नमस्कार,
पुढच्या आठवड्यात, साधारण १८ एप्रिल ते २२ एप्रिलच्या दरम्यान एका दिवसासाठी,(तारीख अद्याप नक्की नाही....) मी आणि आमची अर्धांगिनी, चिपळूणला येणार आहोत.
चिपळूणला राहणार्या मिपाकरांना ह्या निमित्ताने भेटता येईल म्हणून हा धागा काढत आहे.
आपलाच,
मुवि....
प्रतिक्रिया
16 Apr 2016 - 9:24 am | अक्षय देपोलकर
फक्त चिपळुणच का???रत्नागीरीला येणार असल्यास भेटु शकतो..मी रत्नागीरीला राहतो...
16 Apr 2016 - 10:23 am | संजय पाटिल
मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
16 Apr 2016 - 2:34 pm | नन्दादीप
मी पण रत्नागीरीला रहतो. आलात तर भेटता येइल.
17 Apr 2016 - 6:59 pm | विशाखा राऊत
रत्नागिरीला कोणी रहात नाही का :). सगळेच रत्नागीरीला रहाता वाटते
18 Apr 2016 - 5:39 pm | मंदार कात्रे
आमी बी आद्य रत्नान्ग्रीकर हाय वो....
रत्नान्ग्रीस आल्यास जरुर भेटू
16 Apr 2016 - 9:36 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
कट्टार धागा.
इनो घेतो अंमळ.
16 Apr 2016 - 11:25 am | sश्रिकान्त
आम्ही महाडला राहतो, तुुुुम्््ही महाडवरुन जाणार का? महाडला आलात तर भेटु आपण.
18 Apr 2016 - 9:36 am | सतिश गावडे
महाडला कुठे राहता? मी गोरेगांवचा आहे.
18 Apr 2016 - 2:04 pm | sश्रिकान्त
मी तळोशी ला राहतो. (रंगुमाता देवस्थान) .
16 Apr 2016 - 8:28 pm | सुधांशुनूलकर
आम्ही कुर्ल्याला राहतो, तुुुुम्ही कुर्ल्यावरून जाणार का? कुर्ल्याला आलात तर नक्कीच भेटू आपण.
पुढचा कट्टा चिपळूणला वाटतं...
इनो आणा रे लवकर
17 Apr 2016 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
औरंगाबाद मार्गे चिपळुणला जाणार असेल तर भेटू शकतो. .
-दिलीप बिरुटे
17 Apr 2016 - 7:55 pm | एस
औरंगाबादहून पुण्यामार्गे चिपळूणला जाणार असाल तर दुपारी एक ते चार ही वेळ वगळता भेटू शकतो. अल्पोपहार म्हणून चिंचेच्या चटणीसोबत बटाटेवडे आणि चहा आवर्जून दिला जाईल. ;-) ही एक्स्लूजिव्ह ऑफर केवळ डोंबोलीकरांसाठी आहे याची इतरांनी नोंद घ्यावी.
17 Apr 2016 - 8:12 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
चिंचेच्या चटणीबरोबरचे म्हणजे जोशीचे बेचव बटाटेवडे असा संशय येतोय.
17 Apr 2016 - 9:44 pm | एस
समझ़ने वाले दोनों पार्ट्या समझ़ गये हय. ;-)
17 Apr 2016 - 10:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
;)
18 Apr 2016 - 2:29 pm | सस्नेह
जोशांचे नव्हे हो, हे बटाटेवडे आणि चिंचेची चटणी..
18 Apr 2016 - 6:14 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बेचव हा शब्द अगदी मागे घेतला.
17 Apr 2016 - 8:58 pm | जेपी
धागा काश्मीरच्या वाटेला लागला..!
काश्मीरमार्गे चिपळुणला जाणार असाल तर भेटु ;)
17 Apr 2016 - 9:13 pm | माझीही शॅम्पेन
उस गावातील डेट्रॉइट मार्गे जाणार असतल तर नक्कीच भेटू
रचाक्ने डेट्रॉइटला कोणी आहे का ?
17 Apr 2016 - 9:23 pm | गॅरी ट्रुमन
तुमच्या या प्रतिसादापूर्वी बरोबर ५९ मिनिटे म्हणजे भाप्रवे ८ वाजून १४ मिनिटांनी मी खरडफळ्यावर लिहिले होते:
या धाग्यावर "उद्या कोणी 'चिपळूणला न्यू यॉर्कमार्गे जाणार असाल तर जरूर भेटू' असे उत्तर दिले तरी आश्चर्य वाटायला नको. :) "
उद्यापर्यंतही थांबायची गरज लागली नाही. तासाभरातच तशा स्वरूपाचा प्रतिसाद आला. फरक इतकाच की न्यू यॉर्क ऐवजी डिट्रॉईटचे नाव आले :)
जिओ मिपाकर्स.
