"देवा ते प्रेस नोट झाली का हो तयार?"
"करतोय साहेब"
"ती कॉन्फरन्सची पावती फाडा काय असल ती. पाकीटासहीत प्रेस्नोट देऊन टाका"
"हो साहेब"
"ते आपलं ल्याबराडार कुठं खपलंय? फोटोसहीत कव्हरेज पाह्यजे म्हणाव. नुसती हाडकं चघळाया पाय्जेत"
"सांगतो साहेब"
"ते फाउंडेशनचं काय लागतय का पत्ता?"
"साहेब तेनी बीड ला हायत म्हणं कार्यक्रमाला"
"बघावं का सांगून दादासाहबाकडून?"
"नको साहेब, कव्हरेज तेनीच खातेत, आकडा बी आधीच द्यावा लागतो म्हण"
"राव्ह दे राव्ह दे. आपन हाव हितं. आपनच करायचं"
"हो साहेब"
"ते आमचे शेक्रेट्री कुठं खाजवत बसलेत, पाठवा जरा."
"हो साहेब"
.................
"कामाच्या टायमाला कुठं हिंडता राजे?"
"हाय की साहेब, जरा ते पत्ते लिहून काढीत होतो"
"किती निघालेत?"
"बावीस हायत. आकडा मेन्शन करावा का?"
"नाय नाय. बावीस म्हणजे मोठा खुट्टाय राव, परहेड कमी करावं लागतील"
"मग कसं करावं? चेक तयार करुन घेतो."
"ठिकाय. नावं टाकून ठिवा. फिगर नंतर सांगतो. पाकीटात शिस्तीत पॅक करा. कार्यक्रम होस्तवर फोडू दिवू नका"
" होय साहेब"
"स्टेजचं कसं?"
"ते धाकटे सरकार बघतेत"
"बर बर. पिंट्याकडून मारुन घ्या. तेचे मागचे बी द्यायचेत. सगळं एकदम देऊ म्हणाव"
"हो साहेब"
"बघा जरा तुमीच जाउन, आमचं धाकलं जरा सर्कीट हाय"
"हो साहेब"
......................
"काय म्हणतेत रं?"
काय नाय. ते स्टेजचं"
"कितीला ठरलं?"
"सत्तर "
"आन डिजिटल?"
"डिझाइन पायी थांबलय"
"आर्र काय असातय बे. एक साईड मस्तपैकी फास टाकायचा, हिकडं डोस्क्याला हात लावलेला गडी टाकायचा. खतम"
"हेडलाइन द्या म्हणतेत"
"आर लिहि की, दुश्काळाला साथ, आमचा हात"
"जरा येगळा अर्थ होतय ओ त्यातून"
"अर्थ वाचत नसतेत बे कोण. लिहि कायतर हर्दिक मदत बिदत"
"नुसती दुश्काळ्ग्रस्ताना मदत लिव्ह्तो"
"वेटेज आलं पाह्यजे भौ. जंगी दिसला पाह्यजे बॅकड्रॉप"
"हो साहेब"
"रस्त्यावर दोन होर्डिंग, स्टेजसमोर एक, खांबावर पन्नास. रिक्षावर पन्नास. किती होईल?"
"साठ सत्तरची लेवल हुईल की"
"करा"
"साहेब ते आलेल्यांची उतरायाची कशी करावी व्येवस्था?"
"वरच्या दोन हॉलमधी कर सगळ्याना अॅडजस्ट"
"आमदार हैत त्यादिवशी एसी ला. गोंधळ हुइल."
"बेसमेंटला थांबेव मग"
"हो साहेब"
"ते पेपरच्या जाहीरातीचं झालं का? कीती लागतील?"
"दोन द्यावे लागतील आत्ता"
"करा करा. ते मस्ट हाय बघा"
"ही ताटली बाटली ग्यांग"
"पन्नास दिले साहेब"
"ते चॅनेलचे बोलला का"
"येतय टायमावर. दिलेत तेला बी"
"आपले साह्य्बाचा ड्रेस आन जाकीट?"
"येतय."
"टायमावर फेशेल कराया पाठीव"
"हो साहेब"
"ती अँकर आयटम कोण रे? सांगितला का तिला?"
