कॉम्प्युटर/ व्हिडीओ गेम्स.....भाग १ (मारीयो)

उगा काहितरीच's picture
उगा काहितरीच in जनातलं, मनातलं
7 Apr 2016 - 1:08 pm

१९९० च्या दशकात जन्म झालेल्या लोकांना मी नशीबवान समजतो. कारण या अगोदरच्या पिढीतल्या लोकांना मोबाईल, काँप्युटर थोडेसे उशीरा मिळाले. त्यामुळे ते लोक मोबाईल, संगणक( हाच शब्द सोपा आहे टाईप करायला ;) ) वगैरे वापरायला तितकेसे उत्साही नसतात. २००० नंतरच्या पिढीला जन्मापासुनच मोबाईल वगैरे वापरायला मिळतो त्यामुळे इतर मैदानी खेळाला वगैरे ही पिढी तितकीसी उत्साही नसते. पण ही जी ९० च्या दशकातली पिढी आहे ना त्यांनी शिवणा-पाणी , विष-अम्रुत, लपंडाव हे ज्या उत्साहाने खेळले त्याच उत्साहाने मारीयो, कॉन्ट्रा , SD fighter , vice city खेळले.
चला तर मग आमच्या पिढीने खेळलेले काही क्लासीक गेम्स पाहुया...
इतर बर्‍याच लोकांसारखीच माझी पण गेम खेळन्याची सुरुवात "मारीयो" नी झाली. बहुतेक चौथी - पाचवीच्या उन्हाळी सुट्ट्या असाव्यात दिवसभर उन्हात गोट्या नाहीतर क्रिकेट खेळत होतो. मग एक दिवस मोठा मावसभाऊ बोलला, माझ्या मित्राने कुठलातरी गेम आणलाय रे , जा पाहुन ये. त्या मित्राकडे काहीसा असा गेम होता टिव्हीला जोडलेला...
video_game

व त्यावर मारीयो चालू होता तेच त्याचे झालेले पहिले दर्शन ! बटण दाबलं की मारीयो पळतो, उड्या मारतो हीच मुळात गंमतच होती त्या वेळी. मग काय ? दुपारचे क्रिकेट बंद अन् मित्राकडे पडिक! पण मित्राकडे किती खेळणार ना ?म्हणुन मग स्वतःचा गेम घेण्याची खटपट चालु झाली . मग रितसर त्याने कसा मानसीक विकास होतो ? शैक्षणीक प्रगतीच्या आड कसा येत नाही ? हे आई-वडीलांना समजाऊन झाले. नंतरचा अध्याय म्हणुन रडणे , मार खाणे वगैरे साग्रसंगीत कार्यक्रम पार पडल्यावर एकदाचा स्वतःचा गेम मिळाला. आणी एका वेगळ्याच विश्वात प्रवेश केला.
तसा मारीयो हा काही अगदिच नविन नाही . मारीयो पहिल्यांदा दिसला तो Donkey Kong या गेम मध्ये . तेही १९८१ ला. मारीयोचे पप्पा (designer) आहेत Shigeru Miyamoto आणी याचा जन्म झाला Nintendo या कंपनीत. या मारीयोचे "मारीयो" असे बारसे होण्याच्या अगोदर Mr. video, jumpman असे काही नावं होती. तसे मारीयोचे बरेच गेम्स आले. मारीयो वेगवेगळ्या गेम्समध्ये दिसला . पण मारीयोला प्रसिद्धी मिळाली ती Super Mario Bros.या गेम मुळे.
या गेम मध्ये "किंग कूपा" नावाचा व्हिलन "राजकुमारी पीचला" त्याच्या "मशरूम किंग्डम" मध्ये डांबुन ठेवतो . व मारीयोला तिला सोडवायचे असते . या प्रवासात त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागतो. या गेम मध्ये एकुण ८ राउंड होते प्रत्येक राउंड मधे ४ स्टेजेस. सुरुवातीला ३ चान्सेस असतात . पण नंतर ते वाढू शकतात. जशी जशी गेम मध्ये प्रगती करणार तशी संकटे कठिण होत जाणार पण वेगवेगळे सिक्रेट मार्ग , बोनस, १ अप , इत्यादी गोष्टींमुळे रोचक पण होत जातो.

