उत्तरं यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम्
वर्ष तत् भारतं नाम भारती यत्र संततिः
समुद्राच्या उत्तरेला आणि हिमाद्रीच्या दक्षिणेतल्या भू भागाला भारत असे म्हणतात. या भारतभूमीची संतति इथे निवास करते.
अपि स्वर्णमयी लङ्का न मे लक्ष्मण रोचते.
जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी.
हे लक्ष्मणा, सुवर्ण लंकेचा राजा बनण्यापेक्षा अयोध्येत भरताच्या अधीन सेवक राहणे अधिक रास्त कारण माता आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा हि महान आहे.
पुरातन काळापासूनच आपण आपल्या भरत भूमीला आई म्हणतो. युरोपियन लोक हि देशाला पितृभूमी म्हणतात. एकदा का देशाला आपण माता /पिता मानले कि देशात बंधुत्वाचे वातावरण आपसूक निर्मित होते. जिथे सोख्य असेल तिथे शांती, आणि समृद्धी हि आलीच
प्रकृतीने हिमालयापासून समृद्रापर्यंत एक विशिष्ट भूभागाची रचना केली आहे. या भू-भागात अनेक भाषा-भाषी, पंथ आणि जातींचे लोक राहतात. एकाच राजाचे राज्य नेहमीच या भूभागावर राहील, हे संभव नाही. सत्तेसाठी युद्ध हे अटळ आहेच. आपल्या देशात सत्ता बदलली तरी लोकांवर जास्त अत्याचार होत नव्हते. कारण लोकांमध्ये बंधुत्व भाव आहे.
आपले ऋषी-मुनि दूरदर्शी होते. धर्म आणि जातीच्या नावाने संपूर्ण भरत भूमीत राहणार्या लोकांना सांस्कृतिक दृष्ट्या एक सूत्रात बांधणे शक्य नाही हे त्यांना माहित होते. प्रत्येकाला त्याचीच भाषा, जाती आणि पंथ श्रेष्ठ वाटतो. पण देशाच्या मातीप्रती लोकांच्या मनात आत्मीयता उत्पन्न करणे शक्य होते. आपल्या ऋषींनी हेच केले. सकाळी म्हणण्याचे श्लोक म्हणजे प्रात:स्मरणची रचना केली. लोकांच्या मनात देशाची माती आणि तिथे जन्मलेल्या महापुरुषांप्रती आदर भाव जागृत करणे हाच दूरदर्शी ऋषींचा उदेष्य हेतू होता. उदा:
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती.
नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन सन्निधि कुरु.
महेन्द्रो मलय: सह्ये देवतात्मा हिमालय:.
ध्येयो रैवतको विन्ध्यो गिरिश्चारावलिस्तथा.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका.
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिका.
रोज सकाळी प्रात:स्मरण केल्याचा परिणाम, लोकांच्या मनावर नकळत होतोच. घरात नळाच्या पाण्याने किंवा गावात विहिरीच्या पाण्याने, स्नान करत असताना आपण देशातील सर्व नद्यांच्या पाण्याने आंघोळ करण्याचा आनंद घेतो. यमुनेच्या पाण्यात स्नान करताना माझ्या मनात कावेरी नदीत स्नान करण्याची इच्छा उत्पन्न होते. सर्व पर्वतांचे आणि नगरांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेची इच्छा होणारच.
भरतभूमी वर जन्म घेणार्या आपल्या पूर्वजांप्रती आपल्या मनात आदर आणि श्रद्धा निर्माण करण्याचे काम हि आपल्या ऋषींनी केले. भारतभूमीत जन्म घेणारी महान विभूती मग ती स्त्री असो वा पुरुष, त्यांची स्मृती नेहमी आपल्याला राहावी म्हणून त्यांना हि प्रात:स्मरणात स्थान दिले. आयुष्यभर संघर्ष करून आपले उद्दिष्ट साध्य करणार्या आपल्या ५ महान स्त्रियांचे आपण रोज प्रात: स्मरण करतो:
अहल्या द्रोपदी सीता तारा मंदोदरी तथा.
पंचकन्या स्मरेनित्यं महापातक नाशनम्.
तसेच पुण्यश्लोको नलो राजा... ‘अश्वत्थामा बलिर्व्यासो... सारांश अश्यारीतीने पुरातन ऋषींनी आपल्या मनात या देशाच्या माती आणि पूर्वजांच्या प्रती आपल्या मनात आदर आणि भक्तीभाव उत्पन्न केला. आज आपण आपल्या पूर्वजांची पूजा करतोच मन देशाच्या मातीला ‘भारत माँ’ संबोधून तिची हि पूजा करतो.
जेंव्हा देशाचे राजकीय दृष्ट्या शेकडों तुकडे झालेले होते, त्याच वेळी आदी शंकराचार्यांनी देशाच्या चारी भागात चार मठांची स्थापना केली. चार धाम यात्रेची सुरवात बहुधा आदी शंकराचार्यांमुळेच सुरु झाली असेल. शाक्त पंथीयांनी देशात विभिन्न भागात (पाकिस्तान सहित) ५२ शक्तीपीठांची स्थापना केली. शैवांनी देशात विभिन्न प्रांतात १२ ज्योतिर्लिंगांची स्थापना केली. जवळपास सर्व हिंदू तीर्थ क्षेत्री जैनांनी सुद्धा आपली मंदिरे उभारली. गुरु गोविंद जर काही काळ आणिक जिवंत राहिले असते तर निश्चित कन्याकुमारीला हि एक गुरुद्वारा बांधला असता. असो. आज हि विभिन्न स्थानांवर भरणार्या कुंभ मेळ्यात देशातील सर्व ठिकाणाहून यात्रेकरू येतात, सर्व पंथीय साधू सन्यासी, यात्री एकत्र बसून चर्चा करतात. अश्यारितीने देशातील सर्वपंथांनी, या मातीप्रती लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि आदरण निर्माण करण्यात महत्वाचे योगदान दिले आहेत.
देशाला मातृभूमी किंवा आई मानण्याने, देशात राहणार्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होतोच या शिवाय एक राजनीतिक सत्ता स्थापन करण्यात हि यश येते. आपल्या देश्यात शेकडों चक्रवर्ती झाले. एकदा दिल्ली काबीज केली कि संपूर्ण देशाची सत्ता सहज प्राप्त होत होते हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. आत्ताचेच उदाहरण घ्या. देशाला स्वतंत्रता मिळण्याच्या वेळी देशात ६०० पेक्षा जास्त राजे-महाराजे होते. त्यातील अधिकांश राजा-महाराजांनी स्व:खुशीने आपल्या राज्यांचे भारतात विलीनीकरण केले. तेथील जनतेने हि विरोध केला नाही. कारण विभिन्न राज्यात राहणारी लोक या देशाला ‘भारत माँ’ म्हणून ओळखत होते. भारतमाते प्रती त्यांच्या मनात श्रद्धाभाव होता.
इस्लाम मध्ये देशाला मातृभूमी मानण्याची अवधारणा नाही. पण धर्मावर आधारित बंधुभावाची अवधारणा आहे. त्यांच्या मनात आपल्या गैर इस्लामिक पूर्वजांप्रती सम्मानाची भावननेला हि स्थान नाही. तेथील जनतेला एकत्र ठेवण्याचा कुठलाच दुआ उरलेला नाही. एकाच देशात राहणारे लोक, एकच धर्म मानणारे, पंथ, कबीला, जातीच्या नावावर एका दुसर्याच्या विरुद्ध लढत आहे. कोण स्वकीय आणि कोण परीकीय हे कळण्याची बुद्धी हि त्यांच्यात उरलेली नाही. जे लोक त्यांच्या कबील्याचे किंवा पंथाचे नाही, त्यांची हत्या करण्यात त्यांना काहीच वाईट वाटत नाही आहे. मग लहान मुले असो किंवा स्त्रिया सर्वांचाच वध होतो. लाखोंच्या संख्येने लोकांना आपली जन्मभूमी सोडून शरणार्थी बनावे लागले आहे. ह्या देशांचा संपूर्ण विनाश झालेला आहे. एकच धर्म मानणारे बंधुभावाने राहू शकतात, हि अवधारणा फोल ठरली आहे. गेल्या शतकात दोन विश्व युद्ध इसाई धर्म मानणार्या युरोपियन देशांत झाले. नेपाल हिंदू धर्मावलंबी असला तरी भारताशी त्याचे संबंध चांगले नाही. इस्लामी देशांची परिस्थिती तर आपण पाहताच आहोत..