"ती न्हाय म्हणती आता. दुसरी हाय. मेकपसहीत १५ म्हणतीय"
"देऊन टाक. रौनक नाय येत तेच्याबिगर"
............................
"साहेब ते काय मदत करणारेत असं इचारत आलेत"
"मदतीचा हात हाय तो. मोजत नस्ताव आम्ही सांग"
"न्हाई, संघटनेतर्फे तेनी बी देऊ म्हणतेत"
"काय नको. कारखान्याच्या इलेक्षनला हेनीच मारलेत आपली. आता आपली आपनच गाजवायची"
"स्टेजवर हारगुच्च तरी"
"कोन दिसाया न्हाय पाह्यजे. फकस्त आपन न आपले"
"ते मदत द्यायची ते"
"खाल्लाकडं उभं कर, सत्कार वगेरे आटपले की एकेक सोडायचे"
"ती रडनारी मावशी?"
"ते कॅमेर्याच्या टायमाला तिला आन"
"साहेब ती चेकवर फिगर टाकायची राह्यलीय."
"आता लिव्ह कायतर पाच साहा. टोटल मिळून एकवर जाऊ दिवू नको. ऑलरेडी लै खर्च झालंय"
"हो साहेब. सह्या राह्यल्याती"
"घे कुनाच्या तर. आप्ल्याच पतसंस्थेचा तर हाय चेक."
"हो साहेब"
................................
स्थानिक वार्ताहरः आजच शहरात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात दुष्काळ्ग्रस्त शेतकर्यांच्या कुटुंबियांना मदतीचे वाटप करण्यात आले. ह्या कार्यक्रमास आपल्या शहरातील मान्यवर______
______
______
______
______
______
याच कार्यक्रमाशेवटी बळीराजाप्रती असणारी आपली सामाजिक बांधिलकी अधिक वृध्दिंगत होण्यासाठी सढळ हस्ते मदतीचे आवाहन करण्यात आले.
.................................
प्रतिक्रिया
14 Mar 2016 - 1:38 am | रमेश भिडे
ब्लॅक ह्युमर खूप छान प्रकारे व्यक्त झालेला आहे.
राजकारण कसं केलं जातं हे साध्या संवादांतून नेमकेपणाने मांडलंय.
आवडलं.
(नुसतंच चिडवत नाहीस तर. लिहितोस देखील छान. ती दुसरी येर्टेल वाली बंद आहे काय?)
14 Mar 2016 - 11:13 am | नीलमोहर
उत्कृष्ट लेखन !
'नुसतंच चिडवत नाहीस तर. लिहितोस देखील छान' - अगदी हेच..
16 Mar 2016 - 1:09 am | वैभव जाधव
२
लै भारी लिहिलायस बे अभ्या...!
सगळी गाबडी समोर दिसायली.
17 Mar 2016 - 1:55 pm | अभ्या..
था़ंकू भिडेसाहेब,
येर्टेलवाली स्कीम कस्टमर रिस्पॉन्स नाही म्हणून गुंडाळलीय. ;)
18 Mar 2016 - 12:22 pm | अद्द्या
लिही बे ते.
रिस्पॉन्स कधी पासून बघायला लागला तू?
14 Mar 2016 - 5:52 am | फारएन्ड
हर्दिक मदत, ऑलरेडी लै खर्च झालाय वगैरे वाक्ये खतरनाक आहेत.
कशाबद्दल आहे याचा संदर्भ थोडा पुढे लागतो, त्यामुळे पहिला भाग पुन्हा जाउन वाचला.
14 Mar 2016 - 6:52 am | श्रीरंग_जोशी
संधीसाधू राजकारणावर भाष्य करणारं लेखन आवडलं.
मदत मिळणारे बदलत राहीले तरी संधीसाधू राजकारणी तसेच राहतात व उत्तरोत्तर प्रगती करत राहतात :-( .
14 Mar 2016 - 7:38 am | प्रचेतस
झक्कास.
एकदम मार्मिक भाष्य.
14 Mar 2016 - 7:42 am | अत्रुप्त आत्मा
बादशाही लेखन!
14 Mar 2016 - 7:43 am | अत्रुप्त आत्मा
A1 बादशाही लेखन!
14 Mar 2016 - 8:10 am | एस
साले!...