मारीयो...
mario

सुपर मारीयो ब्रॉस गेमची काहि द्रुश्ये...
१)
mario 1

२)mario 2

सुपर मारीयो ब्रॉस गेमप्ले...

(या सिरीज मध्ये मुख्यतः संगणकावरील गेम्स बद्दल लिहिण्याचा विचार आहे. जसेकी vice city, tod, nfs, EA चे काही गेम्स, far cry इत्यादी. अर्थात तुम्हाला आवडेल तरच...काही सुचना असतील तर जरुर सांगाव्यात.)

(सर्व चित्रे जालावरुन साभार...
संदर्भ: १) https://en.wikipedia.org/wiki/Mario
२) https://en.wikipedia.org/wiki/Mushroom_Kingdom
३) https://en.wikipedia.org/wiki/Shigeru_Miyamoto
४) https://en.wikipedia.org/wiki/Nintendo )

तंत्रमौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

बाबा योगिराज's picture

7 Apr 2016 - 1:20 pm | बाबा योगिराज

उगाच नका ना हो आठवणी काढू. काहीतरीच होत मनामध्ये.
आम्हाला स्वतःचा गेमिंग कंसोल कधी मिळालाच नाही.

बाकी ये दुनिया थी बडी खास. काँट्रा आणि मारिओ तर आपल्याला जाम आवडायच्ये.

इस्तृत माहिती यु द्या.

वेल्लाभट's picture

7 Apr 2016 - 1:22 pm | वेल्लाभट

कहर आवडीचा विषय...
मारियो ने व्हिडियो गेमचा श्रीगणेशा झालाय... काँप्यूटर गेम्स हा पूर्ण वेगळा आणि व्यापक विषय आहे.
पण या लेखमालेतले पुढचे भाग काय असावेत, अंदाज खालीलप्रमाणे

काँट्रा
जॅकल
रोड फायटर
अ‍ॅडव्हेंचर आयलंड
लोड रनर

बापरे....
काँट्रा खेळत अख्खे दिवस दिवस बसलेला
वेल्लाभट

लै लवकर आटोपलात.. पुढचे लेख थोडे डिट्टेल मध्ये लिहा.

१९९४ साली पहिल्यांदा मारिओचे दर्शन झाले. त्यानंतर घरातले सगळेजण उत्साहाने मारिओवर R&D करू लागले. मारिओ गोळ्या मारतो हे ही माहिती नव्हते म्हणजे किती बेसीकपासून सुरूवात केली असेल बघा...

नंतर वेगवेगळे वार्प झोन शोधून काढले, त्या ड्रॅगनच्या पायाखालचा पूल पाडून त्याला पाय हलवून मारणे वगैरे प्रकार कळाले. मारिओ शिड्यांवरून वर जातो आणि वरती नाण्यांचा खजिना असतो असे पण बरेच काही शोध लागले.

कांही आठवड्यातच सगळ्या लेव्हल्स पार केल्या आणि एकदाची ती घाणेरडी दिसणारी प्रिन्सेस दिसली. ;)

नंतर त्यातच इंप्रोव्हायझेशन सुरू झाले १-१ पासून सगळ्या लेव्हल्स पार करत ८-४ ला जावून ड्रॅगनला मारायचे, कमीत कमी वेळेत फायनल स्टेज पूर्ण करायची (४ मिनीटांमध्ये सगळे पार केले आहे एकदा..!)
एक क्वेस्ट पूर्ण झाली की दुसरी, मग तिसरी असे सलग ६ क्वेस्ट खेळलो आहे.

