Cognitive Dissonance ची थेअरी

कुमारकौस्तुभ's picture
कुमारकौस्तुभ in जनातलं, मनातलं
11 Dec 2013 - 6:18 pm

सानंदा चा कल्ट

मानसशास्त्रज्ञ लिऑन फ़ेस्टींजर ने ही कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ही थियरी विकसित केली. त्याच्या उगमाची कथा इंटरेस्टींग आहे, १९५६ मध्ये प्रकाशीत त्याच्या व्हेन प्रॉफ़ेसी फ़ेल्स या पुस्तकात ही विस्ताराने दिलेली आहे ती अशी. मारीयो कीच या लेकसीटी मिनिओपोलीस मध्ये राहणारया एका साध्या गृहीणीला अचानक एक दिवस एक मेसेज सानंदा नावाच्या देवाकडुन आला, की २१ डीसेंबर च्या मध्यरात्री अटलांटीक महासागरात प्रलय होईल आणि संपुर्ण जग त्यात बुडुन जाईल, अवघा रशिया तर एक समुद्र होऊन जाईल इ. हे जगात जे काय अपावित्र्य निर्माण झालेल आहे त्याला प्युरीफ़ाय करण्यासाठी होईल परंतु जे लोक सानंदा त विश्वास ठेवतील ते मात्र यातुन वाचतील.हीचा नवरा डॉ, आर्मस्ट्रॉंग हा एक डॉक्टर होता त्यानेही यावर पुर्ण विश्वास ठेवला. दोघांनी मोजक्या लोकांना ही घटना सांगितली त्यांनाही पटली मग एक छोटा कल्ट तयार झाला.त्यांनी एकच बातमी प्रेस ला दिली आणि सुरुवातीला प्रसिध्दी टाळली पण बातमी वारयासारखी पसरली आणि ती फ़ेस्टींजर पर्यंत पोहोचली. फ़ेस्टींजर ने या कल्ट मध्ये शिरकाव करण्याचे ठरविले आणि काही मिंत्रासहीत त्याने यात खोटी आस्था दाखवुन प्रवेश मिळवला. आणि मग त्याचा जवळुन अभ्यास सुरु झाला.यात शेवटचा मेसेज हा एखाद्या हींट सारखा येईल असे सांगण्यात आले होते.मेंबर्स नी नोकरया सोडल्या, घरं विकली लौकीक जीवनाचा त्याग करुन सानंदा ला शरण जाण्याची पुर्ण तयारी केली. शेवटी २१ डीसेंबर ची रात्र आली कीच च्या घरी सर्व मेंबर मंडळी जमली. मग एक पत्र्याचा आवाज आला ती हींट समजुन त्याचा अर्थ मेंबर्स नी आता आपल्या शरीरावरील सर्व धातु मेटल च्या वस्तु काढुन टाकाव्या असे सांगण्यात आले. कारण सानंदा च्या स्पेसशिप मध्ये बसण्यासाठी त्याचा अडथळा होणार होता. मग बायांनी ब्रा चे हुक पासुन आणि पुरुषांनी झिप च्या मेटल हुक काढण्यास सुरुवात केली. डॉ. आर्मस्ट्रॊंग एकीकडे घड्याळाकडे काळजीने बघत सरळ हुक सहीत चेन्स उखडुन टाकण्यास मदत करु लागला.शेवटी ११.५० झाले काही कल्ट मेंबर्स रडु लागले काही वारंवार पडदा उघडुन बघु लागले की बाहेर काही दिव्य प्रकाश सानंदाची स्पेसशिप दिसत आहे का असे.
परंतु असे काहीही झाले नाही जग १२ वाजेनंतर ही बुडाले नाही सानंदा ची स्पेसशिप ही आली नाही.प्यान्टी ब्रा परत तुटलेल्या हुकांसहीत कशाबशा चढविण्यात आल्या.