ज्या देशांत त्यांची पूर्वजांना सम्मान दिल्या जातो, तेथील परिस्थिती वेगळी आहे. इराणी लोक आज हि अग्निपूजक जाल, रुस्तम, सोहराब यांचे तराणे गातात, तिथे शांती आहे. ५००० पेक्षा जास्त द्वीपसमूह आणि भारताप्रमाणे भिन्न-भिन्न जनजातीय असलेल्या इंडोनेशियात लोक एकत्र राहतात. रामायण आणि महाभारतातल्या कथांनी आणि चीनी परंपररेनी तिथल्या लोकांना एकत्र जोडलेले आहे. मिस्त्रच्या लोकांना आपल्या पिरामिड आणि त्यांना बनविणार्या पूर्वजांवर गर्व आहे. नील नदी प्रती त्यांच्या मनात आदर भाव आहे. परंतु आजकाल इस्लामी कट्टरता त्यांच्या मनात त्यांच्या पूर्वजांप्रती अनादर निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचेच परिणाम आज मिस्त्रचे लोक भोगत आहेत.
१९४७ मध्ये भारताच्या ज्या भागात इस्लाम मानणारे लोकांची संख्या जास्त होती, तो भूभाग देशापासून वेगळा झाला त्याचे कारण हेच. पण हे इथेच थांबणार नाही, देशाच्या मातीप्रती आदर नसल्यामुळे पाकिस्तानचे भविष्यात आणखीन हि तुकडे होण्याची संभावना नाकारता येत नाही. आज तिथे अराजकतेचे वातावरण आहे. बलूच, पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी सर्वच दुसर्याला आपले शत्रू समजतात. जर इस्लामी जगात शांतता प्रस्थापित करायची असेल तर मातृभूमीला आईचे स्थान देण्याची अवधारणा इस्लाम मध्ये समाविष्ट करावी लागेल. अर्थात हे कार्य इस्लामी विद्वानांच करावे लागेल. एकदा देशाला आई म्हंटले कि त्या भूमीत जन्म घेणार्या सर्व पंथीय आणि जातीय लोकांविषयी बंधुत्व भाव आपसूक निर्माण होतो. लोक एका दुसर्याला जाणण्याचा प्रयत्न करतात. देशात शांती प्रतिस्थापित होते.
आज आपल्या देशाला ‘भारत माता’ म्हणण्याचा विरोध काही अतिशहाणे पुरोगामी करीत आहे. एक तर त्यांना इतिहासाचे ज्ञान नाही. होणार तरी कसे? अंग्रेजानी देशावर राज्य करण्यासाठी ‘फूट डालो राज करो’ च्या नीतीचे अवलंबन केले होते. त्या साठी त्यांनी आपल्या पुरातन इतिहासालाच खोटे ठरविले. हेतू आपल्या पूर्वजांप्रती आपली श्रद्धा नष्ट करणे. एकदा लोकांच्या मनात ते वेगवेगळे आहेत, हि भावना रुजविली कि त्यांच्यात दुही माजविण्यात यश येतेच. त्याच साठी देवासुर संग्राम म्हणजे आर्य आणि द्रविडांचे युद्ध. असा इतिहास शिकवणे सुरु केले. आज देशाला स्वत्रंत होऊन हि ७० वर्षे झाली तरी हि आपल्याला पूर्वजांचा खरा इतिहास शिकविला जात नाही. अंग्रेजानी त्यांच्या स्वार्थासाठी तैयार केलेला खोटा इतिहास शिकून तैयार झालेले अतिशहाणे आपल्या भूमीला ‘माता’ कसे मानणार. भारत मातेच्या बर्बादीचे नारे लावणारे त्यांचे हिरो झालेले आहे. या विद्वानांना एवढे हि कळत नाही, एकदा भारत माते विषयी आपली श्रद्धा नष्ट झाली तर या मातीचे शंभर तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. मग लिबिया आणि इराक सारखी आपली गत व्हायला कितीस वेळ लागेल.
हे टाळायचे असेल, तर उद्यापासूनच आपल्या मुला-बाळांना प्रात: स्मरणीय श्लोक शिकवा. आपल्या देशातील नद्या, पर्वत, पवित्र सरोवरे, पुरातन ऋषी-मुनि, राजा-महाराजा, बादशाह आपले सणवार त्यांच्या मागच्या कहाण्या इत्यादी बाबत माहिती दिली तरी चालेल.
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 10:16 pm | राघवेंद्र
लेख आवडला. विचार करण्यासारखा आहे.
13 Apr 2016 - 10:45 pm | mugdhagode
बाबुल मोरा नैहर छूटोही जाय .
एका मुसलमान नबाबानेच लिहिले आहे ना ?
राजेमहाराजानेअॅ आपलॅ राज्ये सुखाने व भक्तिभावाने दिली हाही असाच एक भ्रम . भक्ती होती तर एकीकरणाला ४७ साल का यावे लागले ?
14 Apr 2016 - 2:05 pm | विवेकपटाईत
कुणीच सुखाने गादी त्याग करीत नसतो. पण जनतेची इच्छा त्यांना माहित असते. शिवाय दिल्लीवर एक सम्राट बसणार होता बसणार होता.(आजच्या भाषेत लोकशाहीचा). शिवाय सांस्कृतिक दृश्या देश एकच होता.
14 Apr 2016 - 9:21 pm | रमेश आठवले
बहादूरशाह हा शेवटचा मुगल राजा. त्याला पदच्युत करून ब्रिटीशांनी मंडाले,ब्रम्हदेश येथे कैदेत ठेवले होते व त्याचे तेथेच निधन झाले . तो जफर या टोपण नावाने शायरी करत असे. आपल्याला हिंदुस्तान मध्ये परत जाता येत नाही म्हणून खंत वाटून त्याने या पंक्ति लिहिल्या.
कितना है बदनसीब जफर द्फ्न के लिये
दो गज जमीन न मिली कु ए यार मे
https://www.youtube.com/watch?v=_iPt023KdVQ
या रफी साहेबांनी गायलेल्या गझल चे इंग्लिश भाषांतर तेथेच दिले आहे.
13 Apr 2016 - 11:07 pm | तर्राट जोकर
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तान हमारा
हम बुलबुले है इसकी ये गुलसिता हमारा ॥धृ॥
घुर्बत मे हो अगर हम रहता है दिल वतन मे
समझो वही हमे भी दिल है जहाँ हमारा ॥१॥
परबत वो सब से ऊंचा हमसाय आसमाँ का
वो संतरी हमारा वो पासबा हमारा ।२॥
गोदी मे खेलती है इसकी हजारो नदिया
गुलशन है जिनके दम से रश्क-ए-जना हमारा ।३॥
ए अब रौद गंगा वो दिन है याद तुझको
उतर तेरे किनारे जब कारवाँ हमारा ॥४॥
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना
हिन्दवी है हम वतन है हिन्दोस्तान हमारा ॥५॥
युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिल गये जहाँ से
अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥
इक़्बाल कोइ मेहरम अपना नही जहाँ मे
मालूम क्या किसी को दर्द-ए-निहा हमारा ॥८॥
14 Apr 2016 - 3:04 pm | मृत्युन्जय
स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल का?
14 Apr 2016 - 5:17 pm | तर्राट जोकर
अगदी अगदी, अचूक पकडलेत. जसे पाकिस्तानला ५५ कोटी देणारे गांधी, लेडी माउंटबॅटनशी लफडी करणारे नेहरु इत्यादी सिलेक्टीव असतं ना शिकवलेलं अगदी तसंच.