मला एका मारिओच्या कॅसेटमध्ये हवेत प्रचंड उंच उड्या मारणारा मारिओ सापडला होता. एकदा उडी मारली की खालचे सगळे जण; भूत, कासव वगैरे वगैरे यांना पार करून तो बर्‍याच वेळाने खाली उतरायचा.. नंतर पुन्हा उंच उडी.. असे तीन चार उड्यांमध्ये डायरेक्ट किल्याच्या झेंड्यावर..

मारिओ म्हणजे मजा होती. :)

.

चांदणे संदीप's picture

7 Apr 2016 - 3:23 pm | चांदणे संदीप

मला एका मारिओच्या कॅसेटमध्ये हवेत प्रचंड उंच उड्या मारणारा मारिओ सापडला होता. एकदा उडी मारली की खालचे सगळे जण; भूत, कासव वगैरे वगैरे यांना पार करून तो बर्‍याच वेळाने खाली उतरायचा.. नंतर पुन्हा उंच उडी.. असे तीन चार उड्यांमध्ये डायरेक्ट किल्याच्या झेंड्यावर..

येस्स! त्याच्या 9999999999 पैकी कुठल्यातरी नंबरला ही गेम लागायची. अशी बरीच व्हर्जन्स होती!

Sandy

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 3:39 pm | उगा काहितरीच

Moon mario असं नाव होतं त्याचं . शिवाय giant mario हे एक व्हर्जन होतं यात मारीयो फक्त दरीत पडून वा वेळ संपूनच मरायचा.

बरोबर.. हा मारिओ असला की हसत खेळत ड्रॅगनचा पूल पार करायचा.

चांदणे संदीप's picture

7 Apr 2016 - 1:23 pm | चांदणे संदीप

"मारियो" म्हणजे लहानपणीचा एक दोस्तच जणू!

मी मारियो आधी उभ्या, एटीएमसारख्या मशीनमध्ये कॉईन टाकून खेळलोय! एक रूपयात एक गेम कॉईन आणि गेम ओव्हर होईस्तोवर खेळा! पाय दुखेपर्यंत उभा राहून खेळायचो! किती गेम खेळलो पण मारियोसारखी मजाच वेगळी! अजूनही भाच्यासोबत खेळतो. मला खेळायला मिळावी म्हणून त्याला गेम घेऊन दिली! ;)

Sandy

गणामास्तर's picture

7 Apr 2016 - 2:04 pm | गणामास्तर

टीव्ही ला जोडून खेळता येणारा गेम असेल तर कुठून घेतला सांगाल का? मध्यंतरी बराच शोधला मी पण कुठेचं मिळत नाही सध्या.

बहुतेक पिंपरीमध्ये प्रत्येक खेळण्याच्या दुकानात मिळेल असा वाटतय.
मी आकुर्डी चिखली रोडवर एका व्हरायटीज स्टोअर मधून घेतलेलं.

कंजूस's picture

7 Apr 2016 - 1:26 pm | कंजूस

छान लेख.एक 64 in 1 कॅसेट मिळायची त्यातलेबारा गेम मी नेहमी खेळायचो.बॅामर मॅन, पॅकमन,आणखी नावं आठवत नाहीत.त्यातला एक फुग्यांचा गेम पार्टी गेम होता.आपल्या हातात तीन फुगे घेऊन उडायचं दुसय्रांचे फोडायचे दुसरे आपला फोडतात.रिपिटिशन होणारे -मारियो ,कार रेस वगैरेमध्ये ठरावीक ठिकाणी ठरावीक अडथळे येतात ते मलक आवडायचे नाहीत.मोबाइलातले टचस्क्रीनवाले सर्वच खेळ भंकसगरी वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2016 - 1:31 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मारियोनामक ह्या प्लंबराने मला गेमविश्वात खेचलं. त्यानंतर मग काँट्रा, सर्कस, डबल ड्रॅगन २ वगैरे गेम्समधे पडिक असे. सद्ध्या विचर-३ ने वेड लावलेले आहे. अर्थात हल्ली फार खेळायला मिळत नाही हा भाग अलाहिदा. :(!!!

माझा पॉकेमॉन सगळ्यात आवडता!
रेड पासून ते ओमेगा रूबी पर्यंत सर्व पारायणे केलीत!

