हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे.
मी हाताच्या फ्रॅक्चरने हनिमुनला जाउ शकलो नाही. ३ महिने घरीच होतो. नंतर का कुणास ठाउक नंतर जमलेच नाही.
आता कुठ कुठ जायाच हनिमुनला
लोणावळा, खंडाळा,
कोल्हापुरचा पन्हाळा,
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
सदाबहार रेखावर चित्रित हे गाणे लागले की अगदी 'जांबुवंत' जमान्यात लग्न झालेल्या लोकांच्या चेहे-यावर सुद्धा स्मित उमटवते. उसासे येउ लागतात. लोणावळा, खंडाळा हरकत नाही. बेंगलोर, गोवा, काश्मिर जरा जास्त लांब प्रवास होतो हनिमुन करिता असे मला वाटते.
खरेदी,देवक्,लग्न्,पाहुण्यांची जेवणे,सत्यनारायणाची पुजा ह्या चक्रात वधु आणि वर गांजलेले असतात. पुजेनंतर लगेच दुस-या दिवशी टू बाय टू बसमधे बसुन बेंगलोर प्रवासाचे प्रयोजन काय? बस वेळेवर पोचली नाही तर हालात आणखी भर. तिथुन परत ७ तास उटी. ह्या प्रवासात बस बहुधा लागतेच. रेल्वेची कुपे सिस्टीम फार कमी गाड्याना राहीली आहे आजकाल. आणि सिझन मधे रेल्वेची हवी असलेली तिकीटे फक्त पूण्यवंतांनाच मिळतात. (इतर प्लॅनींग पण असतेच की) अंगाखांद्याचे (मानेचे, पाठीचे वगैरे वगैरे) धिरडे करुन काय फायदा. तोटाच तोटा. पैशा परी पैसा करुनआणि प्रवासाचा त्रास घेउन काय मिळते. परत डी हायड्रेशनची भीती असतेच. बहुधा नावाचाच हनिमुन होतो. जवळात जवळ जावे हनिमुनला. प्रवासाचा अतिरिक्त त्रास नसल्यामुळे जोडपे कसे फ्रेश रहाते. आणि उटीचे 'बॉटॅनिकल गार्डन" असो वा माथेरान ची बाग असो त्यांना काय फरक पडतो.
अशा वेड्यावाकड्या प्लॅनिंग मुळे फसलेला हनिमुन मला ब्-याच वेळा कानावर आला आहे. नविन लग्न असताना त्याचे काही वाटत नाही. पण साधारण ४ वर्षाने टोमणे द्यायला आणि घ्यायला सोय होते.
जाता जाता: लग्नाची सिल्वर ज्युबिली आणि पहिला हनिमुन 'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' वर करायचे ठरवले आहे. साधारण १ लाख रुपये लागतील. पण अजुन ३ वर्ष हातात आहेत. साठवीन हळु हळू. रॉयल सुट्स असतात म्हणे.
प्रतिक्रिया
14 Jan 2009 - 3:28 pm | परिकथेतील राजकुमार
पुर्वीच्या काळी ज्या ज्या 'कामांकरता' हनिमुनला जायचे, ती सर्व 'कामे' आजकालच्या जमान्यात लग्नाआधीच उरकली जातात असे ऐकले आहे ! तरीही अजुन हनिमुनची क्रेझ टिकुन आहे हे आश्चर्य आहे ;)
अनुभवाची व लग्नाचीही पाटि कोरी असलेला
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
14 Jan 2009 - 8:40 pm | सखाराम_गटणे™
>>अनुभवाची व लग्नाचीही पाटि कोरी असलेला
सहमत.
अगदीत ताबा सुटल्याने अनुभव घेतले तरी नाव पुर्ण पणे पैलतीरी न्यावी.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
14 Jan 2009 - 4:04 pm | झेल्या
"आता कुठ कुठ जायाच हनिमुनला?" हा प्रश्न पाडूनच घेऊ नये..
'जाऊ तेथे हनिमून करू' अस्से धोरण हवे..कशें..?