रच्याकने, मुविकाका, तुम्ही डोंबिवलीहून सुरवात करा, मग कुर्ला, वाशी, पुणे, औरंगाबाद, डेट्रॉईट वगैरे ठिकाणे करूनच मग शेवटी रत्नागिरीला जा आणि तिथून चिपळूणला :)
(एक वाशीकर) ट्रुमन
17 Apr 2016 - 9:57 pm | पैसा
=))
17 Apr 2016 - 11:16 pm | बोका-ए-आझम
माहीमला न येता गेलात तर सत्याग्रह करण्यात येईल.
- (माहीमकर) बोकोबा
18 Apr 2016 - 4:44 am | माझीही शॅम्पेन
मी काय खफ बघितला नाही , पण अजाणतेपणी तुमची अपेक्षापुर्ति , मजा आहे बुवा !!!
17 Apr 2016 - 9:25 pm | गॅरी ट्रुमन
मिपावर अशी मज्जा येते म्हणूनच मिपा लै आवडते :)
17 Apr 2016 - 9:33 pm | निधी
मी पण रत्नागिरीत राहते. मिपावर रोमात असते. :) इथे आलात तर भेटता येईल.
17 Apr 2016 - 9:45 pm | एस
रोमात असता म्हणजे काय हो?
17 Apr 2016 - 11:14 pm | बोका-ए-आझम
नंतर चिमटा काढला तेव्हा ते रोमात आहे हे समजलं.
19 Apr 2016 - 12:40 am | काळा पहाड
रात्री साडेबारा ही काही गडाबडा हसून लोळण्याची वेळ नव्हे हे खरंच.
17 Apr 2016 - 9:56 pm | पैसा
बरे सापडले एकेक रत्नागिरीकर. वेल्लाभटा, कधी कट्टा करूया रत्नागिरीत? सगळे फोटो गविंना पाठवण्यात येतील.
17 Apr 2016 - 10:30 pm | भीमाईचा पिपळ्या.
ठ्ठो =)) =)) =) ) =) ) =) ) =) )
17 Apr 2016 - 9:57 pm | अजया
=)))
17 Apr 2016 - 10:21 pm | निधी
रोमात म्हणजे 'रिड ओन्ली मोड'. वाचनमात्र असते.
17 Apr 2016 - 10:31 pm | चाणक्य
नविन भर शब्दसंग्रहात.
17 Apr 2016 - 10:47 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचं रोमात वाचुन कोमात जायची वेळ आलेली कि ओ.
17 Apr 2016 - 10:59 pm | अजया
आमच्या रोमारोमात मिपा आहे ;)
17 Apr 2016 - 10:59 pm | निधी
अहो हल्ली वापरतात की हा शब्द. नवीन कुठेय तो???
17 Apr 2016 - 11:56 pm | palambar
वरिल प्रतिसाद वाचून चिपळुण प्रवास रद्द करण्यात येईल.
17 Apr 2016 - 11:59 pm | डॉ सुहास म्हात्रे
मिपाकर जोमात मुवि कोमात =))
18 Apr 2016 - 2:53 am | विशाखा राऊत
मुवि आत्ता नक्की कुठे कुठे जाणार :)
18 Apr 2016 - 6:51 am | अत्रुप्त आत्मा
मिपा पोखरून रत्नागिरी मिळाली! ;)
18 Apr 2016 - 7:42 am | मुक्त विहारि
@ अक्षय, संजय, निधी आणि नन्दादीप ====> चिपळूणला शेती घेतली की रत्नागिरीला जाणे-येणे असेलच.तेंव्हा नक्कीच भेटू.
@ sश्रिकान्त ====> महाडला आलो तर नक्कीच भेटू.
@ सुधांशू ====> कुर्ल्याला कट्टा करण्यासाठी आम्ही नेहमीच तयार असतो.
@ बिरूटे सर =====> चिपळूणच्या शेतीचे एकदा काम झाले की, वल्लींच्या बरोबर नक्कीच येईन.
@ एस =====> मिपाकरांच्या बरोबर कट्टा करतांना आम्ही ताटात काय असेल ते खातो, अगदी बटाटेवडे आणि चिंचे चटणी पण खाऊ शकतो आणि श्रीखंडाचे पाणी पण.
@ जेपी ====> खानावळीत जेवणे आणि काश्मीरला जाणे ह्या जन्मांत शक्य नसल्याने, आपण काश्मीरला कट्टा न करता, दिवाळीच्या सुमारास लातूरला कट्टा करू या.