सौंदाळा's picture

7 Apr 2016 - 1:47 pm | सौंदाळा

सहीच
डेव, प्रिंन्स, वुल्फ, प्रोजेक्ट आय्जीआय बद्दल पण लिहा

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 4:06 pm | उगा काहितरीच

डेव्ह , प्रिन्स विसरलोच होतो मी . धन्यवाद आठवण करून दिल्या बद्दल. वुल्फ नाही खेळलो जास्त. आय जी आय वर आहे एक भाग. सो स्टे ट्युनड्... !

वाह्यात कार्ट's picture

7 Apr 2016 - 2:21 pm | वाह्यात कार्ट

थोडं अजून लिहिलं असतं तर आणखी मजा आली असती. पण आवडत्या विषयावर वाचायला आवडतंय.
जमल्यास PS4 पर्यंतची प्रगती येउद्या !!!
पुभाप्र!!

अमित_निंबाळकर's picture

7 Apr 2016 - 2:29 pm | अमित_निंबाळकर

wrestling games हि त्या वेळेस खूप चालायचे ..
मरिओ खेळण्यासाठी तर मी खूप धडपड करायचो.. राणी पर्यंत पोहाच्यालावर जाम खुश व्हायचो

अद्द्या's picture

7 Apr 2016 - 2:41 pm | अद्द्या

भाग अजून लांबवला असते तरी चाललं असतं.
पपुढल्या भागाला शुभेच्छा आणि काही मदत लागली तर जरूर सांगा , आठवड्याला एक या प्रमाणे अगदी डिट्टेल मध्ये टाका भाग .

मारियो आणि कोण्ट्रा म्हणजे शाळेतले बरेचसे हाफ डे बंक करण्याचे कारण होते.

- मिपावर गेम्स वर पण धागा बघून अतिशय सुखावलेला अद्दया

चांदणे संदीप's picture

7 Apr 2016 - 3:19 pm | चांदणे संदीप

मारियो म्हटल की आठवत, नवीन खेळायला सुरूवात केलेली तेव्हा प्रत्येक स्टेजवर नव्या चमत्कारिक, धोकादायक, जीव घेणारया प्राण्याना बघून...'ही स्टेज लै अवघडे... ही काय पार होत नस्ते!'... अस सर्व मित्रांना सांगत ती आपण सर्वाच्या आधी पार करण्यासाठी केलेली पराकाष्ठा! (एवढी अभ्यासात करणे मात्र कधीच जमले नाही)
प्रत्येक लेव्हल पार करत असताना जर वेळ १०० सेकंदाच्या खाली आला की म्युजिक फ़ास्ट मोड मध्ये जायचे आणि खूप दडपड यायचे. अशा वेळेसच खूप चुका होऊन जीव जायचा! ड्रगन आला की मात्र सुरुवातीपासूनच ते भयानक म्यूजिक वाजायचे आणी कधी एकदा ते संपतंय अस होऊन जायचं!

पापणी न पाडता एकटक बघणारे आणि आडवे-आडवे चालणारे किडे, अंगावर उडी मारली की पाठीवरच्या कवचात लपणारी बदकं, काळ्या कवचाचे किडे, पाठीवर चाकू असणारे कासवसदृश प्राणी, हवेतून असलेच प्राणी खाली फेकणारा ढगातला चेहरा, फोनसारख्या दिसणार्या यंत्रातून निघणारी गोळी, हातोडी फेकणारी माकडे, स्प्रिंगवरून मोठी जम्प घेणे, पाण्यातले चावरे मासे, हवेत उडणारे चावरे मासे, आभाळात घेऊन जाणारी वेल, हवेतले तराजू, हवेतल्याच, वजनाने लगेच खाली जाणारया पायरया असे अनेक विस्मायकारिक गोष्टींनी भरलेले मारीयोचे जग होते. आणी त्या जगात फक्त आपण लहान मुले! वा, झाल परत नॉस्टाल्जिक मोडमध्ये जायला! ;)