17 Apr 2016 - 11:04 pm | मृत्युन्जय
काय बोलता? म्हणजे कवी इक्बाल यांणी मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्राची मागणी केलीच नव्हती की काय? काय पण हा असहिष्णु लोकांचा खोटा प्रसार ब्वॉ. तुम्ही माझे डोळेच उघडलेत.
17 Apr 2016 - 11:14 pm | तर्राट जोकर
मी असं कधी म्हटलं?
20 Apr 2016 - 6:06 pm | मृत्युन्जय
म्हणजे स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल का?
20 Apr 2016 - 6:13 pm | तर्राट जोकर
अगदी अगदी. आधीच तर सांगितले ना, 'हो' म्हणून. परत परत का विचारताय?
20 Apr 2016 - 6:16 pm | मृत्युन्जय
काय झाले की ती गांधी नेहरुंच्या कथांची ठिगळे का लावली तेच कळाले नाही. त्यामुळे कन्फ्युझ झालो ना मी. तर मग स्वतंत्र पाकिस्तानच्या (मुस्लिम राष्ट्राच्या ) निर्मितीसाठी जोरदार चळवळ उभारणारे ते हेच इक्बाल हे स्पष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद,
20 Apr 2016 - 8:08 pm | तर्राट जोकर
मुस्लिम राष्ट्र, पण वर धाग्याचा सूर असा आहे की मुस्लिम राष्ट्र-बिष्ट्र काय मानत नाहीत म्हणून? आता कन्फुझ व्हायची पाळी माझी. ;)
20 Apr 2016 - 8:37 pm | ईश्वरसर्वसाक्षी
बहुत देर से कम्फुज हुये हो सर :))
20 Apr 2016 - 8:43 pm | तर्राट जोकर
इफ ओन्ली यु कुड हॅव अंडरस्टॅन्ड इट. असो!
20 Apr 2016 - 8:58 pm | ईश्वरसर्वसाक्षी
:)
21 Apr 2016 - 5:31 pm | मृत्युन्जय
माझा प्रश्न तसाच राहिला. पण चला तुमचे कन्फुझन दुर करुयात:
Tarana-e-Milli (Urdu: ترانۂ ملی) or Anthem of the Community is an enthusiastic poem in which Allama Mohammad Iqbal paid tribute to the Muslim Ummah (nation) and said that nationalism in Islam was not recommended. He recognized all Muslims anywhere in the world as part of a single nation,[1][2] whose leader is Muhammad,the prophet of the Muslims.
Iqbal wrote the poem a few years after writing a poem written in the same meter and rhyme scheme call Tarana-e-Hindi (More commonly known as Sare Jahan Se Accha). In this time, Iqbal's world view had changed dramatically, Tarana-E-Hindi is a patriotic song that glorifies the land of Hindustan (Modern day India, Pakistan and Bangladesh) and the people who live in it; it also suggests that people should not divided by religion and should instead be bonded by a common national identity. Tarana-E-Milli, on the other hand, argues that a global, Islamic community should come above all and even warns against a nationalistic world view. This reflects the dramatic change in Iqbal's views, and his support for the Muslim League and the Pakistan Movement [1][2][3]
21 Apr 2016 - 6:18 pm | तर्राट जोकर
तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की तुम्हाला. तराना-ए-मिली आणि पाकिस्तान मागणारे हेच ते इक्बाल.
पण माझे कन्फुझन दूर होत नाही हे इंग्रजीतले परिच्चेद वाचून. जर मुस्लिम हे राष्ट्र ही संकल्पना मानतच नाहीत तर पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र कसे काय झाले?
जर सगळ्या जगातले मुस्लिम हे एकाच इस्लाम राष्ट्राचे नागरिक आहेत तर मग जी काही मुस्लिम राष्ट्रे आहेत त्यांच्यातल्या आपसी आंतरराष्ट्रीय संबंधांमधे व गैर-इस्लामिक राष्ट्रांच्या आपसी आंतरराष्ट्रीय संबंधांमधे ठळक वा छुपे वा क्षुद्र असे फरक दिसून येतात का? कोणत्याही देशातल्या मुस्लिमांना मुस्लिम राष्ट्रांमधे विनापासपोर्ट प्रवेश मिळतो? असेच उठून जाऊन नागरिकत्व घेता येते?
आता गांधी-नेहरुची साईडस्टोरीचे कारणः मोठी माणसे आयुष्यात खूप गोष्टी करतात, कित्येकदा त्या परस्परविरोधीही असतात. समर्थक वा विरोधक त्यांना हवे ते निवडतात. खर्या खोट्या घटनांचे आधार घेऊन गांधी-नेहरुंचे पद्धतशीर चारित्र्यहनन करुन ही माणसे मोठी नाहीच हे सिद्ध करण्यात अनेक दशके खर्ची पाडली आहेत काहींनी. इक्बाल ह्यांनी तराना-ए-हिंद आणि इतरही हिंदू-मुस्लिम एकीच्या कविता लिहिल्यात हे काही लोक सोयिस्कर विसरवू पाहतात. कारण त्यांनी पाकिस्तानची मागणी केली. जेव्हा ह्या कविता लिहिल्या तेव्हाची सामाजिक-राजकिय परिस्थिती व पाकिस्तान मागणीच्या वेळची वेगळी. बरं पाकिस्तान मागणीच्या मागे बरीच कारणे आहेत. असो.
आता प्रश्न पडतो की तराना-ए-हिंद व नया शिवाला त्यांनी का लिहिले असावे? तुमच्याकडे उत्तर असेल तर बघा. मग पुढे बोलू.
25 Apr 2016 - 3:46 pm | मृत्युन्जय
कसे हवे तेवढेच वाचता हो तुम्ही तजो. स्पष्त लिहिले आहे की मुस्लिम काही राष्ट्र वगैरे मानत नाहित. मुळात अधिष्ठान आहे ते धर्माचे. राष्ट्र वगैरे नंतर येते जर ते धर्माधिष्ठित असेल तर. म्ह्णजे जर मुस्लिम राष्ट्र अस्सेल तर "राष्ट्र"या संकल्पनेचा विचार होउ शकतो. भारत / जर्मनी वगैरे देशांमध्ये नाही. मूळ मुद्दा फक्त तेवढाच आहे. बाकी तुमचे इतर प्रश्न त्या मूळ मुद्द्याला अनुषंगुन नसल्याने उत्तर देण्याची तसदी घेत आहे. तुम्ही ज्या मुद्द्याला प्रतिवाद करण्यासाठी इक्बालची कविता दिली त्या मुद्द्याला इक्बालनेच जोरदार सुरुंग लावला आहे ते बघा जरा.
14 Apr 2016 - 7:55 pm | चौथा कोनाडा
धन्यु तजो हे काव्य इथे दिल्या बद्दल !
विख्यात सावरकर साहित्य अभ्यासक अन सावरकर वादी ह.भ.प. श्री वा. ना उत्पात यानी इक्बाल यांचे हे काव्य हिंदुस्थानच्या प्रेमाच्या पोटी लिहिण्या एवजी मालकी हक्काच्या भावनेने लिहिले आहे असे खळबळ्जनक विधान केले होते असे काही वर्षापुर्वी वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते.
कोणी माहितगार यावर प्रकाश टाकू शकेल काय ?
20 Apr 2016 - 6:27 pm | ईश्वरसर्वसाक्षी
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना
पण ह्याच मझहब चा आधार घेउन ह्यांनि आणि जिनांनी पाकिस्तान चि संकल्पना उचलुन धरलि, ति संकल्पना जि रहमत अलि चौधरि ह्या तरुणाने मांडलि होति.