जाऊ द्या.
एक नंबर लिहिलंय.
14 Mar 2016 - 8:23 am | स्पा
साल्या लय कडू लिवतोस
जबराट
14 Mar 2016 - 8:49 am | मन१
----/\----
14 Mar 2016 - 8:52 am | नाखु
बेणं "आत पुत्तुर" पोचलेल आहे हे माहित होतच, आज पुन्हा कळालं.
एक्दम टांगा पलटी लिखाण..
14 Mar 2016 - 8:58 am | कंजूस
श्रावण मोडक ?
15 Mar 2016 - 12:41 pm | बॅटमॅन
अगदी असेच म्हणतो. लय आतपर्यंत पोहोचलाय अभ्या. मान गये लेका (कितव्यांदा ते देव जाणे). _/\_
14 Mar 2016 - 9:15 am | यशोधरा
जबरी!
14 Mar 2016 - 9:24 am | बोका-ए-आझम
वस्तुस्थिती दाखवणारे लिखाण अभ्याभौ! महानिर्वाण नाटकाची आठवण आली!
14 Mar 2016 - 9:40 am | ज्ञानोबाचे पैजार
धार दार टोकदार आणि चमकदार गोष्ट आवडली.
टाळूवरचे लोणी खाणार्या जमातीचे यथायोग्य चित्रण केले आहे.
पैजारबुवा,
14 Mar 2016 - 9:49 am | नाव आडनाव
.
14 Mar 2016 - 10:12 am | पियुशा
वास्तववादी जबरा चपराकी लेखन एकदम !!!! छान छान तरी कसे म्हणावे :(
14 Mar 2016 - 10:49 am | अनुप ढेरे
चांगलं लिहिलय!
14 Mar 2016 - 11:26 am | सुधांशुनूलकर
किमान शब्दात कमाल परिणाम
संवादशैली आवडली
रमेश भिडे - ब्लॅक ह्युमर खूप छान प्रकारे व्यक्त झालेला आहे.
एस - साले!... - दोघांशी प्रचंड सहमत
14 Mar 2016 - 12:35 pm | पैसा
याला जीवन ऐसे नाव.
14 Mar 2016 - 2:15 pm | राजाभाउ
एक लंबर !!
14 Mar 2016 - 2:29 pm | महासंग्राम
कडक ए कडक … दैनिक महासंग्राम झाल्ली वाचून
14 Mar 2016 - 3:27 pm | चांदणे संदीप
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही कथा पोचली पाहिजे आणि....
"दुश्काळाला साथ, आमचा हात"
हे लोकांना "कळलं" पाहिजे!
Sandy
14 Mar 2016 - 3:48 pm | सस्नेह
राजकारण आणि 'माज'कारण.. जसं आहे तसं उतरलंय...
14 Mar 2016 - 7:34 pm | मराठी कथालेखक
वा वा.. रविवारच्या लोकरंगमध्ये छापायला हवा :)
14 Mar 2016 - 9:26 pm | जव्हेरगंज
ड्यांजर!!
खतराच !!!
14 Mar 2016 - 10:45 pm | आदूबाळ
भारी!
14 Mar 2016 - 10:59 pm | तर्राट जोकर
मुख्यमंत्रीनिधी साठी दिलेले अनेक चेक बाउंस झाले. माध्यमांत नेहमी लांडगा आला रे आला होत असल्याने बातमी आली तेव्हा हे चेक मुख्यमंत्रीनिधीतून दिले आणि बाउंस झाले असा समज झाला. खरेतर अनेक मोठ्या नेत्यांनी असे मोठ्या रकमेचे चेक मुख्यमंत्री मदत निधीसाठी तोंडदेखल्या कार्यक्रमात उदार हस्ते देतोय असा आव आणला, नंतर चेक बाउंस झाले ते कुठे बाहेर येणार? साहेबांनी शेतकर्यांसाठी मदत दिली याची डिजिटल दवंडी पिटायला कार्यकर्ते मोकळे. अभ्या.. यांना विचारतो, ह्या डिजीटल दवंडीचे तरी पैसे मिळतात ना नीट?
17 Mar 2016 - 1:57 pm | अभ्या..
पोलिटिकल दवंडी आटपली साह्यबा. होइना आपल्याच्याने ते. :(
कमर्शिअल करतो फक्त.