सगळ्या स्टेज जेव्हा संपवलेल्या तेव्हा काही दिवस जुन्या स्टेज खेळायला नाको वाटायचे आणि मग दुसर्या गेम्सकडे बघायला वेळ मिळाला. त्याविषयी पुढील भागात! ;)

Sandy

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 3:45 pm | उगा काहितरीच

वा ! प्रतिसाद आवाडला . धन्यवाद . मारीयोमधे बरेच किडे केले होते. जसेकी स्टेज पार केल्यावर झेंड्यावरून पलिकडे उडी मारायची. मग तो कॕसल मधे न जाता समोर पळत सुटतो. वेलावर मारीयोला डान्स करायला लावणे. इत्यादी इत्यादी .

नीलमोहर's picture

7 Apr 2016 - 2:59 pm | नीलमोहर

पॅकमॅन, मारियो, डेव्ह, डूम, प्रिन्स ऑफ पर्शिया, अलाद्दिन, आताचं अ‍ॅन्ग्री बर्ड्स,
मॉर्टल कॉम्बॅट आणि डबल्यू डबल्यू एफ - कहर !! भाऊ आणि मी वेड्यासारखे खेळायचो..
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी :(

लेखातल्या फ़ोटोत दिसतेय ती बंदूक अलिकडच्या काळातली आहे. आधी तिचा शेप वेगळा होता. :)

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 3:40 pm | उगा काहितरीच

होय. माझ्याकडे होता त्या गेमचा फोटो मिळाला नाही .

गणामास्तराने विचारलय ते "Ending Man" कंपनीचे होते.अजूनही जपानमध्ये गेमस्टोर्समध्ये "retro games section" मध्ये आहेत ते दाखवलेले.

गणामास्तर's picture

7 Apr 2016 - 4:28 pm | गणामास्तर

माझ्याकडे SUBOR कंपनीचा होता. बाकीच्या मित्रांकडे जे होते त्याचे रिमोट वारंवार खराब व्हायचे आणि रिमोट बदलता यायचे. माझ्या गेमला तशी काही सोय नव्हती,पण रिमोट कधीच बिघडला नाही कित्येक वर्षे रगडून सुद्धा.

viraj thale's picture

7 Apr 2016 - 4:11 pm | viraj thale

चे emulator download करून आता मोबाईल वरही हे जुने सर्व गेम्स खेळता येतात त्यामध्ये contra ,street fighter type गेम्स bluetooth किंवा wifi द्वारे multiplayer मित्रांबरोबर खेळू शकतो .

गेमिंगच्या दुनियेशी फारसा म्हणण्यापेक्षा अजिबातच संपर्क आलेला नाही. त्यामुळे उत्कंठेने वाचतो आहे. पुभाप्र.

प्रचेतस's picture

7 Apr 2016 - 4:47 pm | प्रचेतस

सुपर मारियो रॉक्स.

संजय पाटिल's picture

1 May 2016 - 9:07 pm | संजय पाटिल

सुपर मारीयो ब्रदर्स..

मस्त विषय.

एक मजा आठवलीये. लहानपणी गेम कधी खेळायला मिळतो याची कायम संधी शोधत असायचो. पूर्वी आमच्या घरी केबल होते आणि एकदा आई शेजार्यांकडे (बाजूच्या बिल्डिंग मध्ये ) बाहेर जाणार होती. घरात इतर कोणीही नव्हते आणि मी आई कधी एकदा बाहेर जाते आणि मी गेम खेतो याची वात बघत होतो. आई जाऊन येते असा सांगून बाहेर पडली आणि मी गेम खेळायला सुरवर केली. मारियो !!! बराच वेळ मनसोक्त खेळून मग मी गेम बंद करून , नीट कपाटात घालून ठेवला आणि आई यायच्या थोड्या आधी अभ्यासाला सुरवात केली. थोड्या वेळाने आई आली आणि मला म्हणाली मग काय, झाला का तो मारियो खेळून ? मला काही कळेना , आईला कसा काय कळले ? म्हणजे त्या वेळी मी गेम खेळायचो पण मारियो बरोबर इतर पण बरेच गेम खेळायचो. आणी मुख्य म्हणजे आईला मारियो हे गेम चा नाव माहित असण्याची काहीच शक्यता नव्हती. मग एकतर मी गेम खेलो आणि दुसरा म्हणजे मारियो खेळलो हे आईला कसा काय कळल ?