ईक्बाल साहब के शायरी के तो हम हमेशा कायल रहे है. इसि गझल का एक नुक्ता लेकिन हिंदोस्ता के नाम
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥
13 Apr 2016 - 11:12 pm | तर्राट जोकर
मझहब नही सिखाता आपस मे बैर रखना
हिन्दवी है हम वतन है हिन्दोस्तान हमारा ॥५॥
युनान-ओ-मिस्र-ओ-रोमा सब मिट गये जहाँ से
अब तक मगर है बांकी नामो-निशान हमारा ॥६॥
कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी
सदियो रहा है दुश्मन दौर-ए-जमान हमारा ॥७॥
ह्या ओळी देशभक्तिवर बौद्धिकं घेणार्यांनी विशेष लक्षात घेण्याच्या आहेत.
बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात दूर राहणार्यांनी न बोललेलंच बरं.
एवढं बोलुन मी खाली बसतो. जय हिंद!
(लेख काथ्याकूटात नाही हे ध्यानात आहे)
14 Apr 2016 - 3:06 pm | मृत्युन्जय
बाकी हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल स्वातंत्र्य लढ्यापासून चार हात दूर राहणार्यांनी न बोललेलंच बरं
थोडक्यात म्हणजे १९४७ नंन्तर जन्मलेले सगळे याबद्दल काहिही भाष्य करण्यास नालायक असे का?
14 Apr 2016 - 5:15 pm | तर्राट जोकर
आयत्या पिठावर रेघोट्या काढणार्यांबद्दल आहे हो ते. आणि तिथे लिहलंय स्पष्ट, स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणार्यांनी म्हणजे नक्कीच १९४७ नंतर जन्मलेल्यांबद्दल नाही हे आपल्यासारखे जाणकार नक्कीच ओळखू शकतात. जन्मायच्या आधीच चार हात दूर राहाय्ची कला कुणाला अवगत असेल तर सांगा, महोदय. ;-)
20 Apr 2016 - 6:38 pm | मृत्युन्जय
स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणार्यांनी
पण स्वातंत्रय लढ्यापासून चार हात दूर राहणारे आता उरलेत कुठे मग? स्वातंत्र्याला ७० वर्षे झाली. तुमच्या म्हणण्या चा मतितार्थ असा होतो की त्यावेळेस स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होउ शकत असुनही सहभागी न झालेल्या लोकांनी त्याबद्दल बोलु नये. आता असे लोक म्हणजे १९४७ च्या आधी १५ वर्षे जन्मलेले. ज्यांचे वय आज जिवंत असेल तर ८७ असेल. अश्या नक्की कोणत्या व्यक्तींबद्दल तुम्ही बोलत आहात ते आधी स्पष्ट करा मग.
थोडक्यात म्हणजे असे लोक की जे:
१. आज ८७ च्या वरचे आहेत आणी
२. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेला नाही आणी
३. हिंदू-मुस्लिम, भारत, देशप्रेम आणि इतिहास ह्याबद्दल बोलतात.
असे माझ्या माहितीत कोणी नाही, मिपावर देखील नाही मग तुम्ही हे वक्तव्य (मिपावर जाहीरपणे केले आहे म्हणून विचारतोय हा) नक्की कुणाला उद्देशुन केले हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे म्हणुन विचारतो.
20 Apr 2016 - 9:16 pm | तर्राट जोकर
व्यक्तींबद्दल नाही, संघटनांबद्दल आहे. देशात अशा काही संघटना आहेत ज्या स्वातंत्र्य युद्धात तर कातडी बचावू धोरण ठेवून होत्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हीच मोठे देशभक्त अशी मिजाशी करत फिरत असतात आणि दुसर्यांची देशभक्ती किती ह्याचे मोजमाप करण्याचे फुक्कट धंदे करतात.
21 Apr 2016 - 9:25 am | बोका-ए-आझम
१५ आॅगस्ट १९४७ या दिवशी त्यांनी ' ये आजादी झूठी है ' असं म्हणणारी पत्रकं लावायचा प्रयत्न केला होता असं घरातल्या मोठ्या (आणि त्यावेळी कळत्या वयाच्या) लोकांकडून ऐकलेलं आहे. तुम्ही त्यांच्याबद्दल बोलत आहात का?
21 Apr 2016 - 10:56 am | तर्राट जोकर
ज्या स्वातंत्र्य युद्धात तर कातडी बचावू धोरण ठेवून होत्या स्वातंत्र्य मिळाल्यावर आम्हीच मोठे देशभक्त अशी मिजाशी करत फिरत असतात आणि दुसर्यांची देशभक्ती किती ह्याचे मोजमाप करण्याचे फुक्कट धंदे करतात.
जे असं करतात त्यांच्याविषयी मी बोलत आहे. तुम्ही ज्यांच्याविषयी बोलत आहात ते असे करत असतील तर तसं समजा. तसेही कमुनिस्टांची निष्ठा देशाशी नाही असं काही लोक म्हणतात ब्वॉ तरी तुम्ही कमुनिस्टांचे उदाहरण देताय म्हणजे कमालच!
14 Apr 2016 - 8:56 pm | सुधीरन
‘‘चीनो अरब हमारा हिंदूस्ताँ हमारा
मुस्लिम हैं हम वतन हैं सारा जहाँ हमारा
तौहीद की अमानत सीनों में है बाकी
आसां नहीं मिटाना नामों निशां
हमारा
दुनिया के तबकदों में पहला वो घर खुदा
का
हम उसके पासबां हैं वो पासबां हमारा
तेगों के साये में हम पलकर जवां हुए हैं
खंजर हिलाल का है कौमी निशां हमारा
मगरिब के वादियों में गूँजे अजा हमारी
थमता नहीं था किसी से सैल-ओ रवा
हमारा
बातिल से दबनेवाले ऐ आस्मां नहीं हम
सौ बार कर चुका है तू इम्तेहां हमारा
ऐ गुलिस्ताने अंदलुस वो दिन है याद तुझको
था तेरी डालियों में जब आशियां हमारा
ऐ आब- रूद -ए गंगा वो दिन है याद तुझको
उतरा तिरे किनारे जब कारवाँ हमारा
ऐ मौजे दजला तू भी पहचानती हैं हमको
अबतक तेरे दरया अफसाना ख्वा हमारा
ऐ अर्दे पाक तेरी हुरमत पे कट मरे हम
है खू तेरी रगों में अबतक खुआ हमारा
सालारे कारवाँ है मिरे हिजाज
इस नाम से से है बाकी आरामे जां हमारा
इकबाल का तराना बाँग-ए-दरा हो गया
होता है जादा पामाया फिर कारवां
हमारा’’
14 Apr 2016 - 8:59 pm | सुधीरन
उपरोल्लिखित कविता ही कवी इक्बाल यांची रचना म्हणून सांगितली जाते, खरे आहे का ते?
17 Apr 2016 - 9:06 pm | lakhu risbud
इक़्बाल स्वतःच्याच गाण्याची चोरी करणारा जगातील बहुतेक एकमेव शायर असावा.
१९०४ मध्ये सारे जहान से अच्छा लिहिले. टागोरांना १९१४ च्या सुमारास नोबेल मिळाला.
त्या द्वेष भावनेने पछाडूनच स्वतंत्र पाकिस्तान राष्ट्राची कल्पना पुढे आणली.
https://www.youtube.com/watch?v=Qq6fxGUhYXw
बाकी आपल्या गहन ज्ञानातून आणि सखोल अभ्यासातून ,विचारांची मौक्तिके अशीच बरसू द्या.
13 Apr 2016 - 11:38 pm | अर्धवटराव
हि असहिष्णुता का ?
14 Apr 2016 - 12:01 am | तर्राट जोकर
If you are sitting outside and not analysing these things you should not ask this question
14 Apr 2016 - 4:16 am | अर्धवटराव
शिवाय देशप्रेम, इतीहास वगैरे विषय इतके मूलगामी आहेत कि प्रत्येकाला प्रत्येककाळी त्याविषयी काहिनाकाहि ममत्व आणि महत्व वाटणारच. त्याविषयी अमुक व्यक्तीने (किंवा व्यक्तीसमुहाने) बोलु नये म्हणजे फारच झालं.