स्पष्टीकरणांची मालिका

आणि मग फ़ेस्टींजर ने आणखी एक आश्चर्य बघितले ते असे की कल्ट मेंबर्स या घटनेपुर्वी मीडीया ला जाणीवपुर्वक दुर ठेवत होते, मात्र आता त्यांनी स्वताहुन सर्व मीडीयाला फ़ोन लावण्यास सुरुवात केली लाइफ़, टाइम आणि न्युजविक ला ही संपर्क केला, पुढील काही दिवसांत आता मारीयो, आर्मस्ट्रॉंग आणि कल्ट मेंबर्सनी सुरु केली एकामागोमाग एक स्पष्टीकरणांची रॅशनलायझेशन्स ची मालिका. त्या सर्वांचा सुर एकच होता की आम्ही जे म्हणत होतो ते अगदी खरेच होते असे झाले नाही याचे कारण सानंदा ने आम्हाला पृथ्वी वासियांना सेकंड चान्स दिलेला आहे , ही वॉर्नींग आहे आता आम्हा मेंबर्सना सानंदा ने लोकांना पृथ्वी ला अधिक कलुषीत करण्यापासुन रोखण्याची, बाकी पृथ्वि वासियांना जागृत करण्याची जबाबदारी सोपवली आहे इत्यादी इत्यादी अशी अनेक अतार्कीक वेडगळ स्पष्टीकरणे त्यांनी दिली.
कॉग्नीटीव्ह डीसोनन्स ची मुलभुत तत्वे
या च्या अभ्यासा वरुन आणि यानंतर च्या अनेक प्रयोगांवरुन फ़ेस्टींजर ने एक महत्वाची थेअरी बनविली ती म्हणजे कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ची या अनुसार
१-माणस ही जेव्हा आपल्या मान्यते च्या, श्रध्देच्या विरोधात असलेल्या वास्तवाला- सत्याला सामोरे जातात तेव्हा त्यांच्या मनात एक प्रकारची तीव्र अस्वस्थता, विसंवाद निर्माण होतो. यालाच तो डिसोनन्स म्हणतो.
२-हा विसंवाद ही अस्वस्थता मानवी मन तात्काळ संपविण्याचा प्रयत्न करु लागते त्याशिवाय त्या मनाला शांती मिळत नाही.
३-हा डीसोनन्स संपवुन टाकण्यासाठी माणुस तीन पर्याय निवडतो.
अ- श्रध्दा बिलीफ़ शी तडजोड करणे - आपली चुकीची कृती न बदलता वा सत्याला सामोरे जाउन आपली चुकीची श्रध्दा न बदलता तीच्याशी च तडजोड करुन तीचेच समर्थन करणे.
आ- नविन श्रध्दा जुनीच्या समर्थनासाठी निर्माण करुन तिला च चिकटुन राहणे.
इ- सत्याला प्रामाणिकपणे सामोरे जाणे/ चुकीच्या श्रध्दा अथवा कृती चा त्याग करणे.

या थेअरीनुसार माणुस सहसा पहीले दोन पर्याय च निवडतो अगदी क्वचित तिसरया पर्यायाचा अवलंब केला जातो. वरील केस मध्ये जेव्हा वास्तवाने त्यांची श्रध्दा खोटी ठरविली तेव्हा कल्ट मेंबर्स नी तिच्या जागी नव्या श्रध्दा निर्माण केल्या पण तिसरा पर्याय नाही वापरला. पुन्हा आपल्या जुन्याच चुकीच्या विश्वासाला चिकटुन राहीले.या थेअरी ला अनेक प्रयोगांनी सिध्द करण्यात आले आहे विकीपेडियाचे हे पेज याची अधिक व्यवस्थित माहीती येथे देते ती एकदा जरुर वाचावी.
१-http://en.wikipedia.org/wiki/Cognitive_dissonance
२-http://web.mst.edu/~psyworld/cognitive_dissonance.htm
३-http://psychclassics.yorku.ca/Festinger/