-झेल्या
मी लिहिलेलं.. (वाचा आणि कळवा आणि इतरांना वाचवा (वाचायला सांगा..)! )
14 Jan 2009 - 7:43 pm | अवलिया
लग्नाची सिल्वर ज्युबिली आणि पहिला हनिमुन 'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' वर करायचे ठरवले आहे. साधारण १ लाख रुपये लागतील. पण अजुन ३ वर्ष हातात आहेत. साठवीन हळु हळू. रॉयल सुट्स असतात म्हणे.
सोवळ्या संपादकांना विनंती
उडवायचे असेल तर पूर्ण प्रतिसाद उडवावा.
अर्धवट प्रतिसादाने काही साध्य होत नाही.
तसेच प्रतिसाद संपादन करतांना व्यक्तिसापेक्षता ठेवु नये ही नम्र आणि जाहीर विनंती
http://www.misalpav.com/node/5515#comment-81994 हे दिसत नाही का?
14 Jan 2009 - 8:23 pm | नीधप
छान लिहिलंय..
'रॉयल पॅलेस ऑन व्हील्स' साठी शुभेच्छा!!
आमच्या 'अविस्मरणीय' हनिमूनची गाथा
http://www.maayboli.com/node/716
या लेखात शेवटच्या भागात वाचा!
नवर्याने आयुष्यभर माझ्याकडून टोमणे आणि बाकीच्यांकडून 'काय ध्यास आहे! वा!!' असं म्हणवून घेण्याची सोय करून घेतली कायमची.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
14 Jan 2009 - 8:37 pm | मुक्तसुनीत
"हनामून"ला अति दूर जाऊ नये हा संदेश पटला. सुरवातीच्या दिवसांमधे दंपतीने आपला वेळ एकमेकांबरोबर जास्त आणि प्रवासात, प्रवासातल्या एकंदर हाणामारीत कमी घालवावा हेच अगदी योग्य.
- लग्नानंतर पत्नीबरोबर महाराष्ट्रातल्या एका थंड हवेच्या ठिकाणी गेलेला :-)
15 Jan 2009 - 10:51 am | नीधप
दोघांपैकी एकाच्याही ओळखीची माणसे भेटण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी मुळीच जाउ नये. लोकांना हनिमूनला आलेल्या कपलला आमच्याकडे जेवायला या असं म्हणताना ऐकलंय मी.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Jan 2009 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
किती जास्त आहे ते बघा आता!
=))
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
15 Jan 2009 - 11:09 am | छोटा डॉन
>>लोकांना हनिमूनला आलेल्या कपलला आमच्याकडे जेवायला या असं म्हणताना ऐकलंय मी.
=)) =)) =))
एकच नंबर, बेक्कार हसलो बॉ ...!
बाकी सल्ला एकदम क्लास आहे ह्यात वाद नाही.
अवांतर : आता मग काय "चंद्रावर " जावे काय हनिमुनला ?
च्यामारी ह्या मिपामुळे लोकसंग्रह एवढा वाढला आहे की जगाच्या कानाकोपर्यात कुठेही गेले तर मिपाकर भेटतीलच. ;)
------
छोटा डॉन
15 Jan 2009 - 11:11 am | अवलिया
बरे जेवायलाच या असे म्हणतात.. रात्री मुक्काम करा असे नाही म्हणत हे काय कमी?
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
15 Jan 2009 - 11:20 am | नीधप
तेही म्हणत असतील..
आमच्या ओळखीचे लोक तेवढे जवळचे नव्हते नाहीतर
'आमच्या गावात येऊन हॉटेलात कसले रहाता?' असंही म्हणाले असते :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
15 Jan 2009 - 11:22 am | नीधप
>>च्यामारी ह्या मिपामुळे लोकसंग्रह एवढा वाढला आहे की जगाच्या कानाकोपर्यात कुठेही गेले तर मिपाकर भेटतीलच.<<
चिंता नसावी. आता ह्या धाग्यानंतर कुणी हे धाडस करणार नाही. नाहीतर इथेच त्याचा किस्सा येईल हे कळण्याएवढा प्रत्येक मिपाकर चाणाक्ष आहेच ना...