@ माझीही शँपेन ====> मला येती ७-८ वर्षे तरी परदेश गमन परवडणारे नसल्याने, डेट्रॉइट कट्टा सध्या तरी जमणार नाही.तुम्ही भारतात आलात की, तुम्ही कट्टा ठरवा मी येईन.
@ गॅरी ===> मे महिन्यात वाशीला येणे झाले तर नक्कीच भेटू.
@ बोका ===> आमंत्रणाबद्दल धन्यवाद.
@ कॅप्टन जॅक स्पॅरो ====> थोडे दिवस थांबा, एक जोरदार कट्टा करायचे ठरवत आहे, तेंव्हा मात्र नक्की या.
22 Apr 2016 - 4:38 pm | अक्षय देपोलकर
स्वागतच आहे...
18 Apr 2016 - 8:28 am | नाखु
आणि (भावी) प्रगतीशील शेतीउद्योजक मुवी यांना शुभेच्छा !!!
सभासद
अखिल पिंचि सहीत पुणे महानगर कट्टा महामंडळ.
उपसचिव
जेपी संचालित्,टका आयोजीत सत्कार समीती
खुलासादार (खजिनदार नाही)
अखिल मिपा भाव विश्व चक्री पारायणी वाचक संघ (महाराष्ट्र राज्य)
18 Apr 2016 - 2:01 pm | sश्रिकान्त
मुक्त विहारि — महाडला आलात तर आपणास
प्रिसध्द असे िशवथरघळ, रायगड, गरम पाण्याचे झरे (सव) ,
वालणकोंडी, रंगुमाता देवस्थान, चौवदार तळे, िलंगाणा, प्रतापगड
अशी स्थले पाहता येतील.
18 Apr 2016 - 2:23 pm | इरसाल
वडोदराथी आवजो हां !
18 Apr 2016 - 2:33 pm | सस्नेह
आणि कोल्लापुरात न येता चिपळुणाला गेलात तर तलवार काढण्यात येईल, हे ध्येनात ठेवावे.
18 Apr 2016 - 2:34 pm | स्पा
येताना आडीव्र्याला येऊन जा, मी असेनच तिकडे :)
18 Apr 2016 - 3:39 pm | त्रिवेणी
मग आमच्या जळगाव ने काय घोड़ मारलय? औरंगाबाद वरुन जळगाव मग रत्नागिरी अस जा तुम्ही.
असे ही आता आमरस आणि मांदे मांडे असा बेत करतो आम्ही पाहूणचारा साठी.
18 Apr 2016 - 3:58 pm | सस्नेह
तुम्ही पुण्यात ना ?
18 Apr 2016 - 6:14 pm | डॉ सुहास म्हात्रे
मनातले मांडे खायला घालायला पुणे काय, औरंगाबाद काय, जळगाव काय, रत्नागिरी काय किंवा डेट्रॉइट काय अगदी एका एका हाकेच्या अंतरावर असतात :) ;)
18 Apr 2016 - 7:16 pm | त्रिवेणी
हो तै पण ते माहेर आहे न सो मन असतच तिकडे.
18 Apr 2016 - 4:40 pm | सूड
पुणे मार्गे जाणार असाल तर सांगा.
18 Apr 2016 - 4:49 pm | दिपक.कुवेत
जरी कानाडोळा केलात तरी सूडचा प्रतिसाद गंभीरतेने घ्या. मुळात आधी तो नीट समजून घ्या. तो फक्त सांगा म्हणतोय. आमंत्रणाचा पत्ता नाहिये. तुमच्या महाराष्ट्र भ्रमंतीस खुप खुप शुभेच्छा.
18 Apr 2016 - 6:22 pm | सूड
आमंत्रण? ते काय असतं?
18 Apr 2016 - 9:05 pm | सस्नेह
ते कोकणकरांना समजावणे औघड आहे ;)
18 Apr 2016 - 9:19 pm | सूड
=))
18 Apr 2016 - 7:43 pm | मी-सौरभ
चिपळूण धागा पिळुन निघालाय अगदी
मूवी: मस्त मजा करा , भरपूर आमरस हाणा
18 Apr 2016 - 8:01 pm | भंकस बाबा
सगळ्यांच्या आंमत्रणाचा मान ठेवलात तर पुढच्या वर्षी नक्की चिपळुनला पोहोचाल!
तेवढा बाल्या डान्स शिकुन घ्या जाताय तर! लय भारी!
18 Apr 2016 - 9:13 pm | खटपट्या
गाडी क़ळव्यावरुन जाते ना वो ????