14 Apr 2016 - 9:28 am | तर्राट जोकर
हेच ज्यांना पटत नाही त्यांनी बोलणे संयुक्तिक नाही. ;-)
14 Apr 2016 - 11:49 am | अर्धवटराव
:ड
14 Apr 2016 - 11:56 am | तर्राट जोकर
पूर्ण वाक्य आहे हो. तरीबी 'कोणी' असं विचारताय ;-)
15 Apr 2016 - 12:18 am | अर्धवटराव
स्वातंत्र्य लढ्यापासुन अंतर राखुन असणार्यांना देशप्रेमाचा कळवळा का येऊ नये?
18 Apr 2016 - 9:45 pm | DEADPOOL
But if you have enough dignity and punctuality you should answer this question!
18 Apr 2016 - 9:57 pm | तर्राट जोकर
And who are you to decide my dignity and punctuality?
13 Apr 2016 - 11:49 pm | उगा काहितरीच
छान लेख... बाबी विचार करण्यायोग्यच आहेत.
14 Apr 2016 - 7:02 am | mugdhagode
दोन मुसलमान राष्ट्रे लढतात. दोन ख्रिस्चन राष्ट्रे लढतात.
आमचा धर्म बघा किती शांत.
हेही असेच भोंगळ विधान आहे.
जगाच्या पाठीवर हिंदु राष्ट्रे आहेतच कुठे ? भारत वगळता इतर नेपाळ , कंबोडिया वगैरे अगदीच किरकोळ आहेत... जर शेजारी शेजारी दोन तुल्यबळ व वाद असणारी हिंदु राष्ट्रे असतीच तर तीही आपापसात लढलीच असती.
14 Apr 2016 - 9:17 am | विशाखा पाटील
लेख पटला नाही-
१. ऋषी- मुनी दूरदर्शी होते, तर जातीपातीची उतरंड का तयार होऊ द्यावी? बरे ती आधीच तयार झाली असेल असे मानले तर ती मोडीत काढण्यासाठी का काम केले नाही?
२. या भूभागावरच्या किती लोकांना हे श्लोक येत होते ? किती लोकांना ती संधी मिळत होती? कळणे अजून दूरच.
३. राजेमहाराजांनी स्वखुशीने विलीनीकरण केलेले नाही. तसे असेल तर सरदार पटेल यांचे काम सोपे होते, असेच म्हणावे लागेल.
४. इराणमध्ये शांतता ? - असली तरी, प्रत्येक देशाचे प्रश्न वेगळे असतात, त्याला एकच धार्मिक भिंग लावून बघता येत नाही.
14 Apr 2016 - 11:47 am | मराठी कथालेखक
प्रतिसाद आवडला.
14 Apr 2016 - 11:59 am | अर्धवटराव
डिव्हिजन ऑफ लेबर
पर्यायी डिव्हिजन ऑफ लेबर तयार होतच असते.
श्लोकाचा इसेन्स आपापल्यापरिने प्रत्येकाला माहित होता. माहित असतो.
संधीची काय गरज. मुक्या, बहिर्यांसाठी सुद्धा हा इसेन्स कामात येतो.
तसं त्यांनी करणं अपेक्षीत पण नाहि. एकदा जनताच राजा झाली कि तिची राजीखुषी महत्वाची.
सरदारांना यशाची १००% खात्री होती. जनतेचं मन त्यांना कळत होतं. बाकी त्यांचं काम तेच करु जाणे.
एकदम खरं
14 Apr 2016 - 2:10 pm | विवेकपटाईत
विशाखा ताई, समाजात नेहमीच दोन प्रवाह असतात, एक तोडणारे आणि एक जोडणारे. बाकी या लेखाचा जातीपातीशी काही हि संबंध नाही. तरीही जगात प्रत्येक समाजात जाती वेगवेगळ्या स्वरुपात तैयार होतात आणि नष्ट हि होतात. आत्ताचेच घ्या. काही वर्षांपासून सरकारी कार्यालयात अधिकर्यांसाठी वेगळे मूत्रीघर बांधल्या जातात आहे. IAS नावाची एक नवीन श्रेष्ठ जाती तैयार झाली आहे.
सामान्य जनतेला संस्कृत नव्हती येत तरी कथा कहाण्यातून त्याना देशाबाबत माहित मिळायची. एखाद्या ८०-९० वर्षांच्या गावकर्याला विचारा, आपल्या पूर्वाजान्प्रती त्याची माहिती तुमच्यापेक्षा जास्त असण्याची शक्यता.
21 Apr 2016 - 12:34 pm | पुंबा
तुम्ही ज्या शब्दांना मराठी प्रतिशब्द मिळत नाही ते शब्द तयार का हो करता? मुत्रीघर???
14 Apr 2016 - 10:07 am | पैसा
लेखातल्या बर्याच मतांबद्दल वेगवेगळी मते आणि चर्चा सतत चालू असतात. सगळेच पटले असे नाही. पण काही प्रमाणात ओके.
14 Apr 2016 - 11:29 am | तिमा
आपल्या देशातली जनता लब्बाड आहे. एकदा माँ म्हटलं की सगळे गुन्हे पोटांत घेते ती माँ! म्हणून भारतमाता म्हणायचं आणि वाट्टेल तसं वागायचं. हेच पिता म्हटलं, तर तो शिक्षा करेल ना.
14 Apr 2016 - 11:50 am | मराठी कथालेखक
म्हणजे एकाच धर्माचे गुणगाण इंतरांनी करावे असेच म्हणायचे आहे तर !!
14 Apr 2016 - 2:27 pm | विवेकपटाईत
मी इथे बादशाह शब्द हि टाकला आहे. आपल्या पूर्वजांच्या इतिहासाला १००० वर्ष आधीच्या इतिहासाला हिंदू इतिहास म्हणणे एक संकुचित विचार धारा आहे. लोक गेल्या १००० वर्षांतच मुसलमान होणे सुरु झाले, ४०० वर्षांत इसाई. सर्वांचे पूर्वज इथेच राहणारे होते. इथल्या मातीत जन्म घेणारे सर्व महापुरुष वंद्निया आहे. राम कृष्ण माझे नव्हे तर इतर धर्मांच्या लोकांचे हि पूर्वज आहे.
इथे नमूद करतो, २००५ मध्ये प्रधान मंत्री सोबत जकार्ता येथे गेलो होतो. तिथे आम्हाला इंडोनेशियाच्या इतिहासाची आणि स्वातंत्र्य युद्धाची जुजबी माहिती दिली. ५००० हून अधिक द्वीपांवर बसलेल्या विभिन्न जातीय समूह असलेल्या देशाला एकत्र कसे ठेवावे हा एक प्रश्न उपस्थित झाला होता. तेंव्हा त्यांनी 'जड़ों की और लौटो' हां नारा दिला. गैर इस्लामी पूर्वजांना हि साम्मानाचे स्थान दिले. पण इथे आपणच स्वत:... काही बोलत नाही.
14 Apr 2016 - 2:33 pm | नाना स्कॉच
आपल्या गैर इस्लामिक महापुरुषांना सन्मानाचे स्थान दिले जात नाहीये असे आपल्याला वाटते का पटाईतजी ?? असे वाटत असल्यास का वाटते म्हणे??
14 Apr 2016 - 2:45 pm | मराठी कथालेखक
रामयण आणि महाभारत या निव्वळ कथा (किंवा महाकाव्य म्हणू ) आहेत. ते कुणाचे पुर्वज नाहीत.
आणि फक्त इस्लाम वा ख्रिश्चन धर्माचा प्रश्न नाही भारतात इतरही धर्माचे आहेत (जैन, बौद्ध , पारशी ई) त्यांनी हिंदू धर्माचे तत्वज्ञान जबरदस्तीने का स्वीकारावे.
