पर्वचा

विद्यार्थी's picture
विद्यार्थी in जनातलं, मनातलं
28 Mar 2016 - 7:28 am

आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे. पर्वचा झाल्यानंतर मराठी वार, मराठी महिने, मराठी तिथी वैगेरे घोकून घेतले जाई. जसे मोठे झालो तसे त्यात पाढेसुद्धा सुरु झाले होते.

पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.)

गम्मत म्हणून आम्ही रोज म्हणत असणारे श्लोक येथे टाकत आहे. पर्वचा म्हणण्यासाठी माझ्या मुलाच्या मागे लागण्याची प्रेरणा यातून मला होत आहे (यश कितपत मिळेल माहित नाही). तुम्हालाही याचा फायदा होतोय का ते पहा.

गणपती स्तोत्र
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ|
निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा||

गुरु आराधना
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा|
गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरवे नमः||

दीप स्तोत्र
शुभंकरोती कल्याणं आरोग्यं धन संपदा|
शत्रुबुध्हि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते||

शिव स्तोत्र
सौराष्ट्रे सोमनाथांच श्रीशैले मल्लिकार्जुन|
उज्जैन्न्याम महाकालं ओंकारे ममलेश्वरम||
हिमालये तू केदारं डाकीण्याम भिमशंकरम!
वाराणस्या तू विश्वेशं त्र्यंबकम गौतमीतटे||
परल्यां वैद्यानाथमच नागेषम दारुकावने!
सेतू बंधे तू रामेशं घ्रीश्नेषम तू शिवालये!!

श्रीराम मंत्र
श्री राम राम रामेति रमे रामे मनोरमे|
सहस्र नाम तत्तुल्यं राम नाम वरानने||

हनुमान स्तोत्र
मनोजवं मारुततुल्य वेगम|
जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम||
वातात्मजं वानारायुद्ध मुख्यम|
श्रीरामदुतम शरणं प्रपद्ये||

श्रीकृष्ण मंत्र
वसुदेव सुतं देवं|
कंस चाणूर मर्दनम||
देवकी परमानंदम|
कृष्णाम वन्दे जगद्गुरु||

विष्णू स्तोत्र
शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम|
विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णम शुभांगम||
लक्ष्मीकान्तं कमल नयनम योगीभिर्ध्यान गम्यं|
वंदे विष्णू भवभय हारम सर्व लोकैक नाथम||

देवी स्तोत्र
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके|
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते||

देवी मंत्र
या देवी सर्व भूतेषु विद्या रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||

या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||

या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||

या देवी सर्व भूतेषु भक्ती रूपेण सौन्स्थिता|
नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः||

या देवी सर्व भूतेषु लक्ष्मी रूपेण सौन्स्थिता|
या नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमो नमः|

ओम सहना ववतु सहनौ भुनक्तु|
सहवीर्यं करवावहै||
तेजस्विना वधितमस्तु मा विध्विशावहै|
ओम शांति शांति शांतिः||

संस्कृती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Mar 2016 - 8:14 am | यशोधरा

ज्या ज्या ठिकाणी
मन जाय माझे
त्या त्या ठिकाणी
निज रूप तुझे

मी ठेवितो
मस्तक ज्या ठिकाणी
तेथे तुझे
सद्गुरु पाय दोन्ही।

सदा सर्वदा योग तूझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका मागणे हेचि आता...

तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो
त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य करणि पडो
स्वदेशहिंतचिंतनाविण दुजी कथा नावडो
तुझ्यासमचि आमुचि तनुही देशकार्यी पडो

माझी मुलगी कधी म्हणते कधी नाही. पाठ आहे. रोज म्हणायची सक्ती करावीशी वाटत नाही. (केली तरी ती ऐकते थोडीच!)

पाढे मात्र बरेचदा म्हणते. (त्याची थोडीफार सक्ती आहे.)

आजी आजोबांच्या घरी आम्ही रहातो, पण त्यांच्यासाठी ती मंजे दुधावरची साय. सक्ती बिक्ती जमेल तेवढी आई वडिलच करू शकतात. आजी आजोबा फार कडक राहू शकत नाहीत.

सिरुसेरि's picture

28 Mar 2016 - 9:20 am | सिरुसेरि

सध्या संस्कार वर्ग / संस्कार शिबिरे यांची नितांत गरज आहे .