तिसरा पर्याय न निवडणारे व त्यांची वागणुक

वरील तिसरा पर्याय न निवडणारे मग आपल्या विरोधी विचार असलेल्यांना एकतर टाळतात किंवा कायम आपल्या मतांना पुष्टी जेथुन मिळेल त्याचाच आधार घेतात. तीच पुस्तक वाचतात तीच व्याख्याने ऐकतात आणि त्याच मतांना आपली टाळी देतात. हा डिसोनन्स टाळण्याचा विरोधी आवाज/ मता विषयी जाणीवपुर्वक विकसीत केलेला बहीरेपणा असतो जो डिसोनन्स( बेसुर) ने होणारा त्रास वाचविण्याची एक केविलवाणी धडपड असते. जितका माणुस रीजीड तीतकी त्याची विरोधी विचाराला सामोरे जाण्याची इनफ़ॅक्ट स्वमत विरोधी वास्तवाला सामोरे जाण्याची क्षमता कमी असते.. याला च फ़ेस्टींजर या शब्दात मांडतो “human behavior cannot be explained by reward theory alone. Human beings THINK . They engage in the most amazing mental gymnastics, all just to justify their hypocrisy. “

थेअरीचा फ़ोकस

ही थियरी तिसरया पर्यायासंबंधी जास्त भाष्य करत नाही या थियरी चा फ़ोकस डिसोनन्स कसा निर्माण होतो आणि त्यासाठी सर्वसामान्यपणे पहील्या दोन पर्यायांचा वापर कसा केला जातो हा आहे. थोडीशी एकांगी अशी ही आहे. एलियट अरोन्सन या विषयातील अधिकारी व्यक्तीला जेव्हा विचारण्यात आल की ही थेअरी तिसरा पर्याय वापरण्याविषयीच्या व्रुत्ती वर फ़ारसा प्रकाश टाकत नाही असे का? त्यावर त्यांच उत्तर होत की जोन्सटाउन च्या( धुमकेतु वाला कल्ट ) केसमध्ये ९०० लोकांनी स्वत:चे जीवन संपवुन स्वत:चा डीसोनन्स संपविला होता. त्यातील काहींनी असे केले नाही हे जरी खरे असले (तरी इतक्या बहुसंख्य लोकांनी वरील दोन पर्याय च निवडले होते) आणि म्हणुन ते म्हणतात की “So this theory focuses on , the vast majority who hang on to their beliefs even until death.”

मला वाटत की ,

खोट्या श्रध्दांना कवटाळुन व त्याने मिळवलेल्या तथाकथित शांति पेक्षा डिसोनन्स ने निर्माण झालेली व्याकुळता मला अधिक महत्वाची वाटते. रेडीमेड उत्तर मिळविण्यापेक्षा कठोर वास्तवाला सामोर जाउन घेतलेला शोध आणि निवडलेली मुल्ये अधिक महत्वाची असे मला वाटते.दांभिकपणे आपण बाळगलेली चुकीची तत्वे वास्तवाने खोटी ठरविल्यानंतर ही त्याचा प्रामाणिकपणे त्याग न करता त्यांनाच मरेपर्यंत चिकटुन राहणे हीच माणसाची सर्वात मोठी अधोगती असावी असे वाटते.

मांडणीमाहिती

प्रतिक्रिया

साती's picture

11 Dec 2013 - 8:18 pm | साती

चांगल्या आणि वेगळ्या विषयावरचा लेख आवडला.

नगरीनिरंजन's picture

11 Dec 2013 - 8:55 pm | नगरीनिरंजन

लेख उत्तम आहे. वाचून मजा आली; पण काही प्रश्नही पडले.
माणूस हा सामान्यतः आशावादी प्राणी आहे पण हा डिसोनन्स फक्त वाईट घटनांवरच विश्वास ठेवणार्‍यांमध्येच दिसतो का?
समजा काहीतरी वाईट घडणार आहे याची सगळी लक्षणे दिसत असूनही चांगलेच घडेल असा विश्वास बाळगणारा माणूसही त्याच्या वागण्यात याच तीन पायर्‍या दाखवतो का?