मुळात देशाचा, समाजाचा गाडा सुरळीत चालण्याकरिता आजच्या काळात धर्म उपयोगी पडत नाही. त्याकरिता देशाची राज्यघटना आहे. देशाच्या राज्यघटनेबद्दल आणि लोकशाही मुल्यांबद्दल आदर आणि ममत्व असावे असे मला वाटते.
पुर्वीच्या काळी धर्म हा समाजव्यवस्थेचा कणा होता आणि राजांनाही धर्माच्या आधाराने राज्य चालवणे योग्य ठरे (धर्माधिष्ठित न्यायदान, राजकर्तव्ये ई) त्यावेळी ती गरजच होती.
पण आता आपल्याकडे राज्यघटना आहे जी शास्त्रोक्त पद्धतीने , अभ्यासपुर्वक लिहिलेली आहे. मंथनातून बनविलेले कायदे आहेत (त्यात त्रुटी असतीलही , पण त्या दूरही केल्या जावू शकतात)
थोडक्यात धर्म (मग तो कोणताही असो) ज्यात शेकडो -हजारो वर्षापुर्वी काही चांगल्या गोष्टी सांगितल्यात आणि आज जर तो अपरिवर्तनीय असेल तर माझ्या मते तो कालबाह्य आणि बहुतांशी निरुपयोगी आहे.
15 Apr 2016 - 1:15 am | ट्रेड मार्क
राज्यघटना आणि लोकशाही मुल्य यांच्याबद्दल त्या त्या देशातील सर्व नागरिकांना आदर असायला पाहिजे ना?
भारतात फक्त हिंदू राज्यघटना आणि देशाचे कायदे पाळतात. मुसलमान फक्त सोयीनुसार त्यांना पाहिजे ते घेतात -
उदा. सामाजिक कायदे - हे त्यांच्या सोयीनुसार तथाकथित शरिया मध्ये लिहिलंय असं सांगून ४ बायका करणार, ३ वेळा तलाक म्हणले, मग फोन वर, समस, स्काईप, कायप्पा ई ई कसे ही सांगितले तरी ते बाईने मानलं पाहिजे. वर कोर्टाला यात लक्ष घालायचा अधिकार नाही म्हणतात.
आता या उलट -
आरक्षण, गुन्हेगाराला शिक्षा ई ई मात्र भारतीय संविधानाप्रमाणे पाहिजे. इतर मुस्लिम देशात बलात्कार करणाऱ्यासाठी दगडाने ठेचून मारायची शिक्षा आहे. पण इथे मात्र ते सोयीप्रमाणे कोर्ट सांगेल तसे अशी भूमिका घेतात. निर्भयावर जीवघेणे अत्याचार करणारा फक्त १८ वर्षे वयाला काही दिवस कमी पडल्यामुळे फक्त ३ वर्ष सुधारगृहात राहून सुटला. एक तरी अल्ला का बंदा म्हणाला का हे चुकीचे आहे. या नराधमाला सगळ्यात जास्त शिक्षा झाली पाहिजे.
इस्लामिक बँकिंग मध्ये व्याज घ्यायला बंदी आहे. इथे किती मुसलमान इस्लामिक बँकिंगचे कायदे पाळतात?
सध्या फक्त एकाच धर्म हजार वर्षांपूर्वी लिहिलेले कायदे इतरांवर लादायचा प्रयत्न करतोय. ते पण सगळे कसे सोयीनुसार. शरिया सर्वांनी पाळला पाहिजे म्हणायचं आणि मग अंगावर आलंच तर शरिया वेगळा आणि कुराण वेगळं म्हणून पळ काढायचा. एकीकडे कुराणात शांततेचे संदेश आहेत म्हणायचं पण अमलात मात्र शरिया आणायचा. दुटप्पीपणा आहे सगळा.
त्यामुळे असोच.
15 Apr 2016 - 1:44 am | तर्राट जोकर
भारतात फक्त हिंदू राज्यघटना आणि देशाचे कायदे पाळतात
हास्यास्पद विधान. त्यामुळे असोच. =))
15 Apr 2016 - 7:19 am | ट्रेड मार्क
तुमच्याच भाषेत म्हणतो विदा द्या. सिद्ध करा.
15 Apr 2016 - 7:24 am | तर्राट जोकर
काहिच्या काही विधानं तुम्ही करायची आणि विदा मी का म्हणून द्यायचा? बा भै बा.
15 Apr 2016 - 7:26 am | ट्रेड मार्क
जेव्हा तुम्ही माझ्या विधानाला आक्षेप घेताय तेव्हा तो आक्षेप का ते तुम्हीच सांगायला पहिजे. नसेल जमत तर राहूदे.
15 Apr 2016 - 7:29 am | तर्राट जोकर
तुमच्या वाक्यातच विदा आहे मी ते वाक्य हास्यास्पद का म्हटले आहे ह्याचा. कळत नसेल तर राहू दे.
15 Apr 2016 - 7:34 am | ट्रेड मार्क
ही तुमची पेटंट स्टाईल झाली आहे. पुढे प्रतिसाद नकाच देऊ. उगाच फालतू गोल गोल फिरण्यात मला इंटरेस्ट नाही.
15 Apr 2016 - 7:52 am | नाना स्कॉच
,ट्रेड मार्क भाऊ
जितपत मला माहिती आहे त्यानुसार, बहुपत्नीत्व (स्पेसिफिकली द्विभार्या असणे) हे फ़क्त मुसलमान लोकांना लीगल नसुन गोवा राज्यात रहिवास असणाऱ्या हिंदूंना सुद्धा आहे असे ऐकले आहे ब्वा, कोणी गोयंकर ह्यावर प्रकाश टाकू शकेल काय??
असल्यास असे प्रोविशन का आहे?? त्यामागे बॅकग्राउंड काय आहे? ह्याचे कुतूहल आहे!
खालील प्रमाणे माहीती मिळाली बुआ
स्त्रियांच्या इतक्या हिडिस ऑब्जेक्टिफिकेशनला कधी कोणाला विरोध करताना नाही पाहिले बुआ! आता बहुपत्नीत्वाला विरोध आहे का फ़क्त मुसलिम लोकांतील बहुपत्नीत्वाला विरोध आहे ते समजल्यास बरे पडेल पुढे बोलायला, नाही जसं तुमचं कायमचं एक म्हणणे असते की "ब्वा अमुक मुद्द्यावर मुस्लिम धर्ममार्तण्ड काही कसे बोलत नाहीत" तसाच प्रश्न पडतो, की "ब्वा नवरात्री मधे 9 दिवस पूजा करुनही शेवटी स्त्री जोखली जाते ती तिच्या जनन क्षमता अन त्यातही मुलगे जन्माला घालायच्या क्षमतेच्या परिमाणावर"
एरवी शिर्डी साईबाबा ह्यांचे देवत्व ते पाश्चात्य संस्कृती वगैरे बोलणाऱ्या धर्ममार्तण्डन्ना (आपल्याच धर्मातल्या) पोर्तुगीज सिविल कोड मधली ही प्रोविशन बरी चालतात, त्यावर कधी कोणी बरे बोलत नाही!
असो!!
15 Apr 2016 - 1:55 pm | पैसा
कधीच ऐकले नाही. उलट गोव्यात समान नागरी कायदा आहे. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सगळ्याना लग्नाचे रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे. गोव्यात जन्मलेले मुस्लिम एकच लग्न करू शकतात आणि तलाकने घटस्फोट होत नाही. हिंदूंच्या बाबत सांगायचे तर मी इतक्या वर्षात एकाच वेळी दोन बायका असलेला एकही माणूस बघितला नाही.