अत्रे's picture

28 Mar 2016 - 9:40 am | अत्रे

मला वाटतं सोबत अर्थ पण त्यांना समजावून सांगितला तर जास्त इंटरेस्ट येईल।

सस्नेह's picture

28 Mar 2016 - 2:04 pm | सस्नेह

वातात्मजं वानारायुद्ध मुख्यम|
हे असं आहे बहुतेक,
वातात्मजं वानरयूथ मुख्यम |

मदनबाण's picture

28 Mar 2016 - 2:40 pm | मदनबाण

श्रीगणेशाय नमः।
कोपला रुद्र जे काळी , ते काळा पाहावेचिना।
बोलणे चालणे कैचे , ब्रह्मकल्पांन्त मांडला॥१॥
ब्रह्मांडाहुनी जो मोठा , स्छुळ उंच भयानकु।
पुछ्य ते मुर्डले माथा , पावले सुन्यमंडळा॥२॥
त्याहुनी उंच वज्रांचा , स्छुळ उंच भयानकु।
त्यापुढे दुसरा कैचा , आद्भुत तुळणा नसे॥३॥
मार्तंडमंडळा ऐसे , दोनी पिंगाक्ष ताविले।
कर्करा घडिल्या दाढा , उभे रोमांच उठीले॥४॥
आद्भुत गर्जना केली , मेघचि चेवले भुमी।
फुटले गिरीचे गाभे , तुटले सींधु आटले॥५॥
आद्बुत वेश आवेशे , कोपला रण कर्कशु।
धर्म स्थापनेसाठी , दास तो उठीला बळे॥६॥
||श्रीसमर्थ रामदासकॄतं मारुतीस्तोत्रं संपूर्णम||

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तू माझी मँगो डॉली... ;) :- गुरु

टवाळ कार्टा's picture

28 Mar 2016 - 3:10 pm | टवाळ कार्टा

आम्ही लहान असताना घरातील वयस्कर मंडळी (बहुतेकवेळा आजी) दिवेलागणीला आमच्याकडून पर्वचा म्हणून घेत असे.

पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.)

आधीच्या पीढीत बहुतांश लोकांना जर हे सगळे संस्कार मिळाले असतील तर तीच पीढी सर्कारी नोकरीत "जाउ तिथे खाउ" असे का वागायला लागली असे विचारले तर ते धाग्याच्या उद्देशाला मारक होईल का? :)

तर्राट जोकर's picture

28 Mar 2016 - 3:37 pm | तर्राट जोकर

=)) असल्या धागामारक प्रश्नांसाठी आम्ही खास राष्ट्रपाव हा धागा राष्ट्रार्पण केला आहे मालक.

नाखु's picture

30 Mar 2016 - 2:25 pm | नाखु

फार गमतीशीर आहे.श्री श्री रा रा चौराकाका यांनी प्रतिपादलेल्या धर्म-धार्मीक-आस्तीक-सश्रद्ध यांम्ची सरमिसळ केली की असे प्रश्न पडतात.

दुवा एक उठ सुट "सगळ्या बाबांची अंगठ्या/लॉकेट घालणार्या लोकांना खरेच (किमान साईबाबांनी/बालाजीने) चोरिमारी-दरोडेखोरी-बलात्कार करायला सांगीतलेले असते का? तेव्हा त्याचा आणि कृत्याचा काहीही संबध नसताना सरसकट त्या संताना/देवांना नावे ठेवतो.

यात मुद्दाम अलिकडचे (महाली,राजेशाही) संत (?) जमेस धरले नाहीत पण लोक त्या आडूनही रामदास स्वामी/तुकाराम्/गजानन/स्वामी समर्थ महाराजांवर आपली विखारी मते टंकतातच.

या उपरोक्त संतांमध्ये कुणी कुठल्याही साहीत्यात निश्क्रीय रहा,उन्मादी व्हा,त्रास देऊन आणि दडपशाहीनेच मोठे व्हा असे लिहिले आहे का ? नाही तरी त्यांच्याच नावाने निघालेले प्रतिष्ठाण ते मंडळ असे करणार आणि आपण उपहासाने म्हणणार बघा गजानन महाराज/स्वामी यांना का शिक्षा करीत नाहीत.