14 Mar 2016 - 11:12 pm | आनंदयात्री
लेख आवडला. पंचेस अगदी मार्मिक आहेत.
14 Mar 2016 - 11:39 pm | आनंद कांबीकर
एक नंबर लिवलय भौ!
आता एखादं डिजिटल बॅनर बी टाका
"दुश्काळाला साथ, आमचा हात"
15 Mar 2016 - 12:09 am | डॉ सुहास म्हात्रे
येक लंबर ! बाकीचं राहूंदे, असं काही लिहीत जा !
15 Mar 2016 - 12:21 am | मी-सौरभ
मस्त टोकदार लिहिले आहेस
15 Mar 2016 - 10:10 am | वपाडाव
हातात कला अन पेनात तागद हय तुझ्या !!!
15 Mar 2016 - 11:23 am | प्रचेतस
क्या बात...क्या बात...!
अभ्याच्या लेखणीनं वप्याला खेचून आणलं जणू मिपावर.
15 Mar 2016 - 12:15 pm | नाखु
"हस्तीदंती" हूच्चभ्रू न होता दर्दी आणि कौतुक करायला अजिबात न लाजणारा आहे हे पुन्हा सिद्ध झाले.
धन्यावाद वप्या !!!
15 Mar 2016 - 11:04 am | मुक्त विहारि
लेख आवडला.
15 Mar 2016 - 12:04 pm | भीडस्त
उत्सवी समाजसेवा ...
रग लावणारं लेखन.आवडलं
ताटली बाटली ;)
15 Mar 2016 - 9:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी
अभ्या सेठ लय भारी.वास्तव मांडलय.
15 Mar 2016 - 9:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगलं लिहिलंय. लिहित राहा.
-दिलीप बिरुटे
15 Mar 2016 - 9:22 pm | प्रदीप साळुंखे
अप्रतिम
16 Mar 2016 - 10:06 am | मदनबाण
मस्त...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-विकिपिडीया पे चेक कर ले, गुगल तू सर्च कर ले, बेबी जरा लुक अराउंड कर ले...नैयो मिलेगा ऐसा यार सोणिये...इक नंबर. इक नंबर. इक नंबर... :- Sanam Teri Kasam
16 Mar 2016 - 10:45 am | साहेब..
वास्तववादी जबरा चपराकी लेखन एकदम !!!!
17 Mar 2016 - 10:24 am | रातराणी
बेक्कार लिहलयस रे :(
बेक्कार म्हणजे लयच खुपनार या अर्थी. क्रुगैसन.
_/\_
17 Mar 2016 - 10:31 am | सतिश गावडे
लेख आवडला. पुढील लेखनास शुभेच्छा !!
17 Mar 2016 - 11:57 am | प्रमोद देर्देकर
+१
17 Mar 2016 - 12:54 pm | भिंगरी
+++१११
17 Mar 2016 - 12:58 pm | आतिवास
मस्त उतरलंय लेखणीतून.
लिहिते राहा ..
17 Mar 2016 - 2:03 pm | अभ्या..
आणी पन्नासावा सत्कार माझा मीच करुन घेतो. एक कोरा विनासहीचा चेक घेऊन. ;)
सर्व वाचकांचे मनापासून आभार. हे काही अगदी श्रेष्ठ दर्जाचे लिखाण नाही. मला वाटले, दिसले, खुपले, जाणवले ते शब्दात मांडायचा प्रयत्न केला. प्रतिसादभिशीच्या धुळवडीत देखील कथेला ५० प्रतिसाद मिळाले. मला तेवढे बस्स आहेत.
पुनः धन्यवाद.
18 Mar 2016 - 12:05 am | जुइ
लेख आवडला खूप मार्मिक भाष्ये केले आहेस. या वरून पाहिलेला
एक हजाराची नोट सिनेमा आठवला.
18 Mar 2016 - 1:22 am | भरत्_पलुसकर
जिकलस गड्या!
18 Mar 2016 - 6:14 am | एक एकटा एकटाच
जबरदस्त लिहिलय
18 Mar 2016 - 12:25 pm | अद्द्या
शेट
पोचलं आत पर्यंत.
मस्त