आता लपवून ठेवण्यात काही अर्थ नव्हता. मी आईला विचारलं " होय, पण तुला कसा कळलं ? " तेव्हा आईनी जे सांगितला ते आज आठवून हसायला येत. आमच्याकडे जी केबल होती ती एका छोट्या कनेक्टर बॉक्सला जायची जिथून अजून ४ वायर्स जायच्या. त्यातली एक त्या शेजार्यांकडे जायची. आई जेंव्हा त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांचा मुलगा tv बघत बसला होता आणि थोड्या वेळात कसा काय माहित त्यांच्याकडे नेमक्या त्या चानेलवर मरिओ दिसायला लागला. आणि त्यांचा मुलगा एकदम ओरडला "अरे मारियो !! " आता बिल्डिंग मध्ये गेम माझ्या कडेच असल्याने कोण मारियो खेळतंय हे काही वेगळे सांगायची गरज लागली नाही. आणि नंतर मला असा कळलं की केवळ त्यांच्या कडेच नाही तर त्या बॉक्स मधून केबल गेलेल्या ४ हि जणांकडे त्या विशिष्ठ चानेलवर मारियो दिसत होता ...... हे आठवून अजूनही हसायला येत !!

विवेक ठाकूर's picture

7 Apr 2016 - 11:13 pm | विवेक ठाकूर

त्या वेळी मोबाईल नवीन आले होते. सदाशिव पेठेत राहाणार्‍या एका मित्राच्या बिल्डींगमधे एक प्रख्यात वारांगना राहायची. प्रख्यात अशासाठी की तत्कालीन डेप्युटी सीएमशी तिचे लागेबांधे होते. त्यात ती तमासगीर असल्यानं अदाकारी इतकी लाजवाब होती की नुसती घराबाहेर पडली की गल्ली शांत व्हायची. तिच्या मोबाईलची आणि मित्राच्या टिवीची फ्रिक्वेन्सी अकस्मात मॅच झाली आणि याचा टिवी चालू केला की त्यावर त्या दोघांचे नकोनको ते भन्नाट प्रणयी संवाद ऐकू यायला लागले. हा बाहेर गेला की घरात आईचं लक्ष नाही असं बघून मुलं टिवी चालू करायची आणि मजा घ्यायची. बरं तिला काही बोलायची कुणाची शामत नव्हती. शेवटी मोठ धाडस करुन मित्र तिच्याकडे गेला आणि म्हणाला :
`ताई, एक रिक्वेस्ट आहे.'

`बोला ना. तुमच्यासाठी काही पण' ती म्हणाली

`आहो, तसं काही नाही......तुमच्या मोबाईलचे संवाद आमच्या टिवीवर ऐकू येतात !'

मग मात्र ती लाजून चूर झाली आणि म्हणाली `साहेबांना सांगते'.

संध्याकाळच्या आत टेक्निशियनन काही तरी जुगाड केली आणि ब्रॉडकास्ट बंद झाला. तेंव्हा कुठे मित्राचा जीव पुन्हा जागेवर आला.

मारिओ आणि रिव्हर रेड हे एकदम आवडते गेम. अतारीच्या सेटवर खेळायचो. कहर धमाल मे महिन्याच्या सुट्टीत!

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2016 - 10:42 pm | श्रीरंग_जोशी

मारियो, कॉन्ट्रा ही नावे ऐकली तेव्हा मी नववीत होतो. धाकटा भाऊ त्याच्या मित्रांकडे जाऊन खेळायचा. मी स्वतः खेळल्याचे आठवत नाही :-( .