असो बर्याच वेगवेगळ्या गोष्टी जरी बेमालुमपणे एकत्र केल्या तरी लहानपणी मिळालेली, शिकवण पुढे अंगीकारायची का/पूर्ण विपरीत वागायचे हे ती व्यक्ती ठरविते. आणि व्यक्तीची मते/वागणे स्थल-काल-परिस्थीती सापे़क्ष असतात.आणि बर्याचदा परिस्थीती शरणही असतात.

सोसायटीत आपण वर्गणी दिली आहे तर आरतीला जाऊ असे करणारेही नास्तीक असतात्च तस्मात फक्त काळे पांढरे जग नसून त्या त बर्याच रंगछटा आहेत आणि त्याही बदलत्या राहतात इतकेच.

सश्रद्ध पण कट्टर नसलेला नाखु

तर्राट जोकर's picture

1 Apr 2016 - 2:29 pm | तर्राट जोकर

नाखुशेठ, टका यांचा प्रश्न देवदेवतांवर, संतांवर, त्यांच्यावर ठेवल्या जाणार्‍या श्रद्धांवर प्रश्नचिन्ह वा चिखल उडवणारा नसून असे संस्कार होऊनही नितीमत्तेने वागायचे विसरलेल्या लोकांबद्दल आहे. जर मोठेपणी नितिमत्तेने वागायचे की नाही ह्याबद्दल ती व्यक्ती ठरवते तर मग लहानपणीच्या अशा संस्कारांचा नेमका उपयोग काय असावा?

मला तर वाटतं आपण निखालस ढोंगी असतो, आपले खायचे आणि दाखवायचे दात स्थळकाळपरिस्थिती प्रमाणे बदलतात. जिथे स्वार्थ असेल तिथे संस्कारांची झूल झुगारल्या जाते. आपल्या स्वार्थाला दुसर्‍याच्या स्वार्थामुळे बाधा येत असेल तर त्याग, परमार्थ, संस्कार, परंपरा इत्यादी पुढे करुन दुसर्‍याच्या मनात अपराधभाव निर्माण व्हावा असे उपदेश केले जातात. ह्याचे एक सामान्य उदाहरण म्हणजे प्रेमविवाहाला आईवडिलांकडून होणारा विरोध. अर्थात ह्या उदाहरणाला अनेक पैलू आहेत. पण आपल्या मनाविरुद्ध लग्न करणार्‍या आपल्याच पोटच्या मुला-मुलींच्या हत्या कराव्यात असे संस्कार कसे घडत असतील? सगळे हत्याच करतात असे नाही पण अबोल अढीपासून ते थेट हत्या करण्यापर्यंत अनेक टप्पे ह्यात असतात.

अजया's picture

1 Apr 2016 - 5:06 pm | अजया

+१
सहमत आहे.टका आणि तजोंच्या प्रतिसादाशी!

विजय पुरोहित's picture

1 Apr 2016 - 2:31 pm | विजय पुरोहित

नाखुकाका...
प्रतिसाद झकास...
लोक त्या आडूनही रामदास स्वामी/तुकाराम्/गजानन/स्वामी समर्थ महाराजांवर आपली विखारी मते टंकतातच. अगदी परफेक्ट बोललात...

वरील अनेक स्तोत्रांबरोबरच अठरा श्लोकी गीता आम्ही रोज म्हणत असू.

मराठी कथालेखक's picture

1 Apr 2016 - 2:51 pm | मराठी कथालेखक

पर्वचा म्हणण्याची परंपरा अलीकडे लोपच पावली आहे असे म्हणता येईल (अगदी माझा मुलगासुद्धा हे काही करत नाही आणि घरात आजी-आजोबा नसणे हे कारण त्यामागे असू शकते.)

तुम्हाला असे वाटत असेल की हे श्लोक/प्रार्थना यांचा तुमचे आजचे व्यक्तीमत्व घडण्यात वाटा आहे, तर तुम्ही नक्कीच हे असे म्हणण्याचा तुमच्या पाल्याला आग्रह धरा. पण अर्थ समजून घेऊन म्हणणे जास्त योग्य राहील. मला तरी संस्कृत फारसे समजत नाही आणि या श्लोकांचा अर्थ माहीत नाही. पण शीर्षकावरुन हे एकेका देवाची (गणपती स्तोत्र , विष्णू स्तोत्र, हनुमान स्तोत्र ई) प्रार्थना असल्याचे समजते.
तुम्ही अस्तिक असल्याने मुलावर अस्तिकतेचे संस्कार करणार हे साहजिकच आहे.