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
14 Jan 2009 - 8:46 pm | सखाराम_गटणे™
>>हे प्रकटन फक्त 'कोरी पाटी' करिता आहे. मुंबई स्थित नव दांपत्यांकरिता आहे.
ह्या वाक्यात विरोधाभास नाही काय?
ह्या रेंजमध्ये किती लोक सापडतील?
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
15 Jan 2009 - 11:02 am | विनायक प्रभू
गटणे, आता तुला प्रांतवार 'कोरी पाटी' चा विदा हवा काय?
जेवढे मुंबई तेवढेच पुणे हो ह्या बाबतीत.
पुण्यात सुद्धा तासासाठी मिळणारी हॉटेल्स काय कमी आहेत का?
जेंव्हा गरज लागेल तेंव्हा सांग पत्ते देइन.
15 Jan 2009 - 1:26 am | पिवळा डांबिस
कुठेही बाहेरगावी जाण्यापेक्षा मुंबईतल्याच एखाद्या उत्तम होटेलमध्ये बुकिंग करावं...
खावं-प्यावं, मजा करावी....
(अगदीच खोलीबाहेर पडावसंच वाटलं तर चौपटी आहेच!!:))
15 Jan 2009 - 2:12 pm | बिपिन कार्यकर्ते
'तो' आणि 'ती' चौपाटीवर गेले की 'ते' फार त्रास देतात.
बिपिन कार्यकर्ते
15 Jan 2009 - 2:17 pm | टारझन
सहमत आहे ...
हो ना .. तो टार्या आणि ती जेन एकदा चौपाटीवर गेलेली तर ते बिप्स काका फोन करून किती त्रास देत होते =))
(अवांतर : टार्या आता खातोय फटके .. बिप्स आता मुंबैतच आहेत आणि तु ही )
- तो टार्या
15 Jan 2009 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते
आणि बिप्सशी बोलता बोलता..... थांब तो सगळा संवादच लिहितो इथे.
***
ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग...
टार्या : हॅलो.
बिप्स : हॅलो टार्या, बिपिन बोलतोय. कसा आहेस? पोचलास का भारतात?
टार्या : अरे वा!!! फोन केल्या बद्दल धन्यवाद. मी पोचलो व्यवस्थित. आत्ता मुंबैत आहे.
बिप्स : ओह... जेन बरोबर का? कुठे आहेस?
टार्या : अहो मी चौपाटीवर आहे.
बिप्स : अरेरेरे! सॉरी. डिस्टर्ब केलं. आता काय चाललंय हा प्रश्न विचारतच नाही.... ;)
टार्या : अहो तसं काही नाही. गप्पा मा..... एऽऽ गप ना...
बिप्स : (अति आश्चर्यचकित स्वरात) .... काय झाले रे? काय केलं मी? मला 'गप ना' कशाला म्हणतोस?
टार्या : अहो तुम्हाला नाही म्हणलं हो. ही....
***
पुढचं लिहित नाही. सुज्ञांस कळलेच असेल की 'एऽऽ गप ना' ही प्रेमळ आज्ञा / विनंति कोणासाठी आणि काय निमित्ते होती.
टार्या, खरंच डिस्टर्ब केल्याबद्दल सॉरी हां....
डिसक्लेमर : ह. घ्या. वरील प्रसंग ९९% खरा असला तरी.... :)
बिपिन कार्यकर्ते
15 Jan 2009 - 5:40 pm | अवलिया
हा प्रसंग खरा असेल तर आणि तो खरा असावा असे वाटते, टा-याला समुपदेशनाची गरज आहे.
बाइल असतांना मोबाईल बंद ठेवावा.. समजता नै कुछ !!!!
(अवांतर - पोटदुखीवर जालीम उपाय - हवाबाण हरडे )
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
15 Jan 2009 - 5:42 pm | मैत्र
नाना हे लै भारी..
बाइल असतांना मोबाईल बंद ठेवावा.. समजता नै कुछ !!!!
15 Jan 2009 - 6:09 pm | टारझन
आंवलीयाजी,बिपीनजी,मैत्रजी, आणि सर्व आजी माजी,
आपल्या सल्लायुक्त प्रतिक्रियेबद्दल आभार ......