आगामी भागांतल्या गेम्सपैकी काही गेम्स मी खेळलेले असले म्हणजे मिळवली ;-) .

पुभाप्र.

गणेश उमाजी पाजवे's picture

7 Apr 2016 - 11:12 pm | गणेश उमाजी पाजवे

गेमिंग चे विश्वच अद्भुत असते.तुम्हाला एक विनंती आहे.गेम्स बद्दल तर लेख येउद्यतच परंतु गमिंग कोन्सोल्स बद्दल पण वाचायला मिळाले तर अधिक आवडेल.आणि कम्प्युटर गेमिंग साठी लागणारे साहित्य जसे कि ग्राफिक्स कार्ड, हाय स्पीड प्रोसेसर, मोठ्ठ्या रॅम यांबद्दल देखील लेटेस्ट माहिती वाचायला आवडेल. जमत असेल तर बघा :)

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 11:43 pm | उगा काहितरीच

गेमींग कंसोल बद्दल जास्त काही माहिती नाही मला. पण कॉप्युटर गेमींग साठी लागणारे H/W requirements वगैरे बद्दल लिहीता येईल. तिथपर्यंत पोचायला बराच वेळ लागेल पण. खरा गेमर ना लॕपटॉप किंवा डेस्कटॉपमधून डेस्कटॉपचीच निवड करेल हे सांगून ठेवतो तोपर्यंत
-(नाइलाजाने लॕपटॉप वापरणारा) उका.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2016 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2016 - 11:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

घरातला पहिला काँप्युटर घेतल्यावर पॅकमॅन, मारियो, डेव्ह, डूम, प्रिन्स ऑफ पर्शिया, अलाद्दिन... असे अनेक गेम्स खेळून झाल्यावर मगच इतर वेळात काही काम करायचे असा शिरस्ता आपोआप पडला होता !

आताही मोबाईलवरचे बरेच गेम झाल्यावर अगोदर अँग्री बर्डस ची अनेक व्हर्शन्स पुरी करून मग अँग्री बर्ड २ च्या एरिनातली शेवटची डायमंड लीग जिंकून झाली आहे आणि मूळ गेममधिल आजपर्यंत पब्लिश झालेल्या ५४० पैकी ५०६ व्या लेव्हलवर आहे :)

लिवा, लिवा... गेम्सवर भरपूर लिवा. तुमच्या-माझ्यासारखे खूप वेडे इथे आहेत हे आतापर्यंतच्या प्रतिसादांवरून ध्यानात आले असेलच ;)

उगा काहितरीच's picture

7 Apr 2016 - 11:48 pm | उगा काहितरीच

तुमच्या-माझ्यासारखे खूप वेडे इथे आहेत हे आतापर्यंतच्या प्रतिसादांवरून ध्यानात आले असेलच ;)

हो ना. आनंदच झाला हे पाहून .

अगोचर's picture

8 Apr 2016 - 12:14 am | अगोचर

प्रिन्स ऑफ पर्शिया ची कालच आठवण काढली होती. इथे खेळा

मला फक्त गेम्स चे वॉलपेपर आवडायचे. आमचेकडे सांभाळायला रिलायन्सचे गेमप्लेक्स असूनसुध्दा मला एकही गेम कधी खेळता आली नाही. आतापर्यंत थोड्याश्या जमलेल्या गेम्स म्हणजे जुन्या फोनवर स्नेक, पीसीवर वर्चुअल कॉप आणि अ‍ॅन्ड्रॉइडवर २०४८. ह्यापलिकडे माझी बुध्दी चालली नाही, चालणार नाही. :(
लोकं तासनतास मिनिअन, सर्फर कसे पळवतात, कशा कॅन्ड्या फोडतात ह्याचे नवलच वाटते.