15 Apr 2016 - 2:31 pm | नाना स्कॉच
ह्या लिंक मधे माहीती मिळाली,
ती चुक असल्यास
माहीतगार साहेब कृपया इकडे लक्ष देणे (विकी लिंक असल्यामुळे ही विनंती करतोय)
15 Apr 2016 - 12:30 pm | मराठी कथालेखक
म्हणजेच मुस्लिम व्यक्ती बँकेतून कर्ज घेतल्यास व्याजाचे हप्ते भरतो ना ? त्याने तसं करु नये असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? :)
15 Apr 2016 - 4:57 pm | ट्रेड मार्क
इस्लामिक बँकिंगमध्ये व्याज देणे घेणे हे शरियाच्या विरुद्ध आहे. वेळेअभावी विंग्रजीत चोप्य पास्ते करतोय -
Consider two persons, one of whom has capital but no special skills in business, while the other has managerial skills but possesses no capital. They can co-operate in either of two ways:
Debt-financing (the western loan system): The businessman borrows the capital from the capital-owner and invests it in his trade. The capital-owner is to get back his principal and an additional amount on the basis of a fixed rate, called the interest rate, as his compensation for parting with liquidity for a fixed period. The claim of the lender for repayment of the principal plus the payment of the interest becomes viable only after the expiry of this period. This payment is due irrespective of whether the businessman has made a profit using the borrowed money. In the event of a loss, the borrower has to repay the principal amount of the loan, as well as the accrued interest, from his own resources, while the capital-owner loses nothing. Islam views this as an unjust transaction.
Mudarabah (the Islamic way, or PLS): The two persons co-operate with each other on the basis of partnership, where the capital-owner provides the capital and the other party puts his management skills into the business. The capital-owner is not involved in the actual day-to-day operation of the business, but is free to stipulate certain conditions that he may deem necessary to ensure the best use of his funds. After the expiry of the period, which may be the termination of the contract or such time that returns are obtained from the business, the capital-owner gets back his principal amount together with a pre-agreed share of the profit.
14 Apr 2016 - 2:47 pm | mugdhagode
तुमच्या हिंदु नियमानुसार मनुष्य मागच्या फक्त तीन पिढ्याना तर्पण देउ शकतो. ( चु भु दे घे). यामागे संकेत हाच आहे की मनुष्य जवळची नाती जास्त प्रेमाने संभाळतो.. पाचशे वर्षापुर्वी ज्यांचे धर्मांतर झाले आहे , त्यांचे खापर- खापर - खापर पणजोबा राम कृष्ण होते , हे टेक्निकली जरी करेक्ट असले तरी ते प्रॅक्टिकली अॅक्सेप्टेबल नाही... उद्या समजा शास्त्राने असे सिद्ध झाले की भारतातील या पूर्वजांचे अतीमूळ पूर्वज आफ्रिकेतुन आले... मग आफ्रिकेतील लोक तुम्हाला बोलले की दोन आफ्रिकन पुर्वजांचीही उदा नेल्सन मंडेला वगैरे नावे त्या पाच स्मरणीय नावात घाला , तर तुम्ही तयार व्हाल का ?
14 Apr 2016 - 3:01 pm | mugdhagode
यातही एक गंमत आहे बरं का.
मागच्या तीन पिढ्या म्हणजे कोणत्या ? बापाकडच्या. मातृकुलातील पूर्वजांचा संबंध येत नाही. आईकडल्या मागच्या तीन पूर्वजांची नावे तरी आठवतात का ?
मग दुसर्या धर्मातील लोकाना पाच हजार पूर्वीचे वेगळ्या धर्मातील पूर्वज जवळचे न वाटणं यात नवल ते काय ?
14 Apr 2016 - 8:52 pm | बोका-ए-आझम
It's not a question of 'if', it's a question of when.
14 Apr 2016 - 11:54 am | बोका-ए-आझम
लेख आवडला. देशाविषयी प्रेम आणि अभिमान असेल तर माता म्हणा, पिता म्हणा किंवा सखा म्हणा - काहीही फरक पडत नाही. आईशी कुणाचीही सर्वात जास्त जवळीक असते म्हणून देशाला माता म्हटलं जातं. रच्याकने सगळे युरोपियन्स आपल्या देशाला पितृभूमी म्हणत नाहीत. फक्त जर्मन्स म्हणतात. बाकी सगळे मातृभूमीच म्हणतात.
14 Apr 2016 - 11:57 am | mugdhagode
मुमताजमहल , जोधाबाई , मदर टेरेसा , इंदिराजी व आमची आज्जी यांच्यावर प्रातःस्मरणीय श्लोक उर्दु किंवा इंग्रजीत करुन मिळेल का ?
14 Apr 2016 - 2:18 pm | विवेकपटाईत
संघाच्या लोकांनी त्यांच्या हिशोबाने सावरकर, हेडगेवार, गांधी, मदन मोहन मालवीय यांचे नाव प्रात: स्मरणात टाकले. प्रत्येकाला त्याच्या दृष्टीने स्वतंत्रता आहे. बाकी लेख आपल्या देशाला आई म्हणण्या बाबत आहे.
14 Apr 2016 - 1:25 pm | viraj thale
जनत
14 Apr 2016 - 3:08 pm | नाना स्कॉच
उगाच हवेत भावनिक गोळीबार लेख! असो!.
14 Apr 2016 - 3:16 pm | 'पिंक' पॅंथर्न
अरब देशात त्यांच्या जातीनिहाय पासपोर्टचा रंग पण वेगवेगळा असतो....
14 Apr 2016 - 6:33 pm | Ram ram
मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं
14 Apr 2016 - 6:35 pm | Ram ram
मोकळ्या वावरात मोकळे हाेण्यासाठी जाताना पाकिस्तानला चाललो असे का बरे म्हणतात बरं
14 Apr 2016 - 6:59 pm | होबासराव
जंत झाले का बरे? का बरेच झाले ?
15 Apr 2016 - 10:32 am | गॅरी शोमन
बापाची कबर वाळायच्या आत सर्वात बापाच्या धाकट्या आणि तरुण पत्नीशी निकाह करु पहाणार्या " त्यांना " आई समजली नाही तर मातृभुमी काय समजणार ?
15 Apr 2016 - 10:53 am | नाना स्कॉच
सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो, आपल्या महान धर्मात तर नात्यांतर्गत संबंधास धर्माने मान्यता दिली आहे म्हणतात बुआ, असे नसल्यास हे नियोग काय असते हे ज़रा समजावून सांगाल का कृपा करुन? नाही आमचेच काही गैरसमज असले तर क्लियर होतील असे वाटते
18 Apr 2016 - 8:52 am | बोका-ए-आझम
हा जर स्त्रीला त्या पुरूषापासून मूल होऊ शकत नसेल - म्हणजेच तिच्यात दोष नसेल पण तो काही कारणाने मूल देण्यास असमर्थ असेल किंवा तिचा पती हयात नसेल आणि तरीही तिला मूल हवं असेल तर उपयोगात आणला जातो. नियोग हा शक्यतो दिराबरोबर असावा अशी पद्धत आहे. हा संदर्भ महाभारतात आहे आणि मी आनंद साधल्यांच्या ' हा जय नावाचा इतिहास आहे ' मध्ये वाचलेला आहे.
18 Apr 2016 - 10:32 pm | नाना स्कॉच
शुद्ध मखलाशी अन आधुनिक समाजशास्त्रीय परिमाणानुसार ते फ़क्त अन फ़क्त व्यभिचाराचे एक भिकार समर्थन वाटले.असो.
18 Apr 2016 - 10:51 pm | नाना स्कॉच
तुम्ही सांगितलेले नियोग सन्दर्भ वाचले तरी मी सुरुवातीलाच म्हणलेले
सगळ्यांचा संबंध फ़क्त वारस अन दमड़ी ह्याच्याशी असतो,
हे वाक्य चुक ठरते काय???
19 Apr 2016 - 12:19 am | ट्रेड मार्क
हजारो वर्षांपूर्वीची पद्धत तुम्ही आत्ताच्या निकषांवर तपासून बघत असाल तर ते चूकच नाही का?
इथे एक दोन दशकांपूर्वी लग्नाआधी बॉय फ्रेंड/ गर्ल फ्रेंड असणे चुकीचे मानले जायचे. फारच जवळीक झाली असेल तर मग काय विचारायलाच नको. आजकाल असे मित्र (एक नव्हे) नसतील तर मुलात किंवा मुलीत काहीतरी वेगळा प्रोब्लेम आहे असे समजले जाते. शारीरिक जवळिकीचे वय अनुभवण्याचे वय आजकाल १४-१५ वर्षे आहे.