मी फार कमी वयात म्हणजे १३-१४ वर्षांचा असताना नास्तिकतेकडे झुकू लागलो. आणि पुढे लवकरच पुर्णपणे नास्तिक झालो. त्या वेळी शाळेत म्हंटल्या जाणार्‍या वेगवेगळ्या प्रार्थनांपैकी साने गुरुजींची "खरा तो एक ची धर्म , जगाला प्रेम अर्पावे" या गीताने मनात वेगळे स्थान निर्माण केले. आणि आजही ते स्थान कायम आहे.

विद्यार्थी's picture

1 Apr 2016 - 8:28 pm | विद्यार्थी

मूळ लेखनाचा मुद्दा आस्तिक किंवा नास्तिकतेचा नसून घरात असणारी वयस्क मंडळी आणि त्यांच्या असण्यामुळे घडणारे संस्कार हा आहे. आता संस्कार म्हणजे धार्मिक असे मला म्हणायचे नसून आपल्या दिनक्रमात शिस्तीचा अंतर्भाव करणे हे आहे. त्यामुळेच वाढत्या वयाबरोबर झालेल्या पाढ्यांच्या अंतर्भावाबद्दल मी लिहिले आहे. ठराविक वेळी झोपेतून उठणे, ठराविक वेळी ठराविक गोष्टी करण्याची सवय घरातील मुलांना लहानपणापासून लावणे हा मुख्य उद्देश मला दिसतो.

आपले व्यक्तिमत्व घडण्यात घरातील प्रत्येक व्यक्तीचा सहभाग असतो आणि तो तसा माझ्याही आहे. श्लोक/ प्रार्थनेचा असो किंवा नसो, शिस्तीचा मात्र नक्कीच आहे.

राहिला मुद्दा अर्थ समजून घेण्याचा, मुलांना प्रत्येक गोष्टीबद्दल फार कुतूहल असते. अर्थ सांगायला आपण विसरलो तरी मुले तो विचारायला विसरत नाहीत :-)

नाखु's picture

1 Apr 2016 - 4:00 pm | नाखु

मला तर वाटतं आपण निखालस ढोंगी असतो, आपले खायचे आणि दाखवायचे दात स्थळकाळपरिस्थिती प्रमाणे बदलतात. जिथे स्वार्थ असेल तिथे संस्कारांची झूल झुगारल्या जाते. आपल्या स्वार्थाला दुसर्‍याच्या स्वार्थामुळे बाधा येत असेल तर त्याग, परमार्थ, संस्कार, परंपरा इत्यादी पुढे करुन दुसर्‍याच्या मनात अपराधभाव निर्माण व्हावा असे उपदेश केले जातात.

+१११ तीव्र सहमत आणि नेमके

बरोबर पण संस्कार(जे काही झाले/केले असतील तर) पुढील जीवनात त्यानुसारच वागायचे का नाही हे ती व्यक्ती ठरवते आणि त्याला अनेक पदर्/पैलु असतात. अन्यथा सर्व शिक्षक्/पुरोहित यांची मुले अगदी सदाचारी/लोकांना मदत करणारी आणि "आदर्श बाळे" होऊन पुढे राष्ट्रकल्याणासाठी झटताना दिसले असते. पण तसे होत नाही तस्मात स्तोत्रे/परवचा/नीती कथा वगैरेने काय करावे किंवा करू नये याचा (फारफार तर) दिशादर्शक/मार्गदर्शक फलक म्हणून उपयोग होईल पण पुढे खड्ड्यात जायचे का अपघात करायचा हे वाहन चालकावर अवलंबून आहे.

लोक साईअबाबांची/दत्ताची तस्बीर (टेबलावरील काचेखाली लावलेली असताना) वट्ट पैसे (पक्षी लाच) मोजून घेताना पाहिलेत.

कंपनी कामामुळे विक्रीकर्/जकात्/केंद्रीय उत्पाद शुल्क्/सांखीकी सर्वेक्षण्/भविष्य निर्वाह निधी सारख्या लोकांना मलीदा द्यायच्या कार्यातला साक्षीदार नाखु.