उगा काहितरीच's picture

8 Apr 2016 - 12:46 am | उगा काहितरीच

तो कॕन्डी क्रश मला पण नाही आवडत. रच्याकने सबवे सर्फ चा माझा रेकॉर्ड आहे १ कोटी ७० लाख ! इथे आहे का कुणी यापेक्षा जास्त स्कोर वाला ? असेल तर पायाचा फोटो पाठवून देणे . यावरून आठवलं माझे clash of clans चे ११८८ वॉर स्टार्स आहेत. (सबवे सोडून १ वर्ष झालं . म्हणून त्या रेकॉर्ड वर भरोसा नाही. पण coc चा "हा"रेकॉर्ड .... I don't think so... ;-) )

१२०६ वार स्टार्स!
आता बोला!

उगा काहितरीच's picture

8 Apr 2016 - 11:26 am | उगा काहितरीच

बाबौ ! कोणता क्लॕन ? #tag टाका. माझा #JQJGU8L

गणेश उमाजी पाजवे's picture

8 Apr 2016 - 11:43 am | गणेश उमाजी पाजवे

coc चे भक्त इथे पण आहेत हे बघून एकदम भारी वाटतंय.माझे वार स्टार्स काही जास्त नाहीत पण मी टाऊन हाल ८ ला आहे :D तुम्ही लोक्स कोणत्या लेवल ला आहात ?

उगा काहितरीच's picture

8 Apr 2016 - 12:39 pm | उगा काहितरीच

# Tag दिलाय...भेट द्या . लिडर आहे मी.

वगिश's picture

1 May 2016 - 11:02 pm | वगिश

Lvl 130

पिशी अबोली's picture

8 Apr 2016 - 12:45 am | पिशी अबोली

मारिओ मारिओ मारिओ...
कॉन्ट्रा कॉन्ट्रा कॉन्ट्रा...

काय भरून आलं सांगू हे सर्व वाचून!

एक अडाणी प्रश्न विचारते. हे गेम्स आता कुठे मिळतात का? एंड्रॉइडवर खेळता येतात का? म्हणजे तो क्लासिक मारिओ..त्याची भ्रष्ट व्हर्जन्स नाही..

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 May 2016 - 11:04 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

नॉर्मल संगणकावर खेळता येतात एम्युलेटर्स वापरुन. पण संगणक दणकट लागतो. एम्युलेशन वाईट प्रोसेसिंग पॉवर आणि रॅम गटकावतं. वर्थ प्लेइंग.

आइ ग्ग कीती जिव्हाळ्याचा विषय :)
मी अजुनही खेळते मारिओ , खास मोबाइल मध्ये घेतलाय डी एल करुन :)

पीके's picture

8 Apr 2016 - 11:45 pm | पीके

Coc town hall level 10 आहे Leag all star आहात कुठे महाराजे?

उगा काहितरीच's picture

8 Apr 2016 - 11:54 pm | उगा काहितरीच

बाकी मिळेल हो . (जेम्स घालून मिळवता पण येईल) पण वॉर स्टार्स कमवावेच लागतात. ;-)

नाना स्कॉच's picture

9 Apr 2016 - 10:18 am | नाना स्कॉच

हे वेड कधीच नव्हते, एकदाच हट्ट केलेला बापाकडे ह्याच्यासाठी पण नंतर भोकं पडलेली बनियान पाहून त्याची त्या बालवयात सुद्धा घसा कोरडा पडला होता, ते असो

गरीबी होती अन गेमची मालकी नव्हती म्हणून गेम्स वर हतखंडा नव्हता उन्हाळ्यात एखाद दिवस पाच रु/तास भावाने सेगा गेम पार्लर मधे खेळत असे मी, त्यातले आवडते म्हणजे मोर्टल कॉम्बेट अन सनसेट राइडर्स होते. बाकी पारंगत असलेले मित्र सफाईदारपणे एक एक लेवल पार करत तेव्हा टक लावुन टीवी कड़े बघत बसणे अन लेवल सर झाल्यावर त्यांच्यासोबत जल्लोष करणे ही आवडती कामे होती.

विजय पुरोहित's picture

30 Apr 2016 - 10:13 pm | विजय पुरोहित

उक्या भावा...
डायेब्लोवर पण लेख लिही की...
मला अतिशय आवडते...