19 Apr 2016 - 12:20 am | ट्रेड मार्क
शेवटचे वाक्य "शारीरिक जवळिक अनुभवण्याचे वय आजकाल १४-१५ वर्षे आहे." असे वाचावे.
19 Apr 2016 - 12:29 am | तर्राट जोकर
आता नाही मानले जात?
असे कुठे समजले जाते?
19 Apr 2016 - 2:17 am | ट्रेड मार्क
आता तुमच्या सारखेच गोल गोल फिरुया
मानलं जातं का? कुठे? कुठल्या वयोगटात?
नाही समजले जात का? कुठे?
19 Apr 2016 - 3:40 am | तर्राट जोकर
आम्ही कधीच गोल गोल फिरत नाही साहेब, आम्ही मुद्दा धरुन असतो, लोक रिंगणात फिरतात गोल गोल, गोल गोल फिरत विषय नेतात भलतीकडे मग आमचं तर नावच कानफाट्या. तुमच्याकडे आताही उत्तर नाही म्हणून कांगावा करत आहात. जरा आयडींकडे पुर्वग्रहदुषित नजरेने बघणं सोडाल तर काही खरं. मुद्द्यावर बोलणं जमत असेल तर बोला नाही तर वैयक्तिक मत व्यक्त केले असे म्हणा आणि व्हा बाजुला. वर ते हास्यास्पद विधान सिद्ध करता येत नाही तर तेव्हाही फुगडी घालायला गेलात आणि धपकन पडलात. आताही तेच.
बाकी ज्यापद्धतीने तुम्हाला हे दोन प्रश्न विचारलेत ती मिपाची नेहमीची पद्धत आहे, अनेक सदस्य वापरतात चर्चेत. हेच प्रश्न दुसर्या कोण्या आयडीने विचारले असते तर तुम्ही असेच प्रत्युत्तर केले असते का?
'लोकमत ऑक्सिजन' छाप मते गंभीर चर्चेत मांडणे तुम्हाला आवडत असेल तर मला काही समस्या नाही. वेन्जॉय.
19 Apr 2016 - 6:49 am | ट्रेड मार्क
माझ्याकडे उत्तर नाही अशी तुमची समजूत आहे. उगाच स्वताकडे पाहून इतरांना तसेच समजू नका.
चल मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्तर देतो पण आधी हे सांगणे महत्वाचे आहे की हे निरीक्षण महानगरांमधले आहे.
१. आता फारसे कोणी मनावर घेत नाहीत. एकवेळ मुलाचे/ मुलीचे आईवडील थोडे प्रश्न विचारू शकतील पण तरुणाईमध्ये या गोष्टीचा एवढा taboo केला जात नाही.
२. परत हे उदाहरण सुद्धा तरुणाईचेच आहे. वय वर्षे १५ असणाऱ्या मुला मुलींमध्ये हा सामान्य चर्चेचा विषय आहे. आणि जर का कोणाला विरुद्ध लिंगी जवळची मैत्री नसेल तर चेष्टा होते. त्यातूनही कॉलेज मध्ये पण नसेल तर मग मित्र मंडळींमध्ये चर्चा होते की त्या व्यक्तीला समान लिंगी व्यक्तींमध्ये रस आहे असे वाटायला लागते.
आता मूळ मुद्दा - मी असे म्हणण्याचे कारण की मी प्रतिवाद केला होता नानांचा. ते म्हणत होते नियोग पद्धत आत्ताच्या दृष्टीने कशी चुकीची आहे. जे तुम्ही उचललेत ते फक्त उदा म्हणून दिलेले होते. आता तुमच्या प्रतिसादामुळे मूळ मुद्दा राहिला बाजूला आणि उदाहरणांवर चर्चा चालू झाली. हे जनरल ओब्सर्वेशन आहे. तुमचाच काय कोणाच्याही आयडी ने असे केले असते तरी हेच उत्तर आले असते.
19 Apr 2016 - 10:31 am | बोका-ए-आझम
आज जी artificial insemination पद्धत वापरली जाते त्यात sperm donors असतात. त्यात आणि नियोगात काय फरक आहे? आणि बहुपत्नीत्व हा व्यभिचार नाहीये का तुमच्या मते? का व्यभिचाराचे नियम फक्त स्त्रियांनाच लागू होतात असं तुमचं म्हणणं आहे? तसंही आजच्या काळातील व्यभिचाराच्या संकल्पना पुराणकालीन किंवा भूतकालीन आचरणाला लावणे आणि vice versa हा मूर्खपणाच आहे.
19 Apr 2016 - 11:10 am | नाना स्कॉच
1. आर्टिफिशल इंसेमिनेशन वर काय बोलणार! शास्त्रोक्त पद्धतीने लॅब मधे भ्रूण विकसित करणे अन उत्कट प्रणयभाव सहित नैसर्गिक संभोग ह्यात जर मानवी भावना आपल्याला अकाउंट मधे घ्यायच्या नसल्या तर नाईलाज आहे! नियोग क्रिया अन आधुनिक आर्टिफिशल इंसेमिनेशन एकच आहे तर आर्टिफिशल इंसेमिनेशन क्लिनिक्स गरजच का पडली असती भारतात?? नियोग बरं होतं की! इंफ्रास्ट्रक्चर मधे फ़क्त एक बेडरुम असली का भागले, फुकट कश्याला बुआ बायो सेफ्टी लेवल 3 लॅब वगैरे उघडत बसावे ?
2 होय बहुपत्नीत्व व्यभिचार आहे (माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनातून) अन नियोग सुद्धा! मुळ फ़क्त वारस निर्माण करणे आहे दोहोंत अन त्या साठी धर्ममताने (दोन्ही धर्मानी) विधीनिषेध गुंडाळुन त्याला नैतिकतेचा मुलामा द्यायचा प्रयत्न केलाय हे आपण मान्य कराल काय??
3 व्यभिचाराचे नियम फ़क्त स्त्रियांना लागु होतात असे मला म्हणायचे नाहीये , तर मुळात व्यभिचारात स्त्री अन पुरुष दोघे ही असल्यामुळे दोघांना लागु होतात असे वाटते,
आता काही माझे प्रश्न
1 नियोग नियमात "स्त्री ने पुत्रप्राप्तीसाठी परपुरुषासोबत संबंध ठेवल्यास त्यात वासना किंवा उत्कट प्रणयी भाव न ठेवता फ़क्त कर्तव्यबुद्धी ठेवावी" किंवा "नेमके अमुक अवयव दृश्य अन अमुक अदृश्य ठेवावे" असले खुळचट नियम आहेत, ह्या सगळ्यांचा निर्वाळा देणार कोण?? नियोग क्रिया झाल्यास त्यात कर्तव्यभाव होता की आकर्षण हे कोण ठरवणार?
नियोग पद्धतीआडून आधुनिक काळात किती अत्याचार होत आहेत स्त्री वर ह्याची आपल्याला कल्पना आहे का?
ता.क. - मी आपल्या धर्मात सुद्धा असला मुर्खपणा अस्तित्वात होता/आहे असे म्हणणे म्हणजे दुसऱ्या धर्माची भलामण असा होत नसतो, किमान तुमच्या सारख्या सुजाण माणसाने ते करू नये ही विनंती, धर्म दाढ़ीवाला असो वा टीळेवाला मला फरक पडत नाही अन जन्माने टीळेधारी असल्यामुळे मी सदरहु प्रवृत्तीची पाठराखण सुद्धा करणार नाही! बघा पटले अन पचले तर , बाकी तुम्हाला मला व्यक्तिगत पातळी वर उतरून मुर्ख वगैरे म्हणायचे असले तर तो तुमचा वैयक्तिक वकुब असेल अन माझे दुर्दैव! असो!