सिमेचे कुंपणीकरण नीट झाल्यास अल्प आराम पडावा. पण सिमेला कुंपण हा पुर्ण स्वरुपी पर्याय नव्हे आर्थीक फरक मोठा राहीला भारत अधिक विकसीत असेल तर युरोपात बोटींनी स्थलांतरे होतात तशी होतच राहतील. स्थलांतरे पुर्ण थांबवण्यापेक्षा आपल्या टर्मस वर होतात का आपल्या देशाची मुख्यधारेतील भाषा संस्कृती आणि हिंसात्मकतांचे कोणतेही परोक्ष अपरोक्ष समर्थन न करता भारता प्रती सुस्पष्ट लॉयल्टी ठेवणार्‍यांना अधिकृत घेऊन अर्थव्यवस्थेत उत्पादक योगदान करतील अशा पद्धतीने घ्यावे, आणि बाकीच्यांना हकलावे. अधिकृत असलेल्यांना मॉनीटर करणे लोकसंख्यावाढीवर नियंत्रण घालणे अधिक सोपे जावे. अधिकृत होणारे अनधिकृतांना शोधून घालवण्यासाठी मदत सुद्धा करु शकतील.

एक मोठी चुक इंदीरा गांधींच्याच काळात झाली ती म्हणजे फाळणीनंतर बांग्लादेशात जाऊन स्थायीक झालेल्या पाकीस्तानवादी बिहारी मुस्लीमांना सक्तीने पाकीस्तानात रेल्वे भरुन भारत सरकारने हाकलले असते तर समस्या कमी गंभिर राहीली असती. बंगाली मुस्लीम १९७१च्या अनुभवा नंतर तेवढा कडवा राहीला नसता आणि काही अपवाद सोडल्यास उर्दू हिंदी त्यांना फारसे झेपण्याची शक्यता कमी त्यामुळे पश्चिम बंगालातच पुरेसे औद्योगीकरण करणारा नॉन कम्युनीस्ट पक्ष यशस्वीपणे काम करु शकला तर बंगाली सहसा बंगालाच्या पुर्व भारताच्या पलिकडे फारसे आनंदाने जाणार नाहीत. पण या जर तरच्या गोष्टी झाल्या.

बोका-ए-आझम's picture

19 Apr 2016 - 5:20 pm | बोका-ए-आझम

कम्युनिस्ट सर्वांचे गुरु आहेत. कामगारांचं आणि कष्टकऱ्यांचं राज्य म्हणून मिरवणारं सोविएत युनियन म्हणजे प्रत्यक्षात दडपशाही आणि हुकूमशाहीच होती. भारतातले कम्युनिस्टही काही फार वेगळे नाहीत. गोध्राचा संदर्भ देताना त्यांना नंदीग्राम आणि सिंगुर आठवत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Apr 2016 - 7:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपलं म्हणनं खरंही असेल पण मला हल्ली त्यांची काही* मतं पटू लागली आहेत, म्हणजे त्यांना एक संधी का देऊ नये इथपर्यन्त.

-दिलीप बिरुटे

बोका म्हणतात तसे त्यांनी संधी उपयोगात आणून सत्तेत सहभाग घेतला असता तर बरे झाले असते. सत्तेच्या बाहेर राहून टिका करणे सोपे असते, सत्तेत आल्यावर सुवर्णमृगा मागचा मारीचझंपी दिसायला वेळ लागत नाही. काही शहाणपण त्यांना आणि समर्थकांना सत्तेत आल्या नंतरच येते. आणिबाणीच्या काळात विद्यर्थी नेता लालू प्रसाद म्हणजे केवढा ग्रेट वाटला असेल सत्तेत जाऊन त्याने काय दिवे लावले ते आपोआप दृष्टोत्पत्तीस पडते.

दोन्हीही वेळा त्यांनी चूक केली. पहिल्यांदा १९९६ मध्ये. जेव्हा भाजपचं १३ दिवसांचं सरकार पडलं तेव्हा ज्योती बसू पंतप्रधान होऊ शकले असते. त्यांना पाॅलिटब्युरोने मनाई केली. नेमकी कुठल्या कारणामुळे देव जाणे किंवा मार्क्स जाणे.
दुसरी युपीए १ च्या काळात - २००४-०९ मध्ये. तेव्हा त्यांचे सर्वात जास्त (मला वाटतं ६१) सदस्य लोकसभेत होते. सरकारला त्यांनी बाहेरून पाठिंबा दिला होता. मनरेगासारख्या योजनांवर आपला ठसा उमटवला होता. पण अमेरिकाद्वेष इतका डोक्यात गेला त्यांच्या की त्यांनी सरकारला वेठीला धरलं आणि पाठिंबा काढून घेतला. काँग्रेस सरकारला तेच हवं होतं.
अशा दोनदा संधी मिळूनही ती लाथाडणा-यांना काय म्हणावं? तसंही सध्याच्या राजकीय विचारसरणीत त्यांना जागा नाहीच आहे. THEY ARE NO LONGER RELEVANT.

mugdhagode's picture

19 Apr 2016 - 8:29 pm | mugdhagode

हायला , बांग्ला निर्वासितात हिंदूच भरपूर आहेत...

रच्याकने , भारतीय हिंदूना हे हिंदु निर्वासित कसे वाटतात ? मित्र की शत्रू ?

तर्राट जोकर's picture

19 Apr 2016 - 10:43 pm | तर्राट जोकर

जेव्हा ते हिंदू असतात तेव्हा त्यांना आधारकार्ड घोषित केल्या जातं. जेव्हा नसतात तेव्हा खार खाल्ल्या जातो.