बाकी आम्हाला पेचात पकडल्यावर बिपीनकाकांच ते पाताळविजयम् छाप हास्य अजुनही काणात वाजतंय ..
आंवलीयाजी ,,,, तो मोबाईल अंमळ बंद/सायलेंटच असतो बरं ...
-- टार्कृष्ण सामंत
तु..झी... आ..ठ...व..ण...ये...ते!!
18 Jan 2009 - 12:29 pm | विजुभाऊ
बाइक आणि बाईल चालु असताना मोबाईल बन्द ठेवावा
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
15 Jan 2009 - 6:01 pm | चतुरंग
टार्या आणि बिपिनभौंची आतषबाजी अंमळ हसवून गेली सकाळी सकाळी!! =)) =))
चतुरंग
15 Jan 2009 - 8:11 am | डॉ.प्रसाद दाढे
वैद्यकीय सल्ला: हनीमूनला लग्नान॑तर साधारणतः दहा दिवसा॑नी जावे तरच काही उपयोग
होतो. अन्यथा प्रयत्ना॑ती अपयश !!
15 Jan 2009 - 9:16 am | पिवळा डांबिस
जनरली, मुंबईतल्या नव-दांपत्याच्या घरी चार ते पाच जण (नवदांपत्य, मुलाचे आई, वडील आणि एखादा भाऊ/ बहीण) रहातात!
प्रायव्हसी मिळण्याची मारामार!!!
अशा वेळी नवदांपत्याने वैद्यकीय सल्ल्यनुसार हे दहा दिवस काय करावे?
(नाही म्हणजे पर्याय बरेच सुचताहेत पण इथे मांडणे प्रशस्त वाटत नाही! :* )
15 Jan 2009 - 10:27 am | अंतरंग....
डॉ. साहेब जरा विस्तारीत करुन सांगता का?
15 Jan 2009 - 12:54 pm | टारझन
बाबो ... हाणा च्यामारी !! प्रभू भौ .. आता युवांचं समुपदेशण का ?
हणिमुण ....बर्याच पब्लिकला अंमळ गुदगुल्या झाल्या असतिल .. आणि बरंच काही झालं असेल हे आम्ही तिसर्या डोळ्याणे पाहु शकतो .. बाकी हनिमुण म्हणजे सहवास पण की फक्त समागम ? जर तसे फक्त समागम णसेल आणि सहवास पण असेल तर ... मग घ्यावी एक बाईक(बाईक शक्यतो चांगल्या कंडिशण मधली पॉवर बाईक असावी, जसे थंडरबर्ड, ऍव्हेंजर किंवा करिझ्मा वगैरे .. जोषात येऊन सीडी१०० , सन्नी ,स्कुटीवर निघू नये ) .. बसवावी बायको मागे .. आणि निघावं सुसाट कुठेही ... निसर्गाच्या साणिध्यात ... २-४ कपल्स संगच निघणार असतील तर ... कँपिंगच सामाण घ्यावं.. मस्त शेकोटी करावी ... मस्त ...
आपल्याला तर बाबा बायको आणि बाईक बरोबर मिळाली तरच खरा आणंद आहे .. त्यामुळे बायकोही तशीच बघून घ्यावी ...
सुचना : सगळीकडे हेल्मेट घालून वावरावे...
(निंजा ६०० घेण्याच्या प्रयत्नातला क्रेझी बाईकर) - टारझन
18 Jan 2009 - 12:31 pm | विजुभाऊ
बाबा बायको आणि बाईक बरोबर मिळाली तरच खरा आणंद आहे .
कोणाचे बाबा बायकोचे की स्वतःचे ?
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
15 Jan 2009 - 3:52 pm | विनायक प्रभू
सगळी कडे हेल्मेट. लय भारी रे टार-या.
15 Jan 2009 - 7:48 pm | ब्रिटिश
आमी हानीमुनला जाताना न येताना राच्ची बस केलती. खड्ड्यांचा पूरेपुर वापर.
हेल्मेट बद्द्ल म्हनाल त रॅपरसकट चाकलेट खावाला आमाला आवरत नाय
मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)