नगरी निरंजन जी
ही थेअरी सकारात्मक अथवा नकारात्मक विश्वास कुठल्याही प्रकारच्या माणसावर लागु होउ शकते. सकारात्मक विचारसरणीचा माणुस ही आयदर सत्याला सामोर जायच ठरवु शकतो वा स्वतःच्या चुकीच्या मतांना चिकटण्याचा पर्याय ही स्विकारु शकतो तसेच नकारात्मक विचारसरणी चा माणुस ही वरील प्रमाणे च वागु शकतो. आणि सर्वात महत्वाच म्हणजे धर्म संबधित जरी वरील उदाहरण असले तरी इतर बाबतींतील मतांना श्रद्धांना ही ते तसेच लागु होते. जसे एखादी नवि वैद्यानिक थेअरी जेव्हा जुन्या वैद्यानिक थेअरी ला चुकीच सिध्द करते तेव्हा ही या प्रकारे स्व-मत अशाच आंधळेपणाने जस्टीफाय करण्याचा प्रयत्न होत असतो.
मुळात माणुस या थेअरी नुसार जेव्हा दोन परस्पर विरोधी विचार जेव्हा निर्माण होतात अथवा आपल्या आतापर्यंत जीवापाड जपलेल्या श्रध्दांना जेव्हा वास्तवाच्या समोर खोटे ठरत असलेले बघतो तेव्हा एक प्रकारचा डिसोनन्स (व्याकुळता/ विसंवाद) मनात निर्माण होतो. तो दडपुन टाकण्यासाठी मग माणुस आयदर श्रद्धेत सोयीस्कर अ‍ॅडजस्टमेंट करतो अथवा त्या जागी नविन चुकीची ( जी परत जुनीलाच जुन्या चुकीच्या श्रद्धेलाच जस्टीफाय करते) तीला पकडुन धरतो.
या संदर्भात आता आसाराम/नारायण साईंच्या भक्तांचे चॅनेल्स वरील डीफेन्स बघावेत तसेच त्यातील काही भक्त तिसरा पर्याय स्विकारुन सत्याला सामोरे जात असलेले ही दिसतात आणि काही तर आता बापुंनी जेल मध्ये जाणे हा त्यांनीच केलेल्या स्व-लीले चा भाग समजतात असे तीन ही टाइप या केसमध्ये तुम्हास दिसतील.

वडापाव's picture

12 Dec 2013 - 12:04 pm | वडापाव

ननिंची शंका आणि त्याचं केलेलं निरसनसुद्धा आवडलं.

कवितानागेश's picture

12 Dec 2013 - 12:29 pm | कवितानागेश

वाचतेय..

मुक्त विहारि's picture

12 Dec 2013 - 12:33 pm | मुक्त विहारि

आवडला...

ताजा ताजा म्हणजे २१ डिसे. २०१२ चा कल्ट
त्या अगोदर २००० साली पण असाच काहीतरी कल्ट आला होता म्हणे.

वेगळ्या विषयावरचा अभ्यासू लेख. आवडला.

पैसा's picture

12 Dec 2013 - 10:08 pm | पैसा

वेगळ्या विषयावरचा अभ्यासू लेख आवडला. आपल्या चुका मान्य करणे कोणालाही कठीण जाते त्यामुळे तिसरा पर्याय वापरला जात नसावा.

अस्वस्थामा's picture

29 Mar 2016 - 7:57 pm | अस्वस्थामा

हाच लेख शोधत होतो गेले काही दिवस. फायनली सापडला.. :)

तर्राट जोकर's picture

30 Mar 2016 - 3:01 am | तर्राट जोकर

धन्यवाद ;-)

अस्वस्थामा's picture

30 Mar 2016 - 3:04 pm | अस्वस्थामा

धन्यवाद ? ओहो.. सुज्ञास (जास्त) सांगणे न लगे. आणि सूज्ञ तर सर्वत्र आहेतच. ;)